Tujhach me an majhich tu..19 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग १९

तुझाच मी अन माझीच तू...भाग १९

राजस ला आभा चे वागणे अजिबात आवडले नव्हते.. त्याने आभा ला सांगितले होते स्टे अवे फ्रॉम रायन पण त्याकडे दुर्लक्ष करत आभा रायन शी गप्पा मारतांना पाहून राजस चे डोके थोडे फिरलेच होते.. त्याला एक मिनिटे अस्वस्थ सुद्धा वाटले होते.. त्याच्या मनात एक क्षण भीती सुद्धा वाटून गेली होती.. पण त्याने स्वतःला सावरले कारण आभा इतकीही लेची पेची नाही हे राजस ने जाणले होते. अगदीच गरज लागली तर तो तिच्यासाठी असणार होताच पण मुद्दाम आभा शी ह्या विषयावर बोलणे टाळायचे ठरवले...आणि आपले तोंड परत लॅपटॉप मध्ये खुपसले..

आभा सुद्धा काम करत होती.. आधी मध्ये आभा आणि राजस ची नजरा नजर होत होती.. पण त्याने आता दोघांनाही फार फरक पडत नव्हता. पहिल्या दिवशी दोघांना आलेली भावनांची आलेली लाट आता शांत झाली होती. दोघांनाही पहिल्याच भेटीत एकमेकांबद्दल काहीतरी वाटले होते पण दोघांनाही एकदम वाटल ह्या गोष्टीवर कंट्रोल केला पाहिजे सो दोघे लक्ष डायव्हर्ट करणार होते. दोन्ही कडे सेम फिलिंग जन्म घेत होती पण आभा आणि राजस सुद्धा प्रयत्नपूर्वक ही गोष्ट टाळत होते. आणि दोघांनीही सेम विचार करत वेळ घायचा निर्णय घेतला होता.. पण ही तर फक्त सुरवात आहे ह्याची दोघांनाही कल्पना नव्हती.. दोघांच्या आयुष्यात बरेच चढ उतार येणार आहेत ह्याची जाणीव कदाचित दोघांनाही नव्हती.

आभा रायन च्या थोडी जवळ जात होती. रायन तसा वागायला किंवा बोलायला छानच होता. आणि त्याच्या कडे आपसूकच आभा आकर्षित होत होती. त्यावर आभा चा काही कंट्रोल नव्हता. ती जितक्या फर्म पणे राजस शी बोलली होती तितक्या फर्म पणे रायन शी बोलू शकत नव्हती.. असं का होतंय हे आभा ला कळत नव्हते पण हे खरे होते. आभा ला रायन आवडला आहे का ह्याबद्दल आभा साशंक होती पण तिला रायन बद्दल तिला अजून जाणून घ्यावसे वाटत होते. आभा रायन शी फ्रेंडली होत होती त्यामुळेच तिला राजस चा विसर पडला होता.. पण राजस च्या मनात मात्र फक्त आभाच होती. म्हणजे त्याच्या मनात आभा बद्दल एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर झाला होता. पण आता आभा, रायन आणि राजस ह्या तिघांमध्ये पुढच्या काही दिवसात बराच काय काय होणार होतं. ह्या सगळ्यात आभा ची खरी परीक्षा होणार होती.

आभा ने तिच काम चालू केल.. रायन च्या मदतीमुळे आभा ला तो इश्यू चुटकी सारखा सोल्व्ह झाला आणि त्यामुळे आभा एकदम खुश झाली. तिने त्या इश्यू च उत्तर तिच्या सिनिअर स्टाफ ला पाठवले आणि तिला काही वेळातच अप्रिसीएशन चे मेल आले.. ती भलतीच खुश झाली. ह्यावेळी तिला रायन ची आठवण आली.. राजस मात्र आत्ता कुठेच नव्हता.. ती राजस बद्दल विसरूनच गेली होती. तिने पहिलाच काम केले आणि लगेच तिला तिने लगेच रायन ला पिंग केल आणि कॉफी साठी बोलावलं.. रायन सुद्धा काही आढे वेढे न घेता कॉफी साठी हो म्हणला. त्याने त्याचे काम आवरले आणि तो आभा च्या डेस्क पाशी आला..

"हे आभा.. इतक्यात आवरलं काम?"

"हो हो.. रायन..हा इश्यू इतका लवकर सुटला फक्त आणि फक्त तुझ्यामुळे... सो थँक्स अ लॉट..."

"वो.. तुझा इश्यू सुटला पण.. मी तर फक्त तुला हिंट दिली.. त्या हिंट वरून तू इतक्या लगेच सगळंच केल.. तू फारच फास्ट निघालीस.. आणि हो, हुशार सुद्धा.." रायन आभा च कौतुक करतांना स्वतःला थांबवू शकत नव्हता. रायन च बोलण इतक लडिवाळ होतं कधी लगेच न हुरळून जाणारी आभा रायन च्या बोलण्याला भुलत होती. आभा ला स्पेल बाउंड झाल्यासारखं वाटत होत.. आज कामाचा तिचा दुसरा दिवस आणि आजचा दिवस तिच्यासाठी फारच खास बनत चालला होता आणि तो ही राजस च्या आस पास असण्याशिवाय.. अर्थात, राजस ने त्याचा प्रेझेन्स फुलांच्या गुच्छात आभा च्या आस पास होता.. मधेच फुलांमधून येणारा सुवास आभाचे मन प्रसन्न करत होता. आणि तिला मधेच राजस ची आठवण येत होती... पण आज तिचे सगळे लक्ष रायन ने स्वतःकडे वळवले होते..

"थँक्यू रायन... आणि हुशारीच नाही माहित रे. पण आय एन्जॉय माय वर्क.."

"ओह हो.. हे सिक्रेट आहे तर तुझ.. तू छान आहेस ग आभा.. एकदम इंटरेस्टिंग... तुझ्याशी मैत्री करायला आवडेल मला.. " रायन हसून बोलला.. आभा पण हसली..आणि आभा मनात बोलायला लागली, "उगाच काहीही खोट पसरवतात लोकं... मी इतक्या लगेच कोणावर विश्वास ठेवायला नको..रायन तर चांगला वाटतोय.. फक्त बोलण्या वरून कोणाला चांगल किंवा वाईट ठरवण हे चुकीच आहे आभा बाई.." मग आभा परत हसली आणि रायन शी बोलायला लागली.

"तू पण आहेस छान.. एकदम फ्रेंडली.. बर कॉफी प्यायला जायचं का आता?" आभा बोलली आणि रायन हसला..

"हो हो.. आपण इथेच काय गप्पा मारत बसलो.. मस्त कॉफी घेतांना मारू गप्पा... मला तुझ्या बद्दल जाणून घ्यायला आवडेल आभा..."

"सेम हियर रायन.."

इतक बोलून दोघे कॉफी प्यायला गेले... राजस त्याच्या डेस्क वरून आभा कडे पाहत होता आणि आता त्याच डोक खरच फिरलं होत.. खर तर असं व्हायचं काहीही कारण नव्हत... आभा शी त्याच्या शी ओळख फक्त एक दिवसापूर्वी तर झाली होती.. तरी राजस आभा बद्दल पझेसीव्ह होत होता.. त्याला राहवून न राहवून आभा ची काळजी वाटत होती. आपण उगाच आभा ला ते चिट्ठी दिली हे सुद्धा वाटायला लागल.. त्या कागदाच्या चीठोरीमुळेच आभा विनाकारण राजस च्या नादी लागतीये हे सुद्धा त्याला वाटून गेले.. त्याला स्वतःच्या वागण्याचा राग आला.. त्याने मनात स्वतःला शिव्या हासडल्या.. फक्त एक शिवी नाही तर त्याने स्वतःला ४-५ शिव्या हासडल्या.. मग तो एकदम भानावर आला.. आपल्याला हे काय होतंय हे राजस ला कळत नव्हते पण आत्ता च्या क्षणी त्याला आभा च्या आजूबाजूला राहावे असे वाटत होते.. पण तो गेला तर ते मुद्दाम गेल्यासारखं वाटेल आणि त्यातून काहीतरी वेगळाच अर्थ निघेल अस राजस ला वाटून गेले.. पण आता काय करायच्या ह्या विचारात तो पडला... त्याला का कोण जाणे आभा ला रायन बरोबर एकटीने गेलेले पाहून भीती वाटत होती. त्याला माहिती होतं, रायन ऑफिस मध्ये काही वेडवाकड वागणार नाही पण तरीही त्याला खात्री मात्र वाटत नव्हती.. नेहमी कामात पूर्ण लक्ष देणार राजस अआज अस्वस्थ झाला होता.. तो त्याची नखं कुरतडायला लागला.. ही त्याची लहानपणी पासून ची सवय होती.. त्याला टेन्शन आले की तो आपली नखे कुरतडायला लागायला.. राजस च्या मनात विचार चक्र चलू होते. समोर कामाचा ढीग होता पण आत्ता या क्षणी फक्त आभा आणि आभाच.. त्याला बाकी कश्याचे भान नव्हतेच.. राजस विचार करत होता.. आणि तितक्यात त्याला एक कल्पना सुचली.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED