सलाम-ए-इश्क़ - भाग-७ Harshada द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सलाम-ए-इश्क़ - भाग-७


#सलाम-ए-इश्क़

भाग- ७

विसापूरचा तो धुंद अनुभव कमालीचा अवघडलेपणा देऊन गेला होता.
काही दिवसांपूर्वी झालेलं भांडण,वाद.. त्यानंतरची चिडचिड सगळं शांत झाल होतं आणि शब्दांनी सांगता येणार नाही की डोळ्यांनी व्यक्त होणार नाही अशी एक जाणीव गुलाबी रंग लेऊन गालांवर सांडली होती.
अबोला मात्र कायम होता पण अचानकपणे समोर आल्यावर आपसूक नजर चोरली जात होती. त्या धुंदीत बोललेलं गेलेलं ‘लव्ह यु’ ने मात्र आशुला पुरतं घाबरवलं होतं....आपण पुन्हा काहीतरी मोठा मूर्खपणा केला याची जाणीव तिला अस्वस्थ करत होती.
आता टर्म संपायला एकच आठवडा शिल्लक होता,सबमिशनच वारं वहायला लागलं होत.एका महिन्यापासून घेतलेली मेहनत आणि जिद्दीमुळे आदित्यचं सर्व सबमिशन पूर्ण होतं.

लायब्ररी मध्ये जातांना लायब्ररी बाहेरच्या कॅरिडोरमध्ये आशुला आदित्य एकटाच पेपर वाचतांना दिसला.तिच्या छातीत नकळत गोड धडधड वाढली.पण आज त्याला त्या दिवसाच्या आपल्या मूर्खपणाबद्दल स्पष्टीकरण द्यायचंच असं ठरवून तिने हिम्मत बांधली. ती त्याच्या शेजारच्या डेस्क समोरचा पेपर चाळत उभी राहिली.
‘आदित्य एक मिनिट बोलायचं होत तुझ्याशी....’
तिने त्याच्याकडे न बघता पेपर चाळत विचारलं. त्याने चमकून वर बघितलं,मग अश्विनीला पाहून न पहिल्या सारखं करून पेपरमधून जराही लक्ष न काढता म्हटलं
‘बोल...’
‘त्या दिवशी....आय मीन...तेव्हा...’
ती चाचरत होती तिचे शब्दच हरवले.मग पेपरमधून लक्ष काढत आदि हातची घडी घालून तिच्याकडे बघत उभा राहिला.

‘बोल...तेव्हाचं काय’...तो कोरडेपणाने म्हणाला.

‘तेव्हा....तेव्हा मी जे काही बोलले ते.....ते...I really didn’t mean it. मी खूप घाबरले होते...सो मला काही सुचलं नाही... आणि मी उगाच काहीतरी बोलून गेले....होप यु वोन्ट माईन्ड इट..’

इतकच बोलणं थोडक्यात आटोपून ती घाईत जायला वळणार तसा मागून आदि म्हणाला- ‘इट्स ओके....& I am also sorry for my mistake.. ….तू कुणावर प्रेम करू शकते यावर माझाही विश्वास नाहीये....सो मी सुद्धा तो एक मोमेंट होता...म्हणून तुझं बोलणं कॅजुअली घेतलं..तसही आपला काहीही संबंध नाही....’
पेपर डेस्कला अडकवलेली ब्याग झटक्यात खांद्यावर अडकवत तो निघाला.
*********

रात्री शलाकाच्या रूममध्ये फाईल कम्प्लीट करत दोघीही बसल्या होत्या.
‘आशु...बिजेटीच प्रक्टिकल खूप महत्वाचं आहे यार एक रिविजन व्हायला हवी.....’
समोर पसरलेल्या पुस्तकं,फाईल यांचा पसारा आवरता आवरता शलाका म्हणाली. पण आशुचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तिने तिच्याकडे बघितले.तिची नजर खिडकीतून बाहेर कुठेतरी दूर लागली होती.

‘आशु....काय म्हणतेय मी.....’ तिच्या डोक्यावर फाईल मारत शलाका म्हणाली.

‘काही म्हटलीस का?’.
..
‘.....आशु.....तुला काही दिवसांपासून बघतेय मी...हरवल्यासारखी वाटतेस ?

‘.....शले...कधी पासून सांगेन म्हणतेय पण...हिम्मत होत नाही ग.........’

‘आता बोल हा आशुडे....बेकार रपटे बसतील....’

‘शले ...विसापुरला..........He kissed me………….on lips………’
एक दीर्घ श्वास घेत एका दमात ती बोलली आणि ती शलाकाच्या गळ्याला मिठी मारून रडायला लागली.

‘...woooowwww……wait…….. who?........इत्यादी ? ’

तिला सावरत शलाका म्हणाली.

तिने मानेनेच होकार दिला आणि तो प्रसंग थोडक्यात सांगितला.
‘अगं...ए वेडू.....रडतेस काय......इट्स ओके...यार...त्याचं प्रेम आहे तुझ्यावर...he really loves you a lots आशु...’ तिच्या पाठीवर थापडत ती म्हणाली.

‘इट्स नॉट ओके शलु......प्रेम...फ्लर्ट....टाइमपास हे माझं हे aim नाहीये... ह्यासाठी आई बाबांनी इथं पाठवलं नाहीय गं...’ तिला हुंदका आवरत नव्हता.

तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत शलाकाने तिला पाणी दिले.ती जरा रडायची थांबली.

‘आशु...फ्लर्ट,टाइमपास?....तुला अजूनही वाटतंय आदित्य फसवतोय ?......आशु किती चेंज झालाय तो....ते ही फक्त तुझ्यासाठी......अजून त्याने काय करायला पाहिजे ग...त्या सुजित वरूनही तू त्याच्याशी भांडलीस..you slapped him…खरं तर त्याला राग त्याला यायला हवा होता तरी त्याने कितीतरी वेळा बोलायचा प्रयत्न केला...तू तरीही ऐकत नाही म्हटल्यावर त्याचं त्या दिवशी चिडणं अगदी स्वाभाविक होत आणि तू त्याच्या रिझल्टवरूनही त्याचा अपमान केला...आणि तू त्याला एकदा ही सॉरी म्हटलेल नाहीये....कुणाचं चुकतंय आशु?’

‘शल्या...तुला काय वाटतं...तो किती बिचारा...मी भांडल्याने उदास वैगरे असतो....आणि माझं काय...तो सरळ सांगून मोकळा होतो किती प्रेम करतो ते...,चिडतो,हक्क गाजवतो.. ... आणि मला सांगता येत नाही म्हणून माझं प्रेम नाहीय का?....ह्या भांडणाचा,अबोल्याचा फक्त त्यालाच त्रास होतोय...मी खुश आहे...मला तर काही फरकच पडत नाही...आणि तो म्हणतोच ना मला...मी प्रेमाच्याच काय मैत्रीच्याही लायकीची नाहीये....म्हणून ना मला ह्या प्रेमाच्या भानगडीतच पडायचं नाहीये....’

तिचे डोळे पुन्हा भरून आले..
तिच्या गालाला चिमटा घेत शलाका म्हटली -
‘ वेडाबाई प्रेमात पडायचं नाहीये काय....प्रेमात बुडाली आहेस तू!!!! कुणाशी खोट बोलतेस? तुला खोटं सुद्धा बोलता येत नाही....किती कॉम्प्लीकेटेड करतेयस तू सिच्युएशन,...नेमकं काय आहे तुझ्या मनात?...एकवेळ म्हणायचं प्रेम आहे..आणि वागायचं भलतंच ?.........’

‘...मलाही कळतंय मी खूप कॉम्प्लेक्स वागतेय... मला खूप भीती वाटतेय गं शलू.....’ ती पुन्हा शलाकाच्या गळ्यात पडून रडायला लागली.तिला धीर देत शलाका म्हणाली-‘ वेडू काय होतंय तुला?....किती रडशील ग...कसली भीती वाटतेय..?शांत हो बरं.....’

थोड सावरून मग आशु म्हणाली- ‘ मला भीती वाटते की त्याला जर हे कळल की माझं ही तितकच प्रेम आहे तर.. मग तो कुणाचंच ऐकणार नाही....तुला माहितीय ना किती हट्टी आणि चिडका आहे तो....मी उगाचंच त्या दिवशी ’लव्ह यु’ बोलून गेले..आज लायब्ररीतच्या बाहेर पुन्हा मला ‘असं’ म्हणायचं नव्हतं असही बोलून गेले....मलाच कळत नाहीये मी काय करतेय.. आणि पुढचं काय....माझं घर,गाव.माझ NGO काढायच ध्येय .... मी कसलाच विचार केला नाही गं प्रेमात पडतांना...फक्त वाहवत गेले...ह्या प्रेमाचं भविष्य काय असेल शल्या....आज तो म्हणतोय,दाखवतोय की प्रेम आहे...ते फक्त attraction ,infatuation नसेल कश्यावरून?....

