Touch - Unique Features (Part 29) books and stories free download online pdf in Marathi

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 29 )


मेहकी है मेरी हर शाम
मेरी सुबहँमे भी तो तेरा जीक्र है
मैं ना रही हु तुझसे मिलन के बाद
ये इशक का कैसा असर है
खो चुकी हु तेरेही बातो मे
तेरे खयाल मे ही गुम रेहना आदत है
बदल सी गयी है मेरी जिंदगी
जबसे मिला मुझे तेरा साथ है ..

पुन्हा गोवा ( कथेच्या पहिल्या भागातच त्यांची भेट झाली आहे ..कथा आता फक्त भूतकाळातून वर्तमानकाळात सुरू होईल )


नित्या रात्रभर विचारात असल्याने रात्री तिला झोप लागली नाही पण पहाटे पहाटे तिला झोप लागली होती .सारांश अगदी सकाळीच उठून फ्रेश झाला होता परंतु त्याने तिला उठवले नव्हते ..उलट समोर सोफ्यावर बसून तो तिच्या शांत चेहऱ्याकडे बारकाईने लक्ष देत होता ..तिचा तो निरागस चेहरा डोळ्यात साठवून घेत होता ..सकाळचे सुमारे 10 वाजले होते ..अचानक खिडकीवरचा पडदा उडू लागला आणि काचेतून सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडू लागला..तो तिच्या चेहऱ्यात इतका हरवला होता की त्याला चुणूक त्याची देखील लागली नाही पण चंचल सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर लक्ख प्रकाश टाकल्याने ती जागी झाली ..समोर तो तिला न्याहाळतच आहे हे पाहून ती म्हणाली , " काय राजे अस काय पाहत आहात माझ्याकडे ? जसे आधी कधी मला पाहिलेच नाही ? "

तो गालातल्या गालात हसत म्हणाला , " तेही पाहणचं होत का ? .कधी फोटो मध्ये तर कधी विडिओ कॉल मध्ये ..आज तू समोर आहेस तेव्हा इतक्या जवळून तुला डोळ्यात साठवून घेण्याची मज्जाच वेगळी !!..ही प्रेमाची नाशआ आहे , ते तुला कळणार नाही नित्या मॅडम ..."

तिने आपली मान हातावर ठेवली आणि चेहऱ्यावर गोड हसू आणत म्हणाली , " अच्छा जी !! इतकं गोड गोड बोलणं तुम्हाला जमत तरी कसं बर !! बघा ना !! माझे गालच लाल होतात आणि शब्दही सुचत नाहीत मला .."

तो खोडकरपणे उत्तरला , " मग नको बोलू का गोड - गोड ? "

आणि ती हसत म्हणाली , " मी अस कुठे म्हणाले बर !!..उलट मला आवडत तुमचं अस बोलणं ..माझी जिलेबी ..गोड गोड बोलणारी .."

तीच बोलणं ऐकून दोघेही हसू लागले होते ..ती केसांना चेहऱ्यावरून बाजूला करत म्हणाली , " काय सर मग किती वाजले आणि केव्हापासून मला असे लपून लपून बघत आहात ? "
तो तिची गंमत करत म्हणाला , " फार काही नाही आता तर सकाळ झाली आहे ..तुम्ही झोपा निवांत ..वेळ झाली की मी उठवतो तुम्हाला .."

तिने मोबाइल चेक केला तर जाणवलं की सकाळचे 10 वाजले होते ..वेळ पाहताच ती म्हणाली , " शहाण्या 10 वाजले आहेत नि म्हणे सकाळ आहे ..मला उठवल का नाहीस ? "

अस म्हणत ती बेडवरून उठून वॉशरूमकडे जाऊ लागली ..ती जाणार तेवढ्यात त्याने तिचा हात मागून पकडला आणि तिला स्वतःकडे खेचले आणि ती जणू तिच्या मिठीतच येऊन पडली..दोघांच्याही नजरा एकमेकांस भिडल्या होत्या आणि दोघेही एकमेकांत हरवले होते ..तो अगदी कुतूहलाने तिच्याकडे पाहत होता तर तिच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव होत.अंगावर शहारे येऊ लागले होते आणि जाऊन हळूच धक्का मारून तिने त्याला बाजूला केले आणि धावतच वॉशरूमकडे पळाली ..क्षणभर वॉशरूममध्ये गेल्यावर स्वतःला बघितले ..तिचा गाल लाजून लाल झाले होते आणि हृदयही धडधड करत होत ..

तर इकडे तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून हसत होता ..क्षणभर त्याच्याही चेहरा उजळून निघाला होता .. हृदय जोरजोराने धडधड करू लागल होत ..त्याने स्वतःला सावरले आणि म्हणाला , " अग तू रात्री उशिरा पर्यंत जागत होतीस ना म्हणून म्हटलं तुला लवकर उठवू नये ..बाय द वे काल बाबांचं स्वप्न पडलं होतं का तुला ? म्हणूनच रात्री झोपेतून उठली होतीस? "

नित्याने दुरूनच मान हलवली..आणि थोडा रागावत तो म्हणाला , " कितीदा सांगितलं मी तुला की बाबा तुझ्यामुळे गेले नाहीत तरी का ऐकत नाहीस माझं आणि स्वतःला त्रास करून घेतेस ..तुला अस बघून माझी काय अवस्था होते तुला तरी माहिती आहे का ? "

ती खेचत म्हणाली , " काय अवस्था होते बर ? "

तो शांत होत म्हणाला , " तुला त्रास झाला की वाटत की माझा श्वास तर थांबणार नाही ना .."

अस म्हणताच तिने धावत येऊन त्याच्या तोंडावर हात ठेवला ..आणि म्हणाली , " सारांश आज म्हणालास तर म्हणालास पुढे अस बोलू नको ..नाही तर मी बोलणार नाही तुझ्याशी ..तुझ्याविना मी आयुष्याच जगण्याचा विचार देखील करू शकत नाही पण प्लिज अस काही बोलू नको "

अस म्हणतच ती त्याच्या मिठीत शिरली ..त्यानेही मिठी घट्ट केली आणि म्हणाला , " ते सर्व ठीक आहे पण आज असच आपण मिठीत राहणार असू ना तर बाहेर जाण काही व्हायचं नाही बाबा !!.तू म्हणत असेल तर बाहेरचे प्लॅन कॅन्सल करू का ? "

ती लगेच बाजूला झाली आणि त्याच्या डोक्यावर हात मारत म्हणाली , " बुद्धू आहेस एक नंबरचा!! कुणी रोमँटिक होत असेल तर अस बोलतात का !! "

तो आपल्या डोक्याला हात लावत म्हणाला ," बापरे !! किती भारी हात आहे तुझा!! ..एकदा पडला तर इतकं दुखत आहे आणि आयुष्यभर पडला तर काय होईल काय माहिती ? "

आणि ती त्याच्यावर हसत म्हणाली , " बर झालं मग मी बायको नाहीये तुझी !! नाही तर रोज घेतलं असत तुला फाईलवर ..माझे सर्व काम तुझ्याकडूनच करून घेतले असते आणि मी बसले असते महाराणीसारखी तुला पाहत.."

ते दोघेही एकमेकांकडे पाहत होते आणि दोघांनाही राहवलं नाही व ते हसून पडले ..थोडा वेळ गेला शेवटी तोच म्हणाला , " बर चल भरपूर वेळ झाला आहे चेंज करून घे आपण जरा फिरून येऊ .."

फ्रेश झाल्यावर तिने लगेच कपडे चेंज केले आणि दोघेही बाहेर पडले

काही वेळातच ते बाहेर पडले आणि दिवसाची सुरुवात कॉफीने केली ..बाहेर समुद्र किनारी बरेच लोक जमले होते आणि सर्व समुद्र किनारी खेळत होते ..जाता - जाता तिने त्याचा हात केव्हा पकडला त्यालाही कळले नाही आणि त्यानेही तिचा हात घट्ट पकडला ..ते समुद्र किनारी पोहोचलेच होते की नित्या पाण्यात जाण्यासाठी जिद्द करू लागली होती तर सारांश जाण्यासाठी मनाई करत होता पण तिने त्याच काहीही एकल नाही आणि त्याला ओढतच आतमध्ये घेऊन गेली ..अगदी पाय भिजेल इतक्या पाण्यात गेल्यावर ती शांत उभी झाली आणि तिने डोळे मिटून घेतले ..तो थंड वाळूचा स्पर्श , पायावरून सरसर करणार पाणी जाताना तिने डोळे घट्ट मिटून घेतले आणि तो आवाज ऐकू लागली ...तिने त्याचा हात आताही सोडला नव्हता ..तर सारांश बारीक नजरेने तिची प्रत्येक हालचाल टिपू लागला होता ..तिने काही क्षण डोळे उघडले नाही हे बघून त्यानेही डोळे घट्ट मिटून घेतले आणि सागराच्या लाटांच्या आवाजात क्षणभर हरवला ..तो शांतपणे भ्रमण करणारा समुद्र जणू त्याच्या हृदयात बसला आणि तो डोळे घट्ट मिटून तसाच उभा राहिला ..नित्या त्याचा हात सोडून केव्हाच गेली आहे हे त्याला कळलंही नाही ..ती सारांश डोळे खोलेलं म्हणून वाट पाहत होती पण सारांश आपले डोळे खोलत नाही म्हणून नित्याने त्याच्यावर पाणी उडविण्यास सुरुवात केली ..पाणी अंगावर पडताच तो भानावर आला ..त्याने समोर पाहिले तर नित्या त्याच्यावर पाणी फेकत होती आणि त्याच अर्ध शरीर पाण्याने ओल झालं होतं ..त्यालाही आता राहवलं नाही आणि तोही तिच्या अंगावर पाणी फेकू लागला ..तर आपल्या अंगावर पाणी येऊ नये म्हणून नित्या दूर दूर पळत होत ..नित्या समोर तर तो मागे अस त्यांचं पळन सुरू होत ..नित्याला समोर धावता धावता पायात काहीतरी रुतल आणि ती मधातच थांबली ..तिला वेदनेने पाय हलविता येत नव्हता ..त्यामुळे ती तिथेच उभी होती ..नित्याला काय झालं पहावं म्हणून त्याने तिला हाताने आधार देऊन पाण्याच्या बाहेर नेले ..ती लंगडत बाहेर आली आणि त्याने तिला खाली बसविले ..तिच्या पायात शंकूचा तुटलेला तुकडा थोडा रुतला होता ..त्याने तिच्या पायाला हळूच स्पर्श करत तुकडा काढून घेतला ..पायातून तुकडा बाहेर येताच तिच्या तोंडून आवाज आला , " आई ग " आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले .तिने जरी वेदनेने डोळे बंद करून घेतले होते तरीही तो तिच्या शांत चेहऱ्यात हरवला होता आणि डोळे उघडल्यावर तो म्हणाला , " ए झाशीची राणी अशी तर सर्वाना झाडून काढतेस आणि एवढ्या छोट्या तुकड्याला घाबरतेस !! वाटलं नव्हतं घाबरट असशील इतकी .."

आणि ती पुन्हा त्याच्या डोक्यावर मारत म्हणाली , " तुला मज्जा येतेय का माझी खेचायला !!..मला लागलं ते नाही ना माझी खेचत आहेस .!!."

तिने मारलं आणि तो डोळे लहान करून तिच्याकडे पाहू लागला ..तिला ते जाणवलं आणि त्याच्यावर हसत म्हणाली , " ए नौटंकी चल नाटक नको करू !!..कळत मला तुझं अस वागणं .."

ती बोलली आणि दोघेही हसू लागले ..त्याने लगेच खिशातून रुमाल काढला आणि तिच्या पायावर घट्ट बांधून घेतला तर नित्याने त्याचे ओले केस उडवून घेतले .किती सुंदर क्षण होते ते ..त्यांनतर सुमारे दोन तास ते समुद्रात मज्जा मस्ती करत होते ..शेवटी नित्या थकली ..त्यांचे कपडे ओले झाले होते म्हणून त्यांनी रूमवर जाण्याचा निर्णय घेतला..

रूममध्ये परतल्यावर साधारणतः तासाभरात ते अंघोळ करून फ्रेश झाले होते ..तेव्हा दुपारचा 1 वाजला होता ..पोटातही कावळे ओरडू लागले होते त्यामुळे सरळ त्यांनी हॉटेलकडे प्रस्थान केले ..नित्याला फारच भूक लागली होती त्यामुळे तिने दोघांसाठीही फिश ऑर्डर केली नि पटापट खाऊ लागली ..तर सारांश फिशकडे पाहतच होता ..नित्या खाण्यात इतकी व्यस्त झाली होती की तिच्या लक्षात आलंच नाही की सारांश जेवण करत नाहीये ..तीच लक्ष गेलं नि ती म्हणाली , " काय रे फक्त बघूनच पोट भरणार आहे का की काही खाणार पण आहेस ? "

सारांशने काहीच उत्तर दिलं नाही उलट तो मंद स्मित करू लागला आणि ती त्याच्यावर हसत म्हणाली , " काय रे काट्यांची भीती वाटते का ? ..मग आधी का नाही सांगितलंस ..आपण बिना काट्याची मागवली असती ..वेंधळटच आहेस पक्का !! "

ती त्याच्यावर हसत होती आणि तो तोंड पाळून शांत बसला होता ..तिला त्याच लहान तोंड करन आवडलं नाही म्हणून त्याच्याकडची प्लेट घेत म्हणाली , " अगदी कुकुल बाळ असल्यासारखच वागतोस बाबा !! आन मी काढून देते काटे .."

आणि ती त्याची प्लेट घेऊन काटे विरहित भाग त्याला देऊ लागली आणि म्हणाली , " कस होईल रे तुझं सारांश ? "

आणि आतापर्यंत शांत असलेला तो म्हणाला , " तू आहेस ना मग सर्वच चांगलं होईल .."

आता त्याने जेवण करायला मान खाली घातली होती तर ती त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहत होती ..अगदी साधा होता तो ..कुणालाही न दुखावणारा आणि आपल्याच जगात रममाण असणारा ..त्यांचं जेवण आटोपलं आणि ते परत रूमवर येऊ लागले ..येताना पण ती त्याला चिडवत होती आणि त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होत ..तर तिच्या चेहऱ्यावर हसू आहे म्हणून त्याचाही चेहरा प्रफुल्लित झाला होता ।.

काही क्षणात ते रूमवर पोहोचले आणि बेडवर पडले ..मोबाइलवर मृन्मयचा कॉल येऊन गेला होता म्हणून तिने त्याला परत कॉल केला आणि साधारणतः 5 मिनिटे बोलून तिने फोन कट केला तर त्यानंतर लगेच तिने भैय्याला फोन केला आणि संध्याशी बोलली ..सुमारे 20 - 25 मिनिटे फोनवर बोलल्यावर तिने फोन ठेवला ..संध्या भैय्याकडे नीट राहते आहे हे ऐकून तिची चिंता मिटली होती ..तिने फोन ठेवला नि समोर त्याच्याकडे पाहू लागली ..तो समोर सोफ्यावर बसून मोबाइल वापरत होता ..त्याच तिच्याकडे लक्ष नव्हतं हे पाहून ती त्याला शांतपणे न्याहाळू लागली आणि त्याचा चेहऱ्याचा हालचाली नीट टिपू लागली ..तिने त्याच्या डोळ्यात आधीच बघितले होत ..ते शांत डोळे त्याच्या मनातलं सर्व काही सांगत होते ..तर तिने आता लक्ष केलं तेंव्हा समजलं की त्याच नाक थोडं मोठं आहे आणि ती गालातल्या गालात हसू लागली ..त्याला न्याहाळता न्याहाळता तिचे डोळे जड झाले आणि झोपी गेली ..

नित्याची झोप उघडली तेव्हा सायंकाळ झाली होती ..सारांश फ्रेश होऊन सोफ्यावर बसून होता बहुदा तो तिची उठण्याची वाट पाहत होता ..ती उठली तेव्हा त्याने गोड स्मित केलं आणि पुन्हा एकदा मोबाइल वापरण्यात व्यस्त झाला ..तर नित्या पंधरा मिनिटात तयार होऊन बाहेर आली ..तिने आरशात बघून केस विंचरून घेतले होते ..तिला त्याक्षणी वाटत होतं की सारांशने आपल्याकडे पहावं आणि आपली स्तुती करावी कमीतकमी मागून घट्ट मिठी मारावी म्हणून ती आरशात त्याला पाहत होती ..पण त्याच पूर्ण लक्ष आताही मोबाईलकडे होत ...तिची सर्व तयारी करून झाली आणि ती त्याच्याजवळ येऊन उभी राहिली आणि तेव्हाच त्याच तिच्यावर लक्ष गेलं ..ती रागाने त्याच्याकडे पाहत होती आणि म्हणाली , " असा तर खूप रोमँटिक होत असतोस पण समोर आहे तर ढुंकूनही पाहत नाहीस ..समोर मी आहे तर एखादी कविता एकवावी ती नाही उलट बसलास मोबाइल घेऊन ..आता नि मी बोलणारच नाही तुझ्याशी मग बस मोबाइल वापरत .."

ती पैंजनाचा आवाज करत , पाय आपटत बाहेर जाऊ लागली . ती दारापर्यंत पोहोचलीच होती की तो तो म्हणाला

छन- छन वाजणारी पैंजण तुझी
धक - धक करणार काळीज माझं

त्याचे शब्द ऐकू येताच ती मागे पलटली आणि तिथेच उभी राहिली तर सारांश सोफ्यावरून बाजूला उभा होत म्हणाला ..

छन- छन वाजणारी पैंजण तुझी
धक - धक करणार काळीज माझं
व्हायचा आवाज एका वेळी
आणि त्यात माझं कायम हरवणं

आठवत असेलच तुला
तू वाजवायचिस जाणून पैंजण
आणि एकायचीस माझ्या हृदयाची धडधड
किती गोड हसू असायचं तुझ्या चेहँऱ्यावर
आणि भिजवायचीस सार आंगण

आठवत असेलच तुला
एकदा तुझी पैंजण हरवली
आणि भीतीने तुझे डोळे बोलू लागले
टपोऱ्या डोळ्यातील अश्रू पुसताना
तेव्हा माझ्या मात्र नाकी नऊ आले

भीती तुला पैंजण हरवण्याची
आणि मला काळजी की
मी पैंजनाचा आवाज एकला नाही तर
हृदय तर थांबणार नाही ना माझं

बघ ना इथेच तर आहे पडलेली
दाखवत तुझं पैंजण बोललो
पैंजण नाही हृदय देतोय माझं
काळजी घे जरा क्षणभर त्यांची..

तुझ्या पायात पैंजण बांधताना
जणू हृदय सुद्धा बांधल तुझ्या कोमल पायात
मी बांधलो गेलोय आता तुझ्या पैंजनाशी , तेव्हा पैंजण तुझं हरवू नकोस
आहे हृदय माझं सामावल त्यात हे मात्र विसरू नकोस
हे मात्र विसरू नकोस ..

कविता ऐकताच तिने धावतच त्याला मिठी मारली ..डोळे अश्रूने भरलेले होते तर ओठांनी सारांशच्या कपाळी मोहोर उठवायला सुरुवात केली होती..

क्रमशः ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED