Tujhach me an majhich tu..18 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग १८

तुझाच मी अन माझीच तू...भाग १८

राजस चे वागणे आभा ला जरा विचित्रच वाटले.. त्याचे कालचे वागणे आणि आजचे वागणे ह्यात जमीन आस्मानाचा फरक होता. तिला कळत नव्हत राजस मध्ये एकदम इतका बदल कसा झाला.. आभा ला राजस ला भेटून काही तास झाले होते पण तरीही त्याचे विचार काही केल्या आभा च्या मनातून जात नव्हते. सगळ्या भावनांचा गोंधळ तिच्या मनात होत होता. राजस ने तिच्या साठी आठवणीने फुलं आणली होतीच पण त्याचबरोबर ही चिट्ठी.. "श्या..काय चालूये हे.." आभा ने मनात विचार केला... ऑफिस ची सुरवात अश्या पद्धतीने होईल ह्याची आभा ला कल्पनाच नव्हती. तिची थोडी चीड चीड सुद्धा झाली.. आता ह्याच मूड मध्ये दिवसभर रहाव लागू नये म्हणून मग तिने नेहमीच्या सवयीने स्वतःला लेक्चर द्यायला सुरु केलं..

"कोण कुठला राजस? शांतपणे काम करायचं होत पण राजस ने आयुष्यात उलथापालथ केली... काल भेटला राजस माझ्या आयुष्यावर कब्जा कसा काय करू शकतो.. नो नो आभा.. तो असेल चांगला पण त्याचा चांगुलपणा त्याच्यापाशी.. तुम्ही या आपल्या ट्रॅक वर.. स्वत:ची एम आठवा... उगाच भरकटायच नाही.. कोणाच्या नदी लागून एम्स विसरायची नाहीत... आणि राजस शी मैत्री होणार असेल, आम्ही चांगले मित्र बनू किंवा नाही, जे व्हायचं ते होऊ दे..तसही गिरीश मुळे लगेच कोणावर विश्वास ठेवायचा नाही अस ठरवलं आहे ना.. डोंट ब्रेक own रुल्स. काल्म डाऊन अॅँड कॉंसंट्रेट ओन वर्क!!"

आभा ने स्वतःला थोड लेक्चर झाडलं.. आणि मग ती शांत झाली.. स्वतःला राईट ट्रॅक वर आणायला आभा बऱ्याच वेळा स्वतःला लेक्चर झाडायची... असं केल्याने तिचा फोकस ती परत मुळ पदावर आणून ठेवायची.. ही आभा ची नेहमीची ट्रिक होती.. आणि ही ट्रिक आभा ला कधीच दगा द्यायची नाही... त्याचप्रमाणे आज सुद्धा तिच्या ट्रिक ने काम करायला सुरवात केली होती.. आभा चा मूड परत नॉर्मल वर येत होता.. आणि आता काही तास तरी ती ह्याच बदलेल्या मूड मध्ये राहणार होती..

आभा ने तिच लक्ष लॅपटॉप कडे होतं. पण मधेच आभा ला ती चिट्ठी आभाला परत उघडून वाचायची होती पण तिने ते टाळले.. पण फुलं पाहून ती हसली.. "राजस कसाही असेल पण ही फुलं मात्र मस्त आहेत.." अबह्ने विचार केला.. राजस ने आणलेल्या फुलांचा वास तिने परत एकदा घेतला. आणि काम करायला लागली..

आता आभा एकाग्रतेने काम करायला लागली.. तितक्यात तिला एक शंका आली.. पटकन जाऊन ही शंका राजस ला विचारू असा विचार तिने केला पण ती फक्त हसला..काही दिवस ती राजस पासून ठरवून लांब राहणार होती..तिच्या मते कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्याच्यापासून दूर राहणे हा सर्वोत्तम पर्याय असतो..आभा ने परत लॅपटॉप कडे पाहत बसली.. तेव्हाच नेमका रायन तिच्या डेस्क जवळून जात होता.. रायन ऑफिस मध्ये एकदम उत्तम वागायचा... समोर रायन ला आभा ने पहिले.. रायन तसा एकदम राजबिंडा तर होताच पण त्याने व्यायामाने हेल्दी बॉडी सुद्धा कमावलेली होती.. त्यामुळे रायन पाहता क्षणी आकर्षक दिसायचा.. आधी आभा ने काही गोष्टी आभा ने आधी नोटीस केल्या नव्हत्या. आज अचानक आभा ला त्याच्याशी बोलायची इच्छा झाली आणि आभा ला अर्जंट हेल्प हवी होती सो तिने फार विचार न करता रायन ला हाक मारली..

"रायन.. " आभा ने रायन ला हाक मारली.. त्याने आभा चा आवाज ऐकला आणि तो थबकला.. मग जरा वेळ विचार करून तो आभा शी बोलयला आला,

"हे स्वी..." रायन एकदम बोलायचा थांबला.. त्याला एकदम जाणवले आपण ऑफिस मध्ये आहोत आणि इथे नीट वागण अपेक्षित आहे.. त्यामुळे त्याने आपले वागणे बदलले...

"हे आभा... काही काम आहे? माझी काही मदत हवीये? कधीही सांग..." रायनचा आवाज एकदम बदलला होता.. त्याचा आवाजात अजिबात एकदम प्रोफेशनल झाला होता.. रायन च्या बोलण्याने आभा ला छान वाटल.. म्हणजे जे पहिल्यांदी तिला वाटले होते ते साफ चुकीच होत असं उगाचच वाटून गेले. पण अर्थात तिला राजस ने सांगिलेल लक्षात होत.. पण आत्ताच्या क्षणी 'अडला हरि..' अशी तिची अवस्था होती.. त्यामुळे अजून कोणाला विचाराच्या ऐवजी रायन ला आपल्या शंका विचारू असा तिने विचार केला..

"ओह येस.. मला हा इश्यू कळत नाहीये.. मी कोणाला तरी मेल करणार होते पण तू समोर होतास आणि जरा अर्जंट आहे सो... सॉरी! त्रास देत नाहीये ना?" आभा नकळत रायन शी बोलायला लागली.

"हो हो.. मी नक्की करतो मदत.. आणि त्रास कसला... उलट मला खूप छान वाटलं तू माझी हेल्प घेते आहेस.."

"ओह.. थँक्यू सो मच..." इतक बोलून आभा ने रायन ला तिचा इश्यू दाखवायला सुरु केलं.. रायन तिच्या शेजारी येऊन उभा राहिला.. आणि आभा च्या परफ्युम मुळे तो एक क्षण हरवूनच गेला.. एकदम मस्त मंद सुंगंध होता.. अगदी हवा हवासा असा सुगंध त्याने नाकात साठवून ठेवला.. आणि मन तो भानावर आला.. आभा चा इश्यू त्याने पाहिला.. जरा वेळ विचार केला आणि तो बोलायला लागला,

"अरे हा इश्यू तर एकदम सोप्पा आहे.. मी सांगतो तुला समजाऊन.. " अस बोलून रायन ने आभा ला आलेला इश्यू काही क्षणा मध्ये तिला समजून सांगितला.. रायन च्या हेल्पिंग स्वभावामुळे आभा खुश झाली.. तिच्या मनात अचानक एक विचार चमकून गेला, "राजस ने उगाच मला खोट सांगितलं होत रायन बद्दल? रायन तर आत्ता किती छान वागतोय...मला आलेला इश्यू काही क्षणात सोडवून दिला.. मे बी रायन आणि राजस चे भांडण असेल म्हणून राजस ने काहीतरी सांगितले असेल मला.." आभा ने छताकडे पाहिले. आणि मग ती रायन शी बोलायला लागली..

"थँक्यू सो मच रायन.. यु आर व्हेरी इंटेलीजेन्ट.. मला येत नसलेला इशू लगेच सोल्व्ह केलास.." आभा बोलली..तिने थँक्यू म्हण्यासाठी हात पुढे केला.. रायन ने सुद्धा तिला शेक हॅँड केला..

"कधीही आभा.. काहीही मदत लागली तर विचारू शकतेस.. आणि काल वागलो त्याबद्दल सॉरी....पण तू आहेस एकदम आकर्षक.. आणि माझा माझ्या वागण्या बोलण्यावर कंट्रोल राहिला नाही...व्हेरी सॉरी! पण त्यात मला तुला दुखवायचे नव्हते ह..." रायन दोन्ही डोळे मिचकावत बोलला. ह्यावेळी आभा ला रायन कडून एक खूप मस्त व्हाईब आली. आभा हसली..

"येस येस..बाय द वे, आत्ता जरा वेळात मी कॉफी घ्यायला जाणारे... यु कॅन जॉईन मी.. तू मला मदत केलीस सो युअर कॉफी ऑन मी!" आभा हसली.. आभा चे बदलेले रूप पाहून रायन विचारात पडला.. पण अर्थात तो हा चान्स सोडणार नव्हताच...

"नक्की नक्की... पण आता मी पळतो.. भेटू जरा वेळात कॉफी ला.. मला मेल टाक फ्री झालीस की..."

"चालेल..." आभा ने रायन ला बाय केले आणि तिच काम करायला लागली.

राजस आभा आणि रायन मध्ये चाललेलं सगळ पाहत होता.. त्याने डोक्याला हात मारून घेतला आणि मनात विचार केला,"मी आभा ला सांगितलं होत स्टे अवे फ्रॉम रायन तरी ती त्याच्या वाटेला जातीये. असो, स्वतः अनुभव घेतल्याशिवाय शहाणी होणार नाही आभा...शेवटी आयुष्य तिचं आहे... ती हव ते वागू शकते..मी तिच्या आयुष्यात लुडबुड करणारा कोण?" राजस ने विचार केला आणि राजस ने त्याचे डोके परत लॅपटॉप मध्ये घुसवल पण बॅक ऑफ द माइंड, त्याला आभा ची काळजी मात्र वाटत होती..

क्रमशः..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED