Touch - Unique Features (Part 24) books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 24 )


सितम भी वक्त के
कुछ अनसुलझे राज है
तकलीफ जरूर होती है
फिर भी धुंडो तो उसमे भी कुछ खास है ..

ती रात्र दोघांच्याही आयुष्यातील भयावह रात्र होती..दोघांचेही डोळे अश्रूंनी भरले होते ..नित्यालाही त्याला नकार द्यायचा नव्हता पण त्याने तिच्या भूतकाळाबद्दल एकल असत नि तोही इतर पुरुषांप्रमाणे वागणार तर नाही याबद्दल तिला शंका होती म्हणून तिने मनाविरुद्ध जाऊन त्याला नकार दिला तर इकडे सारांश नित्याचे रात्रभर मॅसेज वाचत होता ..तिचा प्रत्येक शब्द त्याच्या डोळ्यात अश्रू आणत होता .. अश्रू आल्यावर स्वतःचे डोळे पुसून घ्यायचा की पुन्हा त्यात पाणी भरायचं ..आई ओरडू नये म्हणून तो घरात झोपायला तर आला होता पण झोप काही येत नव्हती ..जणू ही आजची रात्र त्याला नकोशी झाली होती

एक बारिश भी हो ऐसी
जो जिस्म नही दिलं भिगा दे
जमाणेसे छुपकर सदा युही
हर बुंद मे बेहकर दिलं का हाल सुना दे ..

दुसरा दिवस उगवला ..रात्री नित्याची झोप झाली नव्हती त्यामुळे तिचेे डोळे लाल लाल झाले होते ..तिला सारांशची काळजी वाटत होती म्हणून त्याने मॅसेज केला असेल म्हणून ती पाहायला ऑनलाइन आली ..मॅसेज तर आला नव्हता पण रात्री 3 च्या सुमारास सारांशच नोटिफिकेशन आल्याचं तिला दिसलं आणि ती वाचू लागली ..कवितेच शीर्षक वाचताच तिचे डोळे पाण्याने भरले ..तिने पुन्हा आपले डोळे पुसले आणि कविता वाचू लागली ..

का वाटा वेगळ्या झाल्या ?

मी शब्दांचा सारथी
शब्दांशीच खेळतो
चेहरा तुझाच आठवुनी
रंग कवितेत भरतो..

जणू कित्येक बहरल्या
कित्येक हरवल्या
बेभान होऊनि काहीशा
मना - मनात पोहोचल्या ..

कविता जरी माझ्या
प्राण त्यात तू फुंकले
कल्पनारम्य या माझ्या जगाला
नवे रूप तू दिले

होतो जगी मी एकटा
तू आधार आभासाचा
घेऊन ओंजळीत मज
केलास वर्षाव प्रेमाचा ..

मनी विचार नव्हता कधी
तू जगी या असशील ?
येऊन अलगद कानात
मंत्र प्रेमाचा देशील ..

वाटे गुंतण्याची भीती
गुंतने तुझ्यात झाले
नकळत प्रेमाच्या वाटेवर
मी स्वतःस स्वाधीन केले ..

हरवलो तुझ्यात असा की
भान जगाचे उरले नाही
नजरा शोधतील तुला माझ्यात म्हणून
मी पुन्हा काव्य रचले नाही..

ध्यानी - मनी नव्हतंच कधी
तू वाटेत साथ सोडशील
भरलेल्या डोळ्यांसवे
दूर रानात हरवशील ...

मग पिंजूनि काढल्या मी
राना - वनातील अनोळखी वाटा
फिरे माळरानात जरी तुझा आवाज
मग चेहरा धूसर का झाला ?

विश्वास बसेना , तू दिसेना
मी झालो तुझाच दिवाना
वाटेत उभा मी तिथेच
सांग , का वाटा वेगळ्या झाल्या ?
का वाटा वेगळ्या झाल्या ?
का वाटा वेगळ्या झाल्या ?

