स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 30 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 30 )


केहना है तुझसे हर पल
की तेरा होणा चाहता हु
जमाना इजाजत देता नही
इसलीये खुद का आशिया बनाता हु ...

ती त्याच्या मिठीत जात म्हणाली , " कशा सुचतात रे तुला इतक्या सहज कविता ? "

आणि तो हसत म्हणाला , " सवय झाली आहे ग पण प्रामाणिकपणे सांगू तर ही कविता मी आधीच तयार केली होती आणि विशेष म्हणजे तुला एकवावी म्हणून.."

ती त्याच्या मिठीतुन बाहेर येत म्हणाली , " अच्छा म्हणजे तू मला कॉल केल्यावर काही सेकंद बोलत नव्हतास ..पैंजनाचा आवाज ऐकण्यासाठी ते कवितासाठीच होत का ? "

त्याने मंद स्मित करत मान हलवली ..आणि पुढच्याच क्षणी ती त्याचे केस हलवत म्हणाली , " चालू नाहीस महाचालूं आहेस तू !!! "

तो तिच्याकडे हसत पाहू लागला आणि पुन्हा म्हणाला , " आणखी एक सांगू !!..तू आरशात पाहत होतीस ना की मी तुझ्याकडे का पाहत नाहीये तर ते मी जाणूनच करत होतो ..खर तर दिवसभर मी तुझ्या छोट्या छोट्या हालचाली टिपत होतो ..मला माहीत होतं तू रुसणार आणि असच वागणार म्हणून जाणूनच दुर्लक्ष करत होतो ..खर प्रेम ह्याच क्षणात तर आहे ..."

तिला काय बोलू नि काय नको अस झालं होतं आणि हळूच आवाजात म्हणाली , " इतकं ओळ्खतोस मला? "

तो काहीच बोलला नाही उलट शांतपणे तिला बघू लागला ..तो काहीही न बोलताच सहज तिला उत्तर मिळाले होते ।.काही वेळ ते नजरेनेच बोलत होते नंतर उशीर होतोय म्हणून ते बाहेर निघाले ..

सायंकाळ झाली होती ।.सूर्य बुडाला होता पण त्याच्या केशरी छटा अजूनही हलक्याशा दिसत होत्या ..त्यांनी सकाळी बरीच मस्ती केली होती म्हणून कदाचित हातात हात टाकून ते थंडगार वाळूवर अनवाणी पायाने चालत होते ..तो शांत समुद्र आणि थंडगार हवा मन प्रसन्न करीत होती ..थोड्या वेळ फिरून झाल्यावर त्यांना एक जागा दिसली ..तिथे फारच कमी लोक होते आणि लोकांचे आवाज देखील फार गोंधळ घालत नव्हते ..कर्कशपणा कमी होता म्हणून ते त्या ठिकाणी बसले ..दोघेही समुद्राकडे पाहत होते ..आणि नित्या म्हणाली , " आज माझ स्वप्न पूर्ण झालं बघ !!.एक तर सोबतीला माझा आवडता समुद्र आणि त्यात तुझी साथ ह्याची मज्जाच वेगळी ..खर तर तुला आधीच भेटायच होत पण मधल्या काळात अस काही घडत गेले की ते शक्य झालं नाही ..तू म्हणतोस ते खरं आहे ..भेटायची अपेक्षा होती तेव्हा ती भंग झाली आणि जेव्हा अपेक्षा सोडून दिली तेव्हा मात्र तू नकळत भेटलास आणि हा क्षण जगायला मिळतोय त्यात आनंद आहे ...ही एकमेव सायंकाळ आहे जेव्हा आपण सोबत आहो कदाचित यानंतर आपली भेट होईल की नाही ते सांगणंही खूप कठीण आहे ..पण फार बर वाटल तुला भेटून ..फार लोक म्हणतात आजच्या ऑनलाइन जगात सहसा कुणावर विश्वास टाकू नये ..मीही जरा घाबरत होते पण आज तू भेटल्यावर समजलं की प्रेम ऑनलाइन असो की ऑफलाइन माणूस प्रामाणिक असला की नाती बहरतात हेच बघना ..मृन्मय सोबत दोन वर्षे राहिले पण त्याला माझ्यावर विश्वास नव्हता आणि तू काही क्षण सोबत आहेस तरी विश्वास वाटतो ..."

तो फक्त तिच्याकडे पाहत होता ..तो काहीच बोलत नाही हे पाहून तीच म्हणाली , " काय रे !!अस काय बघत आहेस माझ्याकडे ? "

तो मंद स्मित करत म्हणाला , " काही नाही .."

तीही क्षणभर त्याच्याकडे पाहत होती ।.सदैव बोलणारा हा इतका शांत कसा काय यावर तिला विश्वास बसत नव्हता ..काहीच क्षण गेले असतील त्याने तिचा हात पकडला नि जवळ आला ..तिच्या अंगावर लगेच शहारे आले पण तिने त्याला कळू दिले नाही ..पुढे तो बोलू लागला .., " तुला भेटूनही मला फार आनंद होतोय ..मला माहित आहे यानंतर कदाचित आपली भेट होणार नाही म्हणून कदाचित मी तुला मनात साठवून घेतोय ..हे खरं की ज्याला पाहिलं नाही त्यावर विश्वास कसा ठेवायचा पण व्यक्ती कधी ना कधी भेटतो तेव्हा मात्र नक्कीच ओळखता येते की तो कसा आहे ..तेव्हाच ठरवायचं की ते नात आपण पुढे न्यायचं की नाही तर .."

आता ती त्याच्याकडे पाहत होती ..काही क्षण गेले आणि तो पुन्हा तिला म्हणाला , " नित्या जर तुला राग येणार नसेल तर एक विचारू ? "

ती लगेच उत्तरली , " हो विचार !! "

तो हळुवार आवाजात म्हणाला , " तुला अस कधीच वाटलं नाही का त्याला पुन्हा एक संधी द्यावी .."

प्रश्न ऐकताच तिने त्याच्याकडून आपला हात सोडवून घेतला ..आपली नजर त्याच्याकडून दूर नेत समुद्रावर स्थिर केली आणि जड आवजात म्हणाली , " वाटलं रे !! पण एकदा घरून परत गेल्यावर तो कधी आलाच नाही ..तेव्हांच समजलं त्याला माझी गरज नव्हती .या सात वर्षात मी एक दोनदा माझ्या लेकीला आणायला गेले होते पण त्यांनी मला धक्के मारून बाहेर काढुन दिले .त्यावेळी ते म्हणाले की त्या रात्रभर कुणासोबत झोपलीस काय माहिती आणि आज आलीस तोंड वर करून ..मग अशा वेळी एका स्त्रीने नक्की काय करावे ...लोकांना फक्त अर्ध सत्य माहिती आहे ..त्यांना वाटत एक आई आपल्या मुलीशीवाय कस जगू शकते पण सत्य हे आहे की नाईलाजाने जगावं लाग होत आणि आजही मी फक्त आपल्या मुलीसाठीच त्याच्याकडे परत आले आहे ..सारांश तुला एक सांगू ..त्याने माझा जो शारीरिक छळ केला त्यासाठी मी कदाचित त्याला माफही केल असत पण त्याने माझ्यावर शंका घेऊन एवढ्या रात्री बाहेर काढलं ते मी कधीच विसरू शकत नाही .वरून त्याला त्याने कधी चूक केली अस वाटतच नाही आणि माझ्या चारित्र्यावर सदैव प्रश्न निर्माण केल्या गेले ...त्याने सरळ माझ्या अस्तित्त्वावर घाला घातला आहे ..आजही मी त्या घरी आहे पण संध्याची आई म्हणून बायको म्हणण्याचा हक्क त्याने सात वर्षांपूर्वीच गमावला आहे ..माझ्यावर शंका घेऊन "

जुन्या गोष्टी आठवून तिचे डोळे भरून आले होते ..ती त्याच्यापासून उठून दूर चालू लागली होती ..तो धावत तिच्या बाजूला आला आणि तिचा हात पकडत म्हणाला , " सॉरी !! खर सांगू तर मीही एक स्वप्न पाहिलं होतं तुझ्या सोबत कायम राहण्याच पण तुला परत मृन्मयकडे जावं लागल आणि ते प्रत्येक स्वप्न तुटल ..आता फक्त मला आनंद द्यायचा आहे ..कारण त्यातच माझा आनंद आहे ..नित्या काहीही झालं तरी काळजी करू नको मी कायम तुझ्या सोबत आहे .."

ती त्याचा हात घट्ट पकडत म्हणाली , " ते मला माहित आहे म्हणून तर तुझ्यावर विश्वास टाकून आज इथे तुझ्यासोबत आहे ..माझा आधीच विश्वास होत तुझ्यावर पण आज घट्ट झाला आहे ..तुझ्या वागण्या बोलण्यातून कळून येतंय की तू जसा वागतोस तसाच आहे ..म्हणून कदाचित मी तुझ्याशी इतक जुळले आहे "

ते दोघेही एकमेकांकडे पाहत होते ।.त्यांच्या डोळ्यात त्यांच्याप्रती असलेलं प्रेम , विश्वास सर्व दिसत होतं आणि याव्यतिरिक्त नात्यात आणखी असायला तरी काय हवं ..

थोड्याच वेळात ते हॉटेलकडे गेले ..त्यांना बऱ्यापैकी भूक लागली होती म्हणून आधी जेवणाचा ऑर्डर दिला ..यावेळी तिने बिना काट्याची फिश मागवली होती हे बघून तो थोडा हसला होता तर मृन्मयची आठवण काढल्याने तिचा चेहरा पडला होता ..ते त्याच्या लक्षात आलं होतं पण त्यावर लगेच बोलणं योग्य नव्हतं त्यामुळे जेवण आवरून तिच्याशी बोलायच त्याने ठरवलं ..काहीच क्षणात त्यांचं जेवण आटोपलं

त्यांचं जेवण आटोपताच ते सरळ रूम मध्ये पोहोचले ..सारांशने आधी कपडे चेंज केले आणि बेडवर जाऊन पडला तर नित्याही कपडे चेंज करून त्याच्या बाजूला जाऊन पडली ..सारांश तिच्याकडे पाहत होता हे बघून तीच त्याच्या मिठीत जाऊन शिरली आणि म्हणाली , " सारांश मी आता एक प्रश्न विचारू ? "

आणि तो हसत म्हणाला , " एक नको दोन विचार ? "

ती हसत म्हणाली , " काल आपण इतक्या जवळ होतो ..इतक्या की काहीही होऊ शकलं असत आणि तस काही घडलं असत तर कदाचित मी काहीच म्हणाले नसते तुला मग तू स्वतःला समोर नाही जाऊ दिलंस , अस का ? "

आणि तो अलगद हसत म्हणाला , " मीही जर तसाच वागलो असतो तर मृन्मय आणि माझ्यात फरक काय ? खर सांगू जेव्हापासून तुला भेटता येईल हे माहिती झालं तेव्हापासून फक्त हाच विचार करत होतो तुझ्याशी काय बोलायच ?..फिरायचं कुठे ? ..मनात हा विचार कधीच आला नाही की तुला शरीराने मिळवायच आहे ..मान्य की तू काहीही म्हणाली नसती पण मनात वाटलं असत की हाही शरीरासाठीचा आला होता ..मला तुझ्यात एकरूप व्हायला आवडलं असत ..मी तर विचार केला होता लग्न करू आपण पण मागे काही दिवस असे गेले की तो विचार मी मनात आणूच शकलो नाही ..मी इथे आलोय ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिला क्षणभर पाहायला ..डोळ्यात साठवून कायम सुंदर आठवणी घडवायला आणि मी ते करतोय या सर्वांसमोर शरीर काहीच नाही ..तू आहेस आणखी काय हवं मला .."

ती त्याच्या चेहऱ्याकडे क्षणभर पाहत म्हणाली , " मी खरच लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आहेस ..पण वाईट वाटत की उद्या आपल्याला निघावं लागेल नंतर कदाचित आपली भेट होईल की नाही हेही माहीत नाही ..बहुतेक आपल्या वाटा वेगळ्या होतील .."

आणि तो तिच्यावर हसत म्हणाला , " वाटा तर आधीच वेगळ्या होत्या फक्त आपण भेटलो ते आयुष्यात प्रेम या शब्दाचा अर्थ समजावून सांगायला ..हरकत नाही ..उद्यापसून होतील वाटा वेगळ्या पण आज तर आपला आहे ..ह्या क्षणात जगू आणि ह्याच आठवणी कायम आयुष्यभर मनात साठवून ठेवू ..काय झालं आपण कायम सोबत राहणार नाहीत तर मनाने कायम एकमेकांचे आहोत हेच खूप झालं ..आणि कुणाला माहिती उद्या काय होईल ते ..तेव्हा आज जगून घेऊ .."

ती त्याच्यासमोर काहीच बोलली नाही आणि आपली मिठी घट्ट करत पुन्हा त्याच्या कुशीत शिरली ..तोही तिला घट्ट पकडून झोपी गेला ..

दुसरा दिवस उगवला ..आज नित्या लवकर उठून त्याला न्याहाळत होती ..ती बहुतेक त्याच्यासमोर रडू शकणार नाही म्हणून आताच रडून घेत होती ..काही क्षणात त्याची हालचाल होऊ लागली आणि तिने डोळे पुसले आणि आपण आनंदी असल्याचं नाटक करू लागली ..ती आधीच फ्रेश झाली होती त्यामुळे सारांश फ्रेश होताच ते दोघे कॉफी घ्यायला बाहेर पडले ..सारांशचा चेहरा शांत जाणवत होता तर तिच्या चेहऱ्यावर बरेच प्रश्न होते ..तरीही तो तिला काहीच बोलला नाही ..त्यांनी कॉफी घेतली आणि लगेच रूमवर परतले..सुमारे तासाभरात त्यांची ट्रेन होती त्यामुळे नित्याने दोघांचीही पॅकिंग करायला हाती घेतली ..सारांश स्वतः पॅकिंग करणार होता पण नित्याने त्याला करू दिली नव्हती .बहुतेक तिला स्वतःचे अश्रू आवरण कठीण जात होतं तरीही तिने अश्रू येऊ दिले नव्हते ..पॅकिंग झाली आणि दोघेही बाहेर जाण्यास सज्ज झाले ..ते बाहेर पडणारच तेव्हाच तिने त्याला घट्ट मिठी मारली नि न राहवता तिचे डोळे बोलू लागले ..तो तिला काहीच म्हणाला नाही उलट तिच्या केसांवरून प्रेमाने हात फेरत होता ..काही वेळात तिने डोळे पुसले आणि दोघेही बाहेर पडले .सारांशने रूमच पेमेंट केलं आणि ते रेलवे स्टेशनकडे निघाले ..गाडीतहि दोघे शांत होते तर नित्याची नजर त्याच्यावरुन हटत नव्हती ..तिला राहून राहून एक प्रश्न पडत होता की हा इतका शांत कसा असू शकतो ..ती विचारात हरवली होतीच की स्टेशन आल्याची त्याने आठवण करून दिली ..नित्या आणि सारांश स्टेशनकडे जात होते ..तिला हा दुरावा नकोसा झाला होता म्हणून तिने त्याचा हात घट्ट पकडून घेतला .तो समोर समोर तर ती त्याच्या मागे चालू लागली होती ..सारांशने मुंबई जाणारी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म वर लागते ह्याची चौकशी केली आणि तो तिला ट्रेनकडे घेऊन गेला ..ट्रेन आधीच लागून होती ..ट्रेनला सुटायला आणखी अर्धा तास बाकी होता म्हणून दोघांनीही नाश्ता केला आणि काही फळ घेऊन देऊन तिच्या बॅगेत टाकले ..नाश्ता करून ते परतले तेव्हा गाडी निघायला फक्त 10 मिनिट बाकी होते ..त्याने तिची तिकीट चेक केले आणि तिच्या सीटवर नेऊन बसविले ..तिच्याकडे पैसे असताना सुद्धा काळजी म्हणून काही पैसे त्याने तिच्या हातात दिले ..तिची इच्छा नसतानाही तिला ते घ्यावे लागले आणि केव्हापासूनचा शांत असलेला सारांश म्हणाला , " सॉरी नित्या माझी बुकिंग कोल्हापूरवरून आहे तेव्हा मला आधी तिकडे जावं लागेल ..इच्छा असतानाही मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही ..आता ट्रेन सुटेल काही वेळात तेव्हा नीट जा नि काही खाऊन घेशील आणि रडू नको मुळात ..तुझं रडणं मला आवडत नाही ..आणि मुंबईला पोहोचलीस की कॉल कर मला तेव्हाच माझी चिंता जाईल .."

त्याच बोलणं झालं आणि ट्रेनने हॉर्न दिला .आवाज ऐकताच तो बाहेर आला नि ट्रेन सुटण्याची वाट पाहू लागला ..काहीच क्षणात ट्रेन सुरू झाली आणि नित्याला राहवलं नाही ..नित्या धावतच दाराजवळ आली आणि त्याला बाय बाय करू लागली ..ट्रेन धावू लागली तसा तोही अस्पष्ट होऊ लागला आणि काही क्षणात दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले ..अश्रू दोघांच्याही डोळ्यात होते पण नकळत त्यांना वाटा बदलाव्या लागल्या होत्या ..कदाचित नशीबालाही त्यांचं वेगळं होनच मान्य होत...

गुम हो गया हु मै
कुछ धुंदलीसी गलियो मे
रास्ते वही है जहा पर मै ठहरा हु
फरक इतना की मंजिले बदल चुकी है

क्रमशः ...