स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 31 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 31 )


ये दुवा नही मांगता
की दुवाओमे तुम मिलो
बस ये दुवा चाहता तू की
दुवाओमे सिर्फ तुम रहो

ते गोव्याला भेटले ती शेवटची भेट समजून दोघांनीही आपली वेगळी वाट धरली ...अर्थात एकमेकांवर प्रेम तेवढच होत पण आता ते प्रेम पूढे जाउच शकत नव्हत हे माहिती होत त्यामुळे वाट बदलावी लागली..सारांशनेही एक स्वप्न पाहिल होत पण ती आयुष्यात असावीच हा हट्ट त्याने कधीच धरला नव्हता त्यामुळे त्याला थोडा त्रास झाला असतानाही त्याने स्वताला सावरायचं ठरवलं होतं ..या सर्वात नित्याची स्थिती आणखीच खराब होती ..आता कुठे तिने स्वप्न पाहायला सुरुवात केलीच होती की सर्व स्वप्न पुन्हा स्वप्नच बनून राहिले होते ..सारांश पासून वेगळं होताना तिचे डोळे भरून आले होते ..आणि ते अश्रू मुंबईला परतल्यावरदेखील थांबले नव्हते पण सत्य स्थिती अशी होती की दोघांनाही मूव्ह ऑन करणे गरजेचे होते आणि नशिबाने दिलेलं सर्व त्यांनी जसच्या तस स्वीकारायचं ठरवलं ..

नित्याच आयुष्य फक्त आता संध्यावरच येऊन थांबल होत ..तीच खान पिन करून देणे , शाळेत नेने , अंघोळ करुन देणे तिच्या गोष्टी ऐकणे यातच तिचा दिवस जायचा ..खर तर तीच लहानपण नित्याला पाहायला मिळालं नव्हतं त्यामुळे आपल्या लाडक्या लेकीसाठी ती काहीही करायला तयार होती ..संध्या घरी असली की पूर्ण घरात ओरडा ओरड सुरू राहायची आणि नित्याला काम आवरण्यात वेळ व्हायचा ...सकाळी उठली की मृन्मयचा डबा करणं , नंतर संध्याला शाळेत सोडून , तिकडून आल्यावर अंघोळ वगैरे करून जेवण आटोपन यात तिचा पूर्ण दिवस जायचा ...दुपारी झोपली की सरळ सायंकाळी उठायची आणि पुन्हा काही वेळ बसून रात्रीच्या जेवणाला लागायची तर रात्री फक्त थोड्या वेळ ती सर्वांशी मॅसेजवर बोलत असे ..तर कधी कधी ती कथा वाचत बसत होती ..
इकडे सारांशही आपल्या कामाला लागला होता ..दिवसभर ऑफिसचे काम आवरून तो थकला की सहसा कुणाशी बोलत नसे ..अलीकडे त्याने लिहीन फार कमी केलं होतं ..आईच सोबत असल्याने तो हवा तेवढा वेळ तिला देत होता तर आठवड्यातून दोन वेळा तरी तो कॉलवर नित्याशी बोलायचा ..ती बरी आहे हे ऐकून त्याला समाधान मिळायचं ...त्यादिवशी ते दोघेही सर्व जगाच्या गोष्टी विसरून तासंतास बोलत असत ..तेवढेच काय तर दोघे आनंदी होते ..

पाहता - पाहता चार महिन्याचा कालावधी गेला ..आज सारांशने सकाळपासून नित्याला मॅसेज केला नव्हता ..तोही दिवसभर कामातच असल्याने तिला मॅसेज करणं त्याला जमलं नव्हतं..रात्री थोडा वेळ मिळाला म्हणून त्याने तिला मॅसेज केला ..

📱सॉरी नित्या आज खुप दमलोय काम करून म्हणून मॅसेज करणं जमलं नाही ..तू कशी आहेस आणि काय करत आहेस ?

तो मॅसेजची वाट पाहत होता पण तिचा रिप्लाय आला नाही म्हणून त्याने टीव्ही सुरू केली आणि टीव्ही पाहू लागला ..काहीच वेळ झाला असेल त्याचा मोबाइल वाजला आणि हातातला रिमोट दूर करत त्याने मोबाइल हातात घेतला आणि पाहू लागला ..मॅसेज ओपन केला ..

📱मी ठीक आहे ...थोडं हॉस्पिटलमध्ये आले आहे ..काही सिरीयस नाहीये तेव्हा माझी काळजी नको करू आणि सोबत मृन्मय आहे तेव्हा आता बोलू शकत नाही ..उद्या सांगते तुला सर्व ...बाय

खर तर त्याला तिच्याशी खूप काही बोलायच होत पण नाईलाजाने त्याने मॅसेज केला ..

📱ठीक आहे ..काळजी घे बाय ...

सारांशने काही वेळ टीव्ही पाहिला आणि नंतर बंद करून झोपी गेला ..

दुसरा दिवस उगवला ..सकाळी सकाळीच सारांशने तिला मॅसेज केला होता पण सकाळपासून तिचा रिप्लाय आला नव्हता..त्यामुळे सतत त्याच लक्ष मोबाइलकडे जात होतं ..सकाळची दुपार झाली होती पण तिचा काही रिप्लाय आला नाही म्हणून तो चिंतेत होता .शेवटी त्याने कॉल करायचा विचार केला ..हातात मोबाइल घेणारच नि समोरून तिचाच मॅसेज आला ..

📱सॉरी रे मावशी मला घरी घेऊन आली आहे ..आम्ही आताच आलो इकडे तेव्हा आपण रात्री निवांत बोलू आणि माझी काळजी नको करू ..बाय

तिने पुन्हा एकदा बोलणे टाळले म्हणून त्याला राग आला होता ...म्हणून आता आपण मॅसेज करायचा नाही असा विचार करून त्याने फोन बाजूला ठेवून दिला ..त्याला तिचा इतका राग आला होता की त्याने आपला मोबाइलच सरळ बंद केला ...काम करता करता सायंकाळ झाली आणि सुट्टी झाल्यावर तो घरी परतला ..फोन चार्जिंगला लावून तो फ्रेश होऊन परतला ..आईने हातात गरम चहा आणून दिला आणि तो हातात रिमोट धरून चॅनेल बदलू लागला ..टीव्हीवर बातम्या सुरूच होत्या की तिचा मॅसेज आला ..

📱सॉरी मला माहित आहे की तुला माझा राग आला असेल पण नाही जमलं मला मॅसेज करायला ..तू रागावला आहेस हे माहिती ..सॉरी पुन्हा एकदा!! ..त्रास नको करून घेऊ रे स्वतःला!! ..तू रागावलास की काहीच नीट वाटत नाही !! ..

त्याला तिचा राग आला असल्याने मॅसेज पाहूनही न पाहण्याच सोंग करत त्याने टीव्हीवर लक्ष केंद्रीत केले ..सुमारे 10 - 15 मिनिटे तो टीव्हीवर लक्ष देऊन होता पण आता टीव्ही पाहण्यातही त्याच मन लागत नव्हत ..त्याने टीव्ही बंद करत तिला मॅसेज केला ..

📱तुझ्यात गुंतलो इतका आहे की धड रागावता पण येत नाही तुझ्यावर !! राग तर आले आहेच पण आता तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे म्हणून बोलतोय ..याचा अर्थ असा नाही की माझा राग गेलाय..असो तू कशी आहेस ? डॉक्टर काय म्हणाले ?

📱हो हो कळलं !! रागाव पण बोलणं सोडू नको !! वाटल्यास कान पकडून सॉरी !! एकदम बढिया मला काय झालं ..म्हणाले की काळजी नको करू माझी ..# नित्या

📱 अस कस !! ठीक आहे म्हणे , काल रात्री तुझ्याशी बोललो तेव्हा ठीक होतीस तू आणि एकाच दिवसात तुझी तब्येत अचानक इतकी कशी बिघडली ? नेमक तुला झालं तरी काय होत ? प्रश्न तर पडणारच ना ? # सारांश

📱 लो बीपीचा त्रास आहे ना मला आणि हे तुलाही चांगलंच माहिती आहे म्हणून झालं ते ..बाकी काही नाही आणि रोज मरे त्याला कोण रडे !!..# नित्या

📱 मला जेवढं माहीत आहे त्यानुसार लो बीपीचा त्रास तुला टेन्शन आल्यावर होत ना !! ..मी रात्री बोललो तेव्हा तू नीट होतीस आणि सकाळी सरळ डॉक्टरकडे गेलीस आणि ऍडमिट होतीस म्हणजे रात्रीच काहीतरी झालं , हो ना ? सांग ना काहीतरी झालंय , फक्त तू मला सांगत नाही आहेस !! प्लिज !! # सारांश

📱सोड ना रे तेवढं काही नाही झालं ..इतकी काळजी करू नकोस ..म्हणाले ना मी ठीक आहे तेव्हाच तर मॅसेज करत आहे तुला ..# सारांश

📱 तू उत्तर द्यायला टाळत आहेस म्हणजे काहीतरी घडलं आहे ..एक मिनिट मृन्मय काहीतरी चुकीच वागला नाही ना ? # सारांश

नित्याने त्याला मॅसेजच केला नाही आणि सारांशला उत्तर मिळाल ..नित्या माझं मन घाबरत आहे काय झालं सांगशील का प्लिज ? खूप भीती वाटत आहे नित्या सांग ना !!# सारांश

📱काही नाही रे ..काही झालंच नाही तर काय सांगू ? # नित्या

📱नित्या मला माहित आहे तू खोट बोलत आहेस ..तू सांगणार आहेस की कॉल करू सर्वांसमोर ? # सारांश

📱 नाही ..नको ...नको ..मी सांगते थांब ..# नित्या

📱 हो लवकर सांग ..मी वाट पाहतोय # सारांश

📱तुझ्याशि बोलून रात्री झोपले ..माझ्या बाजूला संध्या झोपली होती ..मृन्मयला काही काम असल्याने तो घरी उशिरा आला ..येताना तो दारू पिऊन आला होता ..आला आणि तसाच बेडवर झोपला तर मी संध्याला सोबत घेऊन खाली झोपी गेले ..रात्रीचे 3 वाजले असावेत ..माझ्या पायावर हात फिरत होता आणि तो हात वर येऊ लागला ..मी दचकून उठले तर तो मृन्मय होता ..मी ओरडू नये म्हणून त्याने हात तोंडावर ठेवला ..माझ्याही नकळत त्याने संध्याला उचलून बाजूला नेऊन ठेवले होते ..त्याचा हात तोंडावर येताच मी जोराने हालचाल केली आणि बाजूचा टेबल फॅन पायावर पडला आणि सोनू जागी झाली ..सोनू जागी होताच तो बेडवर जाऊन पडला ..पण माझी काय स्थिती झाली होती माझं मलाच माहिती .हात थरथर कापत होते आणि अंग गळून पडाल होत...फॅनच्या आवाजाने संध्या बाजूला येऊन झोपली आणि मी माझे अश्रू कसेतरी रोखले ..तो क्षण अस डोक्यात कैद झाला की तो जवळ येईल या भीतीने मी रात्रभर झोपले नाही आणि सकाळी ताप भरला.. बीपी लो होऊन नेहमीचाच त्रास सुरू झाला ..खूप घाबरले होते रे मी त्यावेळी ..रात्री 3 लाच तुला कॉल करावंसं वाटत होत !! मोबाइल हातात घेतला पण तू झोपला असेल म्हणून फोन खाली ठेवला ..सारांश ज्याची भीती होती तेच झालं !! आज जरी वाचले त्याच्या तावडीतून पण पुढे काय होईल माहिती नाही ..खूप भीती वाटत आहे रे सारांश " # नित्या

📱 घाबरू नको मी आहे ना सोबत ..करायचा होता कॉल रात्री त्यात काय !! एवढं सर्व घडलं नि तू मला काहीच कस सांगितलं नाहीस ...मी येतो उद्या जमेल त्या ट्रेन ने ..# सारांश

📱इच्छा तर होती कॉल करायची पण मन मानत नव्हतं म्हणून नाही केला ..नको सारांश प्लिज .. मावशी त्याला आधीच खूप ओरडली आहे तेव्हा आता सर्व काही ठीक आहे ..तोही सकाळपासूनच सॉरी सॉरी म्हणत आहे ..तू नको येऊ ..नाही तर सर्व बिघडेल आणखी ..प्लिज नको येऊ !!# नित्या

📱 खरच ठीक आहे ना की मी येऊ नये म्हणून म्हणत आहेस ? # सारांश

📱हो ठीक आहे आणि तस पण येऊन काय करणार आहात ? .जेव्हा म्हणत होते मला नाही जायचं तेव्हा सर्वांनी हट्ट केला जा म्हणून मग आता त्यालाही बोलून काय फायदा ? ...आता तो जबरदस्ती करो की काहीही करो ?..करेन सहन !! ..आधीही केलंच होत ..आताही करेन .
नवीन काय त्यात ? ..शेवटी बाईचा जन्म सहन तर करावंच लागणार..कधी वडिलांसाठी तर कधी नवऱ्यासाठी !! पण मी आज आनंदी आहे कारण मी योग्य होते त्याच्याबद्दल..तो नाहीच बदलू शकणार कधीच ..

तिचा मॅसेज वाचून तो निशब्द झाला कारण तिला जा म्हनणार्यात तोही होताच ..तो काहीच बोलला नाही हे पाहून तीच म्हणाली

📱काळजी नको करू मी ठीक आहे ..तू थकून आला असणार तेव्हा काळजी घे स्वतःची ..मीही पडते जाऊन ..नाही तर मावशी ओरडायची ..चल बाय # नित्या

त्यानेही बाय मॅसेज करत केला फोन बाजूला ठेवला पण त्याच मन आज मात्र बेचैन होत ..आई घरातून जेवायला हाक मारत आहे हे सुदधा त्याला ऐकू येत नव्हतं ..दोन तीन वेळा हाक मारल्यावर आई स्वतः त्याला बोलवायला आली नि तो भानावर आला ..इच्छा नसतानाही त्याने थोडं जेवण करून घेतलं . जेवण झाल्यावर आई टीव्ही पाहत होती .त्याला तो टीव्हीचा कर्कश आवाज नकोसा झाला होता ..पण आईला टीव्ही बंद कर म्हणायची त्याची हिम्मत नव्हती ..तासभर गेला नि आईने स्वतःच टीव्ही बंद केली ...घराचे लाइट बंद झाले आणि त्याला जरा शांतता मिळाली ..तो बेडवर इकडून तिकडे पलटत होता पण त्याला झोप काही येत नव्हती उलट नित्याचे शब्द त्याच्या कानावर पडत होते ..तो फारच बेचैन झाला होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले ..त्याने ते रात्रीच्या अंधारात पुसून घेतले आणि मनातच म्हणू लागला , " सारांश तू आज चुकला आहेस ..इतरांना रस्ता दाखवता दाखवता तू नित्याला अशा रस्त्यावर एकट सोडून दिलेस जिथून तिला परत येन कठीण आहे ..ती म्हणत होती ना तो नाही सुधारला पण तुही म्हणाला होतास त्याला एक संधी देऊन बघ ..कदाचित तो खरच सुधारला असेल पण बघ काय झालं ..कालच्या प्रसंगानंतर तिला किती वेदना होत असतील याचा विचार सुद्धा तू करु शकत नाहीस ..का सोडलंस तू तिला ऐकट ..तुझं तर प्रेम होतं ना तिच्यावर मग अस वागलास तिच्याशी ? ..तरी ती म्हणत होती ..पण तू नाही एकल ..स्वतःच ज्ञान देत बसलास तिला ..एक मुलगी , एक बायको , म्हणून तिने सर्वच पार पाडल होत मग आईच कर्तव्यही पार पाडण गरजेचं होतंच का ? या सर्वात तिने आपल्या मनासारखं केव्हा जगायच की जगूच नये ? ..तिने केला होता प्रयत्न या सर्वातून बाहेर निघण्याचा पण तू नाही दिलीस तीला साथ ..ती खर म्हणत आहे .जेव्हा थांबवायचं होत तेव्हा थांबवलं नाही आणि आता तोंड वर करून विचारत आहेस ..येऊ का म्हणून ? , काय करशील रे जाऊन तिथे ? ..आणि काय म्हणशील तिला ? ..या सर्वाला ना तू पण जबाबदार आहेसच आणि तिला काही झालं ना तर ? "

शेवटचे शब्द विचार करून त्याचे डोळे आणखीच पाणावले आणि ते शब्द त्याच्या मनात घर करून गेले ...तो पून्हा तिच्याशी तसाच वागला तर ? या विचाराने त्याची झोप उडवली होती ? ..कारण जरी त्याच मन मोठं असलं तरीही नित्यावर त्याच्या समोर रेप होताना तो पाहू शकला नसता आणि त्याला आता कळून चुकलं होत की आपण कितीही प्रयत्न केला तरी नित्या आता तिथून कुठेच जाणार नाही ..मग हा रेप केव्हांपर्यन्त ?

त्याच्या डोक्यात हा शब्द येताच त्याच अंग थरथर कापू लागलं आणि डोळ्यात अश्रू येऊ लागले ..भीतीमुळे डोक्याने विचार करणे बंद केले आणि रात्रभर तेच विचार त्याच्या डोक्यात सुरू होते ..

रात्री कितीतरी उशिराने त्याला झोप लागली ..पहाटेचे 5 वाजले असतील ..त्याच्या डोक्यात तिच्याबद्दलचे तेच विचार फिरत होते आणि पहाटे पहाटे तो झोपेतून ओरडत म्हणाला , " नित्या .." ..त्याचा आवाज ऐकून आई झोपेतून जाग्या झाल्या ..लाइट लावताच त्यांच्यासमोर घामाने भिजलेला आणि भीतीने थरथरनारा सारांश बेडवर बसून होता ..त्याला अस बघून आई घाबरत म्हणाल्या , " बाळा सारांश , काय झालं ? ..स्वप्न बघितल का एखादं वाईट ? "

सारांशला काय बोलावं नि काय नाही कळतच नव्हतं ..त्यामुळे आईला घट्ट मिठी मारून तो म्हणाला , " हो आई स्वप्नच होत बहुतेक ..खूप भयानक स्वप्न!! ज्याचा विचार केला तरी अंगावर काटे येतील .."

आईने त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि घडल्याळीकडे लक्ष दिले ..पहाटेचे 5 वाजले होते ..तो शांत झाल्यावर आई म्हणाल्या , " बाळा काळजी वाटत आहे रे तुझी !! लोक म्हणतात पहाटे पडलेले स्वप्न पूर्ण होतात !! "

आईचे शब्द येताच त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि त्याच्या डोक्यात एकच विचार आला ..खरच त्याने तिचा पुन्हा रेप केला तर ?

मुश्किल है अब तेरे बिन
एक पल जिंदा रेहना
ख्वाब देखा है आज ऐसा की
नही चाहते कभीे उसे याद रखना

क्रमशः ..