Salaam-a-ishq - 11 books and stories free download online pdf in Marathi

सलाम-ए-इश्क़ -  भाग - ११


कालचा कार्यक्रम,त्यानिमित्ताने झालेली धावपळ यामुळे आदिला जाग आली तेव्हा सकाळचे ९ वाजून गेले होते. ऑफिसला जायला उशीर होणार म्हणून तो स्वतःवर चिडला आणि त्याने आवरायला घेतलं.
तयार होऊन बॅगमध्ये महत्वाचे कागदपत्र टाकत असतांना रूमच्या दारावर झालेली टकटक ऐकून त्याने दरवाजा उघडला. समोर त्याचा पुतण्या अगस्त्य-त्याचा लाडका ‘गप्पी’ उभा होता.त्याच्या लाडक्या आदित्य काकाचं नाव त्याने ‘आ’ ‘का’ ठेवलं होतं.दरवाजा उघडताच तो पळत जाऊन आदीच्या आरामखुर्चीवर बसला आणि पाय लांब करत म्हणाला-
‘आका तुला माहित आहे आजीमॉम माझ्यासाठी एक न्यू काकी आणणार आहे...........’
‘काकी?’ केसांत फिरवत असलेला कंगवा तसाच ठेवून तो थोड्या आश्चर्याने म्हणाला.तो पुढे अजून काही विचारणार तेवढ्यात हातात पोह्यांची डिश घेऊन अभिमान स्वतः खोलीत आला.खुर्चीत बसलेल्या अगस्त्यला पाहून तो म्हणाला-“गप्पी खाली जा आजीमॉम बोलावतेय तुला .”
“डॅडी ! मी आत्ताच आलोय ना..मला आकाला न्यू काकीबद्द्ल सांगायचंय ….माझा फ्रेंड ओम आहे ना त्याची काकी त्याला डान्स,ड्रॉईंग शिकवते ..तर न्यू काकी पण मला शिकवेल का हे विचारायचंय...आणि ती मला .....” खुर्चीला हळूहळू हेलकावे देत अगस्त्य बोलत होता तसं त्याला अलगद उचलून खाली ठेवत अभिमान म्हणाला-“अगस्त्य चल पळ बाळा आजीमॉम ओरडेल नाहीतर” म्हणून त्याने अगस्त्यला खाली पिटाळलं आणि दरवाजा लाऊन घेतला.
आदि गोंधळून तसाच उभा होता.हे सगळं काय चालू आहे त्याला कळतंच नव्हत.
आदीच्या हातात डिश देत अभी म्हणाला- ‘आदि ब्रेकफास्ट कर तुझ्याशी जरा बोलायचंय’
‘अरे पण तू का नाश्ता आणलाय, मला नकोय दा.... अगोदरच खूप उशीर झालायं...ऑफिसला पोहचायला हवं..’ डिश पुन्हा टेबलावर ठेवत तो म्हणाला.
त्याला त्याच्या बेडवर बसवून त्याच्या हातात पुन्हा डिश देत अभी म्हणाला-
‘रिलॅक्स आदि ..मी तुझ्या ऑफिसला फोन केलाय की तू आज सुट्टीवर आहे,सो....नो एक्स्क्यूज...’
‘अरे दा पण काय झालंय आणि आता गप्पी काय सांगत होता मला?,न्यू काकू वैगरे काय भानगड आहे...’
त्याच्या शेजारी बसत अभी शांतपणे म्हणाला-
‘आदि...यार इनफ इज इनफ नाऊ....इतके दिवस काहीतरी जादू होईल आणि तू लग्नासाठी तयार होशील या आशेवर घरातले सगळे होते,पण तू लग्नाचं काही मनावरच घेत नाहीये.एकदा तू तुझ्याभोवती पसरलेल्या आशुच्या आभासी जाळ्यातून बाहेर येऊन आजूबाजूला तर बघ...आईचा लाडका आहेस ना तू मग तिचा तरी विचार कर....हे असं लग्न करणार नाही म्हटल्यावर तुझ्यापुरता तू आरामात प्रश्न सोडवलास रे पण बाकीच्यांना कोडयात टाकलंय त्याचं काय?
आईला,डॅड ,मला,ऋतूला आमच्या सोशल सर्कलमध्ये असणारे लोक विचारून भंडावून सोडतात की आदीचा नेमका प्रॉब्लेम काय झालाय?नको नको ते प्रश्न विचारतात,शंका घेतात...काय सांगायचं आम्ही? काय असणार आहे तुझं पुढचं पाउल?आज ह्या प्रश्नांची उत्तर तू द्यायची आहे.....मॉम डॅड यांच्या प्रती तुझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या तू पूर्ण कराव्यात असं मोठा भाऊ म्हणून मला वाटतं....’
नाश्ता तसाच अर्धवट ठेऊन शांतपणे तो पाणी प्यायला. पॅन्टच्या खिश्यात हात घालून समोरच्या खिडकीतून दिसणाऱ्या पारिजातकाच्या झाडाकडे बघून तो निराशेने हसला आणि वळून तो अभिकडे बघत म्हणाला-
“दा...तुम्हाला लोकं नको ते प्रश्न विचारतात म्हणून मी लग्न करावं, माझ्याबद्दल लोकं शंका उपस्थित करतात म्हणून मी लग्न करावं की गप्पीला ड्रॉईंग,डान्स शिकवायला हक्काची काकी यावी म्हणून मी लग्न करावं....सांग ना दा ......मी यासाठी लग्न करावं?
“आदि हे बघ मला तुझ्या शब्दांत अडकायचं नाहीये आणि तुला काल मिळालेल्या निखळ आनंदावर विरजण ही घालायचं नाहीये..पण आई आता थकलीय रे तुला समजावून..डॅड काही बोलू शकत नाही कुणाला तरी बोलावच लागेल ना? आणि तू मला जे प्रश्न विचारलेस ना त्याची उत्तरे मी हीच देईल की - हो ह्या सगळ्या कारणांसाठी तू लग्न करावं...”

‘माझ्यापेक्षा ही न दिसणारी लोकं तुम्हाला केव्हापासून महत्वाची झाली दा?’ त्याचा सूर कडवट झाला होता.
‘ तू आशुवर प्रेम केलं आणि ती तुला भेटली नाही ह्या व्यतिरिक्त मला एक पटेल असं कारण सांग आदित्य की त्यासाठी तुला लग्न करायचं नाहीये. मी स्वतः हा विषय बंद करेल कायमचा.......नाहीतर मॉम म्हणतेय तसं तुला ती म्हणेल त्या मुलीशी लग्न करावं लागेल....and that is final.’
‘दा तू सुद्धा प्रेम केलंय ना?..तुझं तर लव्ह मॅरेज आहे तरीही तू मला हा प्रश्न विचारावा हे खूप दुर्दैवी आहे...पण खरचं तू म्हणतोय तसं मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून आणि ती मला भेटली नाही ह्या दोन गोष्टी सोडल्यास माझ्याकडे एकही कारण नाही तुला द्यायला....
मी काय कारण देऊ तुला दा- ते म्हणतात ना- देव जर प्रत्येक आत्मा वेगवेगळ्या मातीने घडवत असेल ना तर तिला मला घडवणारी माती एक आहे दा.आम्ही अश्या प्रेमाने प्रेम केलंय जे प्रेमापेक्षा खूप काही जास्त आहे. तुझ्या आदिला कळलचं नाही रे की तो त्याच्या आयुष्यातून केव्हा संपला आणि केव्हा त्यात फक्त आशु न आशुच व्यापून राहिली...सांग आता हे असं माझ्यातून संपलेलं आयुष्य मी कुणाच्या नावावर करू? दा माहित नाही कुठतरी काहीतरी चुकतंय जे मला तिच्याशिवाय काहीही सुचू देत नाही की दुसरा विचार करू देत नाही.....सारखं काहीतरी घडणार आहे ह्याची अनामिक चाहूल ओढ लावत असते. लग्न हेच प्रेमाचं डेस्टिनेशन नाहीय दा तो प्रेमाच्या मार्गातील एक फक्त विसावा आहे पण मी प्रेमाचा असा प्रवास सुरु केलाय जिथं मी एकदाच थांबणार आहे जेव्हा कायमचा थांबणार आहे.......... दा खरचं आज माझ्याकडे एकही कारण नाहीये रे तुला द्यायला.
अभिचे डोळे भरून आले होते.त्याने आदीच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला एक घट्ट मिठी मारली.अभिच्या खांद्यावर ठिबकणारया आदीच्या अश्रूंनी मुक्यानेच एक नाहीतर हजार कारणं त्याला दिली होती.
******************
आज आदि ऑफिसला येणारा नाही हे फक्त क्लेरीकल काम करणाऱ्या सुहासला माहित होतं.सरांच्या धाकाने सगळे व्यवस्थितपणे काम करतात म्हणून त्याने मुद्दाम जाहीर केलं नव्हतं. भूमी महत्वाच्या प्रोग्रामवर काम करत होती.पिहुला नवीन प्रोडक्टचं ब्रोशर करायचं होतं पण नेहमीप्रमाणे तिचं त्यात लक्ष नव्हतच दर दोन मिनिटांनी ती दरवाज्याकडे बघत होती.शेवटी कंटाळून ती भूमीजवळ गेली.तिच्या शेजारी खुर्ची घेऊन बसत ती म्हणाली-
“भूमे यार......बघ ना,आज खास सरांसाठी प्रिटी झिंटा लूक केलाय पण इम्तिहा हो गयी इंतजार की...फिरभी...आईना कुछ खबर मेरे यार की........भूमे कधी येतील सर ?”
कॉम्प्युटर स्क्रीनवरून थोडी नजर हटवून तिच्या कुरळ्या केसांकडे बघून हसत भूमी तिला म्हणाली-
“ ये झिपरी पिंटा.......सर केव्हाही येतील आणि तुला असं टाइमपास करतांना बघून परत चिडतील..so better you go and do your work....म्हणे प्रिटी झिंटा”
तोंड वेंगाडत ती तिथून उठली आणि जागेवर जातांना शेजारच्या डेस्कला धडकून तिच्या कपाळाला जोरदार मार बसला.ती कळवळली.समोरच नचिकेत प्रोडक्टच वायरिंग करत होता.तिला लागलेलं पाहून तो धडपडत उठून तिच्याजवळ गेला. काळजीने नकळतपणे तिचे कपाळावर आलेले कुरळे केस बाजूला करत तिला झालेली जखम बघत तो चिडून बोलला- “पिहू वेडीय का? बघून काम करत जा गं!”
त्याच्या ह्या धाडसाने,अनाहूत स्पर्शाने ती गोंधळली पण लगेच भानावर येत तिने त्याचा हात जोरात झटकला आणि ती डोळे मोठे करत म्हणाली-“ये हेल्लो…मी बघूनच काम करते आणि तुला काळजी करायची गरज नाहीये.” ती चिडून तिच्या जागेवर गेली.
तिच्या अश्या फटकळ बोलण्याने दुखावून नचिकेत त्याच्या जागेवर गेला.पिहू ऑफिसमध्ये जॉईन झाल्यापासून त्याला ती आवडत होती.
भूमीला नचीबद्दल वाईट वाटलं पण पिहुला हे सांगून समजणार नाही ह्याची तिला खात्री होती.तरीही तिला समजवायला म्हणून भूमी तिच्या डेस्कजवळ गेली.पिहू फोनवर बोलत होती. फोन ठेवल्यानंतर पिहुने आनंदाने भूमीला मिठी मारली. थोड आश्चर्याने तिला दूर करत भूमी म्हणाली-“ ये बाई...R U OK काय झालं?...”
भूमीच्या खांद्यांना दोन्ही हातांनी गच्च पकडून तिला गोल गोल फिरवत पिहू तिच्या कानात हळूच म्हणाली.-“भूमी मॉमचा फोन होता. ती विभा आंटी ना काल अदिसर आणि माझ्या लग्नाविषयी बोलली होती आणि आज विभा आंटी सरांना शेवटचं सांगणार आहे की पिहुला तू आवडतोस आणि तिच आपल्या शिर्के खानदानची ‘छोटी बहु’ होणार....isn’t it exciting भूमी?”
कामात गढून गेलेल्या नचीकडे एक नजर टाकत ती पिहुला म्हणाली-‘पिहू तुला खरंच आदिसरांशी लग्न करायचंय?...तुमच्या वयातला फरक...तुमच्या पर्सनॅलिटी मधला फरक...काहीच मॅटर करत नाही आणि मुख्य म्हणजे आदि सर ह्या गोष्टीला हो म्हणतील?’
आनंदाने डोळे मिचकावत पिहू म्हणाली-‘ ह्या गोष्टी ओल्ड फॅशन आहेत ग...मी इतका विचार नाही करत..इतका हँडसम,रिच हबी कुणाला नको वाटेल..आणि सरांना हो म्हणावच लागेल. विभा आंटी शेवटची धमकी देणार आहेत त्यांना...लग्न केलं नाही तर मी आश्रमात निघून जाईन म्हणून...यार भूमी प्यार पाने के लिये की हुई खुद्गर्जी भी प्यार ही केह्लाती है.’
तिच्या डोळ्यात थेट बघत भूमी म्हणाली-‘....आणि समज सर नाही म्हणाले तर काय?’
निष्काळजीपणे ओठांवर थोडंस हसू आणत ड्रॉवर मधून कटर काढत हलकेच मनगटावर घासत ती म्हणाली- ‘मग शेवटचं हत्यार तयारच आहे.....’
घाबरून तिच्या हातातलं कटर काढून घेत भूमी म्हणाली- ‘ये झामन सटकली का गं तू जराशी?...आदि सर आहेत ते ...तुझ्या अगोदर कितीतरी वर्ष ओळखतो आहे त्यांना.कुणावर तरी जीवापाड प्रेम होतं त्याचं असं ऐकलंय.....त्यामुळे सिंगल आहेत ते... मी सांगणार नव्हते तुला पण हे असं काही करणार असशील ना तर माझ्याशी बोलू नको.’
रागाने भूमी तिच्या डेस्ककडे निघून गेली.तिच्यामागे पळत जाऊन तिला थांबवत ती म्हणाली-‘ अगं वेडे घाबरते काय एवढं आणि असं काहीच होणार नाहीये कारण विभा आंटी त्यांना कनविन्स करतीलच याची मला खात्री आहे... ते मनापासून प्रेम वैगरे काय नसतं...माझ्यासोबत राहून एका वर्षात विसरतील ते काय जुनं प्रेम बीम...बघच तू...!!!’
जागेवर बसत तिच्याकडे एक हलकी स्माईल देत भूमी म्हणाली-‘Grow Up Pihu…..तुला जे वाटतंय ना त्यापेक्षा प्रेम खूप वेगळं असतं गं आणि ते बघायचं असेल तर नचीच्या डोळ्यात बघ.’
तिच्या ह्या बोलण्याने जरा रागावूनच पिहू जागेवर आली आणि कामाला लागली.
लंच ब्रेकला ही भूमी आणि पिहू गप्पच होत्या.टिफिन उघडणार तोच पिहुचा फोन वाजला.आईचा फोन येतोय हे बघून ती खुश झाली.त्या आनंदात नकळत भूमीला एक मिठी मारून ती बोलायला जरा बाजूला गेली. थोडावेळच ती फोन वर बोलली असेल तोच तिने रागाने फोन फेकला आणि ती धावतच तिच्या डेस्ककडे पळाली.तिला असं पळतांना बघून भूमीही तिच्या मागे धावली.तिला वाटणारी शंका खरी होती.पिहुने टेबलावर पडलेलं कटर उचललं आणि डोळ्यात पाणी आणून एक दीर्घ श्वास घेत तिने वार करायला म्हणून ते थोडं वर उचललं तेवढ्यात भूमीने तिला थांबवायला म्हणून तिच्या हाताला हिसका दिला. कटरचा एक खोल वार तिच्या तळहातावर बसला आणि ती कळवळली...तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून सगळे आवाजाच्या दिशेला धावले.भूमी तिच्या हाताला ओढणी घट्ट गुंडाळत होती.ऑफिसमधले सगळे भांबावून गेले.नचिकेतने धावत जाऊन First-aid बॉक्स आणून अगोदर तिची जखम साफ केली,मग पट्टी गुंडाळली.पिहू अजूनही भानावर नव्हती,ती सारखी रडत होती...रक्तस्त्राव झाल्याने तिला गरगरल्यासारख झालं.तिची अवस्था बघून नची म्हणाला-‘भूमी तू सरांना फोन कर मी हिला वरच्या मजल्यावरच्या दवाखान्यात घेऊन जातो.’
पिहुला आधार देऊन उठवत भूमी म्हणाली-‘नची अरे पण ..लिफ्ट बंद आहे सकाळपासून, ती एवढ्या स्टेप्स कश्या चढेल?
ऑफिसमध्ये सगळा गोंधळ चालू होता.कुणी म्हणत होतं डॉक्टरांना खाली बोलवा,कुणी म्हणत होत एकच मजला आहे डॉक्टर खाली येणार नाही तेव्हा हळूहळू वर घेऊन चला.ह्या सगळ्या गोंधळात नचीने तिला उचललं आणि तो तिला दवाखान्यात घेऊन गेला. आता रडल्याने,मानसिक त्रासाने,रक्तस्त्रावाने गळून ती जरा अर्धवट शुद्धीत होती,तिच्या अर्ध्या उघड्या डोळ्यांना आणि फिल्मी जाणिवांना एवढंच कळल की हिरो ने हिरोईनला उचलून दवाखान्यात नेलं..
डॉक्टरांनी आवश्यक ते उपचार करून तिला जरा वेळ आराम करायला म्हणून तिथेच ठेवलं.तिची आई ऑफिसकडे यायला निघाली होती. नचीचा शर्ट जागोजागी रक्ताने माखला होता.ऑफिसमधल्या बाकी लोकांना खाली पाठवून तो एकटाच तिच्याजवळ बसला होता.थकून शांत झोपलेली पिहू बघून त्याला हळूहळू शांत होत जाणार वादळ आठवलं आणि तो बळेच हसला.तिचे कुरळे केस वाऱ्याच्या हलक्याश्या स्पर्शानेही तिच्या चेहऱ्यावर लाटांसारखे पसरत होते.त्या केसांच्या खेळात तो कितीतरी वेळ हरवून गेला.त्याच्या खांद्यावर एक हात पडताच तो भानावर आला.त्याच्या शेजारी आदि उभा होता.आदिला बघताच तो म्हणाला –‘सर हे असे वेडे लोकं का ठेवतात तुम्ही कंपनीत...स्वतःच्या जीवाला घोर आणि समोरच्या व्यक्तीच्या जीवालाही.त्याचे डोळे भरून आले. त्याला हलकेच थोपटत आदि म्हणाला-‘मला सांगितलय भूमीने खाली काय झालं ते...आणि हे प्रेम जपून ठेव डोळ्यातच थोड्याच दिवसांत लाइफपार्टनर बनून ही तुझ्या आयुष्यात येईल ना तेव्हा भेट दे तिला...माझ्यामुळे तिची ही अवस्था झालीय.तिला माहित नाही तिला जे माझ्याविषयी वाटतंय ते फक्त एक आकर्षण आहे तुझ्या खऱ्या प्रेमाची तिला जाणीव करून द्यायचं काम माझं...’
आदीच्या ह्या बोलण्याने त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता.
*********************
पिहू दोन चार दिवस आराम करून जेव्हा ऑफिसला आली तेव्हा तिला कमालीचा पश्चाताप झाला होता.त्या दिवशी पिहुला नक्की काय झालं होत हे घरी आणि ऑफिसमध्ये एव्हाना सगळ्यांना कळलं होत.ती जॉईन झाल्यावर सर्वात अगोदर आदिने नची आणि पिहुला केबिनमध्ये बोलावलं आणि तिला योग्य ती समज दिली.तिला त्या दिवशीचा उचलून घेऊन जाणारा नचीच आठवत होता.त्यांना तिथे जरा वेळ बोलायला म्हणून केबिन मध्येच थांबायला सांगून आदि बाहेर आला.फिक्कट ग्रे कलर शर्ट,फोर्मल पॅन्ट..विराट स्टाईल ची ‘मोहॉक’ हेयरकट आणि दाढी ...सावळा,आकर्षक चेहरा.. नचीकडे ती पहिल्यांदा बघत असल्यासारखी बघत होती. प्रेमात एक जादू असते प्रेमात पडल की प्रेम समोरच्याची छोट्यातली छोटी गोष्ट,सर्वसामान्य गोष्ट सुंदर करून टाकतं...आणि ती सुंदरता पाहणार्याच्या डोळ्यात प्रेमात पडल की नकळत उतरत जाते.
काहीच आढेवेढे न घेता नची तिला सरळ म्हणाला-‘ Pihu I love you like anything … ह्या जगातली दुसरी सगळ्यात सुंदर गोष्ट माझ्यासाठी तुझ्या डेस्क समोरच्या आरश्यात पडणारं तुझ प्रतिबिंब असेल तर मी जगातल्या पहिल्या सगळ्यात सुंदर गोष्टीच्या प्रेमात आहे. Will you marry me?’
गालावर उमटलेली लाली मुक्तपणे उधळू देत ती म्हणाली-‘हे अमित कलंत्रीच्या स्टाईल मधलं प्रपोज जरी मी एक्सेप्ट केलं तरी मला माहित आहे मी केलेला हा मूर्खपणा,माझ्यात भरलेला धांदरटपणा नक्कीच तुला आवडत नसणार तो मी बदलायचा प्रयत्न करेन..मला वेळ दे थोडा...स्वतःला बदलायला..’
तिचा जवळ जाऊन हात हातात घेत डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला-“कोई प्यार करे तो तुमसे करे,तुम जैसे हो वैसे करे.कोई तुमको बदल कर प्यार करे तो वो प्यार नही,सौदा करे और साहिबा प्यार मै सौदा नही होता”
तिला आवडणाऱ्या ह्या फिल्मी अंदाजाने खुश होऊन जागेचं भान न ठेवता ती त्याच्या मिठीत शिरली.
*********************************
पिहू आणि नची जणू एकमेकांसाठीच बनले होते प्रेम व्यक्त केल्यानंतर त्यांच्यातलं नात अधिकच घट्ट झालं होतं.आदीची ही जरा अँग्री यंग मॅनची प्रतिमा सादळली होती.पिहू नचीला एकत्र पाहून सर्वात जास्त आनंदी भूमी होती आणि त्यासाठी आदि सरांना मनोमन क्रेडीट ही देत होती.
पुढच्या आठवड्यात अग्रिकॅल्चर ग्राउंडवर होणाऱ्या ३ दिवसांच्या “All India NGO Conference and Exhibition 2018” ची तयारी आदीच्या ऑफिसमध्ये जोरदार चालू होती.ही कॉन्फरन्स पहिल्यांदा पुण्यात होणार होती आणि त्यात आपले प्रोडक्ट ठेवायला आदि आणि कंपनी खूप उत्सुक होते.पहिल्या दिवशी अमित,दुसऱ्या दिवशी पिहू आणि नची आणि तिसऱ्या दिवशी भूमी न अमित अश्या कामाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या होत्या.स्टॉल बुकिंग वैगरे सगळी अरेंजमेंट व्यवस्थित झाली होती. ह्या कॉन्फरन्समुळे त्यांचे प्रोडक्ट्स खूप लोकांपर्यंत,NGO पर्यंत पोहचणार होते.
कॉन्फरन्सचा दिवस जवळ आला तशी आदीची बेचैनी वाढत होती, कुठंतरी काहीतरी चुकतंय हा विचार सारखा त्याच्या मनात रुंजी घालत होता…..का कुणास ठाऊक.........!!!!
क्रमशः
©हर्षदा

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED