कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 30 वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .भाग- 30 वा

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

भाग- ३० वा

-------------------------------------------------------------------------

अनुषा ,अभिजित या दोघांचा निरोप घेऊन जळगावकर ऑफिसला गेले. त्यांना अभिजित म्हणाला ,

काका, तुम्ही कायम मला ऑफिसमधले अपडेट देत जावे , मी आता नियमितपणे बाबांच्या ऑफिसकडे

पण लक्ष देईन.

माझ्या ऑफिसची मला तशी फार काळजी करण्याची फार गरज नाही , कारण ती काही

माझी एकट्याची कंपनी नाही.. माझे इतर पार्टनर सुद्धा माझ्या गैरहजेरीत सगळी कामे पूर्ण करू शकतात .

आपल्याकडे तशी सिस्टीम नाहीये ..हे माहिती आहे मला . काम थांबत नाही .

पण, बाबांनी फायनल यस म्हटल्या शिवाय ते ओके समजले जात नाही..हे माहिती आहे मला .

सध्या आजारी आहेत बाबा , या काळात त्यांच्यासोबत असेन , तुम्ही काही काळजी करू नका .आणि

तुम्ही आहात ऑफिसमध्ये “ हे सुद्धा बाबांना पुरेसे आहे.

अभिजीतचा हात हातात घेत ..जळगावकरकाका म्हणाले ..

आय नो अभिजित ..हाच विश्वास आणि नाते हीच तर आमच्या मैत्रीच्या नात्याचा भक्कम पाया आहे.

तू नको काळजी करू . देशमुख साहेब लवकर बरे होऊन ,पाहिल्यासारखे येतील ऑफिसला ,याची खात्री आहे मला

..कारण..त्यांची जिद्द आणि मनातली इच्छा किती प्रबल आहे “,हे माहिती आहे मला.

अभिजित ,आपल्या सोबतीला आता ही अनुषा असणार आहे,

तू बघच आता ..ती किती आयडियाने सगळ्या गोष्टी जुळवून आणते ते ..!

जळगावकरकाका निघून गेले ..अभिजित म्हणाला ..

अनुषा ..तू चाल न आत , आपण दोघे एकमेकांचे कोण आहोत ,हे जरी आई-बाबांना माहिती नसले तरी ,

बाबांच्या दृष्टीने आता तू त्यांच्या फ्रेंड-सर्कल मधली आहेस.

आज तुला कोलेजची घाई-गडबड नसेल ..तर बस ना थोडा वेळ ..!

आईशी पण तुझे बोलणे सुरु होण्याच्या दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे .

अनुषाने घड्याळात पाहत म्हटले .. दुपारचे कॉलेज करू शकते मी ,एखादा तास बसू शकेन

मी .

तू पण न हुशार आहेस..नाव आईचे आणि बाबांचे ..मी नाही म्हणू नये म्हणून ..!

मी समोर असायला हवी आहे तुला “ हे खरे कारण ..!

हो ना अभी ?

अनुषा ..काही समाज ..माझ्या मनातले ओळखणारी आहेसच तू ..

चल , इथेच वेळ नको घालवायला .

त्या दोघांना रूममध्ये आलेले पाहून ..देशमुखसरांच्या चेहेर्यावर प्रसन्न हसू उमटले .

सरिता म्हणाली –

अभिजित , तुझ्या बाबांना ,आम्ही बसलोत त्याचे काही नाहीये ..

पण, तू आणि आता ही अनुषा ..,तुम्ही दोघे असलात की ..बाकी कुणी असो व नसो ..

काही फरक पडणार नाहीये असेच वाटते आहे मला .

बघ ना ..मला दिसते आहे , जाणवते आहे की, ज्या अर्थी ..

अनुषासारख्या नव्या व्यक्तीशी देशमुखसर इतक्या आपुलकीचे वागत आहेत ..म्हणजे ..

या मुलीने नक्कीच काही वेगळे असे करून दाखवले आहे ..

त्याशिवाय देशमुख असे सहजासहजी कुणाला जवळ येऊ देणारे नाहीत .

हे ऐकणार्या अनुशाच्या मनात विचार येत होते -

अभिजीतची आई हे सगळे गमत्तीने म्हणते आहे की ? वेगळेच काही आहे त्यांच्या मनात ?

अशा विचारात असतांना अनुशाचा फोन वाजू लागला ..

तिने कॉल घेतला ..

पलीकडून प्रिन्सिपलसर बोलत होते ..

अनुषा ..कुठे आहेस तू आत्ता या वेळी ?

ती म्हणाली –

सर, मी हॉस्पिटलमध्येच आहे, देशमुखसरांच्या स्पेशल रूम मध्ये ..

का हो सर, काही विशेष ?

सर म्हणाले – बरेच झाले की हे ..

मी येईपर्यंत तू थांब तिथेच ,

मला भेटायचे आहे देशमुख सरांना . त्यांना एव्हढा त्रास झाला ,

माहिती झाल्यावर ..येऊन भेटले पाहिजे .

अनुषा म्हणाली ..ओक सर, या तुम्ही , मी थांबते तो पर्यंत ..

सर म्हणाले – हे काय निघालोच मी ..आलोच समज दहा मिनिटात .

अनुषा –देशमुखसरांच्या समोर उभी रहात म्हणाली ..

तुमचे मित्र आणि आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपलसर ..येत आहेत ,तुम्हाला भेटायला .

तो पर्यंत मला थांबायला सांगितले आहे त्यांनी .

देशमुखसरांनी हात वर करीत ..खुणावले ..

ओके ..काही हरकत नाही . तू थांबणार आहेस..हे खूप छान !

अभिजीतची आई म्हणाली ..

अभी ..ही अनुषा ..बघ ना ..

.कानामागून आलीय आणि तिखट झाली “ असेच वाटते आहे मला .

जळगावकर हिच्यावर खुश , हे देशुख महाशय ..या पूर्वी कुणावर इतके खुश झालेले मी पहिले नाही .

आणि ..तुझ्याशी सुद्धा ..खूप ओळखीची असल्या सारखी वागते आहे ..!

मला तर शंका वाटायला लागली आहे..काही तरी गौडबंगाल आहे ..

फक्त मला सोडून ..ही अनुषा सगळ्यांना इतकी जवळची व्यक्ती कधी पासून आणि कशामुळे ?

हे काही मला कळू शकणार नाही ..का ? कदाचित देशमुखांना वाटते तसे तुम्हाला वाटत असेल की -

या मंदबुद्धी सरिताला ..सांगून काय उपयोग ? तिला काय कळणार आहे ?

नक्की असेच वाटले असणार ..देशमुखांना वाटते असेच ..

तुम्हाला वाटले तर त्यात नवल काय ?

यथा राजा –तथा प्रजा “.

जाऊ दे अभिजित , असे काही तरी बोलून ..सगळा आनंद घालवते मी..

नवीन नाही काही यात.

अनुषा ..तू पण मनावर घेऊ नकोस हं माझे असले बोलणे.

सरिताचे हे असे बोलणे ..सगळ्यांना अनपेक्षित ..त्यामुळे ..

अनुषा ,अभिजितचे जाऊ द्या , स्वतहा देशमुख बायकोचे हे बोलणे ऐकून परेशान होऊन

तिच्याकडे पहात राहिले ..!

अभिजितच म्हणाला –

आई , नको त्या वेळी नको ते बोलणे ..!

चूक केलीस्च तू ..आता काही बोलू नकोस ..

बाबांना काही त्रास झाला तर ..!

तू म्हणशील ..सगळ्या गोष्टीचे खापर ..बायकोच्या डोक्यावर फोडून मोकळे होणे “,

ही तर सागर देशमुखांची आवडती सवय आहे.

रूम मधले वातवरण ..इतके गंभीर वळण घेईल ? असे अनुशाच्या मनात ही नव्हते ..

अशा वेळी काय बोलावे ..सुचेना ..ती अभिजीतच्या आईकडे पहात राहिली ..

तिला वाटले ..

पेशंट म्हणून पलंगावर पडून असलेले देशमुख सर ..म्हणजे ..बिमार शेर “, तो काय करणार ?

म्हणूनच तर .अभिजीतच्या आईने ..मनातला राग व्यक्त करण्याची ,देशमुखांना बोलण्याची

आलेली संधी सोडलेली नाही.”

हे असे असले तरी ..अजून एक सिरीयस पोइंट “ लक्षात येतोय आपल्या ..तो म्हणजे ..

अभिजित आणि देशमुख सर या दोघांशी असलेली आपली ओळख ,मैत्री ..यांना अजिबात आवडलेली

दिसत नाहीये “.

बाप रे ..आपल्या रस्त्यात पुन्हा एक मोठा स्पीड-ब्रेकर आहेच आजून ..!

याचा विचार करणे भाग आहे आता आपल्याला ..!

अनुशाचा फोन वाजला ..

प्रिन्सिपलसर हॉस्पिटलमध्ये आलेले होते ..ते म्हणाले ..

अनुषा ..अभिजीतला पाठव खाली ..किंवा तुम्ही दोघे ही खाली आला तर बरे होईल ,

म्हणजे ..सिक्युरिटी येऊ देईल आम्हाला .

अभिजितने आईला म्हटले ..

बाबांना भेटायला त्यांचे मित्र येत आहेत ..

आम्ही खाली जाऊन घेऊन येतो त्यांना .

काही मिनीटात ..प्रिन्सिपलसर, अनुशाचे प्राध्यापक सर रूम मध्ये आले.

ख्याली खुशाली विचारून झाल्यवर ..प्रिन्सिपल सर म्हणाले ..

देशमुख सर ..अनुशासाठी एक छान बातमी आहे ..ती तुम्ही ऐकाल तर तुम्हाला

खूप आनंद होईल ..

या महिन्यात ..अनुशाच्या प्रोजेक्ट सबमिशनची मुदत समाप्त होती ..पण, तुमचा हा उद्भवलेला

त्रास आणि तुमची कंडीशन पाहून...

आम्ही अनुशाला अजून तीन महिने मुदत वाढवून देत आहोत . आता ती हे प्रोजेक्ट तिच्या

वार्षिक परीक्षेच्या काही दिवस सबमिट करू शकते .

प्रिन्सिपल सरांचे हे शब्द ऐकून ..

अनुशाला आनंदाने उडीच मारावीशी वाट्त होते . कित्ती मोठ्ठे टेन्शन होते ..या गोष्टीचे ..

तिने अशाच सोडली होती ..

प्रोजेक्ट अपूर्ण म्हणजे ..आपले स्वप्न पूर्ण होण्यात फक्त अडचणी आणि अडचणी.

पण, असे काही झालेले नाही..मनातल्या मनात अनुषा देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानीत होती.

हे ऐकून देशमुख सरांना खूपच आनंद झालाय ,हे सगळ्यांना दिसत होते .

अस्पष्ट शब्दात ते प्रिन्सिपल सरांना ..थांक्यू म्हणत आहेत “,हे जाणवले .

देशमुखसर लवकर बरे व्हवा ..आणि

आम्हाला तुमच्या घरी चहाला बोलवा ,नक्की येईन .

असे म्हणत अनुशाचे दोन्ही सर निघून गेले .

अनुषा म्हणाली ..अभिजित ,

आता मी पण येते .घरी जाईन , मग, दुपारचे कॉलेज करीन ..!

अभी म्हणाला -

ओके ठीक आहे . उद्या ये नेहमी प्रमाणे ,

बाबा वाट पाहत असतात तुझी.

आई , मी अनुषाला सोडून येतो

असे म्हणून अभिजित तिच्यासोबत खाली आला .

अनुषा म्हणाली ..अभिजित .

.तू एक गोष्ट पाहिलीस का नीट ?

अभिजित म्हणाला –

तुला जे वाटले , जे दिसले ..ते मला पण दिसले.

आईच्या मनात तुझ्याबद्दल फारसे चांगले मत नाहीये ..कारण..तू देशमुखांची फ्रेंड आहेस ,

माझी फ्रेंड आहेस ..आणि सध्या तरी तिची कुणीच नाहीये ..

मग, ती तुझ्याशी अस्चीच कोरडेपणाने , तुटकपाने वागणार ..

पण, सध्या आपण तिच्याकडे दुर्लक्ष करू या..

तुझ्या प्लैनप्रमाणे चालू दे सगळ्या गोष्टी ..कारण तुझे प्रोजेक्ट –सागर देशमुख ..

तुझ्या हातून निसटून गेलेले नाहीये , सो, बी होपफुल माय डियर अनुषा .

अभिजीतचा निरोप घेऊन अनुषा घरी आली ..

आता पुढे कसे आणि काय काय करायचे ? या विचारांची

गर्दी तिच्या डोक्यात सुरु झाली होती.

यातली पहिली गोष्ट म्हणजे ..

सागर देशमुख येते अनेक महिने ऑफिसमध्ये जाऊन काम करू शकणार नव्हते ..

म्हणजे ..आपल्याला सगळा प्लेन नव्याने करावा लागणार ,कारण यापुढे जेव्हा केव्हा प्रोजेक्ट

सुरु होईल ..त्यासाठी तिला दिवसाचे काही तास ..चक्क ..अभिजीतच्या घरात राहावे लागणार होते.

प्रेमालाय “ हे तिच्या स्वप्न्तले घर..त्या अगोदरच तिला येथे येनास मिळणार होते.

कठीण वाटणारी गोष्ट ..इतक्या सहजासहजी होईल..अशी अपेक्षा पण नव्हती.

असे होणार असले तरी ..

पुढचे सगळे आपल्या सोयी प्रमाणे होण्यासाठी ..सर्वात आधी..

अभिजीतच्या आईच्या मनात आपल्या विषयीची असणारी कटुता नाहीशी करून ..

त्यांच्या मनात आपलेपणा निर्माण करणे “ हे पहिल्याने

करयची गोष्ट असेल .

त्यांच्या शिवाय ..आपल्या मनातले प्रत्यक्षात आणणे अवघड आहे.

त्यासाठी ..अभिजीतच्या आईच्या मनाचा गड “ सर केल्यावरच ..देशमुख सर ..आणि प्रोजेक्ट सर होणार .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग – ३१ वा ..लवकरच येतो आहे ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------