लेडीज ओन्ली - 18 Shirish द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लेडीज ओन्ली - 18

|| लेडीज ओन्ली - १८ ||

( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -

शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता.)


" लेडीज ओन्ली "

|| अठरा ||

विजयाताई खिडकीच्या बाहेर कुठेतरी दूर बघत उभ्या राहिल्या. स्वतःचा सगळा जीवनपट त्यांच्या डोळ्यांसमोरून झरझर धाव घेत जाऊ लागला.
जबरदस्तीच्या अपघाताने पोटात रूजलेलं एक बीज. अन् त्या बीजाच्या संरक्षण संगोपनासाठी लावलेली प्राणाची बाजी. याच दिवसासाठी असं आयुष्य पेरून ठेवलं असेल का निसर्गानं आपल्या जगण्यात? कधीच काहीच मिळावं याचा ना मोह धरला ,ना अपेक्षा केली उभ्या आयुष्यात. लेकीचं कल्याण व्हावं यासाठी प्रार्थना मात्र सदैव करत राहिले. लेकीला सुख मिळावं म्हणून तहहयात धडपडत राहिले. इच्छा एकच होती. काळजाचा पसा करून जपलेलं लेकरू कधी दृष्टीआड होऊ नये. पण आज तेच लेकरू त्याच्या सुखासाठी दुराव्याचं वरदान मागत असेल तर? म्हणावं का तथास्तू? त्याला देऊन इच्छित आशीर्वाद.. स्वतःच्या भाळी लिहून घ्यावा का एकाकीपणाचा अन् विरहाचा शाप? नाही नाही... आता अश्रवी दुरावली तर कदाचित ती कायमचीच दुरावेल...कधीच परत येणार नाही.. तिकडंच तिचं विश्व निर्माण करेल... कदाचित त्या विश्वात माझ्यासाठी जागाच नसेल...!! नाही नाही.. मी असं होऊ देणार नाही..!. '
" अश्रू... अश्रू.. तुला तुझी जेनी हवीय ना?" खिडकीच्या बाहेर दुरात हरवलेली त्यांची नजर आता अश्रवीवर येऊन स्थिरावली, " मी आजवर तुझ्यासाठी तुझी आई झाले, वडील झाले, बहीण, भाऊ, मैत्रीण... सर्वकाही झाले..आज मी तुझ्यासाठी तुझी जेनी व्हायला तयार आहे..! तुला माझ्यात तुझी जेनी गवसेल ?? "
आईच्या त्या प्रश्नाने अश्रवीच्या मेंदूवर जणू वीज कोसळली. विजेचा एक प्रचंड लोळ जणू तिचे सर्वांग जाळत गेला. ती ताडकन खुर्चीतून उठून उभी राहिली... " आई... काय बोलतीयेस तू हे?" अश्रवीच्या मेंदूत जणू झिणझिण्या उठल्या होत्या.
" होय बाळा.... मी तुझ्यासाठी... तुझी जेनी व्हायला तयार आहे.. फक्त तू मला सोडून कुठेही जाऊ नकोस गं..!! " विजयाताई शांतपणे बोलल्या. अश्रवी मात्र नखशिखांत हादरून गेली. तिने थेट आईच्या पायांवर डोकं ठेवलं. तिचे डोळे खळखळा वाहायला लागले. तिने आईच्या पायांना घट्ट मिठी मारली. तिच्या आसवांनी आईच्या पायांना जणू अभिषेक घातला होता.
" मला माफ कर आई... मी चुकले... मला माफ कर... मी माझ्या स्वार्थापोटी तुझा विचारच केला नाही.. मला माफ कर... मी आता तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही... कधीच नाही..! "
कितीतरी वेळ अश्रवीचे अश्रू आईच्या पायांवर ओघळत राहिले... अन् आईचे अश्रू... अश्रवीच्या मस्तकावर..!!

© सर्वाधिकार सुरक्षित -

© शिरीष पद्माकर देशमुख ®


{ 'लेडीज ओन्ली' या कथामालिका कादंबरीतील सर्व घटना आणि पात्र काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. तसा संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.
'लेडीज ओन्ली' कथामालिका कादंबरीच्या संदर्भातली सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत.}

© शिरीष पद्माकर देशमुख ®





( वाचकांसाठी एक विनम्र निवेदन -

शिरीष पद्माकर देशमुख यांची 'फरदड' {कथासंग्रह} आणि 'बारीक सारीक गोष्टी' {बालकुमार कथासंग्रह} ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आणि ही दोन्ही पुस्तके आता विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मिळविण्यासाठी 7588703716 किंवा 7057292092 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा / वाट्सप करा. 'बारीक सारीक गोष्टी' हे पुस्तक तुम्ही केवळ 99 रुपयांमध्ये chaprak.com वरून आॅनलाईन देखील मागवू शकता. आजच ही पुस्तकं मागवा.)