Touch - Unique Features (Part 25) books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 25 )

केहते है लोग अकसर
दुःख भरी रातो मे निंद नही आती
पर जनाब ख्वाब पुरे हो
तबभी खुशीया सोने नही देती ..

वरच्या ओळी अगदी नित्यासाठीच बनल्या होत्या ..आजपर्यंत एकही रात्र अशी नव्हती ज्या रात्री तिने अश्रू गाळले नव्हते की तिला सुखाची झोप लागली होती ..पण आज अस काही घडलं होत की त्या खुशीने , त्या स्वप्नमय विचारांनी तिला झोपुच दिले नव्हते ..नित्याला रात्री जे काही घडलं यावर विश्वासच बसत नव्हता ..तिला कधीच वाटलं नव्हतं की तिला प्रेमही होईल आणि तिचा भूतकाळ एकूनसुद्धा एखादा मुलगा तिच्या प्रेमाचा स्वीकार करेल पण ते झालं ..सारांशने तिला शिकविल की प्रेम ही सुंदर भावना असते मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय घडून गेलं ह्याला काहीच अर्थ नसतो उलट प्रेम हे वर्तमानात जगून भविष्याची स्वप्न पाहायला शिकवत ..नित्यानेही काही स्वप्न आज स्वतःहून पाहिली होती आणि म्हणूनच कदाचित ती रात्री झोपलीच नव्हती ..डोळ्यात अश्रूही होतेच पण आनंदाचे असा आनंद ज्यासमोर सर्व दुःख नश्वर वाटू लागतात..तिला स्वतःच्या भावना आवरता येत नव्हत्या म्हणून पहाटे पाचलाच तिने त्याला टेक्स्ट मॅसेज केला ...

📱 सारांश थॅंक्यु सो मच माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि इतक्या सुंदर भावना जगू देण्यासाठी ..तुला कळणारच नाही मी आज काय आणि काय विचार करत आहेस ..वाटत आहे जणू आज मला सर्वच मिळालं ..आता मरण आलं तरी चालेल ...

तिने मॅसेज सोडून दिला आणि फ्रेश व्हायला बाहेर आली ..मावशीही त्यावेळी उठली होती ..मावशी फ्रेश होत नाहीच तो तिने चहाचा कप त्यांच्या हाती दिला ..मावशी नित्याकडे बघून शॉक होती कारण गेल्या सात वर्षात नित्याला मोरासारखं थुईथुई नाचताना त्यांनी कधीच बघितले नव्हतं ..त्यांनी तिला न्याहाळून बघितलं आणि त्यांचा त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसेना ..नित्याच शरीर तर तेच होत पण आज काहीतरी बदललं होत हे त्यांनी हेरलं आणि त्यांच्याही मनात समाधानाची लकेर उमटून गेली ..तर नित्या पायात पैंजण घालून घरभर फिरत होती ..तिच्या पैंजनाच्या आवाजाने घरात घननाद होऊ लागला आणि तो आवाज जणू सर्वाना सुखावू लागला ..तसा शुभम फार उशिरा उठत असे पण आज नित्या त्याला जाणूनच उठवायला गेली होती ..तो उठत नाहींये म्हणून त्याच्या डोक्यावर मारत तिने त्याला उठवून घेतले ..शुभम आधी तर ओरडलाच होता पण तिचा चेहरा पाहतच शांत झाला ..तो उठला आणि ती पैंजनाचा छन छन आवाज करत किचन मध्ये पोहोचली ..शुभम फ्रेश होऊन हॉल मध्ये पोहोचला होताच की त्याला म्हणाली , " घ्या बंधुराजे आपला कडक चहा .." आणि हसून पळत जाणार तेव्हढ्यात शुभमने तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला , " दिदी थॅंक्यु पर आज आप के तेवर बदले बदले नजर आ रहे ..जरा हमसे भी फरमाईये आपके खुशी की दासता .."

आणि ती डोळे मिचकावत म्हणाली , " बंधुराजे आपण चहा घ्या तो थंड होतोय !! ..मी पुन्हा गरम करून आणणार नाही हा !! ..हो मी आनंदी आहे पण काही खास कारण नाही .. आज खूप दिवसांनी मन करत आहे छान सैरभर उडाव ..आणि सार आभाळ व्यापून टाकाव .."

तिच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद शुभमला दिसला आणि त्याने लगेच तिचा हात सोडला ..तेव्हाच तिच्या लक्षात आलं की सारांशचा रिप्लाय आला असेल म्हणून पुन्हा धावतच बेडरूमला पोहोचली आणि मोबाइल घेतला ..सारांशचा रिप्लाय येऊनच होता ..ती मॅसेज वाचू लागली

📱 काय ग झोपली होतीस की नाही ? पहाटे पहाटे मॅसेज केला आहेस म्हणून म्हटलं ..# सारांश

तिने क्षणभरही वाट न पाहता त्याला रिप्लाय दिला

📱का झोपावं बर ..मी तर रात्रभर तुझ्या शब्दांना आठवत होते आणि सारांश तुझ्या आवाजात पण खूप जादू आहे ....किती सुंदर समजावून सांगतोस ना तू ? ..माझी गोड जिलेबी!!

आणि सारांश गमतीत म्हणाला

📱फक्त खाऊ नको म्हणजे झालं ..उगाच लोक बघतील !!🤭🤭

📱 आता तर खाणारच आहे बघ !! खूप बोलत आहेस ना तू भेट फक्त मग सांगते तुला 😏..# नित्या

📱बर बाई तुला हवं ते कर आणि माझ्याही आयुष्यातला फार सुंदर दिवस होता तो ..फक्त फरक एवढाच की काल मी समाधानाने झोपलो ...जेव्हापासून तुझा नकार एकला होता तेव्हापासून फक्त विचारच करत असायचो त्यामुळे काल निवांत झोप लागली ..थॅंक्यु सो मच स्वीटहार्ट फॉर धीस वंडरफुल मोमेंट्स अँड लव्ह यु सो मच😘😘😘#सारांश

📱चल झुटा🤭🤭 # नित्या

📱सच्ची ..तेरी कसम ..आज तू समोर असती ना तर घट्ट मिठी मारली असती आणि काही क्षण तुझ्यातच हरवलो असतो ..😍😍 # सारांश

📱बर बर सारांश साहेब आणखी काही 🤭 # नित्या

📱काही नाही फक्त मिठी हवी मिळेल ना ? # सारांश

📱 हो मिळेल ना पण मार ..हवाय ? #नित्या

📱बर आधी मार दे मग मिठी दे आता ठीक आहे ना ? ..#सारांश

📱चूप बस खूप चावट झाला आहेस हा सारांश तू मी खपवून घेणार नाही 😉!! # नित्या

📱आता कसाही असो तुझाच आहे 🤭# सारांश

📱 काय माहीत कसा आलास ते पण खूप लकी दिवस होता जेव्हा तू आयुष्यात आलास ..

मन पाखरू झाले क्षणात
अन उंच आकाशी मी उडाले
जादू केलीस कशी तू अशी
मी न आता माझे राहिले ...
# नित्या

📱 व्हा अप्रतिम !! खूप सुंदर ..तुलाही कविता येतात ? # सारांश

📱 नाही रे ..फक्त वाचली होती कुठंतरी ..तुझा विचार आला नि सहज मनातून बाहेर आल्या बघ ..खरच तू काय आहेस माझ्यासाठी नाही कळणार तुला ...# नित्या

📱 हा ते तर आहेच ..मग मिळणार ना मिठी🤭 # सारांश

📱चुप बस !! अगदीच शहाणा झाला आहेस ..बघ तुझ्याशी बोलण्याच्या नादात माझे काम अडकून जातात ..मीही वेड्यासारखी तुझ्याशिच बोलत असते ..चल बाय लव्ह यु सो मच...# नित्या

📱नित्या आधी एक मग जा ..मला कॉल कर आज कसही ..मला बोलायच आहे तुझ्याशी आज ..# सारांश

📱सॉरी सारांश पण कॉलवर बोलणं शक्य नाही ..घरात सर्व असतात रे ..# नित्या

📱प्लिज ना नित्या मी जास्त वेळ घेणार नाही फक्त काही मिनिटे # सारांश

📱दुपारी तर शक्य नाही पण एक काम करते सायंकाळी भाजीपाला आणायला जाते आज मग आपल्याला बोलता येईल शिवाय तुला त्यावेळी सुट्टी झालेली असेल ..तेव्हाच बोलु तुला चालेल ना ? # नित्या

📱हो चालेल ..मी वाट पाहीन ...बाय # सारांश

बाय म्हणत नित्यानेही फोन ठेवला आणि आपल्या कामाला लागली तर सारांशही ऑफिसला जायची तयारी करू लागला ..नित्याच्या चेहऱ्यावरून आज आनंद क्षणभर हरवला नव्हता म्हणूनच कदाचित आज सर्व घर आनंदाने न्हाहून निघालं होत ..आज प्रत्येक गोष्ट ती आनंदाने करत होती ..सायंकाळी कॉल करायचा ह्या विचाराने तिच्या मनात लाडू फुटू लागले होते पण ती त्यातलं कुणाला काहीच सांगत नव्हती ..परंतु काहीतरी झालं असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं होतं

सायंकाळ झाली होती ..सारांशचे दोन तिने मॅसेज येऊन गेले होते तर ती थोड्या वेळात कॉल करते म्हणून त्याला सांगत होती ..पण त्याला धीर मात्र नव्हता ..शेवटी ती तयारी करून घरून निघाली ..त्याला कॉल करायचा या विचाराने तिचे हार्टबिट वाढले होते ..तिने त्यांना आवर घातला आणि त्याला कॉल लावला .एक सेकंद पण रिंग गेली नव्हती की तो फोन उचलत म्हणाला , " किती उशीर ..केव्हाची वाट पाहतोय मी तुझ्या कॉलची ।."

ती हळव्या स्वरात म्हणाली , " सॉरी सॉरी ..मुलांची ट्युशन घेऊन बाहेर निघायला वेळ लागला ..त्यात तयारी वगैरे करायला थोडा वेळच झाला सॉरी .."

तो काहीसा शांत होत म्हणाला , " ए नित्या थांब क्षणभर ...एक शब्द ही बोलू नको ..."

त्याला अचानक काय झालं तिला कळेना ..तोही समोरून काहीच बोलत नव्हता ।.सुमारे वीस - तीस सेकंद वाट पाहिल्यावर तीच म्हणाली , " काय रे काय झालं ? "

सारांश रोमँटिक होत म्हणाला , " काही नाही तुझी पैंजण !! ..किती सुंदर आवाज आहे ना तिचा तोच मनात साठवून घेत होतो..म्हटलं क्षणभर ऐकू दे .."

नित्या त्याच्यावर हसत म्हणाली , " काहीही असत तुझं ...वेडाच आहेस!! "

आणि तो चान्स मारत म्हणाला , " तुझ्याच प्रेमात !! बाय द वे डिअर तुझा आवाजही फार गोड आहे ..काल रात्रभर रडत होतीस ना तेव्हा मला समजल नाही पण आता इतकं गोड हसू आल्यावर कळतंय की त्या पैंजनात इतकी मिठास कुठून आली .."

ती पून्हा हसत म्हणाली , " किती फ्लर्ट करशील शहाण्या !! आता तर कबुलीही दिली प्रेमाची ..आणखी किती लाजवणार आहेस .."

तो नाटक करत म्हणाला , " अच्छा जी!! ..मनात आलं तेच तर म्हणालो तर म्हणे फ्लर्ट करतोय ...आता एखाद्याचा आवाज इतका सुंदर असेल तर आपण काय करणार .मला तर सतत एकावस वाटत आहे .."

आणि ती गमतीत म्हणाली , " पुरे हा !! लाडात येऊ नकोस ! आता सांग कोणतं काम होत की तू कॉल करायला लावला "

सारांश हसत म्हणाला , " मी केव्हा म्हटलं माझं काम होत ..मला फक्त तुझ्याशी बोलायच होत म्हणून कॉल कर म्हणालो ..आता मस्त वाटत आहे बघ बोलून ..प्रेयसीचे पहिले आय लव्ह यु तिच्या ओठांतून ऐकण्याची मज्जाच वेगळी .."

ती थोडी घाबरत म्हणाली , " ए नाही हा इथे लोक आहेत खूप ..उगाच कुणी ऐकलं तर ? सकाळपासून खूप रोमँटिक होत आहेस ..भेटू दे मग दाखवतेच "

आणि तो हसत म्हणाला , " काय दाखवणार बर ? "

आणि नित्या रागात म्हणाली , " माझा हिसका .."

दोघेही क्षणभर तसेच हसत होते तेवढयात तीच म्हणाली , " बर एक ना मागची जी कविता टाकलीस त्यावर प्रेक्षक खूप सॅड फील करत होते ..त्यांचं मन मोहरून जाईल अशी एखादी कविता लिही ना .."

पुन्हा तो खेचत म्हणाला , " त्यांचं की तुझं मन ? "

आणि ती हसत म्हणली , " माझंच समज पण लिही ..माझ्यासाठी ..फक्त माझ्यासाठी ..बर एक चल मी भाजीपाला घेते नि रात्री बोलू बाय .."

सारांशने बाय म्हणताच तिने फोन ठेवला आणि पुन्हा आपल्या कामात व्यस्त झाली ..भाजीपाला आणून स्वयंपाक आवरेपर्यंत तिला 10 वाजले होते ..तर जेवण करून बेडवर पडायला 11 झाले ..तिने मोबाइल चेक केला त्याचा मॅसेज आला नव्हता म्हणून नेट ऑन करून तिने अँप ओपन केली ..त्यावर त्याच नोटिफिकेशन होत आणि खरच त्याने कविता टाकली होती ..कवितेच नाव होतं ..

मैफिलीत माझ्या ....

भीती माझिया पियाची , जागली या मैफिलीत
शब्दात माझिया शोधूनि , नजरा करतील तुला कैद...

मी मोजूनी शब्द बोलतो , गंध कुठूनि आला हवेत
संगीतमय झाली ही मैफिल , चर्चा तुझिच बोल - बोलात..

शब्दांची ही जादू माझी , त्यात तुलाच सारे पाहतात
चेहऱ्यावर आव आणत , गुपित शोधतात हळूच...

मीही झालोय गाफील क्षणभर , उल्लेख चर्चेत तुझा ऐकुनी
मनात लपवून ठेवियेल्या , त्या छटा शोधल्या तरी कुणी ? ...

रंग भरता - भरता मैफिलीत , माझाच रंग का उडाला ?
हसू लागले रसिक सारे , सुरात माझिया सूर तुझा कुठे जुळला ?...

ओठांवर नाव तुझे येता , मी मैफिल त्याग केली
शब्द रंगविले जरी मी होते , तरी वाहँ वाह तुझी का झाली ?..

राग आला क्षणभर तुझा , मी मैफिल सजवता तू रंग कसे त्यात भरले ?
मग आठवताच तुझे गोड हसू , माझे मलाच उत्तर मिळाले..

मी सोडले आता मैफिलीत धुंद होणे , तू असतेस इथे मग तिथे तरी का जाणे ?
शोधता मनीच माझिया गीत तुझे
जणू कित्येक मैफिली बहरतात मनाने..

कविता वाचताच नित्या त्याला म्हणाली , " खूप सुंदर ..अस वाटत हरवून जावं तुझ्यात पण कधी कधी भीती वाटते रे तू एकटीलाच वाटेवर सोडून गेलास तर , ? "

आणि तो उत्तर देत म्हणाला

📱तुझी भीती अगदी साहजिक आहे ..पण याच उत्तर मी प्रियकर म्हणून नाही तर लेखक म्हणून देईल ..नित्या जेव्हा व्यक्ती प्रेमात पडतो ना तेव्हा फक्त तो एका बाजूने विचार करतो की तो आयुष्यभर माझ्या सोबत असेल तर ? कदाचित ते योग्यच आहे पण त्याच वेळेला हा विचार केला की पुढे नात समोर गेल्यावर तो मला एकटाच सोडुन गेला तर ? ..जर हा विचार आल्यावर मनात वाटत असेल की हे सर्व सहन खूप त्रासदायक जाईल तेव्हाच आपण त्या वाटेवर पाऊल टाकू नये याउलट परिणाम माहीत असतानाही पूढे जाण्याचा निर्णय घेतला तर कदाचित तो कुठल्याही कारणाने सोडून गेला तर फार त्रास होणार नाहीं कारण मनात कधीतरी तो सोडून जाईल हा विचार आपण केलेला असतो त्यामुळे त्या दुःखाची तीव्रता नक्कीच कमी होत जाईल ..आपण सुखी स्वप्न पाहण्याचा नादात तो नसेल तर काय होईल याचा विचार करणे सोडून देतो स्वाभाविकता हा विचार देखील नकोसा होऊन जातो पण या विचारातच बरेच उपाय सापडत जातात ..व्यक्तीला जेव्हा एखादी गोष्ट हवी असते तेव्हा तो साम , दाम , दंड , भेद करून ती गोष्ट मिळवितोच आणि आपणही त्या क्षणात हरवून जातो ..त्यावेळी ते सर्व आपल्याला फार सुंदर वाटत असत पण सोडून गेला तर ? ..तेव्हा हाही विचार नेहमी सोबत असावा की जर तो सोडून गेला तर मी जास्त दुःख करून घेणार नाही उलट जे मिळालं त्यात समाधान मानेल आणि जस तू म्हणतेस तशी भीती असेलच तर कधीच प्रेमात पडू नये ..कदाचित आपण एकटेही तेवढेच आनंदात राहु शकतो .. ..नित्या एक गंमत सांगू , जगातले सर्व लोक सांगतात की प्रेम करू नये ते वाईट असत पण सर्वच लोक प्रेम करतात कारण त्यांना वाटत की हे सर्व आपण बदलू शकतो ..तो प्रयत्न करणं म्हणजेच खर प्रेम शोधन ..आणि नाही बदलले तर ते आपल्या अनुभवावरून सांगतात की प्रेम चुकीच असत ..तरीही पुढची पिढी त्यांचं बोलणं ऐकून ठरवत नाही की प्रेम चुकीच असत उलट ते अनुभव घेतात..पुन्हा एक गोष्ट मला जाणवते की प्रेम करताना किंवा ते क्षण जगताना दोघेही सोबत असतात पण तुटल की मात्र कधीतरी सुंदर क्षण होते हे विसरून जाऊन फक्त ते सोडून गेले ह्याच क्षणात कैद होऊन जातात ..मान्य की ते चुकीचे वागले असतील पण आपलं प्रेम तर खर होत ना मग त्याला चुकीच ठरवून आपल्या आयुष्यात का कायम दुःख घेऊन बसावे ..उलट मला आनंद वाटतो की ते सोडून गेलेत ..कारण उद्या जाऊन आपण सर्वांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं आणि नंतर त्याने सोडलं तर कदाचित आयुष्यात काहीच उरणार नाही मग ती गोष्ट आता झाली ह्याचा आनंद व्हायला हवा ..कारन लग्नाआधी अस काही घडलं तर एक नवीन सुरवात करता येते पण लग्नानंतर झालं तर जणू सर्वच वाटा बंद होतात..माझ्यासाठी प्रेम फक्त सुंदर क्षण आहेत ..आज खूप चांगला वागणारा उद्या बदलू शकतो आणि तो बदलणार आहे हे जगातील कोणतीच व्यक्ती सांगू शकत नाही ..मग तो सोडून गेला हे आठवून आयुष्यभर त्रास करण्यापेक्षा मी एका चुकीच्या व्यक्तीच्या तावडीतून सुटले ह्याचा आनंद व्हावा आणि जर दुसरा तर्क पूर्णत्त्वास आला म्हणजे त्याने आयुष्यभर साथ निभावली तर मग काही प्रश्नच येत नाही ..आणि मनात एकच विचार ठेवावा जेव्हा कुणी अर्ध्यात सोडून जात तेव्हा..भलाई तू गेला आहेस पण तुझा विचार करून मी आता माझं महत्त्व कमी होऊ देणार नाही उलट अस जगेन की तू म्हणशील मी हिला सोडून सर्वात मोठी चूक केली आहे .."

आणि तिने वाचून मॅसेज केला ..

📱बाबा सारांश की जय हो !! इतकं सार प्रेमाबद्दल कुठून शिकलास रे ..एखादं काही विशेष पुस्तक आहे का ? असेल तर मलाही दे वाचायला

आणि तो म्हणाला

📱प्रेम हा शब्द खूप मोठा आहे ..त्याची एक व्याख्या होणे कठीणच ...जेव्हा जेव्हा आपण प्रेमाबद्दल स्वताचे अनुभव सांगतो तेव्हा त्यातून एक प्रश्न निर्माण होतो आणि त्यातून एक नवीन उत्तर ..म्हणून प्रेम ह्या शब्दाची व्याप्ती कुणालाच समजून घेता येत नाही ..उलट ते समजून घ्यायचच नसत ..जगायच असत ..कारण माणूस चुकीचा असला तरी अनुभव मिळतील आणि योग्य असेल तर आयुष्यभराची साथ ..प्रेमात काहीच मिळत नाही अस कधीच होऊ शकत नाही ..म्हणून कधीतरी एकदा नक्कीच प्रेमात पडाव ..त्यांच्यासारखे सुंदर क्षण कुठेच मिळत नाही मग अंत कसाही असू दे पण सुरुवात कायमच प्रत्येकाच्या मनात घर करून जाते ..त्या क्षणांसाठी तरी एकदा पडून पहावं प्रेमात कारण दुःखाचा विचार करून जर प्रेमात पडलो नाही तर ? कदाचित खूप काही हरवून बसू ..आणि नित्या मला एक सांग प्रेमाव्यतिरिक्त आयुष्यात दुःखच नसत का ? असत फक्त आपण कोणत्या दुःखाला किती महत्त्व देतो ह्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात ..कदाचित लोकांनी मनात भरवलं आहे की प्रेम करून सर्वात जास्त त्रास होतो म्हणून तो त्रास आपल्यालाही जास्त वाटतो पण जर तुम्ही म्हटलं की प्रेमानेच काही सुंदर क्षण दिला आहेत तर कदाचित तुम्ही आनंदी असाल ..बघ आताही विचार करून तुला माझी भीती वाटत आहे की आनंद आहे मी सोबत आहे त्याचा.. नि तुझं उत्तर आपण तर फक्त मनाने जुळायच ठरवलं आहे ..मग जेव्हा मिळविण्याची इच्छा नाही तेव्हा सोडून जाण्याचा तुला त्रास होईल का ? "

आणि ती हसत म्हणाली

📱मान गये बॉस ..नाहीये भीती आता तुला गमावण्याची कारण तू शरीराने दूर गेलास तरी मनाने माझा आहे ..भीती तिथेच असते जिथे अपेक्षा जास्त असतात..जगाच सत्य स्वीकारून प्रेम केलं तर कदाचित आपण मनाने कायम एकत्र राहू आणि तेच खरे प्रेम आहे...माणसं आपल्या प्रकृतीप्रमाणे सोडून जातात पण त्यातून काय चांगलं घ्यावं आणि काय सोडून द्याव हे आपणच ठरवायचं असत .मान्य की तो सोडून गेला पण तो म्हणजे आयुष्य नाही उलट चुकीच्या मनापासून वाचले यात आनंदच आहे ..प्रेम असो की अरेंज मॅरेज माणूस बदलतो फक्त फरक एवढाच की लग्नानंतर दोन कुटुंब जुळून असल्याने नात सहज तोडता येत नाही तर प्रेमामध्ये दोन व्यक्ती असल्याने नात सहज तोडता येत मग ते कुणी तोडल याला महत्त्व नसत ? .दुःख सुखाचा खेळ नेहमीच सुरू राहील पण जो स्वतःला सावरून घेईल तोच या खेळात नेहमी जिंकेल ..ज्याला लोक जीवन म्हणतात

आणि सारांश हसत म्हणाला

📱बघ माझा प्रभाव इतक्या लवकर पडेल तुझ्यावर अस वाटलं नव्हतं ..

सारांशचा मॅसेज एकूण दोघेही हसू लागले होते ..पण एक गोष्ट नित्याने हेरली होती प्रेमात पडताना दोन व्यक्ती स्वतः आनंदाने नात समोर नेतात तेव्हा कुणी एक सोडून गेल तर दोष त्याला देत बसू नये उलट जे मिळालं ते आपलंच मानून समोर जावं .. अनुभवातूनच उत्तम जीवन शिकायला मिळत आणि माणस ओळखता येतात जेणेकरून त्या चुका पुढे टाळता येतील ..हेच जीवन आहे

मिल जाती है अकसर
दर्द भरी राते सुखो की खोज मे
फिर भी अहमियत प्रयासो की

क्या कभी कम होती है


क्रमशा...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED