Touch - Unique Features (Part 21) books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 21 )

किसीं के लिये दर्द
तो किसीं के लिये दुवा है
माना की कुछ जखम दे जाती है मोहब्बत
फिर भी सभीने माना तो उसको खुदा है

नित्या सकाळी उठली आणि लगेच हातात मोबाइल घेतला व नोटिफिकेशन चेक करू लागली ..नोटिफिकेशन नव्हते पण सारांशचा मॅसेज मात्र आला होता ..तिने मॅसेज ओपन केला ..

📱 गुड मॉर्निंग डिअर ..

रात्रभर विचार करत होतीस ना मी बोललो त्याचा ..वेडीच आहेस !!.इतकाही विचार करू नको ..जगाचा इतका विचार करतेस म्हणून त्यांच्याच गोष्टीत हरवून बसतेस ..तुला वाटलं असेल ना किती फिलॉसॉफीकल आहे हा !! तर मॅडम तस बनाव लागत नाही तर मुली लट्टू कशा होणार बर माझ्यावर!!... हो पण हे तितकंही सोपी काम नाही ..मुली या इमोशनल नक्कीच असतात पण त्या सहसा कुणाकडे खुलत नाहीत आणि एक पुरुष त्यांच्या भावना समजून घेतो याच विश्वासाने त्या स्वतःचे दुःख एक मित्र , एक गाईड म्हणून शेअर करतात मग तू त्यांना गंडवतेस म्हटलं तरी आनंदच ..कारण मला जे स्त्रियांच मन वाचायला , त्यांचे भाव ओळखायला मिळालं आहे ते अजून कुठल्याच पुरुषाला मिळालं नाही ..त्याचा अभिमानच आहे मला..

खुले कळी जशी हिरवळ रानात
मुक्तछंद दवबिंदूचा जसा स्पर्शात
भावना खळाळून वाही शांत नदीप्रमाणे
सारे गुण भेटे मला एक स्त्रीत ...

नित्याने मॅसेज वाचला आणि मनातल्या मनात विचार करू लागली ..त्याचे शब्द जणू थेट तिच्या मनात पोहोचत होते ..आणि मनातल्या मनात म्हणू लागली , " कस कळतं रे तुला हे सर्व!! ..कसे ओळ्खतोस सर्वांचे मन , त्यांच्या भावना की काही विशेष गुण घेऊन जन्माला आला आहेस ..तू जर एका स्त्रीचे मन इतक्या सुंदर प्रकारे जाणून घेऊन शकतोस तर मग इतर सर्व पुरुष ( मृन्मय सारखे ) साधा प्रयत्न पण का करू शकत नाहीत ? ...जर ह्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यानी येणाऱ्या पुरुषांनी समजून घेतल्या तर?... पण अस होणार नाही कारण त्यांना स्त्रियांसमोर झुकन परवडणार नाही..नाही तर लोक त्यांना म्हणतील ना बायकोचा गुलाम झाला आहे ...शेवटी बायकोपेक्षा समाजाचे बोल त्यांना जास्त प्रिय आहेत ..."

ती विचारत हरवलीच होतीच की बाहेरून मावशीने आवाज दिला तेव्हा ती भानावर आली आणि स्वतःच्याच डोक्याला हात मारत म्हणाली , " जे शक्य नाही त्याबद्दल विचार करून काय मिळणार नित्या मॅडम ? ...पुरुषांना सुधारण्याच्या कामात कोण लागेल आणि ते शक्य तरी आहे का ?"

नित्या काही क्षण स्वतःच्या विचारावरच हसत होती ..आज तिने दुःखातही हसू शोधले होते..नाही तर त्याच दुखाना तिने अश्रू बनवून घेतले होते ..तिने हसू आवरत खाली बघितले ..मोबाइल तर हातात होता पण तिने सारांशला रिप्लाय केला नव्हता ..तेव्हा त्याला मॅसेज करत म्हणाली

📱गुड मॉर्निंग

नाही रे तू काहीही विचार करतोस ..मी तर मस्त झोपले रात्री ..कशाला विचार करायचा बर तुझ्या बोलण्याचा ..लेखक लोक वेडे असतात केव्हा मलाही वेड करून सोडशील काय माहिती ? ..तेव्हा तुझ्या शब्दांपासून दूर राहिलेलंच बर ..

नित्या जरा गमतीच्या स्वरात म्हणाली ..ती त्याच्या उत्तराची वाट पाहत होती पण बाहेरून मावशीचा आवाज येत असल्याने तिने मोबाइल ऑफ केला आणि फ्रेश व्हायला बाहेर गेली ..सर्वाना चहा नाश्ता दिला ..काकांना टिफिन दिला आणि स्वतः नाश्ता करू लागली ..थोडासा फ्री वेळ होता म्हणून पुन्हा मोबाइल हातात घेतला तेव्हा त्यावर सारांशचा मॅसेज येऊन होता ..तिने वाचायला सुरुवात केली

📱 चल झुटी !! नक्कीच विचार करत असणार ..जादू आहे लेखकांच्या शब्दाची त्यातून बाहेर पडण शक्य नाही ..तुला तरी ते शक्य नाही ?

जितना दूर रेहना चाहोगे हमसे
उतना ही नजदिक चले आओगे
ये असर है खुद मे ही गुम करणे वाले लफजो का
उन्हे खुदसे कैसे झुटलाओगे...

नित्या त्याच्या गोष्टीवर हसली..शायरी वाचून तर ती मनातून खुश झाली होती ..तिला त्याला बरच काही बोलायच होत पण तिने त्याला क्रॉस केलं नाही ..उलट विषय वळवत म्हणाली ,

📱 ते सोड मला सांग इतके दिवस झालेत तू साहित्य का टाकत नाहीस ..किती वाट पाहायची बर आम्ही वाचकांनी ? ..

तिचा मॅसेज जात नाही तोच समोरून मॅसेज आला

📱वाचक वाट पाहत आहेत की तू ? ..

नित्या त्याचे पाहिले शब्द वाचून जरा गांगरलीच होती ..तिला काय उत्तर देऊ तेच कळत नव्हतं पण पुन्हा पुढच्याच क्षणी त्याचा पुन्हा एक मॅसेज आला

📱मला तर कुणी वाचकाने मॅसेज केला नाही तसा ..आता फक्त तू म्हणत आहेस ..तुला वाटत तसा मी नाही गंडवत मुलींना नाही तर मॅसेज आले नसते का त्यांचे ?

..ती त्याच्या शब्दात अगदीच फसली होती पण पुढचे शब्द वाचून जरा ती रिलॅक्स झाली आणि स्वतःला सावरत म्हणाली,

📱ए चल नौटंकी !! सर्वच मॅसेज करतील असतील तुला आता तुला सांगायचं नाही ते वेगळं आणि राहील तुझं उत्तर ..वाचक म्हटल्यावर मी येणारच ना त्यात ? ..

सारांशही आज तिची तिची फिरकी घेण्याच्या मूड मध्ये होता तो लगेच म्हणाला ,

📱इतरांच माहीत नाही पण तू म्हणणार असेल तर नक्की लिहीन ..सांग लिहू का कविता ?

नित्याला त्याच अस बोलणं फार आवडून गेलं होतं पण तरीही खडूस बनत तिने त्याला विचारलं ..

📱हा..हा..हा..किती फ्लर्टी आहेस रे !! माझ्याशीच फ्लर्ट करतोस की सर्वांसोबत ..

सारांश आधीच गमतीच्या मूड मध्ये होता त्यामुळे त्याने लगेच रिप्लाय केला

📱नॉट विथ ऑल पण ज्यांच्याशी बोलतो त्या सर्वांशी करतो ..फ्लर्ट के सीवाय जिंदगी मे रखा ही क्या है डिअर ..

त्याच्या बोलणं नित्याच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला हसू आणत होत आणि विशेष म्हणजे त्याला ते दिसणारही नव्हतं ..आता नित्याही मस्तीच्या मूड मध्ये आली ..आणि म्हणाली

📱मग किती पटल्या रे आजपर्यंत!!

आणि तो लगेच उत्तरला ..

📱आजपर्यंत एकही नाही पण तुला पाहून वाटत आहे की आता माझी खिचडी बनू शकते ..जमलं तर लवकरच प्रपोज करेन ..

नित्या त्याचे मॅसेज एकूण गालातल्या गालात हसू लागली होती ..तो पहिलाच होता जो तिच्याशी इतका फ्री बोलत होता आणि ती त्याला उलटून काहीही म्हणत होती अन्यथा दुसर कुणी असत तर कदाचित ती त्याच्यावर ओरडलीच असती ..आणि ती पूढे म्हणाली ..

📱हा ....हा.....हा .....पण तुला माझं वय किती आहे कुठे माहिती आहे ? मी जर तुझ्यापेक्षा मोठी असेल तर ?

क्षणभर ती त्याच्या मॅसेजची वाट पाहत होती पण उत्तर आलं नाही हे पाहून पून्हा तिनेच मॅसेज केला

📱काय झालं घाबरलास की काय ?

दोन मिनिटं गेले आणि समोरून त्याने रिप्लाय केला

📱सॉरी थोडं कामात होतो ..हँ ...काय म्हणालीस ..जर तू मोठी असलिस तर ? तर काय झालं मोठ्या लोकांना कुणी प्रपोज करत नाही की काय ..तस पण मुलगी मोठी असली की समजूतदार असते आणि मी आधीच आहे थोडा खोडकर !! ..तेव्हा तू प्रत्येक वेळी समजून घेशील..एखाद्याला इतका सुंदर पार्टनर मिळणार असेल तर कुणी का प्रपोज करू नये ..मला आणखी काय हवं बर...

त्याच उत्तर एकूण तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे वारे वाहू लागले होते..त्याच उत्तरही तिला फार आवडल पण त्याची मज्जा घ्यावी म्हणून पुन्हा म्हणाली

📱समजा मी लहान असेल तर ?

त्यानेही ताबडतोब रिप्लाय केला

📱लहान असेल तर ? प्रपोज करायचं काम माझं पण तिला वेळ देईल योग्य निर्णय घेण्याचा आणि तू जो निर्णय घेशील तो मान्य ..तोपर्यंत वाट पाहीन ..

📱नॉट बॅड हा सारांश .....म्हणून मुली लवकर इम्प्रेस होतात बघ तुला ..नित्या

सारांश हसायचं सिम्बॉल सेंड करत म्हणाला ,

📱 तू झालीस का इम्प्रेस ..?

नित्या त्याच्या बोलण्यावर हसत होती ..पण त्याला तिच्या मनातले भाव कळू द्यायचे नव्हते म्हणून ती म्हणाली

📱इतर मुलींसारखी मी इतक्या लवकर फसणार नाही हा तुमच्या शब्दात लेखक साहेब !!..बर आणखी एक सांग मी आजीबाई असेल तर ..

सारांश जणू याच प्रश्नांची वाट पाहत होता ..तो लगेच उत्तरला

📱मग तर नक्कीच प्रपोज करेन ..कुठल्याही अपेक्षेविना प्रपोज करण्यात जास्त मज्जा ..शिवाय आजीबाईसोबत तिला आधार देऊन तिच्यासोबत तासंतास गप्पा मारण्याची मज्जाच वेगळी ..तुला नाही कळणार तिला प्रपोज करण्याची मज्जा ?...

त्याच प्रत्येक उत्तर तिच्या मनाला लागून जात होतं जणू तो तिच्या प्रत्येक भावनांना अलगद समजून घेत होता ..तिला अस का होतंय ते कळत नव्हतं ...तिने घड्याळात बघितलं तर अर्धा तास होऊन गेला होता ..बरीच कामही अजून बाकी होती त्यामुळे त्याला मॅसेज करत म्हणाली

📱 पुरे झाली हा गंमत म्हणे आजीबाईला प्रपोज करणार !! .. तरीच म्हणते की मुली गंडतात कशा जादू आहे शब्दात तुमच्या लेखक महाशय !! बर ऐक मला फार उशीर होतोय काम आवरते आधी नंतर बोलू ..आणि हो मला आवडेल तुझी कविता वाचायला ..बाय

तिने त्याच्या उत्तराची वाटही न पाहता मोबाइल ठेवून दिला आणि कामाला लागली

आज तिला आवरायला उशीरच झाला होता ..नित्याच जेवण झालं तेव्हा दुपारचे 3 वाजले होते तर दुपारी तिला लायब्ररीमध्ये पुस्तक परत करायचे असल्याने तिने मोबाईल बघितला नव्हता ।.बाहेरून परतली आणि थकून असल्याने बेडवर पडताच तिला झोप लागली ..सायंकाळच जेवण आवरण या सर्वात तीच लक्ष मोबाइलकडे नव्हतच ..रात्रीच जेवण आवरलं आणि सुमारें रात्रीच्या साडे दहाला ती सर्व आवरून बेडवर शांत पडली आणि तिने मोबाइल हातात धरला ..लगेच तिने अँप ओपन केले पण त्यात तिला सारांशचा मॅसेज दिसला नाही त्यामुळे ती खजील झाली आणि नोटिफिकेशन चेक करू लागली ।.नोटिफिकेशन चेक करताच लक्षात आले की त्याने आज कविता टाकली आहे ..तिने घाई घाईतच कविता ओपन केली ..कवितेच शीर्षक होत .." तेरे लिये " ते शीर्षक जणू तिच्यासाठीच होत या उत्साहाने तिने कविता वाचायला घेतली ..संपूर्ण नजर तिची त्या ओळीवर केंद्रित झाली होती आणि जणू ती त्या कवितेचा भाग झाली ...

तेरे लिये

सुकून मिला है मुझको
तेरे शब्दो मे बेहकर
तुम कुछ केहते नही
फिर भी जाण लेता हु तुझको अकसर |

ये प्यार भरी बाते , ये नजमे
ये गजल , शायराणा अंदाज
सब कुछ तो तुमसे जुडा है
मै अधुरा हु तेरे बिन
ये अल्फाजो मे हमने पढा है |

मैने जाना है आज पेहली बार
दिलं से दिलं जुडणे का सफर
तुम हो तो लगे है जैसे
कुछ ना बचा तुझको पाकर |

भरलू बाहो मे तुझको इकबार
ये ख्वाब हर रोज जेहेन मे आता है
तेरी इक हसी को सूनने
दिलं- ए- नादान खिचा चला जाता है |

कुछ नही अब हाथो मे मेरे
सब कुछ तो तुम्हारा है
लोग अकसर मेरे शब्दो मे धुंडे
इन पंक्तीत्यो पे हक किसका है |

मै भी बैठकर अकेले मे
उलझा हु तेरी पहेली मे
दिलं धडककर जवाब दे गया
तुम तो बसि हो मेरी धडकन मे |

हसकर युही कलम से बोल बैठा
क्यू ना ये एलान कर दु
मोहब्बत तुम्ही को मानी है
आज ये इजहार कर दु |

कलम हस पडी मेरी बाते सूनकर
केहणे लगी , तुम तो कभी ऐसें ना थें
जरूर कुछ तो होगा उसकी अदाओमे
जो उस्के लिये अपणे दिलंसे लढ बैठे |

अब क्या कहू मैं कलम से की
उससे जुडकर हम , हम ना रहे
मोहब्बत जाण के तो नही की
फिर भी उससे केहना है ये जिंदगी है सिर्फ तेरे लिये
ये जिंदगी है सिर्फ तेरे लिये
सिर्फ तेरे लिये.....

नित्या थोड्या वेळ त्याच्या शब्दातच हरवली होती ...कविता वाचून जणू तिचे डोळे पाणावले होते ..डोळे पुसून तिने त्याला मॅसेज केला ..

📱 खूप सुंदर होती तेरे लिये ..खरच प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जिच्यासाठी आपण सर्व काही करु शकतो ..जिच्यासाठी जीव द्यायला तयार होतो ती व्यक्ती किती खास असते हे इतरांना कळणार नाही फक्त त्यांनाच कळते ज्यांनी निस्वार्थ प्रेम केलंय आणि करत आहेत..मान गये यार तुझे ..खरच तुझ्या शब्दात जादू आहे!!

तिने मॅसेज सोडून पंधरा मिनिटे झाली होती पण त्याचा काही रिप्लाय आला नाही ..तिला वाटलं तो ऑनलाईन नसेल म्हणून मग तिने त्याच्या मॅसेजची वाट सोडून दिली आणि कवितेवर आलेल्या प्रतिक्रिया वाचू लागली ...जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात तो किंवा ती असते आणि प्रतिक्रियेमध्येदेखील लोक त्यांच्या त्या खास व्यक्तीबद्दल भरभरून लिहीत होते .. मॅसेज वाचून तिचा कंठ दाटून आला होता कारण याबाबतीत ती सदैवच कमनशिबी ठरत आलेली होती..म्हणतात ना की जेव्हा आपल्या आयुष्यात कुणी खास नसत तेव्हा आपण त्यांना इतरांत शोधू लागतो म्हणून ती एक एक प्रतिक्रिया मन लावून वाचू लागली ..वाचता वाचता ती खाली आली त्यात तृप्ती नावाच्या मुलीने प्रतिक्रिया दिली होती आणि जवळपास त्यावर 10 ते 15 रिप्लाय दोघांचे आले होते ..ते असे काय बोलत आहेत हे पाहायला तिने त्यांचं संवाद वाचायला सुरुवात केली ..

📱किती सुंदर कविता आहे .." तेरे लिये " अस वाटत की तोही माझ्या आयुष्यात यावा ..यावा काय आलाच आहे फक्त त्याला सांगायचं आहे ..हिंमत होत नाही रे ..पण तू कुणासाठी लिहिली आहेस ही कविता ते तरी कळू दे ..#तृप्ती

📱कुणासाठीच नाही ग ..कवीला व्यक्ती समोर असो व नसो कविता सुचतात ..माझ्यासाठी सर्वच स्पेशल आहेत ..#सारांश

📱 तरीही असेल की एखादी खास जिच्यासाठी ही कविता लिहिली आहेस ..सर्वच खास आहेत मग त्या खास मध्ये मी येते का ? #तृप्ती

📱 कविता आपण आपल्या खास व्यक्तीला डेडीकेट करत असतो आणि सर्व वाचकही माझ्यासाठी खास आहे तेव्हा ही कविता सर्वांसाठी आहे ....#सारांश

📱मग मी ही कविता माझ्याच साठी आहे असं समजू का 😉#तृप्ती

📱 हो मॅडम समजा मला काय फरक पडतो त्याने ..कविता एक असली तरी त्यात प्रत्येक व्यक्तीला आपला खास व्यक्ती दिसत असतो ..#सारांश

📱पण मला फरक पडतो ना !! कारण डॅमईट आय लव्ह यु ..जेव्हापासून तुझे शब्द माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून मी नव्याने स्वतःला ओळखू लागले ..याआधी अस कधीच झालं नव्हतं ..आता हे जीवन फारच सुंदर वाटू लागलय फक्त तू हवा आहेस मला ..विल यु मॅरी मी प्लिज ? # तृप्ती

तिचा शेवटचा मॅसेज वाचून नित्याला काय झालं माहिती नाही ..आतापर्यन्त आनंदात असणाऱ्या नित्याचा अचानक मूड ऑफ झाला आणि तिला सारांशचा राग येऊ लागला ..कारण तिने मॅसेज केले तेव्हा त्याने रिप्लाय दिला नाही पण तो त्या तृप्तीशी बोलतोय हे बघून तिला फार वाईट वाटत होतं ..तीच आता वाचनात मन लागत नव्हत म्हणून तिने मोबाइल बंद केला नि बेडवर पडली ..अर्धा तास झाला होता तरी नित्याला आज झोप लागत नव्हती ..ती बेचैन झाली होती पण का याच उत्तर तिला माहिती नव्हती ..तिने एकदा पुन्हा मॅसेज चेक केले तेव्हा त्याचा मॅसेज येऊन होता पण नित्याने मॅसेज बघून सुद्धा रिप्लाय दिला नाही ..तिने मोबाइल बंद केला आणि झोपायला गेली ..तरीही तिला झोप येत नव्हती ..सतत तिला तृप्तीचे मॅसेज दिसत होते ..आणि ती बेचैन होऊ लागली ..तिच्यासोबत अस याआधी कधीच झालं नव्हतं पण आज घडत होतं आणि तिला काय होतंय हे तिलाच कळत नव्हतं ..

बेचैन हु मै क्यु आज
किसीं के नाम से तेरा नाम जुडता देखकर
रिषता तेरे मेरे बिच कुछ भी तो नही
फिर भी क्यू आंखे नम है किसीं और की बाते पढकर

क्रमशः....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED