मैत्री : एक खजिना ... - भाग 24 Sukanya द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मैत्री : एक खजिना ... - भाग 24

24

...
..
..
..
..

....
.
..
.
.
....
..

सानू ऑफिस च कामं संपवून घरी आली

खूप जास्त टेन्शन आलं होतं एक मन सांगत होत अभि लगेच तयार होईल तर एक मन म्हणत होतं त्याला हे नाही आवडणार...

ती फ्रेश होऊन बाल्कनी मधे येऊन बसली....

फक्त एखाद्या बाहुली सारखी बसून होती ती
डोळ्यातलं पाणी तर थांबायचं नाव घेईना....

जणू तिला खूप काही सांगायचं होतं बोलायचं होतं
पण त्याचा कोणाला त्रास होऊ नये म्हणून ती आतल्या आतच सहन करत होती
तिचं मनच तिला खात होतं

हल्ली तर सावी पण तिच्याशी नीट बोलायची नाही
तिनी एक दोनदा विचारायचा प्रयत्न केला पण सावी नि काहीच सांगितलं नाही

सानू खरंच थकून गेली होती

सगळ्यांचे मूड स्विंगस सांभाळून
सगळ्यांना समजावून सांगून
सगळ्यांना समजून घेऊन
ऑफिस च वेगळं टेन्शन
अगदी रोज तिच्या मागे काही तरी कटकट होतीच

नॉन स्टॉप बडबड करणारी सानू आता दिवस भरात बोटावर मोजण्याइतपत च बोलायची

असं म्हणतात ना तिला खूप काही बोलायचं होतं तेव्हा कोणीच तिचं ऐकायला नव्हतं
म्हणून तिने सांगायचं सोडून दिलं

तशीच अवस्था सानू ची होती....

तिला अनु अवि पेक्षा बाकी गोष्टींचा जास्त त्रास होत होता
पण तिनी चकार शब्द नाही काढला कधी...

पण तिची सहनशक्ती संपली होती दूर पळून जावस वाटत होतं

घरी तिचं लक्ष नसायचं
जेवणात लक्ष नसायचं

आज घरी आली तेव्हा पण घरी कोण आहे कि नाही हे सुद्धा तिला माहिती नव्हतं

आई बाबा बाहेर फिरायला गेले होते
सोबत सावी आणि मानसी पण होत्या...

विचार करत असताना कोणीतरी समोर कॉफी चा मग दिला तिनी वळून पहिल तर सुमेध होता

तिनी उठून डायरेक्ट त्याला मिठी मारली आणि रडायला लागली

त्याला खरं तर काहीच कल्पना नव्हती कि ती रडत होती
त्याला वाटलं होतं ऑफिस मधे दमली असेल म्हणून बाल्कनी मधे बसली असेल फ्रेश वाटण्या साठी

त्यानी कॉफी चा मग खाली ठेवला आणि तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला शांत केल....

थोडया वेळानी तिला खुर्ची वर बसवलं आणि तो तिच्या समोर गुडघ्यावर बसला...

..
..

काय झालं बच्चा का रडतेय तू
कोणी काही बोललं का...

तिनी फक्त मानेनी नकार दिला

त्यानी तिच्या गालावर हात ठेऊन विचारला सांग ना पिल्लू का रडतेय अशी

अंग गरम होतं तिचं कपाळावर हात ठेऊन पाहिलं तर ताप आला होता तिला...

सानू अग किती ताप आला ए बाळा तुला आणि इकडे बाल्कनी मधे अजून हवेत येऊन बसली ए उठ आत चल .......... सुमेध

तिनी डोळे बंद करून मानेनीच नकार दिला

सानू उठ ना ग हट्ट करू नकोस जास्त आजारी पडशील.... सुमेध

पण ती काहीच बोलली नाही....

सुमेध नि उठून डायरेक्ट तिला उचलून घेतला आणि तिच्या रूम मधे घेऊन आला

डॉक्टर ला फोन करून बोलावलं
त्या नंतर अभि ला कॉल करून लवकर यायला लावलं

आई बाबा ना सांगितलं तर ते उगाच काळजी करतील

थोड्या वेळात डोअरबेल वाजली सुमेध नि डोअर ओपन केला तर अविनाश होता....


हाय जीजू... ..... अविनाश

हाय अवी.. .... सुमेध

जीजू काय झालं कसलं टेन्शन ए का..... अविनाश

अं हा नाही म्हणजे ते अरे सानू.... सुमेध

काय झालं दि ला ऑफिस मधे तर ओके होती.... अविनाश

अरे ताप आला ए थोडासा... सुमेध

ओ अच्छा डॉक्टर ला कॉल केला... अविनाश

हो अरे येतच असतील.... सुमेध

ओके....
जीजू तुम्ही दि सोबत थांबा मी डॉक्टर आले कि त्यांना घेऊन येतो.... अविनाश

ओके फाईन.... सुमेध

सुमेध आत निघून जातो

सानू शेजारी बसतो...

बाळा काय झालं ग तुला कसलं एवढं टेन्शन घेतलं ए
दुपारी पण किती टेन्शन मधे होतीस...

आमचा काही प्रॉब्लेम असला कि कसं लगेच सोलुशन काढते ग किती सांभाळून घेते आम्हाला
पण आम्हाला त्रास होऊन नये म्हणून स्वतःच काही सांगत नाहीस
आजकाल किती कमी बोलतेस
आधी सारखी नॉन स्टॉप बडबड कर ना ग
किती छान बोलतेस
ऐकतच राहावंसं वाटतं

त्याला बोलताना आता रडू येऊ लागला होतं
पण सानू शांत झोपली होती

तोच अविनाश डॉक्टर ला घेऊन आला
सुमेध उठून बाजूला झाला आणि त्यानी पटकन डोळे पुसले
अवी नि हे पाहिलं

डॉक्टर सानू ला चेक करत होते...

अवी सुमेध च्या शेजारी येऊन त्याचा खांद्यावर हात ठेवत म्हणाला जीजू डोन्ट वोरी दि ला काही नाही होणार
खूप स्ट्रॉंग ए ती पण तू रडू नको तिला नाही आवडणार

सुमेध मानेनी होकार देतो...

डॉक्टर म्हणतात.........

काळजी च कारण नाही थोडा ताप आहे औषधं देतो तेवढे घ्या लवकर बर वाटेल त्यांना

येतो मी...

अवी डॉक्टर ला सोडायला जातो येताना अनु आणि अभि पण आलेले असतात

अभि आल्यावर सुमेध लगेच त्याला मिठी मारतो

अभि त्याला समजावून शांत करतो.....

आई चा फोन येतो त्या सांगतात त्यांना यायला उशीर होईल तर ते सगळे बाहेरूनच जेऊन येतील...

सुमेध सानू बद्दल काही सांगत नाही....

अनु सगळ्यांसाठी जेवण ऑर्डर करते...

सानू ला आता आधी पेक्षा बर वाटत असतं

अभि म्हणतो काय मॅडम कशी ए

मी बरी ए रे मला काय झालं ए...... सान्वी

ए सुमेध बरी ए रे ती तिला काहीच नव्हतं झालं तू उगाच रडला... अभिजित

काय सुमेध रडत होता... 🤦‍♀️🤦‍♀️😲😲😲😲..... सान्वी

अग रडत... पूर आला होता पूर... अभिजित

😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

ए गप ए अभि काहीही काय सांगतोस... सुमेध

अरे तुम्ही दोघ शांत बसा ती अजून टेन्शन घेईल.... अनुश्री

तेच ना.... अविनाश

बर ऐकाना..... सान्वी

हा मॅडम बोला.... अभिजित

मला भूक लागली ए आपण जेऊन घेऊया का मग नंतर गप्पा मारू..... सान्वी

हो चालेल चला... सुमेध

तुम्ही सगळे या मी जेवण वाढते.... अनुश्री

हा चल मी पण मदत करतो तुला.... अविनाश

चला सना मॅडम जेवायला असं म्हणून अभि बाहेर निघून येतो....

सॅमी तू रडत का होता येडू... 🤦‍♀️🤦‍♀️.... सान्वी

अरे बाबा मला टेन्शन आलं होतं तुला काय झालं अचानक येडू अचानक रडायला लागली होतीस तू मगाशी
एकतर काही सांगत पण नव्हतीस मग कसं समजणार काय झालंय तुला
मी घाबरलो होतो ग एकतर आज घरी कोणीच नाही
ते बर झालं अवी आला वेळेत थोडं बर वाटलं

येडू सांगत जा ना ग काय झालं ते असं त्रास का करून घेतेस

😟😟😟😟😟😟😟😟😟😟😟


अरे हो बाबा सांगत जाईल पण रडू नकोस हा परत प्लीज

ओके बच्चा नाही रडणार चल आता... सुमेध उठून जायला निघतो तर सानू त्याचा हात पकडते

काय ग काय झालं

सॅमी मला भीती वाटते ए रे ते अभि...

सुमेध तिला पुढे बोलूनच देत नाही तिच्या ओठांवर बोट ठेवतो शुह्ह....

मी आहे ना बच्चा मी सांगेल त्याला यू डोन्ट वरी चल आता भूक लागली ए ना...

सानू लहान मुला सारखं तोंड करून हो म्हणते.. 🤭🤭🤭

चला मग कि आता पण उचलून नेऊ तुला... 😂😂🤭🤭

नाही नाही मी येतेय... सानू घाबरून पटकन उभी राहिली

🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️ घाबरत कुठली ... अशी उठते ए जस किडनॅप करणार ए मी तुला...

अरे म काय उचूलन नेणार होतास 😓😓😓😓😓

येडू एवढी घाबरते का मला... 🤦‍♂️🤦‍♂️ मी काय खाणार होतो का तुला

😏😒😏😒😏😒😏😒😏😒😏

ओके बाबा सॉरी बस्स ... 😀😀😀

गुड... थांब ताप आहे का नाही बघू दे असं म्हणून तो कपाळाला हात लावतो
हा थोडा आहे ग थांब मेडिसिन देतो

ए हुशार अरे ते जेवणानंतर आहे

नाही माझ्या कडे जेवणाआधी च आहे थांब

काय.... 🙄🙄🙄🙄🙄

अग बाळा
थांब तुला मेडिसिन देतो नाहीतर ताप वाढेल ना

अरे सॅमी पण ते...

ती पुढे काही बोलणार तोच सुमेध तिला कपाळावर किस करतो
बघ आता तुला लवकर बर वाटेल...

😂😂😂😂😂😂😂

🤭🤭🤭🤭

सॅमी तू ना...

हा मी काय ग सानू
किती स्वीट मेडिसिन होतं
आणि तुला माहिती ए का हे तुला हवं तेव्हा भेटेल
म्हणजे आजारी नसली तरी

😜😜😜😜😜😜😜


तू ना जास्त आगाऊपणा करू नको मार खाशील...

ओके बाबा सॉरी असं म्हणून तो सानू ला मिठी मारतो

सॅमी भूक लागली ए चल ना आता

हो चल चल

...
...
..
.
.


सगळे मस्त जेवण करतात....


जेवण झाल्यावर अभि म्हणतो सना तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना

म्हणजे तुला बर वाटत असेल तर सांग नाही तर आपण नंतर बोलू काही प्रॉब्लेम नाही

अरे नाही मी बरी ए आपण बोलूयात
आपण तिघे बाल्कनी मधे बसुयात का..

हो ठीके.... सुमेध / अभिजित

ठीके तुम्ही बसा मी एवढं डायनिंग क्लीन करते.... अनुश्री

मग मी एकटा बसून काय करू मी पण तुला मदत करतो अनु.... अविनाश


ओके ठीके..... अनुश्री

सुमेध, सान्वी आणि अभिजित बाल्कनी मधे येतात

सान्वी सगळं बळ एकवटून बोलायला सुरवात करते

अभि आज आम्ही तुला जे सांगणार ए ते तू प्लीज नीट ऐकून घे
चिडू नकोस
म्हणजे ते ना आम्हाला अनु आणि अविनाश म्हणजे ते मी नाही म्हणजे ते सुमेध आम्ही दोघ ते तुला

सानू शांत हो किती पॅनिक होते ए.... अभिजित

सानू तू ओके ए ना.... सुमेध

हो हो मी ठीके ए... सान्वी

सानू डोळे बंद करते, मोठा श्वास घेते आणि बोलायला सुरवात करते

अभि आज जे तुला सांगतोय नीट ऐक
नीट विचार करून निर्णय घे
आणि प्लीज चिडू नकोस

त्याच काय ए ना

अविनाश च अनु वर खूप प्रेम ए आणि अनु च पण त्याच्यावर खूप प्रेम ए

म्हणजे ते एकाच कॉलेज ला होते
तेव्हाच अवी नि तिला प्रोपोज केला होतं
पण तेव्हा तुमच्या घरी तुझ्या डिवोर्स मुळे वातावरण खूपच डिस्टर्ब होतं
म्हणून अनु नि त्याला काहीच सांगितलं नाही

पण आता थोडे दिवसा पूर्वी ते पुन्हा भेटले
अवी अजून पण अनु वर तेवढंच प्रेम करतो रे

अनु त्याला होकार देत नव्हती कारण तिला तुझी भीती वाटत होती

कारण अवी ची बहीण अंशिका जीनी तुला नकार दिला होता म्हणून तुला वाईट वाटलं होतं

पण अभि आज काही कारणामुळे अंशिका या जगात नाही ए

अवी ला हे काही माहिती नाही कारण तेव्हा तो इटली ला होता

अभि पण प्लीज अंशिका मुळे तू अवी ला जज करू नकोस

अनु खूप खुश ए रे त्याच्या सोबत

आणि अनु जशी तुझी बहीण ए तशीच ती माझी पण बहीण ए तर तिच्या बाबतीत मी सगळा विचार करून च मी पण निर्णय घेतला ए

अभि प्लीज तू पण एकदा विचार....

ती पुढे बोलायचा आधीच अभि तिथून उठून घरा बाहेर निघून गेला...

अभि अभि अरे ऐकून तर घे ना अरे प्लीज.... सान्वी


सानू च्या आवाजाने अवी आणि अनु पण बाहेर आले

अभि ला असं जाताना पाहून अनु काय समजायचं ते समजून गेली आणि रडू लागली अवी तिला शांत करत होता

सुमेध म्हणाला सानू मी आलोच तू काळजी करू नकोस मी आहे ना

सुमेध धावतच अभि च्या मागे गेला

अवी ला पण फार टेन्शन आलं होतं पण तो दाखवत नव्हता


तो फक्त सानू आणि अनु ला शांत करत होता

सानू ला वाटत होतं त्यानी पूर्ण ऐकून तरी घ्यायला हवं होतं

तिला फार टेन्शन आलं होतं

..
...
..
...
......
.
..
.
.
.


.

.

( तुम्हाला काय वाटतं अभि असं का वागला

मला ही वाटतं त्यानी पूर्ण ऐकून घ्यायला हवं होतं

त्याला आता कसं समजवायचं...????? )


...
.
.
.
.
.
.
.


( सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया पुढील भागात....

काही चुका असतील तर प्लीज माफ करा.... )

.
.
.
.
.
.
.
.
.

.




सगळ्यांनी खुश राहा आणि घरीच राहा.... 🤗

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.



.
.
.



आत्ता साठी बाय बाय...... 🙂☺️


.
..
.
.....
..
.
.
.
..
.
.
.




- सुकन्या जगताप....... 😘