तिचे हात हातात घेत शलाका म्हणाली..-‘ आशु तुझं अगदी बरोबर आहे....प्रेमात पडताना पुढचा विचार केलेलाच बरा... तो कितपत सिरिअस आहे हे ही महत्त्वाच आहेच की पण ... मला असं वाटतंय की आदि कुठल्याच परिस्थितीत तुझी साथ सोडणार नाही आणि तुझं ध्येय,स्वप्न पूर्ण करण्यात पूर्ण मदत करेल..जरा वेळ दे त्याला ही आणि स्वतःला सुद्धा..आणि एक गोष्ट ह्याच्या परिणाम स्टडीजवर नकोय..तूच म्हटली होतीस ना...ह्यावेळी टॉप करायचंय...’

शलाकाच्या समजावण्याने बर्यापैकी रिलाक्स होत आशु म्हणाली-‘हो...स्टडी सगळ्यात अगोदर...’
भरून आलेले ढग मोकळे झाल्यानंतर पसरलेल्या उन्हासारखं प्रसन्न हसत त्या अभ्यासात गर्क झाल्या.

*********

क्लासमध्ये सगळीकडे सबमिशनचा फिवर चढला होता. सुज्याला रेडीमेड फाईल्स देतांना आदिने त्याला शिव्या देऊन,मारून त्याच्यामुळे झालेला झोल त्याच्या लक्ष्यात आणून दिल्यावर मात्र त्याला वाईट वाटलं.

‘साले...इतना सब हो गया....काय खतरा स्पीड है भावड्या ....प्यार-भी झगडा भी....गुड..’

‘साल्या तुला प्रॉमिस केलं होत...बघ सगळं सबमिशन विथ इंडेक्स साइन कम्प्लीट...’

‘हा यार ...कमाल तर तू आहेस....आता फक्त ह्या फाईलमध्ये काय आहे आणि कुठल्या सब्जेक्ट्ला कोण टीचर आहे तेवढं फक्त सांग भावा...’

‘साल्या सुधारणार नाही तू...” म्हणून आदिने त्याच्या डोक्यावर एक टपली मारली.

सुज्या फाईल पूर्ण करायला लायब्ररीत गेला तर आदि क्लासमध्ये आला.आशु आणि शलाका फायनल सबमिशनची साइन झाल्याने आता घरी जायच्या तयारीत होत्या.तो सरळ त्यांच्या बेंच जवळ गेला.
‘शलाका कॅन्टीनला चलतेस ?’

दोघींनी चमकून वर बघितले..

‘I said …कॅन्टीनला चलतेस का?....’

शलाकाने आशुकडे बघितल्यावर मात्र आदि चिडला.
‘ओके फाईन... तुला ह्या म्याडमची परमिशन घ्यावी लागते ...विसरलोच मी...’

आशुने डोळ्यांनीच तिला ‘जा’ अस खुणावल्यावर ती म्हणाली-
‘असं काही नाहीये....मी तिला सोडून कुठं जात नाही म्हणून बघितलं तिच्याकडे’

आशु त्यांच्याकडे दुर्लक्ष करत खिडकीतून बाहेर बघत होती.शलाका बॅग घेऊन उठल्यावर आशु म्हणाली-

‘मी जातेय आता घरी...मला उशीर होईल...’
‘ओके निट जा...मी तुला प्रॅक्टिकलच्या डेट कळवेल...’

आदित्यला त्यांच्या बोलण्याचा माग लागत नव्हता पण त्याला विचारायचं ही नव्हत.
कॅन्टीनमध्ये ज्यूसच्या ग्लासात स्ट्रॉ फिरवत कितीतरी वेळ आदि तसाच शांत बसून होता,तो बोलत नाहीये हे पाहून ती म्हणाली-

‘आदि अरे बोल काहीतरी...शांत बसलं की माझं तोंड दुखत बाबा...’
आदि फक्त गालात हसला....आणि म्हणाला-‘सबमिशन झालं न सगळं....मग आता काय प्लान आहे?
त्याची जरा मजा घेऊया म्हणून ती म्हणाली-‘अरे काही नाही आता प्रॅक्टिकलच्या डेट्सची नोटीस बघायलाच कॉलेजला येईल तोपर्यंत रुमच्या बाहेर पाय टाकणार नाही. फक्त मी,माझी रूम आणि स्टडी...बास्स....’
आदित्य मान हलवत गालात हसला-‘गुड...मी ही तेच करणार आहे....मग...अजून...काय...’
‘मग अजून काही नाही....तुझ्या ज्युसचा एव्हाना कोमट चहा झाला असेल एवढंच’ उगाच साळसूद भाव आणत ती म्हणाली.
ज्युसचा ग्लास बाजूला सारत तो म्हणाला... ‘...ओके देन...कर तू अभ्यास..तू तुझी रूम आणि तुझा स्टडी...मलाही भरपूर चालेन्जेस पूर्ण करायचे आहेत.’
समोर ठेवलेल्या बॅग वर डोकं टेकत शलाका म्हणाली-‘ इतके इगो भरलेले लोकं माझ्या आजूबाजूला आहेत ना की बास्स.....तू विचारणार नाहीस पण यार मला सांगावं लागेल..आशु आज गावी जाणार प्रॅक्टिकल पर्यंत तिथेच राहणार आहे.तिच्या वाड्यातल्या ५/६ १०वी,बारावीच्या मुलींना तिचा अभ्यास सांभाळून ती रोज २/३ तास शिकवणार....नंतर प्रक्टीकल संपल्यावर थेअरी एग्झामपर्यंत पुन्हा गावी.’
हे ऐकून त्याने त्याची टेबलवरची बॅग जोरात शेजारच्या खुर्चीवर आपटली.खुर्चीवर मागे मान ठेऊन डोळे गच्च मिटून तो जरा वेळ बसला.
‘शाकाल...now enough is enough…..बास्स..आता चिडायचं नाही असं ठरवलं तरी माझं डोक ठिकाणावर राहणार नाही.....काय समजते ग ही स्वतःला?हे सगळं तिचं तीच ठरवणार ?आता आठ दिवस नंतर महिनाभर.....मस्त गावी निघून जायचं...इतके दिवस मी हिला न बघता रहायचं?.एक दिवस लव्ह यु...म्हणायचं मग नंतर येऊन.....’मला असं म्हणायचं नव्हत’ असं सहज म्हणायचं.....मी काय...मी मूर्ख आहे... कारण तिला एक दिवस बघितलं नाही तर मला चैन पडत नाही...बोलत तर नाहीच निदान दिसते तरी समोर म्हणून त्यातच समाधान....... का अशी वागते ही? शाकाल..इतका वाईट आहे का ग मी?

बॅग मधून पाण्याची बॉटल काढून त्याला देत शलाका म्हणाली- ‘आदि.. थोडा वेळ दे तिला.. आपण समजावून काहीही होणार नाही... तिचं खरंच प्रेम असेल तुझ्यावर तर तिचं तिलाच कळेल. तेव्हा मग बघ अशी कन्फ्युज राहणार नाही ती.....’
‘काय .... यार.....’ त्याने पायाने शेजारच्या खुर्चीला संतापाने लाथ मारली.
ह्या दोन मूर्खांना कसं सांभाळायचं ह्या विचाराने शलाकाने डोक्याला हात मारला.

***********

आज प्रॅक्टिकलचा शेवटचा दिवस असल्याने सगळे जरा रिल्याक्स होते.. प्रॅक्टिकल संपल्यावर मेघनाने आदिला आवाज दिला.तो समोर आल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं.
‘काय झालं म्यागी...? why r u crying?’ आदित्यने काळजीने विचाराले.
‘आदित्य कॅन्टीनला जाऊया का?...इथं ठीक वाटणार नाही.’

आदित्यने जरा नाईलाजाने इकडे तिकडे पहिले...आशु कुठेच दिसली नाही.आज शेवटचं प्रॅक्टिकल मग ती निघून जाईल..म्हणून त्याची नजर तिला शोधत होती.
म्यागी पुढे निघाली .
जरा नाखुशीने तो तिच्या मागे गेला.कॅन्टीनमध्ये चागलीच गर्दी होती. आदित्य एक खुर्ची घेऊन बसला.त्याच्या शेजारच्या खुर्चीवर ती बसली.
‘काय झालं म्यागी?’
‘सलील ब्रोक अप विथ मी आदि......’ असं म्हणून तिने आदीच्या एका खांद्यावर डोकं ठेऊन दुसरा हात त्याच्या गळयाभोवती टाकला.
पाच वर्षाचं अफेयर तुटल्याने ती दुखावली गेली होती.
तिच्या ह्या अनपेक्षित वागण्याने तो भांबावला....एकवेळ होती जेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवर ..casual hugging त्याच्यासाठी नॉर्मल होत पण आता तो असं कुण्या दुसऱ्या मुलीच्या इतक्या जवळ असण्याने अनकम्फर्टेबल झाला आणि त्याच्या मनाला वाटत असलेली भीती जणू खरी झाली....आशु आणि शलाका दूर एका कोपऱ्यात बसल्या होत्या आणि आशुने म्यागीला त्याच्या गळ्यात पडलेलं बघितलं आणि शलाकाशी काहीतरी बोलत ती झटक्यात बॅग घेऊन बाहेर निघत होती,शलाका तिच्या मागे निघाली....आदिने म्यागीला बाजूला केल..

‘म्यागी एक मिनिट यार मी आलोच...’ बॅग खांद्याला लावत तो जवळजवळ पळतच बाहेर गेला.

‘शाकाल....ये यार थांब ना....’त्याने धावत जाऊन दोघींना गाठले.त्याने शलाकाला थांबवले पण आशु पुढे निघाली.

‘आदि....प्लीज मी बोलते तुझ्याशी..ती जरा चिडली आहे....मी नेहमी तुझी बाजू घेते पण बघं असं काहीतरी करून ठेवतो....कोण रे ती म्यागी..का नेहमी तुझ्या अवतीभोवती फिरत असते....आणि आता तर डायरेक्ट मिठी.....’

‘अरे मूर्ख ...ती मिठी होती का?......काय राव.....अगं तिचं पाच वर्षाचं अफेयर तुटलं म्हणून रडत होती ती.तिचा बॉयफ्रेंड माझाही मित्र होता...म्हणून.....शीट .......यार आता त्या मूर्ख,बालिश पोरीला कसं समजावणार.............प्रेम आहे मान्य तर करत नाही आणि हे असं उगाचच मग पझेसिव्ह व्हायचं ...याला काय अर्थ आहे का राव.......’
पुढे जाणाऱ्या अशुकडे बघत तो म्हणाला.

‘आदि यार आता तिची समजूत घालणं कठीण आहे...तू तर आता काही बोलू नको तिला..जास्त चिडेल ती....मी जाते आता आणि हो ती घरी जाणार नव्हती पण बघ आता ती बावळट.. उद्या निघून जाईल संध्याकाळी...’
शलाका झपझप पुढे निघाली.

*********

लायब्ररीत काम असल्याने दुसऱ्या दिवशी शलाका सकाळीच कॉलेजला आली होती. रांगेत सुजितला पाहून तिने स्माईल दिलं.सुजित गडबडीत तिच्या जवळ येऊन म्हणाला... ‘शलाका तुला एक सांगायचं होतं..मी तुझा टेलीफोन नंबर पूजाकडून घेतलाच होता .. पण तू भेटलीस बर झालं...’
‘हो बोल ना...’
‘अगं काल आद्याचा अक्सिडेंट झाला....बाय god ग्रेस ...थोडक्यात बचावला....कपाळाला जरा जखम आहे आणि डाव्या पायाला थोडा हेयर क्र्याक आहे...’
‘ओह्ह माय god....कधी झालं हे?’ तिला खूप वाईट वाटलं.
‘काल घरी जातांना झालं....साला मूर्ख आहे तो ..जोरात चालवत असेल बाईक.....मी नोटस मागायला काल त्याच्या घरी फोन केला तेव्हा कळल....मग गेलो होतो रात्री देहूरोडला..मी गेलो होतो तेव्हा थोडा झोपेच्या गुंगीत होता...झोपेत सारखं आशु...आशु करत होता. नशीब... तिथे मी एकटाच होतो..... शलाका सांग ना अश्विनीला त्याला भेटायला...मी सॉरी म्हणू का तिला?..माझ्यामुळे हे सगळं झाल आहे राव......मला माहित नव्हत यार तो इतकं लाईक करतो तिला...मी अशीच भंकस करायला गेलो आणि सगळं बोंबललं राव ...’
‘जाऊदे तू आता काही बोलायला जाऊ नको...मी बघते काय करायचं ते..’ तिला सारखा कालचा चिडलेल्या आदीचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.
शलाका घरी आली तेव्हा आशु मामीला मदत करत होती.तिने महत्वाचं काम आहे म्हणून तिला बाहेर बोलावलं.
‘आशु तू आज गावी जाऊ शकत नाही....’ शलाका दबक्या आवाजात म्हणाली.
‘का काय झालं?’
‘आशु आदीचा अक्सिडेंट झाला आहे मायनर....प्लिज जरा राग सोडून भेटायला चल...तुला कालच्या त्याच्या वागण्याचं कारण मी सांगितलं आहे ना...थोडा राग सोड.....’ ती एका दमात पण हळूच म्हटली.
‘अक्सिडेंट??? केव्हा..कुठे....’ अशुची धडधड वाढली होती.तिचं मन सैरभैर झालं.शलाकाचे खांद्याला गच्च पकडत ती म्हणाली.
‘सगळं सांगेल...पण तू मामीची परमिशन घेऊन ठेव...तिला सांग मैत्रिणीला बघायला जातोय देहूरोडला ... एक दोन तासात येऊ.....मी पण घरी हेच सांगते.’ तिचे डोळे पुसत शलाका म्हणाली.
‘ओके....’ ओल्या डोळ्यांनी ती आत गेली.
मामीशी खोटं कसं बोलायचं हे कितीतरी वेळ आशुला जमत नव्हतं आणि कामातही लक्ष लागत नव्हत. दुपारपर्यंत कसतरी मामीची परमिशन घेऊन ती तयार झाली आयुष्यात असं पहिल्यांदा खोटं बोलून ती काहीतरी करत होती यामुळे सतत एक गिल्ट तिला जाणवत होता पण आता तिला फक्त न फक्त आदिच दिसत होता.शलाका तयार होती.तिच्या टूव्हीलरवरून त्या दोघी निघाल्या. सुजित त्यांना कासारवाडीला भेटणार होता.

***********

‘स्वप्नशिल्प’ बंगल्यासमोर त्यांच्या गाड्या थांबल्या तेव्हा टळटळीत दुपार होती.
आत गेल्यावर झाडांच्या सावलीतला गारवा मनाला शांती देत होता.आशुची नजर मात्र सारखी भिरभिरत होती...तिला फक्त आता तिच्या आदिला बघायचं होत.
ते घरात गेले तेव्हा घरात फक्त त्याचे वडील संजय शिर्के होते. त्याची आई कार्ल्याच्या एकविरा आईची ओटी भरायला गेली होती.तिच्या लाडोबाच्या जिवावरचं संकट जे गेलं होत. सोबत म्हणून अभिमान होता.
संजय शिर्क्यांनी सगळ्यांची आपुलकीने चौकशी केली भरीस भर दोघींना रिझल्टही विचारले.आदीच्या कितीतरी मैत्रिणी यापूर्वी देखील घरी येत असल्याने त्यांना ते सवयीचं होतं.पण ह्या दोघींकडे पाहून त्यांना जरा बर वाटलं आणि आदीच्या इतक्या सोज्वळ मैत्रिणीही आहे याचं त्यांना आश्चर्य देखील झालं.

आदि वर त्याच्या रुममध्ये झोपला होता. मुलांशी थोड बोलून शिर्के झोपायला गेले.घरात काम करणाऱ्या अनिताला त्यांनी पोरांना हवं नको ते बघायला सांगितलं.तिघंही वर आदीच्या रुममध्ये गेले.रूमचा दरवाजा उघडा होता.त्यांनी आवाज न करता तो अलगद लोटला.
मोठ्या प्रशस्त बेडवर आदित्य झोपला होता....समोरच्या भिंतीवर आईच्या कुशीतल्या लाडोबाचा मोठा फोटो होता. शेजारी त्याच्या वेगवेगळ्या वयातले,पोज मधले फोटो होते. त्याची लाडकी गिटार ही दुसऱ्या बाजूला होती.समोर बेडवर निरागसपणे झोपलेला आदित्य पाहून आशूला भरून आलं.ती थोडी दूरचं थांबली.सुजितने त्याच्या शेजारी बसत त्याला हळूच हलवत आवाज दिला.
‘आद्या भावा उठं ना....’
आदिने थोडे डोळे उघडले त्याला झोपेत सुज्याचा धूसर चेहरा दिसला....
पुन्हा डोळे बंद करत तो म्हटला.. ‘ क्या बे हरामी...आता आला का?’
शलाकाला त्या परिस्थितीतही त्याचं हसू आलं. ओळखीचा हसण्याचा आवाज आल्यावर त्याने उठून बसायचा प्रयत्न करत डोळ्यांवर जोर देऊन समोर बघितलं...समोर शलाका आणि आशु दिसल्या.पुन्हा डोळे बंद करत तो उशीला टेकला आणि म्हणाला
‘सुज्या साल्या ...कालपर्यंत फक्त आशुचेच भास होत होते रे....आज शाकालाका भाईसाब पण दिसायला लागले.....’
‘भावड्या....समोर नीट बघं आशु आणि शलाका दोघीही आल्याय.....तुला भेटायला.’ सुज्याने त्याला पुन्हा उठवत म्हटले आणि त्याला उठून बसवल.त्याच्या पंजाला प्लास्टर केलेलं असल्याने तो अवघडत मागे टेकला.डोक्याच्या जखमेला पट्टी बांधलेली होती..
‘काय....?’..त्याने उठायचा प्रयत्न करत समोर बघितले.त्याची धडधड वाढली.दोघीही दूर दरवाज्या जवळ उभ्या होत्या.
‘कसा आहेस आदि ?...शलाका पुढे येत म्हणाली.त्याच्या जवळ बसत त्याला तिने खूप ऐकवलं...
शलाकच्या खांद्यावर एक थाप मारत तो म्हणाला-‘इट्स ओके रे शाकालाका...तू तर माझी माजिक पेन्सिल आहे...मी बघं झटक्यात बरा होईल..मला एक महत्त्वाच चालेंज पूर्ण जे करायचंय.आशुकडे तिरपा कटाक्ष टाकत तो म्हणाला.आशु अजूनही दरवाज्या जवळच्या खुर्चीला पकडून उभी होती. थोडावेळ सुज्या आणि शलाकाने त्याला खूप शहाणपणाचे डोस दिले मग सुजित म्हणाला...
‘ भाई बाहेर तुझ्या स्टडीमध्ये थोडावेळ बसतो आम्ही...कुणाला काही पर्सनल बोलायचं असेल तर....’ तो हसला ,शलाकानेही ‘ओके’ म्हणून मान हलवली आणि दरवाजा ओढून घेत सुज्या,शलाका रूमच्या बाहेर गेले.

दोन मिनिट पूर्ण शांततेचे गेले.आदिने तिच्याकडे पहिले.पांढरा कुर्ता..फ्लोरल गुलाबी,फुल पटियाला सलवार.एका खांद्यावरून घेतलेली तशीच ओढणी.कानात मोत्यांचे छोटे डूल...पुढचे केस मागे घेऊन लावलेलं बटरफ्लाय क्लचर...ती अवघडून उभी होती.

‘तिथंच उभी राहणार आहेस का आता?’ तो रागात बोलला.
तशी ती पुढे आली.त्याच्या बेडजवळ येऊन उभी राहिली.
डोक्याला बांधलेली पट्टी,अंगात बॉटल ग्रीन शोर्ट स्लीव्ज टीशर्ट...खाली ग्रे थ्रीफोर्थ .....पंज्याजवळ असलेलं प्लास्टर.... वेदनेमुळे मलूल झालेला चेहरा...झोपून उठल्याने पेंगुळलेले डोळे आणि विस्कटलेले सिल्की केस...ती त्याच्याकडे अनिमिषपणे बघतच राहिली आपल्यामुळे कदाचित त्याची अशी अवस्था झालीय म्हणून तिला भरून आलं.

आदिने तिचा हात खेचत तिला खाली बसवलं.
ती त्याच्या बाजूला बसली.त्याच्या हाताला...चेहऱ्याला जिथं खरचटल होतं तिथे तिने हळुवार हात फिरवला.त्याच्या डोळ्यात थेट बघत ती म्हणाली-
‘रागच्या भरात कुणी असा मूर्खपणा करत का?...गाडी मिळालीय म्हणून कशीही चालवायची?...सगळं मनासारखं करायचं...किती लागलय रे..तुला काही झालं असतं म्हणजे?..का त्रास देतोस रे ?
तिच्या चेहऱ्यावरून फिरणाऱ्या हाताला पकडत तो म्हणाला-
‘मनासारखं तर तू करतेस........भांडली तू, मला एक थप्पड लावली तू..., लव्ह यु बोलून पुन्हा ‘मला तसं म्हणायचं नव्हत’ असा बालीशपणा तू करतेस.. त्रास तू देतेस..’

‘मी त्रास देते? आणि ती म्यागी इतक्या दिवसांपासून सारख तुझ्या जवळ जवळ करते,तुला मिठीत काय घेते...ह्याचा त्रास नाही होत का मला....’

‘का त्रास होतो तुला?..प्रेम तर नाहीय न तुझं.....तू मिठीत घेत नाहीस.... मग तिला तर घेऊ दे.....’
त्याने तिच्या मानेच्या मागून हात घालत तिच्या केसांचा क्लच काढला...

तिच्या गालांवर गुलाब उमलले.ती दूर सरकायला लागली तसं तिला एका हाताच्या कचाट्यात घट्ट पकडत तो म्हणाला.-

‘आशु..आता तुझा हा असा अबोला...भांडण...नाही ग सहन होत मला..माझी चिडचिड होते...तू फक्त एकदा मान्य कर की तुझही तितकच प्रेम आहे...आईशप्पत आयुष्यभर फक्त तुझ्या होऊन राहील,प्रत्येक श्वास तुझा.....तुझ्या प्रत्येक सुखात तुझ्यामागे आणि संकटात तुझ्या पुढे असेल ..तुझी स्वप्न ती माझी स्वप्न......तू मला दूर केलास ना तर मग माझं असचं काहीतरी होईल..........मग ..’

तो पुढे बोलणार तसं त्याच्या ओठांवर हात ठेवत त्याच्या डोळ्यात थेट बघत ती म्हणाली...
‘बस्स काही बोलू नको ...खूप अवघड असणार आहे आपल्यासाठी हा प्रवास पण आता मलाही हे सगळ अमान्य करणं मुश्कील होतंय...माझ्या स्वप्नांसकट,धेयांसकट तू मला आपलंस करायला तयार आहेस ह्यातच सगळं आलं... आणि नालायका तुला काय वाटत रे ...फक्त जीव तुझाच जातो,त्रास तुलाच होतो.....स्टुपिड....तू बोलायला जरी लागला ना..की एक गोड धडधड होते मनात,तू गालातल्या गालात हसला तरी जीव तीळ तीळ तुटतो माझा.....सुट्टीचा एक दिवस नकोसा होतो...मागचा एक आठवडा कसा काढला माझं मला माहित... ज्या दिवशी हे ओठ ओठांवर हळुवार टेकले त्याच दिवशी मी तुझी झाले....मला फक्त थोडा वेळ हवा होता तुला ओळखायला....आणि भीती वाटत होती की ह्या प्रेमाचं भविष्य काय असेल...पण आता वाटतंय...तुझ्या सोबत राहून मी अजून वेगाने माझं ध्येय पूर्ण करू शकेल.....’
ओठांवरून तिचा हात काढत तिला जवळ जवळ ओढून,तिच्या नकट्या नाकाला नाकाने हलकेच टच करत तो म्हणाला-‘पिल्ल्या...फक्त एकदा मनापासून लव्ह यु म्हण...ना...बघ मी लगेचंच बरा होईल’
त्याच्या ओठांवर दोन बोटं ठेऊन त्या बोटांवर ओठ टेकवत ती म्हणाली-

‘आय लव्ह यु शोना...श्वासात श्वास असेपर्यंत ह्या ओठांवरचा तुझा शिक्का कधीच पुसला जाणार नाही.
त्याने तिचा ओठांवर बोटं असलेला हात खाली ओढला.तिच्या चेरी लिप्सवरून हळूच अंगठा फिरवत तो म्हणाला-‘ लव्ह यु सो मच पिल्ल्या...हा आदि फक्त आशुचाच आहे आणि असेल....’
त्याने तिला घट्ट मिठीत घेतले.त्याला इतके दिवस त्रास दिल्याच आठवून तिचे डोळे पाझरत राहिले. ह्याच भारदस्त आणि उबदार मिठीत तिला आता आयुष्य घालवायचं होतं....

क्रमशः

©हर्षदा