कविता वाचून तिला अश्रूंना सावरण आणखीच कठीण झालं होतं ..ती स्वतःला आवरत होती पण तेही तिला धड जमेना ..आपण त्याला दुखावल याचा तिला अधिकच त्रास होत होता ..तिला त्याक्षणी एकट राहावंसं वाटत होतं पण तरीही तिला ते करता आलं नाही आणि शेवटी आपल्या कामाला लागाव लागलं .तिचे लाल झालेले डोळे बघून घरचे तिला प्रश्न विचारत होते पण ती काहीही उत्तर देत नव्हती उलट तिला त्याचे शब्द आठवत होते आणि अचानक डोळे भरून येऊ लागले ..ती धड कामात लक्ष लावू शकत नव्हती पण कामही करणे गरजचे होते ..तिलाही बर वाटत नव्हतं म्हणून मग काम लवकर आवरून बेडवर पडली आणि त्याची कविता पुन्हा एकदा वाचून काढली पण त्याने वाचकांच्या कमेंटवर आपली प्रतिक्रिया नोंदवली नव्हती .त्यामुळे तो online आला नाहीये हे तरी कळून चुकलं होत ..तिने पुन्हा एकदा त्याचे मॅसेज वाचायला सुरुवात केली ..वाचता - वाचता कंठ दाटून आला आणि तिने पून्हा एकदा मोबाइल बाजूला फेकून दिला ...

सात - आठ दिवस झाले होते पण त्याचा ऑनलाइन येण्याचा काही पत्ता नव्हता ..ती त्याचे मॅसेज तर पाहत होती पण इच्छा असूनही त्याला मॅसेज करू शकली नव्हती शिवाय तो ऑनलाइन न आल्याने वेगळ्याच शंकांनी तिच्या मनात धाव घ्यायला सुरुवात केली होती आणि तीच हृदय जोरजोरात धकधक करु लागलं ..तीही गेले आठ दिवस नीट झोपली नव्हती की जेवली नव्हती पण तिला आपल्यापेक्षाही त्याची जास्त काळजी होती म्हणून मन घट्ट करत तिने त्याला मॅसेज केला

📱सारांश सॉरी ..मला तुला दाखवायचं नव्हतं पण ते करावं लागलं ..खर तर माझ्या आयुष्याचा एक भूतकाळ आहे जो मी तुला सांगायला घाबरत होते आणि तू तो एकला तर तुही दूर जाशील अस वाटलं म्हणून तुला सांगत नव्हते पण जाणवत की तुला आताच जास्त त्रास होतोय म्हणून तुला सर्व काही सांगणार आहे ..आशा आहे समजून घेशील ..हो पण त्यासाठी तुला तुझा नंबर मला द्यावा लागेल ..जेव्हाही ऑनलाइन येशील तेव्हा नंबर दे प्लिज ..मी वाट पाहतेय तुझ्या मॅसेजची ..

नित्याने मॅसेज केला पण तिला त्याचा रिप्लाय आला नव्हता ..दुसऱ्या दिवशी पण अगदी तीच स्थिती होती . ती वाट पाहून थकली होती तरीही त्याचा मॅसेज आला नव्हता पण तिसऱ्या दिवसाच्या सकाळी मात्र त्याचा मॅसेज तिला स्क्रीनवर दिसला आणि ती खूप खुश झाली ..तिने मॅसेज उघडून बघितला तेव्हा त्याने फक्त आपला नंबर शेअर केला होता बाकी काहीच बोलला नव्हता त्यामुळे तिला थोडं वाईट वाटलं होतं पण तरीही ती त्याच्यावर रागावली नाही ..उलट त्याचा नंबर मोबाइल मध्ये सेव्ह करून घेत त्याला टेक्स्ट केला ..

