kadambari Jivalagaa Part 47 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ...भाग-४७ वा.

कादंबरी – जिवलगा

भाग-४७ वा

------------------------------------------------------------

१.

सुट्टीचा रविवार – आराम तर करायचाच असतो , आणि अनेक कामे पण करायची असतात ,

ती तशीच राहून गेली तर ..ढीग साचून जातो ,कारण एकदा का सोमवारपासून ऑफिस सुरु झाले की

मग राहिलेली तशीच राहून जातात , म्हणून किती कंटाळा आला तरी कामे करावीच लागतात .

सकाळी सकाळी सोनिया –अनिता –नेहा तिघी एकाच वेळी घरात साफ सफाईच्या कामात गुंतलेल्या पाहून ..

हेमूच्या आई म्हणाल्या – मुलींनो ..तुम्ही कामे चालू द्या..आज सगळ्यांच्या नाश्त्याचे मी बघते ..

त्यांचे हे बोलणे ऐकून ..सोनिया म्हणाली ..

नको नको मामी , असे काही करू नका ..मी जर तुम्हाला थोडे जरी काम करू दिले तर ..

ही नेहा आमचे डोके खायला सुरुवात करील ..

त्या पेक्षा ..तुम्ही आणि मामा मस्त पेपर वाचीत बसा

मी आणि अनिता दोघी सगळी आवर आवर करतो .या नेहालाच नेहमीप्रमाणे किचन ड्युटी करू द्या .

हेमूच्या आई म्हणाल्या –

तुझे बरोबर आहे सोनिया ..पण, मला वाटते की मी पण माझ्या भाच्यांना माझ्या हातचे काही करून खाऊ घालावे ,

तेव्हढाच तुमच्यासाठी चव -बदल होईल . कधी कधी दुसर्याच्या हाताचे खाण्यात पण आनंद येत असतो.

पण, तुम्ही तर मला काही करूच देईनात .

हातातले काम सोडून देत नेहा त्यांच्या समोर उभी राहत म्हणाली –

मामी – ..तुम्ही आम्हाला काय करून खाऊ घाली इच्छिता ..? ते सांगा ,

मी तोच पदार्थ करते की नाही बघा .. तुमच्या इतका छान नाही जमायचा , पण,बनवीन मी ..

एक मात्र नक्की ..सोनियाच्या पाहुण्यांनी आमचा पाहुणचार घायचा ..बस..बाकी काही नाही..

मामी म्हणाल्या – असे काही नाही नेहा..तू बनवशील ते आम्ही खाऊ , आणि, तुझ्या हाताला छान चव आहे.

त्यांच्या या कमेंटवर सोनिया आणि अनिता दोघींनी टाळ्या वाजवल्या “,

नेहा म्हणाली- सोनिया हे काय नवीनच ? टाळ्या वाजवण्या सारखे काय आहे यात ?

अनिता –म्हणाली –

काय करायचे तुला ? आम्हाला वाटल्या वाजवाव्या टाळ्या ,वाजवल्या ..

काही न बोलता –नेहा किचन मध्ये जाऊन कामाला लागली .हे पाहून ..

सोनिया म्हणाली- आपण टाळ्या का वाजवल्या ..हे तिला आता आपण सांगू शकत नाही..पण,

चान्स आला की न विसरता सांगू या तिला .

नेहाने कुकर लावला . ताज्या मोकळ्या शिजवलेल्या भाताचा खमंग आणि झणझणीत फोडणीचा भात बनवला ..

व्हेज.बिर्याणीच म्हणा की ..तो तयार होत असतांना असा काही वास सुटला होता की ..

हेमुचे बाबा .म्हणाले ..नुसत्या वासाने ..भूक लागली कि हो , चला चला ब्रेक-फास्ट करायला पटकन ब्रेक

घ्या बरे ..!

सोनिया म्हणाली –मला असे वाटते आहे अनिता की -

आज आपण दिवसभर घरातच आहोत ..मामा मामीच्या समोर आपले नेहमीचे अवतार नको दिसायला

..आपण तिघी ..सध्या सिम्पल ..साडी नेसूया ..संडे चेंज ..

कशी आहे आयडीया ?

आपल्या काकूबाई- नेहाला तर माझी कल्पना नक्की आवडेल..

बघच तू आता –कशी खुश होईल ती माझी आयडिया ऐकून ..

नाश्ता करून झाल्यावर सोनियाने नेहाला बेडरूम मध्ये बोलवून म्हटले ..

नेहा -आपल्या घरात सध्या माझे मामा –मामी ही वडीलधारी माणसे आहेत ,

त्यांच्या समोर आपण नेहमीच्या अवतारात घरभर फिरणे बरे दिसणार नाही ..

मला असे वाटते की ..हे असे पर्यंत ..आपण घरात साडी नेसून राहू या ,

काय वाटते तुला नेहा ?

आश्चर्याने नेहा सोनियाकडे पाहतच राहिली ..

ती म्हणाली ..अय्या , मी पण हेच सांगणार होते केव्हापासून , पण, तुम्ही दोघीनी नेहमीप्रमाणे “

माझी “काकुबाईची –सुचना “ म्हणून टिंगल केली असती ..म्हणून मी काही बोलले नाही.

मला तर ही आयडीया आवडेल ,

त्यापेक्षा ..तुम्हा दोघीं साडीत कशा दिसता ? हे पण पहायला मिळेल .

छानच आहात तुम्ही दोघी दिसायला - ..जास्त छान दिसाल साडीमध्ये .

अनिता म्हणाली – बघ सोनिया , तू म्हणालीस अगदी तसेच झाले ..

आपल्या काकूबाई नेहा खुश ..!

खूप खूप दिवसांनी ..तिघींच्या कपाटातून साड्या बाहेर निघाल्या .

ब्रेकफास्टची तयारी होईपर्यंत ..सगळे बाहेर येऊन बसले होते .

नेहाने डार्क मरून कलरची साडी नेसली होती . मोकळ्या केसांचा छान अंबाडा घातला होता .

तिच्या या लोभस रुपाकडे पाहत राहिले सगळे.

तिघी मुलीं छान रंगीबिरंगी साड्या नेसून घरात वावरत आहेत ,

हे पाहून बाबा म्हणाले – सोनियाच्या मामी –

तुम्ही काही म्हणा –घरात असतांना हे असेच रहाणे ..साजरे दिसते, शोभून दिसते ..

ऑफिसमध्ये ड्रेसमध्ये जाणे ठीक ते समजू शकतो , पण घरी आल्यावर हे असेच छान .

हेमूच्या आई म्हणाल्या – हे तुमचं मत झाले ,

आजच्या मुलींना सरसकट हे मान्य कसे असेल ?

ज्यांना मुळातच आवड असते .त्यांना सांगायची गरज पडत नाही ..

आता बघा ना !..या मुलींनी साड्या नेसल्या ना आपणहून !

सांगून तर कुणालही समजेल, महत्वाचे आहे ते आपणहून समजून तसे वागणे !

सोनिया आणि अनिता अशा आहेत हे आपल्याला माहिती आहे , पण, ही नवी मुलगी नेहा ,

ती पण समजूतदार वाटते आहे.

हे ऐकून सोनिया आणि अनिता दोघींनी पुन्हा टाळ्या वाजवल्या ..

या दोघी सारख्या टाळ्या का वाजवत आहेत ? तिला कारण समजत नव्हते .

ब्रेकफास्ट चालू असतांना ..अनिताचा फोन आला ..

रोहन बोलत होता – अनिता – तू लगेच ये आपल्या नव्या सोसायटीच्या flat मध्ये ..

काम करण्यासाठी लोक येत आहेत . तुझे असणे आवश्यक आहे. आणि हो

तू उद्याची रजा घ्याची आहे. दादाच्या घरी आज रात्री फंक्शन आहे ,तुला त्यासाठी थांबायचे आहे.

अनितासाठीचा हा फोन ऐकून ..

नेहा म्हणाली ..

अनिता – इथली नको काळजी करूस ..तू रोहनकडे जा..ते जास्त महत्वाचे आहे.

सोनियाच्या मदतीला मी आहे .

अनिता लगेच निघाली.. तिच्यासाठी तिच्या नव्या आयुष्य्पर्वाची तयारी करणे महत्वाचे आहे ..

याची कल्पना सोनिया आणि नेहाला होती.

सोनिया म्हणाली ..

मामा –मामी ..तुमचा उद्याचा कार्यक्रम दुपारी आहे, आणि आत्ता तुम्ही ऐकले ..अनिताची सुट्टी असणार

आहे ..त्यामुळे ..मला राजा घेणे शक्य नाही ..

आता तुमच्या मदतीला ..ही नेहा येईल ..

मी सांगते तिच्या बॉसला , ते ऐकतील माझे , खूप चांगल्या स्वभावाचे आहेत नेहाचे बोस.

सोनियाचे मामा-मामी म्हणाले –

आम्हाला काय, सोबत हवी , तू काय आणि नेहा काय ..

आता आपण चार वाजता फिरून येऊ या . चालेल ना ?

सोनिया म्हणाली ..हो चालेल की ..

--------------------------------------------------------------------------------------------------

२.

इकडे नेहाच्या गावी—घरी ..तीन वाजेपासून आजोबांची घाई सुरु झालेली ..

आटपा –आटपा लवकर ..किती हळू हळू कारभार चालू आहे सगळा ?

आपण वेळेवर जायला हवे देसाई साहेबांच्या घरी ..समजले ना ?

हे आज्जी म्हणाल्या –

काय हो थोरले वकीलसाहेब ..कोर्टाला जायचात त्यावेळी गडबड ठीक होती .

.आता काय ?

लाडक्या नातवासाठी –नातसुन आणायची भारी घाई झालेली दिसते आहे म्हणायची .

आजोबा म्हणाले – काय समजायचे ते समजा ..

आपल्या एका सुनबाईने –अलकाने , या मुलीबद्दल –इतके काही छान सांगितले आहे ..की

मला वाटते ..ही भारती ..नावाची मुलगी .लवकरात लवकर वकील-वाड्यात “गृहलक्ष्मी “म्हणून

यायला हवी.

नेहाची आई हे ऐकून म्हणाली ..

मला पण असेच वाटते आहे ..माझे अंतरमन कौल देताय ..

ही भारती ..या घरची होणारी सून आहे “.

आजोबा म्हणाले –

ही सगळी कृपा –इच्छा श्री गुरुमाउलींची आहे बघा ..

देसाई साहेबांना आपण उत्सवाच्या प्रसादासाठी बोलावण्याचे ठरवतो आणि

त्याच वेळी .स्वतहा देसाई कुटुंब त्यांच्या कन्ये साठी प्रस्ताव घेऊन आपल्याकडे आले,

मला हा मोठा छान भाग्य्कारी योग वाटतो आहे.

अलका आणि योगेशदादा दोघेही तयार होऊन आलेले पाहून ..

आजी म्हणाल्या ..

अग अलका –देसाई साहेबांच्या मुलीबद्दल तू सांगून काय जादू केलीस ..?

आमच्या घरात तर ..या भारतीला ..सुनबाई “म्हणून आणायची एकच घाई झालीय.

अलकावाहिनी म्हणाली – अहो आजीबाई ..

या मुलीबद्दल मी जे सांगितले आहे ना , ते अजिबात खोटे नाहीये , अतिशयोक्तीचे सुद्धा नाहीये ..

ती जशी माझी मैत्रीण आहे ..तसे तुम्ही तर माझ्या घरातली माणसे आहात ..

मला तुमच्याविषयी तिच्यापेक्षा जास्तच वाटणार. म्हणूनच भारती सारखी योग्य मुलगी आपल्या घरची

सून होणे मला मनापासून आवडले .

मोठे वकीलसाहेब म्हणाले..

चला बरे गाडीत बसा ..पावणेचार होत आलेत ..बरोबर चार वाजता आपण देसाई साहेबांच्या घरी असायला

हवे .

अलका वाहिनी भूषणकडे पाहत म्हणाली

अहो ज्युनियर वकील साहेब ..देसाई साहेबानी बरोब्बर योग्य जावाई शोधलाय ,

आता ..भारतीला पाहून ..तू पण..आपल्या फामिलीला शोभणार्या या ज्युनियर वकीलीनबाईना

आणायची तयारी सुरु कर ..मी सांगते तुला...

नेहाची आई म्हणाली- अलका ..चल आता ..

ठीक चार वाजता –

बँकेच्यावर असलेल्या प्रशस्त क्वार्टर्रमध्ये , वकीलसाहेब फैमिली सहित क्वार्टरमध्ये पोंचले ..

देसाई साहेब वाटच पहात होते ..त्यांनी सर्वांचे स्वागत केले .

आजोबा , मोठे वकीलसाहेब , योगेशदादा आणि भूषणदादू ..हे सगळे बाहेर हॉलमध्ये बसले ..

आणि आजीबाई , नेहाची आई आणि अलकावाहिनी ..आतल्या रूम मध्ये बसल्या .

भारतीची मैत्रीण म्हणून ..अलकावाहिनी इथे अनेकदा येऊन गेलेली .

ती सारखी ..अहो काकू -अहो काकू करीत त्यांच्या मागे मागे घरात इकडून तिकडे फिरत आहे हे पाहून ..

आजोबा म्हणाले .

.देसाई साहेब ..या अलकाने –आमच्या सुनबाईने आपल्या परिवाराबद्दल ,मुलीबद्दल

आम्हाला खूप काही सांगितले आहे.

मला वाटते आपण सगळ्यांनी एकत्र या हॉलमध्येच बसू या ..बोलू या .

देसाई साहेब म्हणाले ..

बापूसाहेब ..जशी आपली इच्छा . आणि त्यांनी अलका वहिनींना म्हंटले ..

अलका ,जा घेऊन ये इकडेच सगळ्यांना .

त्या प्रमाणे एकेक करीत सगळ्या आल्या ..शेवटी ..

अलकाच्या सोबत भारती येतांना दिसली ..

तजेलदार उजळ रंग , घनदाट केस ,टपोरे बोलके डोळे आणि प्रसन्न सस्मित चेहेरा ..

गडद रंगाची जरीची साडी ..दोन्ही खांद्यावरून घेतलेला पदर ..

खुर्चीत बसन्या अगोदर .. भारतीने ..

सर्व मोठ्या माणसांना वाकून नमस्कार केला ..

योगेशदादा आणि भूषणकडे हसून पहात हेल्लो ..आणि हात जुळवून नमस्कार केला ..

भारतीच्या इतक्या सुरेख एन्ट्रीने ..सगळेजन प्रभावित झालेत ,

आणि मनापसून त्यांना आनंद झाला आहे ..हे अलकावाहिनीला जाणवले .

तिने देसाईसाहेब –देसाई –काकुकडे हसून पाहिले ..आणि ..थम्स अप केले ..

आजोबा म्हणाले ..

तुझे नाव काय ? असा प्रश्न आम्ही विचारणार नाही..

ते अलाकाकडून सतत ऐकतो आहोत.

आणि आम्ही काही प्रश्न पण विचारणार नाही ..

फक्त एक छोटीशी परीक्षा मात्र घेण्याचे मी ठरवले आहे..

त्यात तू पास की नापास ..याला अजिबात महत्व नाही ..

कारण त्याचा आमच्या निर्णयात काही फरक पडणारनाही. तू टेन्शन घेऊ नकोस.

तर ..ऐक जरा मी काय सांगतो ते ..

आम्ही सगळे पक्के चहाबाज आहोत .. अखंड चहा –होत्र चालू असते ..आणि प्रय्तेक चहा हा

बेस्टच असतो .

तेव्हा ..

तू तुझ्याहाताने ..सगळ्यासाठी चहा बनवून आणयचा ..,आणि द्यायचा बस..

.त्या नंतर तू आणि भूषण एकमेकांशी बोलावे .

आमचे काम चहा घेतला ,टेस्ट पाहिली की संपले.

तुला येतो ना चहा करता ?

भारती सगळ्याकडे पहात मनात मोजीत होती की ...

किती कप टाकायचा आहे चहा ..?

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग-४८ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED