कादंबरी- जिवलगा ...भाग- ४८ वा Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी- जिवलगा ...भाग- ४८ वा

कादंबरी – जिवलगा

भाग-४८ वा

-------------------------------------------------

१.

आजोबांनी भारतीला चहा करण्यास सांगितल्यावर ..तिच्या मागोमाग बाकीचे महिला मंडळ

उठून उभे राहत म्हणाले ..

हे पहा ..तुमच्या सोबत हॉलमध्ये बसून ..आम्हा बायकांना तुमच्या गप्पा ऐकत बसायला लावू

नका .

उठसुठ ते राजकारण , नाही तर ..जगभरातील घडामोडी ..

आम्हाला काय कळणार आहे त्यातले .?

त्यापेक्षा आम्ही आपल्या बसतो जाऊन ..दुसर्या रूममध्ये ..

आमचे विषय आहेत की आम्हाला बोलायला ..

चला भारतीच्या आई ..आपण बोलत बसू ..

आणि अलका ..तू आहेसच भारतीच्या मदतीला ..

हे एव्हढे सगळे बोलणार्या आजीबाईना ..कोण काय म्हणार आहे ,

नेहाच्या आज्जी आणि आई , भारतीची आई ..रुममध्ये जाऊन बोलत बसल्या .

जरी या बायका दुसर्या खोलीत बसल्या होत्या तरी त्यांचे लक्ष बाहेरच होते .

किचनमध्ये काम करणारी भारती दिसत होती त्यांना .किचनमध्ये तिचे वावरणे अगदी सहज आहे ,

म्हणजे तिला सवय आहे किचन मध्ये काही काम करण्याची .

हाताला असलेली कामाची सवय पाहणार्याला लगेच ओळखू येते .

हेच बघा ना -

चहा करतांना ..भारतीने एकदाही तिच्या आईला आवाज दिला नाहीये ,

साखरेचा ,चहा पावडरचा डब्बा तिला पक्का माहिती आहे “,

हे पाहतांना आजीबाई ..नेहाच्या आईला म्हणत होत्या ..

सुनबाई बघ - भारतीला कामाची सवय आहे बरे का .!.बघून खूप छान वाटतंय .

माझ्या परीक्षेत तर पहिल्या क्लास मध्ये ही पोरगी मी पास करून टाकली ग बाई ..!

हे ऐकून ..भारतीच्या आईला खूप आनंद झालाय हे दिसत होते .

एक तर ..अलकाने त्यांना सकाळीसकाळी फोन करून सांगितले होते ..

फोन स्पीकरवर केल्यामुळे ..आईच्या बाजूला बसून भारती आपल्या मैत्रिणीचे सगळे बोलणे

होती , तिने आईला खुणावले होते , फोन स्पीकरवर आहे, हे बोलू नकोस .

आईने हसून ..बर बर ..! असे ओके खुणावले भारतीला .

अलाकावाहिनी बोलू लागली -

अहो देसाईकाकू ..तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका .

“आज होणारा “मुलगी पाहण्याचा कार्यक्रम “हा

दोन्ही फ्यामिलीसाठी होणारा पहिला आणि शेवटचा कार्यक्रम असणार आहे”

हे लिहून घ्या माझ्याकडून .

खूप साधी आणि प्रेमळ आहेत ही सगळी माणसे .

आता यापुढे आपल्या गोड भारतीने एकच करायचे .

.त्या घरात गेली की – सगळ्यांशी कायम गोड हसून ,गोड बोलून , हसतमुखाने वागायचे .

.एवढे केल की झाल ..!

घरात सगळ्या कामाला गडी-माणसे असतांना , हिला अधून मधून कौतुकाने काही करावे लागेल ,

बाकी ..सूनबाईच्या थाटात आणि रुबबातच सगळं घराणे सांभाळायचे आहे.

आणि मला माहिती आहे की ..माझी मैत्रीण किती गुणाची आहे ,

काही ही सांगा ..ती अगदी परफेक्ट करणार .

म्हणूनच म्हणते ..आमच्या वकील-वाड्यात ,मोठ्या घरासाठी

आपली भारती एकमेव परफेक्ट मुलगी आहे .

तुमचा होणारा जावई- आणि माझा धाकटा दीर ..भूषण .

म्हणजे आमच्या घरचेच नव्हे तर सध्या गावाचे भूषण आहे “

असे त्याच्या सोशल –कार्यामुळे म्हटले जाते .

तुम्ही अजिबात टेन्शन घायचे नाही.

अलकाचे सगळे बोलणे . भारती ऐकत होती ...

भारतीच्या बाबांच्या बोलण्यात अनेकदा ..मोठे वकीलसाहेब आणि त्यांच्या या छोट्या वकील साहेब्नाचे

उल्लेख येत असत . पण, आपल्यासाठी “या छोट्या वकील साहेबांचा विचार आपले बाबा इतका मनापसून

करतील “याची मात्र तिने कधीच कल्पना पण नव्हती केली .

ज्याअर्थी बाबांना हे घर,या घरातील माणसे ..आपल्यासाठी योग्य वाटली आहेत “,

इतका विश्वास तिला तिच्या बाबांच्याबद्दल वाटत होता .

भारतींने केलेल्या चहा अगोदर ..थोडाफार फराळ करावा लागला ..

तो फराळ तयार करण्यात आईला भारतीची मदत झाली आहेच “

ही माहिती ..अलका –वाहिनीने तत्परतेनी सगळ्यांना चहा घेतांना दिली.

तिचे हे ऐकून आजोबा तिला म्हणाले –

अलका ..तुझी ही गडबड पाहून ..मला तर असे वाटते आहे की ..

या भारतींने आपल्या घरात सुनबाई म्हणून यावे “, ही सगळ्यात जास्त इच्छा तुझीच आहे ..

आता ..मी काय सांगतो ते सर्वांनी नीट आणि कान देऊन ऐकावे ..

असे समजा की - या छोट्या वकीलसाहेबांचे वकीलपत्र मी घेतले आहे,

तो माझा हक्क आहे..हो ना हो ..वकीलसाहेब ?

आजोबा असे काही विचारतील याची कल्पना नसलेला भूषण ..त्यांचा मान राखीत म्हणाला ..

आजोबा – तुम्हीच काय , आपल्या परिवारातील सर्वच मोठ्या –वडीलधार्या मंडळींच्या शब्दांचा

मी नेहमीच आदर करीत आलेलो आहे. तुम्ही तुमच्या मनात आहे ते बोलू शकता ..

आजोबा म्हणाले –

देसाईसाहेब –ऐकलात ना ..आमचे वकीलसाहेब काय म्हणाले ते ?

आमच्या या परिवारात तुम्ही सुद्धा आजपासून .आतापासून ..सामील झाला आहात ..

तुमची कन्या ..भारती .हीस आम्ही आमच्या परिवारात .

.आमच्या भूषणसाठी सामील करून घेत आहोत ,

तुम्ही आमची ही इच्छा आणि मागणी पूर्ण करावी...

आजोबांच्या या घोषणेने ..सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे हे ..

भारतीला दिसत होते ..तिने आपल्या आई-बाबांच्या चेहेर्याकडे पाहिले ..

दोघांच्या चेहेर्यावर अपेक्षापूर्तीचे समाधान तिला दिसले .

आनंदाचा भर ओसरल्यावर ..आजोबा म्हणाले ..

देसाईसाहेब ..पण..एक गोष्ट आहे..महत्वाची , ती झाल्यावर .किंवा या कार्यासोबत आणखी एक कार्य

संपन्न होईल ..

अहो ,आमची नात , नेहा ..भूषणदादूची धाकटी बहिण ..

इंजिनियर झाली आणि डोक्यात खूळ घेतल , मुंबईला जाऊन नोकरी करून पहायची ,हौस म्हणून.

म्हणून तिच्या मावशीकडे गेलीय ठाण्याला ,

आता या दोघांच्या लग्नाआगोदर तिच्यासाठी आपण सगळ्यांनी मोहीम सुरु करायची ..आणि ..

एकच वेळी ..सूनबाईचा गृहप्रवेश आणि लेकीची सासरी पाठवणी ..असा योग साजरा करायचा आहे.

त्यामुळे नेहाचे ठरले ,पक्के झाले ..की त्यासोबतच किंवा लगेच .भूषण आणि या भारतीचे ..शुभ-मंगल सावधान होणार

हे पक्के .

देसाईसाहेब म्हणाले ..

बापूसाहेब –आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही सांगायचे आणि ..आम्ही करायचे ..बस.

आमच्या लेकीला तुम्ही तुमची सुनबाई म्हणून स्वीकारलेत “आम्ही धन्य झालोत.

नेहाची आई म्हणाली -

अलका – आता तू एक काम करशील ..

आम्ही मोठी माणसे निघतो इथून ..

तू भारती आणि भूषणला ..बोलण्यासाठी मदत कर .

मग सावकाशीने या घरी ..

मोठी माणसे घरी गेली.. अलका ,भारती आणि भूषण ..गच्चीवर गेले ..

त्यांना बसवून अलकावाहिनी खाली आली ..

भारतीच्या आईला म्हणाली..

उद्या .भारतीला .तिच्या नणंदबाईशी बोलायला लावते ..

नेहा ..खूप छान ,गोड मुलगी आहे.. भारतीचे आणि तिचे छान जुळेल .

येते काकू ..अलका घराकडे मोठ्या आनंदाने निघाली .

भारतीच्या येण्याने घरला शोभणारी लक्ष्मी येणार ..आणि ती आपली मैत्रीण आहे “

याचा तिला जास्त आनंद वाटत होता.

*******

२.

इकडे नेहाच्या रूमवर ..आरामशीर चालू होते सगळे..

अनिता ..रोहनचा फोन आल्यामुळे लगेच त्याच्याकडे गेली होती ..ती आता मंगळवारी येणार.

सोनिया आणि नेहा .बोलत बसल्या होत्या ..

दुसर्या रूम मध्ये हेमुचे आई-बाबा आराम करीत होते .

आणि सोनियाचा मोबाईल वाजला ..

स्क्रीनवर ..शैलेशचा नंबर दिसला ..तिला आश्चर्य वाटले ..

किती महिन्यांनी की वर्षांनी ..आज पुन्हा शैलेशचा फोन ?

आता काय हवे आहे त्याला आपल्याकडून ..

काही उरलेच कुठे ..त्याला काही देण्यासारखे ..

संसार गेला , नवरा गेला ..जाताना काळजाचा तुकडा .आपला पिल्लू –

वीरुला सुद्धा आपल्यापासून तोडले या माणसाने ..

तिने रागाने फोन तिसर्यांदा कट करून .बाजूला ठेवला ..

तरी ..पुन्हा रिंग वाजणे सुरु झाले , ते ऐकून

नेहाच म्हणाली ..अग, किती वेळा पुन्हा पुन्हा रिंग वाजते आहे ,

मला तर वाटते आहे..नक्कीच काही तरी सिरीयस आहे..त्याशिवाय का सतत कॉल

करतोय तो .

असे नको करू सोनिया ..शांतपणे ऐकून घे..मग, बोल आणि ठरव .त्याचे काय करयचे ते .

सोनियाने ..कोल घेत हेलो म्हटले ..

पलीकडून आवाज आला ..

सोनिया मैदाम ,तुम्हीच बोलताय ना ?

अनोळखी आवाज ऐकून सोनिया गोंधळून गेली होती ..

ती म्हणाली .. हो, मी सोनिया ..बोला ..

मैदाम ..मी जनसेवा हॉस्पिटल मधून बोलतोय रिसेप्शन मधून ..

तुमचा नंबर ..तुमच्या मिस्टरांनी ..रोहन यांनी दिला आहे..

अहो..काल मध्यरात्री त्यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली ..

त्यात रोहनसर जखमी झालेत ,

त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा ..त्याला ही बराच मार लागला आहे..

तो सारखे ..आईला बोलवा माझ्या ..असे रडून सांगतो आहे ..

तुम्ही या लगेच .आहेत तशा ..

थोडक्यात दोघे ही मरता मरता वाचलेत , तुम्ही टेन्शन न घेता या.

दोघे ही आउट ऑफ डेंजर आहेत ..

कॉल कट करीत ..सोनिया ..काही न बोलता रडत आहे ..आणि नेहा तिला समजावत आहे,

हे पाहून हेमुचे आई-बाबा रूममधून धावतच तिच्या जवळ आले .

सोनियाला तिचे दुखः-आवेग आवरता येत नव्हता ..

हेमूच्या आईला ती म्हणाली ..

मामी , बघाना का होऊन बसलाय सगळं ,

आणि तिने काय झाले ते सांगितले ..

नेहा म्हणाली ..आपण सगळेच जाऊ या हॉस्पिटल मध्ये ..

सोनिया ..तुझ्या माणसांना तुझी गरज आहे ,तशीच तुलाही आधाराची गरज आहे.

आता तू काही बोलू नकोस ..तयार हो ..

नेहाच्या काळजीच्या शब्दांने सोनियाला धीर आला .

.ती बरीच सावरली ..तिच्या वीरुलाकाही झाले नाही “,ती मनोमन देवाचे आभार मानीत होती.

रोहनच्या मुर्खपणामुळे ..तिचा वीरू तिच्या पासून दुरावला होता ..

तिला माहिती होते ..वीरुला आईची खूप आठवण येते , पण बाबांच्या समोर त्याचे काही चालत नव्हते .

नेहाने टैक्सी बोलावली आणि ते हॉस्पिटल मध्ये पोंचले .

रिसेप्शन काउंटरला तिने सांगताच .. एका वार्डबोय त्या सगळ्यांना रोहनच्या रूम मध्ये घेऊन गेला .

कानांनी ऐकणे आणि डोळ्यांनी प्रत्याक्ष्य पहाणे “यात खूप फरक असतो ..त्यामुळे सोनिया रूम मध्ये

जाईपर्यंत बेचैन होती ..

कसा असेल वीरू , कसा असेल रोहन ?

ती रूम मध्ये गेली ..समोर दोन बेडवर दोन पेशंट ..एक रोहन आणि एक वीरू ..

त्यांच्या पाठोपाठ ..एक नर्स रूम मध्ये आली..आणि म्हणाली ..

सोनिया मैदाम ..तुम्ही यांच्या मिसेस ..आहात , तर

मग ..यांना काल जखमी अवस्थेत इथे घेऊन येणाऱ्या मैदाम कोण होत्या ..?

त्यांच्या बोलण्या वागण्यावरून ..तर आम्हाला त्या यांच्या मिसेस आहेत असे वाटले ..

त्या बराच वेळ यांच्या सोबत होत्या ..पण.. अचानक काय झाले कुणास ठाऊक ..

त्यांनी कुणाला तरी फोन करून बोलावले .आणि आलेल्या व्यक्ती सोबत निघून गेल्या ..

जातांना ..

तुमच्या मुलाला त्या म्हणाल्या ..

वीरू बेटा –सो सोरी ..मी आता तुझी नेबर ऑन्टी नाही बरे का , मी माझ्या घरी जाणार नेहमीसाठी

तू या पुढे तुझ्या आई सोबत राहायचे बरे का बेटा ..!

रोहन – माणुसकी म्हणून ,काल तुला मी इथे हॉस्पिटलमध्ये आणले आहे ..

लपवून नाते टिकवता येत नसते ..माणसे दुखावून कसे ही वागण्याची ..ही अशी शिक्षा मिळते.

यापासून तरी काही शिकून घे रोहन .

तिने रोहनकडे पाहिले ..तो खाली मान घालून बसला होता..

नर्स म्हणाल्या ..सोनिया मैदाम ..आता तुम्हीच सांभाळा हे.

आठवडाभरात हे बाप-लेक परत तुमच्या सोबत घरी येतील ..बी हेप्पी .

सोनियाने वीरुला जवळ घेतले ..आणि रोहनच्या पाठीवर हात ठेवीत म्हटले ..

आधी बरा हो ..मग जाऊ या आपल्या घरी .

मग सोनियाने ..सोबत आलेल्या मामा-मामींची ओळख करून दिली ..

ही नेहा – माय बेस्ट फ्रेंड ..माय माउली ..सगळ काही ही पोरगी ..!

बाकीच्यांना जास्त वेळ बसता येणार नाही ..म्हणून ..

सोनिया तिथेच थांबली ..हॉस्पिटलमध्ये .

हेमुचे आई-बाबा आणि नेहा घरी जाण्यास निघाले

**********

बाकी पुढच्या भागात ..

भाग – ४९ वा लवकरच येतो आहे

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------