📱सारांश मी तुला रात्री 12.30 ते 1 च्या दरम्यान कॉल करते ..काका जॉबवर जातील आणि मावशी पण त्यावेळी झोपली असेल तेव्हा हीच योग्य वेळ असेल आपल्या बोलण्याची ..माहिती आहे खूप उशीर होईल पण प्लिज माझ्यासाठी थांब तेवढा वेळ झोपू नको ..माझं पूर्ण एकूण घे आणि मग मी चुकीची आहे का ठरव ? एवढं करशील ना रे माझ्यासाठी?

त्याने फक्त ठीक आहे म्हणून रिप्लाय केला होता ..

नित्या आज एका वेगळ्याच संकटात सापडली होती ..विचार करून करून ती स्वतःच फार गोंधळली होती ..कारण तिला वाटत होतं की सारांशदेखील आपल्याला समजून घेणार नाही आणि तेच घाव पुन्हा नव्याने उठून येतील आणि अस झालं तर कदाचित मी पुन्हा उभी राहू शकणार नाही पण त्याला सांगणंही तितकं गरजेचं होतं त्यामुळे तिने आपल्या मनाची तयारी करून घेतली ..रात्र होऊ लागली आणि नित्या आपले काम पटापट आवरु लागली ..तिची नजर फक्त घड्याळाच्या टिकटिक करणाऱ्या काट्यांकडे होती तर कधी एकदाचा 1 वाजतो आणि त्याच्याशी बोलते तिला अस झालं होतं ..अशातच तिने रात्रीच जेवण आवरलं आणि काका जाण्याची वाट पाहून लागली ..ठीक 12 वाजता काका जॉबसाठी निघाले पण अजूनही मावशी काही झोपली नव्हती ..मावशीला काही शंका येऊ नये म्हणून ती तिच्याजवळ जाऊन थोड्या वेळ शांत पडली ..सुमारे पाऊणतास झाला असेल ..तिला जाणवलं की आता मावशी झोपली आहे त्यामुळे बेडरूमचा दरवाजा लावत ती हॉलमध्ये पोहोचली ..समोर टेबलवर पाणी ठेवल होत तिने पाण्याचा भरलेला ग्लास पोटात रचला आणि शांत होऊन तिने त्याला कॉल लावला ..

फोनची रिंग जात होती पण तो फोन काही उचलत नव्हता त्यामूळे तीच मन घाबरत होत ..कॉल कट होण्याच्या मार्गावर आलाच होता की समोरून कॉल उचलल्या गेल्या आणि जड आवाजात तो म्हणाला , " सॉरी..फोन सायलेंट मोडवर होता म्हणून उचलायला उशीर झाला .."

नित्याने आज त्याचा आवाज पहिल्यांदाच एकला होता त्यामुळे त्याक्षणी आनंदही वाटत होता आणि त्याच्या आवाजात उदासीनता जानवल्याने दुःखही वाटत होतं ..संपूर्ण शक्ती एकवटून ती बोलून गेली , " सॉरी सारांश ..इतक्या उशिरपर्यन्त जागाव लागलं त्यासाठी पण माझा नाईलाज होता ..आशा आहे तू समजून घेशील .."

समोरून शांत होत सारांश म्हणाला , " ठीक आहे ग काही प्रॉब्लेम नाही..तू बोल काय बोलायचं आहे ते ..मी ऐकतोय फक्त ..तस पण तू आधीच ठरवलं आहेस ना मी तुला समजून घेणार नाही सो फक्त बोलणंच ऐकणार आहे तुझं..पण मला नाही वाटत तुझा भूतकाळ काहीही असला तरी फरक पडेल पण तुझं समाधान होईल म्हणून सांग "

त्याची होणारी घालमेल बघून नित्या अधिकच भावुक झाली होती ..तिचा कंठ दाटून आला होता तरीही तिने आपले भाव मनात लपविले आणि म्हणाली , " हो सांगते पण आधी माझ्या बोलण्यामुळे तुला इतका त्रास झाला त्यासाठी सॉरी !!..माझ्या मनातही नव्हतं कधी की तुला दुखवाव लागेल ..मला माहित आहे तुझं मन मोठं आहे तेव्हा माफ करशील या वेडीला अशी माफक अपेक्षाही करते..माहिती आहे तु अपेक्षा करू नको म्हणाला होतास तरीही मन आहे ते नकळत करून घेत ते अपेक्षा "

" नाही ग त्रास कसला तू तुझ्या मनातलं बोललीस ..काही का असेना ते सत्यच होत त्यामुळे थोडं वाईट वाटलं पण आता सवय करून घेईन..नको काळजी करू तू मी ठीक आहे." , सारांश म्हणाला

नित्या लांब श्वास घेत म्हणाली , " मी वागले ते चुकीच होत पण माझेही काही प्रॉब्लेम होते म्हणून नाही बोलू शकले ..हो पण काहीही निर्णय घेण्यापूर्वी आधी एकूण घे मी काय म्हणतेय ते मग ठरव काय ते ? "

सारांश पुन्हा गंभीर स्वरात म्हणाला , " हो सांग मी ऐकतोय .."

नित्याने हिम्मत एकवटून सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली ...नित्याच्या तोंडून एक - एक शब्द बाहेर निघत होता आणि तसतसा तिचा अश्रूंनी देखील बांध फोडला ..तर सारांश फक्त ऐकत होता ..तिची हकीकत एकूण तिच्या डोळ्यातील अश्रूंनी त्याच्या आता डोळ्यात जागा घेतली होती फक्त त्याने ते तिला कळू दिलं नव्हतं ..नित्या क्षणाक्षणाला रडत होती जणू ते सर्व तिच्यासमोर घडत आहे असं तिला जाणवलं आणि खरच काही घाव तिला मनातून तोडू लागले ..नित्या रडत होती पण नित्याला रडण्यापासून त्याने थांबवलं नव्हतं ..जणू सात वर्षांपासून साठवलेले अश्रू आज तीच मन हलकं करत होते आणि तीही मोकळं होऊ लागली ..सुमारे 15 मिनिट ती त्याच्याशी बोलत होती..बोलत काय रडता रडता सर्व काही सांगत होती .. तिचे दुःख बघून जणू आज आकाशही रडू लागले आणि सारांशकडे रिमझिम पाऊस सुरू झाला ..तो एका झाडाच्या आडोशाला उभा राहुन तीच सर्व बोलणं ऐकत होता ..ती बोलताना देखील हुंदके देत रडत होती पण सारांश काहीच बोलत नव्हता..तीच बोलणं झालं तरी तो काहीच बोलला नाही हे पाहून ती म्हणाली , " बघ सारांश तुही गप्प झालास ना हे सर्व ऐकून म्हणूनच काही सांगत नव्हते बघ तुला ..आता सांग मी कुठे चुकले ? आणि तू देशील ती शिक्षा त्यासाठी मान्य !!"

ती रडत - रडत सर्व सांगते आहे पाहून तो म्हणाला , " काय बोलू नि काय नको ..चूक तुझी की आपल्या म्हणणाऱ्या लोकांची तेच कळत नाही आहे ..शिक्षा तुला कसली देऊ नित्या आणि कोणत्या चुकीची ? काय गुन्हा तरी केलास तू ? "

ती अजूनही रडत आहे हे पाहून तो पुन्हा म्हणाला , "तू आधी शांत हो..मी गप्प नक्कीच आहे पण तुला वाटत त्यामुळे नाही ..तू किती नि काय सोसल हे ऐकून शांत झालोय ..एखादी व्यक्ती इतकं सहन करून तिला फक्त त्रासच मिळतो हे ऐकून ..तुझ्यावर काही विचार मांडावे मी इतका मोठा नाही ..पण नित्या तू जे काही सांगितलं ते ऐकून माझं प्रेम बदलेल हेही चुकीच उलट आज माझं प्रेम आणखीच वाढलं आहे तुझ्यावर आणि महत्त्वाचा म्हणजे आदर आहे तुझा ..कारण मी फक्त सहन करून आयुष्य काढणाऱ्या मुली बघितल्या आहेत तेव्हा स्वताच्या आत्मसम्मानासाठी लढणारी मुलगी आज पहिल्यांदाच बघतो आहे म्हणून एक व्यक्ती म्हणून तुझा आदर करावा वाटतो ..आजपर्यंत फक्त तुझ्या स्वभावावर प्रेम करत होतो पण आज तुझी स्ट्रगल बघून , तुझा आत्मविश्वास बघून अगदीच तुझ्या सहवासात राहावं वाटत ..नसतात ग प्रत्येक मुली त्यातल्या ज्या स्वतःसाठी लढतील मग कारण काहीही असो म्हणून अभिमान बाळग स्वतःचा ..लोक काय बोलतच राहतात ..त्यांच्या मनासारखं केलं नाही की दूषण लावतात ..त्याच पुरुषी विचारातील मृन्मय आहे .ज्याला कधीच बदलायच नाहीये ..नित्या तू विचार केला ते योग्यच पण प्रत्येक पुरुष नसतो ग सारखा ।.प्रत्येक पुरुषाला शरीर नको असत आणि जर त्याला शरीरच हवं असेल तर ते प्रेम कसल ? ..मी तुझ्या मनावर प्रेम केलंय शरीरावर नाही ..तूच विचार कर तुला न बघताही तुह्या प्रेमात पडलोय मग त्या शरीराचा मोह असेल का ? मला तर फक्त तुझं मनाने व्हायचं होत पण तू सांगून मोकळी झालीस की मला प्रेम करण्याचा अधिकार नाहीये ..एकदा सांगून तर बघायचं होत ..जिथे सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय तिथे माझ्या खास व्यक्तीला समजून घेऊ शकलो नाही तर काय अर्थ आहे माझ्या जीवनाला .. .."

मध्येच नित्या त्याला तोडत म्हणाली , " आय लव्ह यु सारांश .."

तिच्या शब्दाने तो काय बोलत होता ते सर्वच विसरून गेला आणि लगेच म्हणाला , " खरच नित्या , तुझं प्रेम आहे माझ्यावर ? "

" हो खरच ..सारांश आय लव्ह यु ..गोड गोड बोलणारे पुरुष खूप पाहिले पण एका स्त्रीला समजून घेणाऱ्या पुरुषावर कुणाला प्रेम करायला आवडणार नाही .कुठली मुलगी असेल जिला तुझ्या प्रेमात पडायला आवडणार नाही ? मी नशीबवान आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे....खर सांगू जेव्हापासून तुह्या कविता वाचायला लागले तेव्हापासूनच तुझ्यात गुंतत गेले ..मग तुज्याशी बोलता - बोलता केव्हा तुझी झाले ते कळलंच नाही ..तू म्हणाला होतास ना तृप्तीच नाव घेता तू ईर्षा करतेस का ?..खर सांगू तर तेव्हा खूप राग आला तिचा आणि तुझाही जेव्हा म्हणालास ती कविता तिच्यासाठी आहे ..अस पहिल्यांदाच होत होत पण का तेच कळेना ..हळूहळू जाणवत गेलं की मी तुझ्याबद्दल पजेसीव होत चालली आहे आणि मी केव्हा तुझी झाले ते मलाच कळलं नाही .. तू ज्यावेळी म्हणालास ना की तुझं माझ्यावर प्रेम आहे त्यादिवशी मी खूप आनंदी होते पण माझा भूतकाळ मला आठवला नि तुला नकार द्यावा लागला ।.आजपर्यंत माझ्या आयुषयात मी ज्यांच्यावर प्रेम केलं ते सर्व सोडून गेले म्हणून कदाचित तुला मनात असतानाही खर उत्तर देऊ शकले नाही पण आज उत्तर दिलं आणि मन प्रसन्न वाटत आहे बघ ..सारांश मी तुझ्यावर प्रेम करते हे नक्कीच खर आहे पण मी काहीच देऊ शकत नाही तुला ..अगदी माझं मन सोडून दुसर काहीच नाही ..ना शरीर ना आणखी काही ..ना अपेक्षा करशील ना ह्या नात्याला मी सर्वांसमोर उघडू शकते फक्त एकच वचन देऊ शकते की माझं मन कायम तुझं असेल ..तरीही देशील मला साथ ? करशील माझ्यावर जीवापाड प्रेम ? "

आणि तो हसत म्हणाला , " ..शेवटच्या श्वासापर्यंत मी फक्त तुझाच असेल ..तू म्हणशील तरी सोडून जाणार नाही तुला

ना देखा है कभी
ना देखणे से कुछ बदलेगा
मोहब्बत तुम्हीसे थी , तुम्हीसे रहेगी
ये पल रोता आसमाभी याद रखेगा .. "

त्याच्या शायरीने तिचे अश्रू पुसल्या गेले आणि तीच मन आनंदाने नाचू लागलं ..ती आपले भाव लपवत म्हणाली , " किती लोकांना ऐकवली आहे ही शायरी साहेब ..तृप्तीला तर ऐकवली नाहीस ना आधी !!.."

आणि तो तिच्यावर हसत म्हणाला , " काही किंमतच नाही बाबा आमची !! ..प्रेयसी कधी ईर्षा करायचं थांबणार नाही हेच खरं .."

नित्याचा चेहरा आणखीच खुलला आणि ती म्हणाली , " तूच सांग , मधूबन मे कान्हा जप गोपी से मिले राधा कैसे ना जले राधा कैसे ना जले ...का ईर्षा करू नये अधिकार आहे तो माझा ..आणि बर का आता तृप्ती मधात आली ना दातच तोडीन तुझे .."

दोघांच्याही चेहऱ्यावर नकळत स्मित खुलून आलं ..दुःखाचे ढग बाजूला सारले होते आणि त्यातून आनंद देणारा पाऊस पडू लागला होता ..दोघेही एकमेकांच्या शब्दात बुडाले होते आणि जणू त्यांना हा निसर्ग साथ देत होता ..

भिग गये है हम
बेवक्त बारिश मे
तू अगर साथ है
तो क्या खोया फिर जिंदगी मे

आज दोन मने एकत्र झाली होती ..वाऱ्यासंग मंजुळ गाणे गाऊ लागली होती आणि एक गोष्ट सर्वाना सांगून जात होती प्रेम करायला भावना लागतात आणि ते प्रेम समजून घ्यायला तितकंच निस्वार्थ मन हवं ..सोपं नाहींये या जगात निस्वार्थ प्रेम करणं पण इतकं कठीणही नसत कुणाशी जुळन ..साथ मनाची असली की शंकाना स्थान नसते आणि जे नात शंकांनी सुरू होत त्यात संपूर्ण समर्पण कधीच नसत ..मान्य की लोक कबुली देऊन प्रेमाची सोडून जातात कायम पण हेही खरच जिथे निभवायची इच्छा असते तिथे दुरावा घर करत नाही आणि जिथे इच्छा नसते तिथे प्रयत्न करूनही काहीच मिळत नसत ..काळ बदलला तसे माध्यम बदलले ..निरागस प्रेम स्वार्थी बनल ..पण अजूनही प्रेमावरचा विश्वास कमी झाला नाही ।.जरी बदलवली व्याख्या प्रेमाची सर्वांनी आपल्याला साजेशी पण प्रश्न करण्याच्या नादात सर्व विसरले की एकमेकांच्या मनाशी मन सहज जुळन तितकंही सोपं नाही आणि इतकं होऊनही ते जुळत असेल तर ते नात नक्कीच खास असत ..कारण त्याला भीती नसते जगाची "

क्रमशः ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED