स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 32 ) Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श - अनोखे रूप हे ( भाग 32 )

चलती रही दुनियाकी भिडमे
बहोतोने हात छोड दिया मेरे हालात देखकर
पर ऊस हालातमे भी मेरे साथ रही
वो परछाई , वो मिठीसी याद हो तुम...

नित्या जरी रागात सर्व काही बोलून गेली असली तरी ती बोच कायम त्याच्या मनात राहून गेली ..ती केव्हाही उदास असू लागली की सारांश स्वतः त्याला जबाबदार समजू लागला होता ..नित्याला नंतर काही दिवसात ते लक्षात आलं होतं आणि म्हणून तिने माफी मागितली होती पण ती गोष्ट त्याच्या मनातून कधीच निघणार नव्हती ।.जितकी भीती तिच्या मनात होती त्यापेक्षाही जास्त भीती कदाचित त्याच्या मनात निर्माण झाली होती ..तो कधी कधी एकटा असे तेव्हा त्या गोष्टींबद्दल विचार करून करून स्वतःला त्रास करून घेत होता पण त्याबद्दल नित्याला काहीच माहीत नव्हतं..कदाचित त्यांच इतरांबद्दल विचार करून वेगळं होणं त्यांना जास्त दुखावणार होत ..

असेच दिवस जाऊ लागले ..नित्या पुन्हा चार भिंतीत कैद झाली होती ..सारांश तिच्याशी बोलत असला की ती आनंदी राहत असे पण तो व्यस्त असला आणि संध्या शाळेत गेली की मग ती एकटी पडायची ..हळूहळू तीच डोकं काम करणं बंद करू लागल होत ..ती नैराश्याग्रस्त होऊ लागली होती आणि कदाचित स्वतःलाच गमावू लागली होती ...सारांशला काही सांगितलं तर तो स्वतःला ब्लेम करून पुन्हा त्रास करून घेईल म्हणून मृन्मयबद्दल बोलणं तिने टाळायला सुरुवात केली आणि त्याला आपल्या आयुष्याकडे लक्ष द्यायला सांगितले ..सारांशची फार इच्छा होती की नित्याला परत आणावे पण तिला दिलेलं वचन आठवायच नि त्याला शांत बसावं लागत होतं ..तिने म्हटलं होतं की मी तुझ्या आयुष्याचा भाग कधीच बनू शकत नाही तेव्हा फक्त मनाने तुझी असेन ..तेव्हा आता जर त्याने तिला मिळविण्यासाठी हट्ट केला असता तर कदाचित मृन्मय आणि त्याच्यात काहीच फरक उरला नसता ..म्हणून तो इच्छा नसतानाही शांत झाला होता ..दोन व्यक्ती आज इतरांच्या आनंदासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करीत होते जणू जगाची हीच रीत होती जी त्यांनाही मान्य करावी लागत होती ..

इकडे एक टेन्शन गेलं होतं तर दुसर समोर आलं ..शुभम आणि वर्षाच एकमेकांवर प्रेम होतं ..हीच गोष्ट शुभमच्या बाबाना माहिती झाली होती ..ती इतर जातीची असल्याने त्यांनी त्यांच्या लग्नाला नकार कळविला होता ..बरेच दिवस ही गोष्ट एकूण शुभम शांत होता पण कदाचित त्यांचं प्रेम एका विशिष्ट वळणावर पोहोचल होत म्हणून त्यांनी घरच्याना न सांगताच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता ..शुभमने ही गोष्ट नित्याला सांगितली होती ..तीच त्यावर काहीही म्हणणं नव्हतं पण काकांशी हे सर्व लपवून ठेवण तिला अवघड जाणार होत ..कदाचित त्यांनी लग्न केल्यावर काकांना माहिती पडल असत तर काकांनी नित्याशी संबंध तोडला असता हे नित्याला माहिती होत त्यामुळे ती आणखीच विचारात पडली होती ..एकीकडे प्रेम होतं तर दुसरीकडे काकांचा विश्वास !! ..पण तिला त्यातून एकच निवडायचं होत आणि तिने प्रेमाला प्राधान्य दिले होते ..याच काळात शुभम स्वतःची जॉब शोधायला पुण्याला गेला होता ..वर्षाही तिथेच होती ..वर्षाचे काही महिन्यात शिक्षण पूर्ण झाले की त्यांचा लग्न करण्याचा विचार होता म्हणून ते थांबले होते ..तर इकडे नित्याला विचार येऊ लागला होता ..

आजचा दिवस ..नित्याने मृन्मयला टिफिन करून दिला आणि तो दहाच्या सुमारास ऑफिसला निघाला ..त्यानंतर संध्याची अंघोळ करून , तीच सर्व आवरून संध्याला नित्याने शाळेत पाठवले होते ..तिला शाळेत सोडल्यावर तिने उरलेले सर्व काम आवरून घेतले आणि बेडवर शांत पडली ...तिने डोळे मिटलेच होते की तिचा मोबाइल वाजला ..तिने मोबाईलकडे लक्ष दिले तर त्यावर शुभमचा नंबर डिस्प्ले होऊ लागला होता ..तिने बेडवरून उठत त्याचा कॉल रिसिव्ह केला आणि त्याची खेचत म्हणाली , " बोला भाऊराजे !! आज कशी वाट विसरलात ..बहुतेक वर्षा नसेल सोबत म्हणून , हो ना ? "

तिने जरी खेचण्याचा प्रयत्न केला होता तरी तो उदास शब्दात म्हणाला , " हो तसच काहीस !! ..सोबतही नाहीये आणि बोलतही नाहींये!! .."

त्याच बोलणं ऐकून ती जरा शांत झाली आणि म्हणाली , " काय रे काय भांडण वगैरे झालं की काय दोघात ? ..रिलेशनशिपमध्ये होतच असत हे सर्व!! त्यात काय उदास व्हायचं .."

आणि तो खिन्न मनाने म्हणाला , " भांडण झाल असत तर बरं झालं असत पण ..? "

त्याच्या पण या शब्दात बरच काही लपून होत आणि ती सिरीयस होत म्हणाली , " काय रे सर्व काही ठीक आहे ना ? "

तिचे शब्द ऐकताच तो रडू लागला आणि काही तरी अप्रिय झालं हे तिच्या लक्षात आलं ..ती घाबरत म्हणाली , " असा शांत नको राहू शुभम !! ..तुला माहिती आहे ना माझा बीपी लो होतो ..लवकर सांग चल .."

आणि तो रडतच म्हणाला , " दिदी मी चुकलो ..तुला नव्हतं पाठवायला पाहिजे मृन्मयकडे !! ..तुझी काय अवस्था असेल हे मला कळलंच नाही सॉरी दीदी!! ..आज जेव्हा माझ्यासोबत अस घडलं तेव्हा मला त्याचा अर्थ कळाला .."

त्याचे शब्द एकूण तिचेही डोळे पाणावले आणि ती म्हणाली , " काय झालं सविस्तर सांगशील का ? "

आणि तो हळुवार म्हणाला , " दीदी दोन दिवस झाले वर्षा माझ्याशी बोलत नाहीये ..त्यादिवशी मी रूमवर एकटाच होतो नि वर्षा रूमवर आली ..ती बहुतेक काम करून थकली होती त्यामुळे बाजूला येऊन पडली ..तिला इतक्या जवळ पाहून मला भान राहील नाही आणि मी तिला सेक्स साठी विचारल..ती थकली असल्याने मला नकार देत होती पण त्यादिवशी मी ऐकायला तयार नव्हतो ..बराच वेळ मी तिला मनवीत होतो आणि तिने मान्य केलं ..आम्ही काही वेळ ते क्षण जगलो आणि आणि बाजूला झालो ..पण नंतर वर्षा अस काही बोलली की .."

नित्याने शांत होत विचारलं , " काय म्हणाली ती ? "

आणि तो हुंदके देत म्हणाला , " ती म्हणाली की शुभम तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ..मी होकार दिला कारण तू आज ऐकत नव्हतास पण मला कधी वाटलं नव्हतं की तू ह्यासाठी माझं मन जपणार नाहीस ..अशी कशी रे ही नशा ? ..तुला हवं ते मिळवलंस ना पण आता तुला माझा अबोला सहन करावा लागेल .."

ती बोलून निघून गेली तर मी तिथेच सर्व ऐकत उभा होतो ..त्या क्षणापासून तिने माझ्याशी बोलणं टाळलं ..

नित्या थोडी रागावत म्हणाली , " काय चूकल शुभम तीच ? .
.तिच्याही भावना आहेत ना मग त्या जोपासता नाही येत का तुला ? ..प्रेम करतोस ना आणि तिची मर्जी सुद्धा जपू शकत नाहीस ..कधीतरी मला म्हणायचास की बाळ होताना खूप वेदना होतात म्हणून मी आम्हाला बाळ होऊ देणार नाही पण त्याचा विचार करताना ह्या गोष्टीचा भान कसा उरत नाही शुभम .."

" सॉरी ना दिदी नाही सावरू शकलो त्यावेळी पण आता अस काही होणार याची काळजी घेईल .पण तू बोलनां तिच्याशी , तिचा अबोला सहन नाही होत ग आता !! " , तो उत्तरला

ती थोडी पुन्हा त्याच्यावर खेकसत म्हणाली , " मी नाही बोलणार कारण तुही मला दुखावल आहेस पण एवढं नक्की सांगू शकते की तिला थोडा वेळ दे ..तीच तुझ्यावर प्रेम आहे तेव्हा सोडून नाही जाणार तुला पण यानंतर अस काही होणार नाही याची काळजी घे .."

" हो दिदी ..घेईल काळजी आणि तुलाही कधी जर वाटलं की मृन्मय त्रास देतोय तर माझ्याकडे निघून ये ..मी ठेवेन तुला जन्मभर " , तो उत्तरला आणि नित्या हसत म्हणाली , " स्वतःसोबत घडलं म्हणून कळतंय हो सर्व आणि नसतंच झालं कधी तर ? आणि तस पण आता हेच माझं घर आहे ..तू पाठवलस ना , पाठवलस काय हाकलून लावलंस ना त्या घरातून मग आता इथून केवळ मेलेलं शरीर निघेल माझ..तू घे आपली काळजी होईल नीट .."

ती गोष्ट शुभमच्या मनाला लागली होती पण त्यावेळी तिची समोर काही बोलण्याची मनस्थिती नव्हती त्यामुळे
तेवढच बोलत तिने फोन कट केला ..फोन तर ठेवला पण तिच्या मनात एकच गोष्ट फिरत होती की इतकी नकोशी झाले होते का मी सर्वाना की माझं मत जाणून न घेता फक्त त्यांना वाटलं की तो बदलला आहे म्हणून त्यांनी मला इथे पाठवून दिल ..? ..एक मुलगी लग्न झाल्यावर आपल्याच जन्मदात्याना परकी कशी वाटते ?.....

नित्या शुभमच बोलणं ऐकून स्वतःवरच हसत होती ..कारण कुठेतरी तिलाही मृन्मयसारख्या पुरुषांचा अंश त्याच्यात दिसला होता आणि एक प्रश्न तिच्या मनात घर करून गेला की हे सर्व आपला समाजच तर पुरुषांना शिकवत नाही ना आणि म्हणूनच एका प्रथेप्रमाणे तो एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाकडे जात असतो ..विचार कुठेतरी योग्यच होता पण याबद्दल कुठलाही पुरुष बदल घडवून आणत नाही याबद्दल विचार करून ती हैराण झाली होती ..

जेव्हा जेव्हा तिला हा प्रश्न पडायचा तेव्हा मृन्मयच ते वास्तव डोळ्यासमोर यायचं ..तिला आठवले ते क्षण जेव्हा जेव्हा ती आपल्या मुलीला न्यायला दोन तीन वेळा आली होती आणि सासूबाईंनि म्हटलं होतं की त्या रात्री निघून गेली होतीस ना मग कुठे तोंड काळ केलंस ? कुणासोबत झोपलीस रात्रभर ? ..हे विचार जेव्हा एक स्त्री स्वतः मनात ठेवते आणि घरातून रात्री बाहेर काढणाऱ्या मुलाला काहीच म्हणत नाही तेव्हा मात्र ते सहन करण्याचा पलीकडे जात ..एवढं असतानाही सर्व लोक फक्त नित्याला म्हणायचे तू आपल्या मुलींशिवाय जगू कस शकते ..? आणि तिला वाटून जायचं की माझं अस्तित्त्व माझ्या इतर नात्यापेक्षा मोठं नाहींये का ? की प्रत्येक वेळी मला एका नात्याच्या नावानेच ओळखलं जाईल ..जन्म होतो तेव्हा मुलगी , लग्न झाल्यावर बायको आणि मूल झाल्यावर आई !! ..या सर्वात माझं काहीच अस्तित्त्व नाही का आणि हे सर्व घडत असताना उलट एक स्त्रीच म्हणते की तू मुलींशिवाय कस जगू शकते तेव्हा त्या स्त्रीला काय वाटत असेल जी स्वतःसाठी लढू इच्छिते !! ..नित्याला ह्या एकही प्रश्नाचं उत्तर कधीच मिळाल नाही आणि जेव्हाही तिने विचारायचं ठरवलं तेव्हाही एकच उत्तर मिळाल..बाईचा जन्म ग आपला!! ..सहन करावंच लागत !! ..पण त्याला मर्यादा किती असतात हे कुठलीही बाईच का सांगत नाही ?..काळ बदलला , ड्रेसिंग सेन्स बदलले , मुलींना शिक्षण घेऊ जाऊ दिल लागलं पण सर्व काही केल्यावरही घरचे तीच लग्न होताना सांगतात की तुलाच सर्व निभावायच आहे आणि तेच तुझं घर आहे म्हणजे ती ज्या घरात राहत होती ते कुणाचं घर होत आणि तिच्यासाठी वडील आईने जे काही केले ते उपकार तर नव्हते ना ? आणि तिने नवऱ्याच घर स्वीकारलं असताही चूल आणि मूल यावरती तिला कधी काही मिळालं का ? शिक्षण घेऊन विचार बदलले पण त्या विचारांना खऱ्या आयुष्यात वापरण्यासाठी घरचे लोक का नकार देतात आणि वापरू द्यायचंच नाही तर जगाला मिरवून का सांगणं की माझी मुलगी डॉक्टर आहे , अभियांत्रिकी केली , बी. एस.सी मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे !!..कधी कधी असे विचार मनात आले की ती स्वतःवरच हसायची..त्या व्यतिरिक्त ती काहीच करू शकत नव्हती आणि हसता - हसता तिच्या डोळ्यात केव्हा पाणी यायचं तेच कळत नव्हतं ..

अजब नियम बने है
परवरिश की आड मे
सच बोलणा एक कला है
पर हर कोई सच को चूप करणा चाहता है

हळूहळू दिवस जाऊ लागले आणि पुन्हा तिने त्या घराचा स्वतःला भाग बनवून घेतले ..अर्थातच तिने मृन्मयला स्वतःला सोपवलं नव्हते ..ती जेमतेमच त्याच्याशी बोलायची आणि म्हणून तो तिला त्याबद्दल टोमणे देखील मारायचा ..तर यावेळी नित्याही त्याच्यावर ओरडायची ..कदाचित ती इतकी कणखर झाली होती की आता गमावण्यासाठी तिच्याकडे काहीच नव्हतं ..म्हणून तो रागावला की तीही त्याच्यावर रागावायची आणि तो तिचा राग संध्यावर काढायचा ..त्याच जरी संध्यावर प्रेम असलं तरीही फक्त नित्यावर राग काढता येत नाही म्हणून तो मुलीवर काढत होता ..मुलीवर हात उगरला की नित्या त्याला ओरडायची आणि त्याची सो कॉल्ड इज्जत वाचवण्यासाठी तो फक्त तीच बोलणं सहन करीत राहिला .

नित्या त्याच्याकडे येऊन सहा महिने झाले होते ..त्याने तिला वचन दिल असलं तरीही तो बदलणार नाही हे तिला माहीत होतं ..आणि ते सत्यात समोर येऊ लागलं होतं ...अलीकडे ती किचन मध्ये असली की तो जाणूनच तिच्या शरीराच्या पृष्ठभागावर हात लावत होता आणि काही झालंच नाही अस दाखवत होता ..हे काही दिवस नित्याने बघितलं होत .तिला त्यातलं काही कळत नव्हतं असदेखील काहीच नव्हतं त्यामुळे ती त्याच्यावर रागावत होती ..आजही त्याने तिच्या पृष्ठभागावर हात फेरला आणि ती ओरडत म्हणाली , " तू जाणून करतोस ना हे ?..तुला मी आधीच सांगितलं होतं की मी तुझी बायको म्हणून नाही तर संध्यासाठी आली आहे आणि तू वचन दिले होतंस त्याव्यतिरिक्त काहीच होणार नाही मग येवढ्या लवकर विसरलास सर्व ? असा कसा रे तू मर्द ? जो आपलंच वचन पाळत नाहीस ? "

आणि तोही तिच्यावर रागावत म्हणाला , " हो मी बोललो होतो पण तुही मला समजून घ्याव !! .किती दिवस वाट पाहिली मी ..मला काही करू तर देत नाहीस मग इतकाही आनंद मिळवू नये का ? ..काहीही झालं तरी तू बायको आहेस माझी आणि माझा अधिकार आहे तुझ्यावर .."

आणि ती पुन्हा रागावत म्हणाली , " म्हणजे मला वापरण्यासाठी आणलं आहेस का ? "

आणि तो पुन्हा चढत म्हणाला। , " नाही मुलीसाठी आणलं पण तू तो अधिकार मला दिलास तर बिघडलं कुठे ? ..शेवटी मीही प्रयत्न करतोय ना नात निभविण्याचा ? "

आणि नित्या थोडी हसत म्हणाली , " बायको म्हणून अधिकार हवे आहेत तर ? पण जो माणूस फक्त सहा महिने होत नाही तेव्हाच आपलं वचन विसरतो त्याला नवरा म्हणून अधिकार देणे खूप दूरच आहे ..एक माणूस म्हणूनही तू विश्वास करण्याच्या लायक नाही आहेस .."

तिच्या बोलण्याचा त्याला राग आला म्हणून तो तिच्यावर हात उचलायला समोर गेला पण संध्या घरात असल्याने त्याने हात आवरला ..पण त्याच हाताने तिच्या हाताला घट्ट पकडून बाजूला नेले आणि म्हणाला , " माझं तोंड नको उघडू..कधी बापाने तरी तुला स्वतःच समजलं का ? पण मी भांडण होऊन सुद्धा तुला बोलावून घेतले ..तू स्वतःच्या बापाला गिळलस !!..मला सर्व म्हणत होते नको आणू तुला तरी घेऊन आलो ..जेव्हा की तू सर्वाना नकोशी झाली होतीस तरीही मग सांग मोठं कोण तू की मी ? "

तो एवढं बोलून पाय आपटत बाहेर निघून गेला ..तर नित्या आताही विचार करत होती ..तिच्या मनात एकच गोष्ट होती म्हणजे सर्वांनी मला घरी ठेवलं , माझा सांभाळ केला ..तर उपकाराची भाषा करत आहेत आणि मी काहीच नाही केल कुणासाठी ? ..किती सहज बोलून गेला मृन्मय की मी जीव घेतला बापाचा पण कधीतरी त्याने जीवनसाथी म्हणून मला समजून घेतलं का की वडिलांनी माझ्याशी किती वाईट वर्तन केले हे समजून घेतलं आणि त्यावेळी का साथ दिली नाही माझी आणि सर्वात महत्त्वाचं फक्त मी वापरायची वस्तू आहे की जो तो मोल लावणार माझं !!..बापाने समजून घेतलं नाही पण तुही कधी समजून घेतलंस ? तू समजून घेतलं असत तर एका स्त्रीला रात्री बाहेर पडायची गरज नसती ..आणि सात वर्षे कुणाच्या तरी घरी आसरा घ्यावा लागला नसता ..उपकार केलेस ना तू मृन्मय !! म्हणजे माझ्यासारखी प्रत्येक मुलगी जी फक्त आपल्या नात्यांसाठी झुकते त्या प्रत्येक मुलीवर तुम्ही उपकार करता आणि ती आयुष्यभर सहन करते , तुझ्यासाठी स्वतःला विसरते , तीचे किती उपकार आहे तुझ्यावर हा विचार का कधी करत नाहीस ? "

वडिलांना मारलं म्हटल्यावर तिचे डोळे आणखीच बोलू लागले ..हृदयातल्या जखमा पुन्हा उठून आल्या आणि ती आपल्या मनात आलेल्या प्रशांवर विचार करू लागली ..खरच एक मृन्मयसारखा पुरुष कायम तिच्यावर उपकार करतो का ? आणि स्त्री काहीच देत नाही त्याला ?

क्रमशा ..

( कथेचे फक्त दोन भाग बाकी आहेत ..या दोन भागात नित्याला जीवन मिळेल की मरण ते समजेल ..)