Touch - Unique Features (Part 22) books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 22 )


कुछ अजीब सी
पहेली बन गयी हु मै
चाहती हो तुझसे दूरी बनाना
पर मेरी चाहतही मेरे खिलाफ है

तृप्तीचे संवाद वाचल्यावर नित्याला अचानक काय झालं माहिती नाही ...तिने तो प्रकार घडल्यानंतर त्याला दोन तीन दिवस मॅसेज केलेच नाही ....सारांश रोज तिच्याशी बोलण्याच्या आशेने ऑनलाइन यायचा नि मॅसेज करायचा पण ती मॅसेज पाहून सुदधा उत्तर देत नव्हती..तीच लक्ष सतत त्यांच्या मॅसेजकडे जायचं आणि ती बेचैन व्हायची ..तिला आपल्यासोबत हे अस का होतंय तेच कळत नव्हतं ..ती त्या रात्री एकटीच बसून होती ..तीच मन काही लागत नव्हत म्हणून विचार करत बसली ..तिने स्वतःलाच प्रश्न विचारला , " नित्या तू आधी तर अशी नव्हतीस मग अचानक तुला अस काय झालं ..तृप्तीचे मॅसेज वाचून ती त्याच्यावर इतकं का चिडली आहेस ..तो आहेच इतका मनमिळावू की कुणीही त्याच्या प्रेमात पडेल मग त्यात त्याची काय चूक ? तू का बोलत नाहीये त्याच्याशी की तीच सारांशवर प्रेम आहे हे ऐकून चिडली आहेस ..तो त्या दोघांचा प्रश्न आहे , पण तू का स्वतःला त्रास करून घेत आहेस आणि पर्यायाने त्याला शिक्षा का ? ..मी का अशी वागतेय ? मी का त्याच्याबद्दल इतकी पजेसीव होतेय की मीही त्याच्यावर प्रेम ? ..नाही ......नाही .......मला फक्त त्याच्याशी बोलायला आवडत ..त्याच्या कविता आवडतात ..त्याचा स्वभाव आवडत जातोय पण हे सर्व प्रेम थोडी आहे ....तर क्षणात दुसरा विचार तिच्या मनात आला मग हे नक्की प्रेम नाही तर काय आहे ? ..का त्याचे शब्द मला माझे वाटतात..त्याचे शब्द जणू माज्यासाठीच आहे असे वाटते आणि मी त्याच्यात हरवत जाते ..त्याच्याशी बोलतानाही भान राहत नाही म्हणजे मी त्याच्याकडे आकर्षिल्या जातेय ..हे देवा !! काय करत आहे मी ..मी प्रेम वगैरे कस काय करू शकते तेही अशा व्यक्तीसोबत ज्याला आपण ओळखत नाही ..हे चुकीच आहे नित्या ..तुला प्रेम करण्याचा अधिकार नाही ।.तुला सावराव लागेल स्वतःला ..सावराव लागेल .."

ठानकर आयी हु फिर से
तुझसे अब जुडना नही
लिखी है खुदा ने किसमत ऐसी
जो मै सोचती वो कभी होता नही

नित्याने त्याच्यापासून दूर रहायच ठरवलं होतं पण ते तितकं सोपं नव्हतं कारण नित्या मनाने सारांशशी जुळली होती ..दोन तीन दिवस आणखी गेले ..आता स्वतः सारांशने तिला मॅसेज करणे बंद केले होते ..ती रोज इनबॉक्स बघायची पण त्यात त्याचा मॅसेज नसायचा ..खर तर ते तिच्यासाठी योग्य होत पण तरीही त्याच्या न बोलण्यानेसुध्दा तिला त्रास होऊ लागला ..ती एका भोवऱ्यात फसत चालली होती जिथे तीच डोकं म्हणत होत की त्याच्याशी बोलणं योग्य नाही आणि मन म्हणत होत की हा तोच आहे ज्याची तू आयुष्यभर वाट पाहत होतीस ..जो तुला क्षणात हसवू शकतो आणि ज्याच्या नसण्याने तुझ्या डोळ्यात अश्रू येतात ..तिने दोन तीन दिवस त्याच्याविना राहण्याचा प्रयत्न केला पण तिला ते शक्य झालं नाही आणि न राहवून तिने त्याला मॅसेज केला ..

📱 सॉरी रे तब्येत बरी नव्हती ..मी तुझे मॅसेज आताच बघितले ..

तिने मॅसेज केला पण त्याचा काही रिप्लाय आला नव्हता ..ती सकाळपासून त्याचा मॅसेज येईल या आशेने मोबाइल बघत होती पण मॅसेज काही येईना ...ती काम करत असताना त्याच्यासाठी बेचैन होत होती ..आपण त्याला गमावल तर नाही ना या भीतीने ती क्षणाक्षणाला मोबाइल बघत होती पण त्याचे मॅसेज काही आले नव्हते .आता ती स्वतःवरच रागावली होती ..तिच्या हट्टीपणाने तिने त्याला गमावल असा समज होऊन ती निराश झाली ..दिवसभर काम करून थकल्यावर ती रात्री बेडवर पडली ..रात्री पुन्हा एकदा तिने मॅसेज चेक केला पण त्याच उत्तर आलं नव्हतं ..तिचा नाईलाज होता म्हणून मग पून्हा तिने तृप्तीचे मॅसेज पाहिले त्यात अजूनही सारांशने उत्तर दिलं नव्हतं ..कितीतरी तेच ते वाचून झाल्यावर ती कंटाळून झोपी गेली
...

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नित्या उठली आणि मोबाइल चेक केला तर त्यावर त्याचा मॅसेज होता ।...त्याचा मॅसेज बघून तिचा चेहरा बऱ्यापैकी खुलला आणि तिने मॅसेज ओपन करून बघितला ..

📱 सॉरी डिअर मी काल बाहेर होतो त्यामुळे रात्री online आलो नाही ..तू आता ठीक आहेस ना ? ..औषध वगैरे घेतलंस का ? # सारांश

त्याचा मॅसेज पाहून ती आधीच खुश झाली विषेश म्हणजे त्याचे काळजीयुक्त शब्द वाचून तिला आणखीच आनंद झाला ..

📱 हो मी ठीक आहे ..मला काय झालं बर ..

आज रविवार असल्याने दोघेही कितीतरी वेळ गप्पा मारत होते ..नित्या आज पुन्हा त्याच्याशी गप्पा मारण्यात रंगली होती आणि त्याच्याशी बोलताना जणू हे विसरूनच गेली की आपल्याला त्याच्यापासून दूर रहायच आहे ..ते सतत दोन तास बोलत होते ..त्यानंतर विषय वळवत नित्या म्हणाली

📱 बाय द वे भारी आहे तुझी फॅन ..काय डेरिंग आहे बॉस ..चक्क सर्वांसमोर प्रपोज केलं तिने ..सर्वानाच नाही जमत हँ एवढं !!

📱 हा थोडी नटखट आहे ती ..मी ओळखतो तिला आणि डेरिंगच काही विचारूच नये ..ती कुटून कुटून भरली आहे तिच्यात ..हा पण ती अस काही म्हणेल याबद्दल माझी खात्री नव्हती ..# सारांश

📱लकी हा सारांश !! मी वाचले तुमचे मॅसेज तू कविता पोस्ट केलीस..मी तुला मॅसेज केला पण तू उत्तर दिलं नाही तेव्हा प्रतिक्रिया वाचू लागले आणि त्यात तुमचे मॅसेज दिसले ..खूप हसले तेव्हा मी ..बाय द वे तू तिला रिप्लाय का दिला नाहीस रे ..#नित्या

📱काय देऊ उत्तर ..ती लग्न कर म्हणाली तर ? आताही मस्तच आयुष्य सुरू आहे उगाच लग्न नावाच्या बंधनात का अडकायच बर !! ..आणि लग्न अशी एक कमिटमेंट आहे ज्यात एकदा फसल की त्यातून बाहेर निघता येत नाही त्यामुळे हे लग्न वगैरे आपल्या बस मध्ये नाही बाबा ..जशी तू माझ्या शब्दांपासून दूर पळायचं ठरवलं तसच मी लग्नापासून दूर जायचं ठरवलं आहे ..# सारांश

📱 दे रे तिला उत्तर ..केव्हाची वाट पाहतेय ती तुझी ..# नित्या

📱 एक गोष्ट सांग तू मला फोर्स का करत आहेस ? आणि मी चुकीचा नसेल तर तू कमेंट वाचून गायब झालीस..आणि तू म्हणतेस तशी तुझी तब्येत बिघडली ..कुठे तुझी तब्येत आमच्या मॅसेजमुळे तर बिघडली नाही ना ? आता मला पक्क वाटत आहे कुछ तो गडबड है बॉस!!😉#सारांश

नित्या जरा गोंधळली होती कारण त्याने अगदी योग्य ठिकाणी तिला पकडलं होत ..तरीही त्याच्याशी खोट बोलत ती म्हणाली

📱 काहीही बोलतो आहेस हा तू सारांश ..तुमच्या मॅसेजमुळे माझी तब्येत का बिघडेल बर ? ..काहीही असत तुझं..

📱 कारण आहे ईर्षा !! ..मी तुला म्हटलं होत ना प्रपोज करणार आहे तेव्हा तुला प्रपोज केलं नाही आणि त्याच वेळी तिचे मॅसेज आले म्हणून तुला ईर्षा होत आहे ..तू पसेसिव्ह तर नाही झालीस ना माझ्याबद्दल आणि दुसऱ्या व्यक्तीने सर्वांसमोर मला आपल्या मनातलं सांगितलं म्हणून तर त्रास करून घेतला नाहीस ना ? ..खर सांग हेच कारण आहे ना ? #सारांश

नित्याचा आता पारच गोंधळ उडाला होता तिला काय बोलू नि काय नको झालं होतं ..तीच हृदय जोरात धडकू लागलं .काही क्षण जर ती त्याच्यासोबत बोलली असती तर कदाचित ती सर्व खर बोलून गेली असती ..त्यामुळे वेळ मारत ती म्हणाली

📱 नाही रे !! तू काहीही विचार करत आहेस बघ !! बर चल मी आवरते काम नाही तर घरचे ओरडतील मला ..बाय

त्याचाही समोरून बाय मॅसेज आला नि तिने सुटकेचा निश्वास सोडला ..आज तीच गुपित समोर येता येता राहील होत..

हळूहळू त्यांचं नात पुढे जाऊ लागलं ..नित्याला सुरुवातीला सारांशप्रति वाटलेलं आकर्षण आता प्रेमाची वाट धरू लागलं होतं ..ती स्वतावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्याशी बोलायला लागली की मग मात्र तिला भान राहत नसे ..नेहमी शांत राहणारी नित्या सारांश आल्यावर दिलखुलास हसू लागली होती ..आणि हे शुभमच्याही लक्षात येऊ लागलं होत ...ताईने सदैव खुश राहावं हे त्याचं स्वप्न होत त्यामुळे त्याला फारच आनंद होत होता ..

नित्या आणि सारांश जवळपास दोन महिन्यापासून एकमेकांशी बोलत होते ..त्यातला एकही दिवस असा गेला नव्हता जेव्हा ते एकमेकांशी बोलत नव्हते आणि ज्या दिवशी त्यातलं कुणीही गैरहजर असलं की मग वेळ जातल्या जात नसे ..नकळत का होईना त्यांच्याही नकळत ते एकमेकांकडे खेचत जात होते ..अलीकडे सारांश तृप्तीवरून नित्याची फार उडवत असे ..तशी ती शांत राही पण तीच नाव एकल की तिचा आपोआपच मूड खराब होत होता हे सारांशच्या लक्षात येत होतं म्हणून तो अजून तिला चिडवत होता ..कधी कधी नित्याला फार राग आला की मग ती त्याच्याशी बोलत नसे ..आणि शेवटी हार मानून त्यालाच तिची माफी मागावी लागत असे ..सारांशने नित्याला एकदा नंबरही मागितला होता पण तिने त्याला दिला नव्हता कारण काय होत तिलाच माहिती पण त्यानंतर त्यानेही तिला कधी नंबर मागितला नाही ..नित्या जेव्हा जेव्हा रुसत असे तेव्हा तेव्हा सारांश तिला शायरी एकवत असे ..त्यामुळे तिला शायरी ऐकायची असली की ती जाणूनच त्याच्यावर रुसत असे ..सारांशही न कंटाळता तिला मनविण्यात पूर्ण दिवस घालवत होता ..पण एक मात्र होत की त्याच्यासोबत असताना तिला आपल्याही आयुष्यात काय घडून गेला याचा विसर पडत चालला होता ..नित्या सदैव खुश राहू लागली होती ..तर इकडे सारांशचीही स्थिती काहीशी सारखीच होती ..त्याला अटॅचमेंटची भीती वाटत असे त्यामुळे कधी कोणत्या मुलीशी तो जुळला नव्हता पण नित्या अचानक त्याच्या आयुष्यात आली आणि त्याच आयुष्य बदलून गेल ..तोही फार खुश राहू लागला होता ..त्याच्याही नकळत नित्या त्याच्या आयुष्याचा भाग बनून गेली होती ..हळूहळू हे नातं कुठल्या वळणावर जाणार होत याच दोघांनाही भान नव्हतं ..ते आपल्याच क्षणात वाहवत जात होते पण त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना चिंता नव्हती ..तशीही प्रेमाने परिणामाची चिंता इतिहासात कधीच केली नाही तर ह्याचं प्रेमही कधीच चिंता करणार नव्हतं फक्त ते प्रेम कोण व्यक्त करत हाच प्रश्न होता ।।..कारण नित्याने तर त्याला आपल्या मनातलं कधीच न सांगायचं ठरवलं होतं ।.

अशीच एक रात्र ..नित्याने सारांशला मॅसेज केला पण बहुदा तो ऑनलाइन आला नव्हता ..तिच्या आज लक्षात आलं की त्याने आपला फोटो प्रोफाइलवर ठेवला आहे ..लक्षात येताच तो तिने झूम केला ..मोबाइल अगदी जवळ नेत फोटोकडे पाहत ती म्हणाली , " किती निरागस आहेत ना तुझे डोळे ..मनातलं सर्व काही डोळ्यात दिसत बघ !!..तुझ्या मनात काही लपवून ठेवत असशील अस वाटत नाही ...ए सारांश तुला एक कन्फेक्शन देऊ ..मागच्या सात वर्षात ना मी बराच प्रयत्न केला स्वतःला सावरण्याचा पण ते तितकं सोपं नव्हतं ...सतत मन विचलित व्हायचं ..कधी कधी तर रात्री झोपेतून दचकून उठायचे ..बरेच प्रश्न माझ्या मनात घर करून बसले होते ज्याचे उत्तर मलाच माहिती नव्हते ..कधी कधी वाटायचं की हे जगच सोडून द्याव पण शुभमचा चेहरा , त्याची काळजी बघितली की स्वतःवरच राग यायचा नि मग नॉर्मल व्हायचा प्रयत्न करू लागले ..कधी कधी कुणी नसले तर मी रडून मन मोकळं करून घ्यायचे पण कधी कुणाशी व्यक्त झाले नाही पण अशाच एक प्रसंगी तू आयुष्यात आलास ..मी माझे मलाच विसरून गेले ..आपल्या पहिल्या बोलण्यातच तू माझं मन जिंकून घेतलस ..त्यानंतर येणारे प्रत्येक क्षण तू खास बनविले ..कधीतरी तुझ्यामुळेच दिलखुलास हसले तर कधी तरी तुला दुखावत आहे म्हणून रडते ..तू म्हणाला होतास ना की तू झालीस का इम्प्रेस ? ..तर हो मीही झाले इतरांप्रमाणे इंप्रेस ..इतकी की तुझ्याविना राहणं देखील शक्य होत नाही ..वाटत तुझ्याशी तासंतास बोलावं ..कारण तू असलास की दुःख आपोआप दूर जात आणि चेहऱ्यावर तात्काळ हसू येत ..पण अलीकडे तू मला संकटात पाळतोस ..प्लिज अस नको करत जाऊ ना !! माझा भूतकाळ खूप जखमा देऊन गेलाय मला तेव्हा तो तू एकलास तर सोडून जाशील याची भीती वाटते म्हणून मनात बरच काही असलं तरी सांगायचं टाळते ...म्हणून नको विचारत जाऊ रे मला असे प्रश्न ..कारण एखाद्या वेळी माझ्या मनातील बाहेर आल आणि तू सोडून गेलास तर नाही जगू शकणार मी ..त्यापेक्षा तू असाच सोबत राहा ..राहशील ना?
बोलता - बोलता तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं ..अश्रूंचा एक थेंब तिच्या मोबाइलच्या स्क्रीनवर पडला आणि ती त्याला साफ करू लागली ..त्याचा फोटो तसाच होता पण जणू तिला वाटत होतं की ती त्याच्या चेहऱ्यावरूनच हात फिरवत आहे ..हात फिरवताच मनात समाधानाची लहर उमटून गेली ..ती त्याच्या फोटोकडे क्षणभर पाहतच होती आणि तिच्या आवडत्या ओळी तिच्या ओठी आल्या ..

ज़रा सी आहट होती है, तो दिल सोचता है
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
कहीं ये वो तो नहीं
ज़रा सी आहट होती है, तो दिल सोचता है
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
कहीं ये वो तो नहीं
छुप के सीने में
छुप के सीने में कोई जैसे सदा देता है
शाम से पहले दीया दिल का जला देता है
है उसी की ये सदा, है उसी की ये अदा
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
कहीं ये वो तो नहीं
शक्ल फिरती है निगाहों में वही प्यारी सी
मेरी नस-नस में मचलने लगी चिंगारी सी
छू गई जिस्म मेरा, किसके दामन की हवा
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
कहीं ये वो तो नहीं
ज़रा सी आहट होती है, तो दिल सोचता है
कहीं ये वो तो नहीं, कहीं ये वो तो नहीं
कहीं ये वो तो नहीं

क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED