सलाम-ए-इश्क़ - भाग -१ Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सलाम-ए-इश्क़ - भाग -१







महानगर विकास मंडळाचे सभागृह उपस्थितांनी खच्चून भरले होते.प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.’आम्ही पुणेकर–आम्ही उद्योजक’ या संस्थेतर्फे दरवर्षी पुण्यातील नव्याने भरारी घेणाऱ्या १० निवडक तरुण उद्योजकांना देण्यात येणारा- ‘न्यूबीझ’ पुरस्कारचा आज वितरण सोहळा पार पडत होता.

पुरस्कार वितरणाला सुरुवात झाली.निमंत्रितांच्या रांगेत बसलेले समस्त शिर्के कुटुंबीय आतुरतेने वाट बघत होते ते त्यांच्या लाडक्या आदित्यच्या नावाची.यंदाच्या १० उद्योजकांच्या यादीमध्ये त्याचे ही नाव होते.त्याचा हा पहिलाच पुरस्कार असल्याने शिर्के कुटुंबीयांचा उर अभिमानाने भरून आला होता.स्वतःची कंपनी असलेल्या संजय शिर्केंचा हा धाकटा मुलगा.मोठा मुलगा अभिमान..... ‘शिर्के इंजिनिरिंग प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनी वडिलांच्या बरोबरीने सांभाळत होता.संजय शिर्के त्यांची पत्नी विभा,मुलगा अभिमान ,सून ऋतुजा व नातू अगस्त्य असा सुंदर परिवार, पुण्याच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर देहूरोडला प्रशस्त बंगल्यात राहत होता.त्यांच्या शांत सुंदर जीवनाला एक दुःखाची काळी किनार मात्र होती...आणि ती चिंता अश्या कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी विभा शिर्केंना अजूनच जास्त छळायची...होता होता एक दोन पुरस्कार झाले आणि निवेदिकेने नाव उच्चारले--आदित्य संजय शिर्के द फाऊनडर ऑफ ‘द सोशल इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड’.टाळ्यांचा कडकडात झाला.पहिल्या रांगेतून उठून आदित्य मंचावर आला....


वय वर्ष 33, ५.१०’’,उंच, मुळचा गोरा रंग पण आता जरा रापलेला,रोजच्या व्यायामाने कमावलेली घोटीव शरीरयष्टी,ट्रीम केलेली उठावदार दाढी,नेव्ही ब्लु ब्लेझर,व्हाईट शर्ट, ग्रे ट्राउझर,व्हाईट पॉकेट स्क़ेअर आणि डबलमोन्क शूज....त्याच्या दमदार आश्वासक चालीत कमालीचा आत्मविश्वास होता.त्याने मोठ्या अदबीने पुरस्कार स्वीकारला.उपस्थितांना संबोधतांना त्याच्या धीरगंभीर आवाजाने त्याच्या व्यक्तित्वाला अजूनच उठाव येत होता.


विभाताईना आभाळच ठेंगणे झाले होते.त्यांची नजरच हटत नव्हती,त्यांना वाटलं “लहानपणी लावायचो तशी मोठी काळी तिट आपल्या लाडक्याला लावावी अगदी गालावर.....” त्यांना त्यांचंच हसू आलं पण क्षणभरच-नंतर पुन्हा तोच जीवघेणा प्रश्न...ह्याच्या लग्नाचं काय...कसं समजावू ह्याला.....का हा जीवघेणा अट्टहास लग्न न करण्याचा,वडलांचा बिजनेस न सांभाळण्याचा? स्वतःचा छोटासा उद्योग,८/१०कलीग्ज...तरीही इतका एकटा एकटा...राहतो...कसं होणार माझ्या आदि चं? ‘त्या’ मेलीचं खूळ का जात नाही ह्याच्या डोक्यातून? त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले.

व्यासपीठावर उभा असलेला आदित्य त्याच्या बिसनेसच्या व्हिजन,मिशन विषयी तन्मयतेने सांगत होता.त्याची १० लोकांची टीम ४ थ्या रांगेत बसली होती.सर्वात कडेला पिहू आणि भूमी बसल्या होत्या.आदित्य स्टेजवर असल्यापासून पिहुची दबक्या आवाजात अखंड बडबड चालू होती.भूमीने वैतागून तिला २/३ वेळा गप्प केले होते पण शांत बसेल ती पिहू कसली-


वर आदित्य समारोपाचे शब्द बोलत होता तेव्हा पिहू परत भूमीच्या कानात कुजबुजली.

–‘यार....भूमी ..कसले हँडसम दिसताय ....आदीसर....Please यार tell him नो ….how much I love him…my sweetie cutie pieee..खुद रबने बनाया होगा फुरसत से तुझे मेरे यार....."


तिच्याकडे रागाने बघत भूमीने ‘गप्प बस’ असा इशारा केला.भूमीच्या खांद्यावर मान टाकत लाडाने परत ती भूमीच्या कानात कुजबुजली

–‘ भूमी यार please मला थांबवू नको...What if मी आज आदिसरांना अचानक किस केल तर.....He is so cute …..you know something bhumi….ते आतापर्यंत सिंगल का आहेत? He was just waiting for me …..मिल जाते है जो बने एक दुजे के वास्ते”


घाबरून तीच डोकं खांद्यावरुन उचलून तिच्या दंडाला हळूच चिमटा घेत भूमी म्हणाली
-‘ ये नौटंकी..किती फिल्मी आहेस ग !....गप्प बस न यार मला खूप awkward होतंय हं,मूर्ख, १० वर्ष तरी लहान असशील तू आदिसरांपेक्षा....... तुला कळतंय का शेजारची फक्त एकच सीट रिकामी आहे आणि त्यानंतर बसलेल्या नचिकेतचं तुझ्याकडेच लक्ष आहे..he is continuously staring at you baby…बघ बघ .....”

तिने हळूच बाजूला पाहिलं तसं नचिकेतने झटकन मान समोर वळवली.तिला खुदकन हसू आले.ती भूमीला म्हटली-

‘जाऊ दे त्याला सवय आहे पोरी टापायची...Useless..,आणि प्यार की कोई उमर नाही होती है साहेबा.....I love him that’s it ..…भूमे ...मी आदिसारांना प्रो मारू का?...what u say ? ’

शेवटी वैतागून भूमी म्हटली ‘अग ये..स्टुपिड हळू बोलायचं काय घेशील? निर्लज्ज..आपण अवार्ड फंक्शनला आलो आहोत...व्हालेनटाइनच्या पार्टीला नाही आणि हो ...आमचा नची सगळ्या पोरी नाही टापत हा ......फक्त तुला टापतो...and U know that.’
“Whatever ….” म्हणत पिहुने बेफिकरीने खांदे उडवले.


तशी पिहू होतीच बिनधास्त..स्पेगटी टॉप,पायघोळ स्कर्ट,खांद्याला रंगीबेरंगी झोला..आखूड कुरळे केस,मोठाले कानातले,तिला कसलीच फिकीर नव्हती.पिहुने नुकतच computer engineering पूर्ण केल होत,त्यातही तिला फक्त ५५% अक्याडमिक्स. अगदीच सो सो.... आणि त्याचं तिला जराही guilt नव्हत...अल्लड,अवखळ,बोलतांना जराही भान नसलेली,बेदरकार पिहू....अवखळ वाराच जणू...गोबरे गाल आणि गोलुमोलू..उंचीही म्हणावी तशी जास्त नाही पण Attitude मात्र ‘Who Cares’ आणि कमालीची फिल्मी...आदित्यच्या धीरगंभीर कंपनीत ही आली ती केवळ विभा शिर्केंच्या हट्टामुळे..यांच्या मैत्रीणीचं ते लाडकं शेंडेफळ.क्लास इंमप्रूव्हमेटला एक वर्ष नाहक जाणार होत तेव्हा आदित्यकडून काही शिकता येईल म्हणून २ महिन्यापूर्वीच ती जॉईन झाली,शिकणं वैगरे तर दूरच पण आदित्यला आणि टीमला वैताग मात्र खूप देत होती ती. कंपनीत प्रोग्रामिंग सांभाळणारी भूमी तिची चांगली मैत्रीण झाली होती.हार्डवेअर सेक्शन बघणारया नचिकेतला मात्र तिचा हा बालीशपणा,धांदरटपणा उगाचंच आवडायचा..तिच्या प्रेमातच होता तो. आदित्यने तिचं अर्धवट नॉलेज बघता महत्वाचं काम न देता तिला फक्त प्रोडक्टचे ब्रोशर बनवायचं काम दिलं होत.

इकडे-
आदित्य व्यासपीठावरून खाली येऊन जागेवर बसला होता.आजूबाजूचा झगमगाट,आवाज,गोंगाट, काही काही त्याच्या गावीही नव्हत,त्याची नजर शून्यात होती..डोळे डबडबलेले होते.हातातल्या अवार्डकडे बघत तो हळूच म्हणाला-“This is for you आशु…..Love u ”


************


अवार्ड्सनंतर काही वेळाने जेवायचा कार्यक्रम सुरु झाला.संजय शिर्के जातीने आदित्यच्या टीम मेम्बर्सची चौकशी करत होते.पिहू तिच्या विभा आंटीशी मनमोकळ्या गप्पा मारत होती.गप्पा मारतांना मात्र फिरून फिरून तिचं लक्ष आदित्यकडेच जात होते.तिला आज आदित्यलाच पहायचं होत,शक्य असल्यास त्याला त्याच्या लूक बद्दल कॉम्प्लिमेंट ही द्यायचं होत,पण आदित्य आपल्याशी किती खत्रूड वागतो हे तिला माहित होत, तिला नेहमी वाटायचं -‘आपल्याशीच नाही तर समस्त स्त्री जातीशी त्याचं काय वाकडं आहे कोण जाणे?’
विभा शिर्केंच्या मनात आता वेगळेच विचार फेर धरत होते.

आदित्य त्याच्या ‘अभिदा’ शी बोलत उभा असतांना त्याला मागून एक ओळखीची अस्पष्ट हाक ऐकू आली-‘हेल्लो मिस्टर इत्यादी शिर्के’
आदित्यने चमकून मागे बघितले...सुंदर मोरपंखी साडी,कॉट्रस्ट ब्लू स्लिव्हलेस ब्लाउज,थोडीशी गुटगुटीत,बराचश्या मेकअप मधली एक स्त्री त्याच्याकडे पाहून गोड हसत होती.तिच्या डोळ्यात अस्पष्ट असा ओलावा होता.आदित्य तिच्याकडे पहाताच राहिला..खूप वर्षांनी एक गोड स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आले होते.त्याला शब्द सुचत नव्हते...त्याच्यासाठी जणूकाही काळ झटकन १२ वर्ष मागे गेला सारखा झाला ...आणि नकळत त्याने तिला एका हातच्या कवेत घेतले.... ‘हेल्लो शाकालाका ...’ आणि तो झटकन भानावर आला...तो ओशाळला आणि तो तिच्यापासून दूर झाला....आणि आताचा आदित्य होऊन तिला अदबीने म्हणाला –

‘ओह ...I am extremely sorry शलाका.. कशी आहेस? इथे कशी?’

क्रमशः

©हर्षदा