Salam-e-Ishq - Part-4 books and stories free download online pdf in Marathi

सलाम-ए-इश्क़ - भाग-४

पहाटेचे पाच वाजले होते. ‘स्वप्नशिल्प’ बंगल्याच्या आवारात असलेल्या पारिजातकाचा गंध पहाट गारव्यात मिसळत होता.आदीच्या रूमच्या खिडकीतून पहिलं दर्शन त्या झाडाचं व्हायचं.सकाळी ९ वाजेशिवाय डोळे न उघडणारया आदीला आज पहाटेच जाग आली...चेहऱ्यावरून..एक तलम अबोली ओढणी हळुवारपणे सरकते आहे असा भास त्याला एक अनामिक हुरहूर लावत होता.ह्या नव्या अनोळखी...अनामिक भावनेने त्याला अस्वस्थ व्हायला झालं.तो उठून बसला.त्याच्या बेड जवळची खिडकी अर्धवट उघडी होती.त्याने खिडकी उघडली तसा पारिजातकाचा मोहक सुगंध दरवळला.त्याने एक दीर्घ श्वास घेत तो दरवळ श्वासात भरून घेतला.विस्कटलेले केस,जडावलेले डोळे,अर्धवट जाग-झोप....तो एकटक खाली पडलेल्या पारिजातकाच्या फुलांच्या सड्याकडे बघत होता. ‘किती नाजूक आणि गोड दिसतात ही फुलं...आपण या आधी असं मन भरून ह्याचा सुगंध कधी घेतलाच नाही..... किती नाजूक आहेत ही.....अगदी ..तिच्यासारखीच.....’त्याने स्वतःला एक टपली मारली...त्याला स्वतःचच हसू आलं....बराच वेळ तो कालचा दिवस,तो क्षण तो आठवत राहिला.मग उठून आरश्यासमोर आला ‘काय होतंय आदि तुला......किती गर्लफ्रेंड झाल्यात स्कूलमध्ये असल्यापासून....जुनियर कॉलेजला तर एकाहून एक हॉट आणि ब्युटी...आणि ही कालची मुलगी काय नाव तिचं?आशु....का सारखा सारखा तिचाच चेहरा डोळ्यासमोर येतोय.....फरगेट इट ड्यूड.....म्हणून तो उठला आणि त्याने आवरायला घेतलं.
आदित्य रूममधून खाली आला.विभाताई किचनमध्ये होत्या.तो लाडाने आईच्या गळ्यात पडला.त्याला असं अचानक आणि विशेष म्हणजे इतक्या सकाळी आलेलं पाहून त्या जरा कौतुक मिश्रित आश्चर्याने म्हणाल्या- ‘आदि..काय रे बऱ वाटतंय न राजा?’
‘काय ग मॉम !...तू चहा दे अगोदर...’ तो डायनिंग टेबलवर डोक ठेऊन बोलला.
त्याच्या डोळ्यात अजूनही झोप होती.त्याच्या डोक्यावर पेपरची गुंडाळी जोरात मारत अभिमान शेजारी खुर्चीवर येऊन बसला.आदिने त्याला अर्धवट उघड्या डोळ्यांनी नकळत एक गोड स्माईल दिलं.त्याला इतक्या सकाळी बघून तो म्हणाला-‘मॉम....आज काय आहे? हा तुझा लाडोबा कसा काय लवकर उठला?
‘अभिदा प्लीज ...यार तुम्ही लोक डिटेन्शन मध्ये आलो तरी बोलतात आणि वेळेवर कोलेजला जायला निघालो तरी बोलतात.’

‘अरे कोलेजसाठी उठला आहेस....इट्स गुड....चल मी कोलेजला सोडतो तुला...मलाही पुढे कोथरूडला एक मीटिंग आहे.’

‘नाही ..नको मी अगोदर सुज्याच्या रूमवर जाणार मग जाईल कोलेजला..तू जा’

‘अरे ठीक आहे ना ...तू तयार हो, मी जे.एम रोडला सोडतो तुला......बोलायचंय जरा तुझ्याशी…..संध्याकाळी सुजित सोडेल तुला घरी....चल..बी रेडी..’ असं म्हणून तो उठला.

आदि तयार होऊन गाडी जवळ थांबला होता,अभिमान खाली आला तसे ते निघाले.

अभिने सवयीने एफ.एम चालू केला...आदि बाहेर बघत होता.

-“चोट दिल पे लगी प्यार होने लगा | वो अजनबी मेरे दिलको भला भला सा लगा...

अभिने आदिकडे जरा मिश्कील हसत बघून रेडीओचा आवाज मोठा केला.
अभिने नुकतच एम.बी .ए पूर्ण केलं होतं आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबत त्याची इंगेजमेंटही झाली होती.आदिने त्याच्याकडे बघून पुन्हा आवाज कमी केला.अभिला हसू आलं.
गाडी सिग्नलला थांबली तसं आदिकडे न बघता अभी म्हणाला- ‘आदि कोण आहे ती?
‘कोण? काय बोलतोय दा?’ उगाच व्हॉल्यूमच्या बटणाशी खेळत,अभिकडे बघायचं टाळत तो म्हणाला.

‘आदि....नाटकं नकोय बडी...तुझ्या सगळ्या जी.एफ,टाइमपास... मला माहित आहे..पण आज तू जरा वेगळा वाटतोय मला.’

‘दा प्लीज.....चिल यार...काहीही काय ...एकच दिवस कॉलेजला गेलो मी काल....आणि....’

त्याचं बोलणं अर्धवट तोडत अभी म्हणाला-
‘आदि बेटा तू चड्डी घालत नव्हतास ना तेव्हापासून...तुझा चेहरा वाचता येतो मला...यू नो द्याट...’ त्याच्या डोक्यात पुन्हा एक टपली मारत अभी म्हणाला.

‘दा....तसं काही नाहीये...हो म्हणजे ....काल एका मुली शेजारी बसलो होतो....तर...असंच..म्हणजे ...तसं काही नाही....अरे यार दा.....मला नाही माहित....मला काही कळलं की अगोदर तुला सांगेल.’
एक गोड स्माईल देत अभी ने गियरवरून हात काढत त्याचा गालाला चिमटा घेत म्हटलं-‘मला का असं वाटतय की कालचा एक दिवस तुझं पूर्ण लाईफ बदलवून टाकेल....?’

‘दा.... यार इनफ....मला तिचं पूर्ण नाव,गाव ,फळ,फुल काहीच माहित नाही...आणि चालला माझी लाईफ बदलवायला.... ’गाल चोळत आदी म्हणाला.
बालगंधर्वजवळ गाडी थांबली न आदित्य खाली उतरला.जाता जाता अभिने त्याला मुद्दाम डोळा मारत म्हटलेल ‘बेस्ट लक’ आठवून आदित्यने स्वतःशीच हसत रस्ता ओलांडला आणि घोले रोडला सुजितच्या रूमकडे निघाला.
आदित्य बराच वेळ सुजितच्या रूमचा दरवाजा वाजवत होता.बऱ्याच वेळानंतर दरवाजा उघडला गेला.सुजीतचे डोळे बंदच होते.रूममध्ये सुजीतचे रुममेट न क्लासमेट सुद्धा असलेले गिरीश,रजत गाढ झोपले होते.
मोठ्या प्रयत्नाने सुजितने डोळे उघडून बघितलं..समोर आदित्य होता.त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं..

. ‘आद्या....साल्या ...इतक्या रात्री?क्या हुआ?’

त्याला ब्यागचा जोरात फटका मारत आदि म्हणाला- ‘साल्या डोळ्यात सूर्यग्रहण झालं का....सकाळ आहे...चल..लवकर आटप..कॉलेजला जायचय....’

आदित्यचा चेहरा दोन्ही हातांमध्ये पकडत सुजय म्हणाला -‘अब्बे.....ओ भाई......इतक्या सकाळी कॉलेजला कोण जात राव....विसर भावा सकाळचे लेक्चर म्हणजे अंधश्रद्धा आहे रे....विश्वास नाही ठेवायचा.’

त्याला ओढत नेऊन आदिने जबरदस्तीने त्याचं तोंड बकेटमध्ये घातलं. सुजितने आदिला शिव्या देत आवरायला घेतलं.

*************

अचिवर्स कॉलेज ऑफ इंजिनिरिंग,शिवाजी नगर कॅम्पसमध्ये नेहमी प्रमाणे सकाळची लगबग चालू होती.सुजित आणि आदि कॉलेजमध्ये आले पण सुजितच्या आग्रहामुळे लेक्चरला न जाता ‘कॅफे लवबाईट’ मधेच थांबले थोडी पेटपूजा झाल्यावर मग बाकीच्या ब्रान्चेसचे त्यांचे टुकार मित्र जमायला सुरुवात झाली आणि खास त्यांचा म्हणून प्रसिद्ध कॉलेज कॅम्पसच्या बाहेरचा स्टारकट्टा गजबजायला लागला.आदि आज पहिलं लेक्चर अटेंड करणार होता ही गोष्ट ऐकून सगळा ग्रुप खिदळून हसायला लागला....मजा मस्ती सुरु झाली तसं आदि ...आशु...लेक्चर...वैगरे सगळं विसरला.बराच वेळ टाईमपास करून,पोरी,टीचर्स,लेक्चर्स.....सगळ्या विषयांची एक एक करून पिसं काढली जात होती.
कट्ट्याच्या शेजारी असलेल्या ‘कॉपी मी’ झेरॉक्स सेंटरवर तुरळक गर्दी होती.इकडे तिकडे पाहत,टीचर्स आजूबाजूला चहाला तर आले नाही ह्याची खात्री करून आदिने सिगरेट पेटवली. हवेत धुराचे वर्तुळं सोडत तो गप्पांमध्ये सामील झाला.
तेवढ्यात त्याला मागून एक नाजूक पण चिडका आवाज ऐकू आला-‘Excuse me…..NO Smoking चा बोर्ड दिसत नाही का...मूर्ख...बावळट?’
तो चिडून मागे बघता बघता म्हणाला-‘च्यायला कोण आहे रे ही भेंडी’

तो वळला- व्हाईट,प्रिंटेड फिटिंगचा कुर्ता,गुलाबी चुडीदार आणि एका खांद्यावर असणारी गुलाबी क्रशची ओढणी.....हातातल्या रुमालाने नाक झाकलेले होत.मागे आशु उभी होती.त्याला पाहताच ती जरा अडखळली..त्याच्या हातातल्या सिगरेटकडे पाहून तिने त्याच्याकडे रागाने पहिलं.त्याने झटकन सिगरेट खाली टाकली...मागून पूर्ण ग्रुप ओरडायला लागला....मूर्ख,बावळट....आणि चित्र-विचित्र आवाज काढायला लागला.
‘No Smoking चा बोर्ड लागलेला असून लाज वाटत नाही इथ बसून smoking करतांना’ ती पुन्हा फणकारत म्हणाली.
मागून पोरं कल्ला करायला लागली आणि एकसुरात ओरडली-

–‘आता सिगरेट पिणार का?....नाही रे भो ....नाही रे भो.......’ ‘पोरगी चिडली, सुधारणा झाली’ .....आता कसं वाटतंय?.....गार गार वाटतंय.......’

काही मुलं थांबून मजा बघत होती.सगळे तिला हसत होते,मधूनच कुणीतरी चिरका आवाज काढून ‘ये भेंडी’.....असं ओरडत होत. आशूला एवढा गलका झालेला बघून वाईट वाटलं.तिचे डोळे भरून आले.हातातल्या झेरोक्सचा गठ्ठा सांभाळत शलाकाने तिला मागे ओढलं आणि त्या कॅम्पसकडे निघाल्या. ‘साल्यांनो गप्प बसा ना......’ म्हणत हातातली ब्याग सुजितच्या अंगावर फेकत तो धावत त्यांच्या मागे गेला तसा मुलांनी अजूनच गलका केला.त्याने आवाज देत शलाकाला थांबवले.
‘अरे यार शलाका....सॉरी ना यार !.....त्याने काकुळतीला येऊन म्हटले.
‘अरे पण मला का सॉरी म्हणतोय ? काय तुझं नाव आदि ..ऑर इत्यादी...whatever....

‘अरे पण जिला सॉरी बोलायचं तिचं पूर्ण नाव तर माहिती हवं ना?...आशुकडे बघत तो म्हणाला.

‘तिचं नाव ..अश्विनी शितोळे....कळलं? ’......शेवटच्या ‘कळल’ वर जोर देत ती शलाका म्हणाली.
‘शले चल ना....कुणाशी आणि का बोलतेय तू ?..आदित्यकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आशु म्हणाली आणि ती पुढे निघाली..

‘ये शाकाल भाई थोडा वेळ इथेच थांब....प्लीज....इट्स अ रिक्वेस्ट...म्हणून तिला हात जोडून पुन्हा तिच्यामागे गेला.
आशु थांबत नाहीये बघून आदिने मागून तिचा हात पकडला.ती थांबली.
‘अरे यार अश्विनी ....सो सॉरी ...मी काय.....’ त्याच बोलणं अर्धवट तोडत आशु म्हणाली..
‘हात सोड....Its hurting…’ आदिने तिच्याकडे पहिले नकट्या नाकावर राग मावत नव्हता....तिचे मधाळ डोळे थेट त्याच्यावर रोखले होते.
आदित्य पुन्हा भारावल्यासारखा तिच्याकडे बघत राहिला ..ती हात सोडवायची खटपट करत होती.तिच्या हातात एक सोन्याचं छोट्या-छोट्या फुलपाखरांची चेन असलेलं नाजुकस ब्रेसलेट होत ते तिच्या मनगटावर दाबलं गेल...तिचा हात तसाच हातात ठेवत थोडं तिच्या जवळ जात तो म्हणाला-

‘सोडतो पण शांततेत माझं ऐकून घेणार असशील तर....नाहीतर सोडणार नाही...मग कुणीही येऊ दे..कुठल्या प्रोफेसरच्या बापाला घाबरत नाही आदित्य शिर्के’

‘ठीक आहे...बोल...’ रागातच हाताची घडी घालत आशु म्हणाली.

‘अरे यार तू मला मूर्ख,बावळट..म्हणाली माझ्या फ्रेंड्स समोर..माझा इनसल्ट झाला .ते आता सगळे जाम खेचतील माझी....तू निट पण सांगू शकली असतीस...’ केसांमधून हात फिरवत आदि म्हणाला.

‘मला सिगरेटच्या वासाने मळमळत....मला त्रास झाला म्हणून मी चिडले...पण चुकलं तुझय आदित्य.... ….तू पण भेंडी वैगरे म्हटलंच न?..हे असं सिगरेट पिणार्या,सकाळपासून कॉलेजला येऊनही लेक्चर अटेंड न करणार्या मुलाशी बोलून मला माझी इमेज खराब करायची नाहीये....सो...काही चुकलं असेल तर सॉरी....कॅन आय लिव्ह नाऊ?’

ती एक दोन पावलं पुढे गेली तोच आदित्य मागून म्हणाला...

‘एक मिनिट........ By the way.. मी सकाळीच कॉलेजला आलो आणि नंतरचे चारही लेक्चर्स मी अटेंड केले नाही ..हे तू का नोटीस केलंस? इतकं का लक्ष ठेवतेस माझ्यावर?’

तिने मागे वळून पहिले....समोर आदित्य हाताची घडी घालून गालातल्या गालात गोड हसत होता.ग्रे जीन्स,व्हाईट टीशर्ट वरून बटन्सअप न केलेला रेड चेक्सचा शर्ट...तसेच थोडेसे विस्कटलेले सिल्की केस.....तिने सारवासारव करत म्हटलं-
‘मी कशाला नोटीस करू? तूमची बाईक सकाळी माझ्या रिक्षा समोरून गेली आणि इकडे लेक्चरमध्ये अटेंडस घेतांना सरांनी तुझं नाव घेतलं म्हणून मी बोलले...’

तिच्या जवळ येत तो म्हणाला ..... ‘म्हणजे...इतक्या नावांमधून माझ नाव कुणाच्यातरी चांगलंच लक्षात आहे तर.....?’

तशी ती गोंधळली आणि मागे झेरॉक्सचे सेट लावायचं उगाचच नाटक करत थांबलेल्या शलाकाला आवाज देत ती पुढे धावतच निघाली. शलाका आदिजवळ पोहचल्यावर जरा गोंधळून म्हणाली...
‘अरे...काय झालं हिला? तू काही बोलला का ?...ती अशी का पळाली......?’
तिच्या हातातला झेरोक्सचा सेट घेऊन तिच्याच डोक्यावर हलकसं मारत आदि एक फ्लर्ट पण गोड स्माईल देत म्हणाला....

‘शाकालाका ...सांभाळ तुझ्या मैत्रिणीला..... नाहीतर प्रेमात पडेल ती आदीच्या....आणि मग तू इत्यादी होशील.....’

शलाका त्याच्याकडे पहातच राहिली जाता जाता त्याने पुन्हा त्याच्या स्टाईलने मागे बघून शलाकाला एक डोळा मारला....आणि त्याच्या कट्ट्याकडे तो निघाला.....दोन हृदय ...हळुवारपणे धडधडत होते....ही गोड धडधड हवीहवीशी होती....पण ती अशीच राहणार होती का?...

क्रमशः

© हर्षदा


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED