Prarambh - 5 books and stories free download online pdf in Marathi

प्रारब्ध भाग ५

बस पुण्यात पोचली तेव्हा परेशने सुमनला जागे केले .
ती दचकून उठली ..”अग दचकु नकोस अशी ,उठ पुणे आलेय जेवायचे आहे न ?
भुक लागली की नाही ..?
सुमनने स्वतःला सावरून साडी नीट केली आणि केसावरून हात फिरवून आपली लांब वेणी पुढे ओढुन घेतली
आणि उठून उभी राहिली .
मग दोघे मिळून बसमधून खाली उतरले.
ते एक बऱ्यापैकी हॉटेल होते इथे अर्धा तास जेवण करण्यासाठी बस थांबणार होती .
टेबल वर बसल्यावर वेटरला परेशने जेवणाची थाळी सांगितली ,सुमनला विचारल्यावर ती डोसा खाते म्हणाली
तिच्यासाठी परेशने पेपर डोसा सांगितला .
सुमनने हॉटेल असे पहिल्यांदा पाहिले होते ,तिला ते खुप छान वाटले .
इतका मोठा पेपर डोसा पाहिल्यावर ती चकित झाली .
असा तिने फक्त चित्रात पाहिला होता .
निम्मा खाऊन तिचे पोट भरले ...”अहो मला आता नाही जास्त जाणार असे म्हणल्यावर
परेशने त्यातील थोडा खाल्ला त्याचेही जेवण झाले होते .
वेटरला बिल देऊन तो उठला ..
“अहो हा उरलेला डोसा काय करायचा ..?
असे विचारल्यावर परेश हसु लागला ....अग टाकून द्यायचा तो त्यात काय एवढे ?
कधी पानात काही टाकायचे नाही अशी शिकवण असलेल्या सुमनला हे ऐकुन कसेतरीच वाटले .
तेवढ्यात बस निघाल्याची बेल वाजु लागली आणि दोघे गडबडीने बसकडे निघाले .
आता सुमन एकदम फ्रेश झाली होती .
खिडकीतुन बाहेर बघत बघत ती परेश सोबत गप्पा करू लागली .
परेश पण तिला परत थोडा चिकटून बसला आणि आपला हात त्याने तिच्या खांद्यावर टाकला .
ती पण आता त्याच्या थोडी जवळ सरकली होती .
प्रवास छान चालू झाला ..पुण्यातल्या मोठमोठ्या बिल्डींग रस्ते माणसे पाहून ती चकित होत होती .
परेश तिला इकडची तिकडची माहिती पुरवत होता .
तिच्या कानाजवळ जाऊन काही सांगताना त्याला तिच्या मुलायम गालांचा स्पर्श होत होता .
सुमनला त्याचा पुरुषी गंध आकर्षित करीत होता .!!
बस आता मुंबईच्या दिशेने धावू लागली .
जाताना लागणारे बोगदे ,पूल रस्ते हे सगळे बघुन सुमन अचंबित झाली होती .
बस मुंबईत शिरताना लागणारे लोकलचे मार्ग ,मोठमोठ्या बिल्डींग त्यांच्या कथा
अशी सर्व माहिती परेश पुरवू लागला .
“बाप रे केवढ्या हो या इमारती ?कसे काय जायचे इतक्या उंच ?
इतके जिने कसे चढायचे ?
अग लिफ्ट असतात तिथे ..
म्हणजे ?...
म्हणजे अशा बंद छोट्या छोट्या खोल्या असतात त्यातून तुम्ही वरखाली
जायचे असते .
इथल्या सगळ्याच उंच उंच इमारतींना अशा लिफ्ट असतात .

आपल्या घराला जायला मात्र जीना आहे कारण आपली बिल्डींग जुनी आहे .”
“अहो इथे हिंदी मराठी नटनट्याचे पण बंगले आहेत ना ?
तुम्ही केव्हा बघितले आहेत का ?
“हो मी शाहरुख ,अमिताभ चा बंगला पाहिला आहे बऱ्याच वेळा
पहिल्यांदा खुप कुतुहूल आणि आकर्षण वाटायचे ..पण आता एवढे काही नाही वाटत त्याचे .
मला तशीही सिनेमा वगैरेची फार आवड नाही .
मला फिरायला मात्र आवडते भरपूर ..परेश म्हणाला .
“अहो पण मला खुप आवडतात बर का हिंदी पिक्चर ..
मला दाखवाल ना तुम्ही ?सुमन थोडी चिंता दाखवून म्हणाली .
परेश हसला ..”तुला दाखवणार ना ..सुट्टी दिवशी सिनेमाला जायचे आपण
पण एका अटीवर ..”
“कोणत्या ?
असे सुमनने विचारताच ..
“सिनेमात जे दाखवतात ते सगळे घरी करून दाखवायचे मला ..परेश तिच्या कानात कुजबुजला .
सुमन लाजली आणि तिने हसुन त्याच्याकडे तीरपा कटाक्ष टाकला .
कधी एकदा घरी पोचतो आणि हीला बाहुपाशात घेतो असे परेशला वाटले .
अखेर बस डोंबिवलीला पोचली आणि परेश सामान हातात घेऊन सुमन सोबत खाली उतरला .
सुमनने पण आपल्या हातात तिची पर्स आणि सामानातली एक सुटकेस घेतली .
खाली उतरल्यावर माणसांची इतकी गर्दी बघुन सुमन भांबावून गेली ..
काय करावे तिला सुचेना ..

परेशने तिला माझा एक हात धर अशी खुण केली .
सुमनने तिच्या एका मोकळ्या हाताने त्याचा दंड पकडला ..
“ही मुंबई आहे इथे थांबायचे नाही ..भरभर चालत राहायचे..
असे बोलून परेश तिच्या सोबत गेटपाशी पोचला.
समोरच रिक्षा होती त्यात त्याने आधी सुमनला बसवले आणि मग सामान ठेऊन स्वतः बसला .
लगेच त्याने संतोषला फोन लावला आणि आपण पोचलो आहे असे सांगितले .
संतोष आणि स्मिता लगेच त्याच्या घरी यायला निघाली .
दहाच मिनिटात दोघेही घरी पोचली .
परेशचा ब्लॉक दुसऱ्या मजल्यावर होता .
सामान घेऊन तो सुमनसोबत जीना चढुन वर आला आणि त्याने आपल्या ब्लॉकचे कुलूप उघडले .
त्या मजल्यावर आणखी तीन ब्लॉक होते पण सध्या सगळीकडे कुलपे होती .
सुमन टकमक सगळीकडे पाहत होती .
आत गेल्यावर तिने हातातले सामान ठेवले आणि सोफ्यावर बसली .
शेजारीच एक अत्याधुनिक डबलबेड होता ज्यावर आरामदायी चांगली कव्हर्स घातलेल्या उशा होत्या .
हा सोफा एकदम मऊशार आणि आरामदायी होता.. असा तिने प्रथमच पाहिला होता .
तिला आठवले सासुबाई म्हणाल्या होत्या मुंबईच्या घरातले फर्निचर खुप चांगले आहे असे .
तिला बसलेली पाहून परेश पण लगेच तिच्याजवळ बसला आणि म्हणाला ..
“काय ग दमलीस का ..?
“हं ..थोडीशी ..सुमन म्हणाली ..
परेशने तिला जवळ खेचुन आपल्या बाहुपाशात घेतले .
“अहो अहो थांबा थांबा ....हे सगळे शब्द तिच्या ओठातच राहिले आणि
परेशने आपले ओठ तिच्या ओठावर दाबून तिचे चुंबन घ्यायला सुरवात केली .
सुमनच्या आयुष्यातला हा पहिलाच “पुरुषस्पर्श” होता ..
ती शहारून गेली आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली ..
हळूहळू परेशचे हात तिच्या अंगावरून फिरू लागले ..
दोघेही एकमेकात हरवून गेले ..
तिचा पदर बाजुला करण्यासाठी परेशने त्याची पिन सोडवायचा प्रयत्न चालू केला.
अचानक बेल वाजली आणि दोघे भानावर आले .
परेश चटकन उठला त्याने ओळखले संतोष आणि स्मिता आले असणार..
सुमनने पण चटकन पदर सावरला आणि केस सारखे केले आणि उठून उभी राहिली .
तिच्याकडे पाहून परेश म्हणाला ..”अग संतोष आणि स्मितावहिनी आले असणार मगाशी
फोन केला होता न मी ..”
परेशने जाऊन दार उघडले ..
संतोष आत आला मागून स्मिता पण आली .
“काय रे आल्या आल्या बेडरूम सीन चालू का ?...स्मिता पण खळाळून हसु लागली .
“गप रे काही बोलतो का ?..आता तर आलोय आम्ही ..परेश म्हणाला .
सुमन हे बोलणे ऐकुन एकदम संकोचली .
मग स्मिता पुढे आली आणि तिने आपली ओळख करून दिली .
“मी स्मिता आणि हा माझा नवरा संतोष ..तुमचे अगदी मित्र जवळचे आहोत बर का !!.
तुमच्या स्वागताला आलो आहोत आणि आज तुझा इथे गृहप्रवेश पण करणार आहोत .”
“मला हे बोलले होते तुमच्याविषयी आणि संतोषभाउजी लग्नात होतेच त्यांना मी पाहिले आहे .
सुमन म्हणाली ..
मग त्या दोघींच्या थोड्या गप्पा सुरु झाल्या .
स्मिता सुमनला आतील खोलीत घेऊन गेली .
येताना तिने दुध ,पेढे व खायच्या काही वस्तू ,फुले वगैरे आणले होते.
तिने दुध गरम करायला ठेवले व चहा टाकला .
नेहेमी परेशच्या घरी येणेजाणे असल्याने तिला ते स्वयंपाकघर सवयीचे होते .

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED