प्रारब्ध भाग १० Vrishali Gotkhindikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रारब्ध भाग १०



सकाळी जाग आल्यावर सुमनने मोबाईल पाहिला तर आठ वाजले होते .
तिने उठून दुध तापत ठेवले आणि परेशला जागे करू लागली .
रात्री उशिरा झोपल्याने परेश जागा व्हायला तयार नव्हता .
“ये ग तु पण झोपायला परत असे म्हणून तिला खेचू लागला .
पण सुमनने त्याचे काही एक ऐकले नाही .
त्याला उठवून त्याच्या हातात ब्रश दिला आणि बाथरूममध्य ढकलले .
आज मुंबई फिरायला जायची तिला गडबड झाली होती .
त्यांचे आवरत आले तोपर्यंत संतोष आणि स्मिता येत असल्याचा फोन आला .
सुमनने नाश्ता तयार ठेवला होता ..कांदेपोहे चहा आणि खारी .
आज आणखी एका नव्या फ्रॉकचे ओपनिंग केले होते सुमनने ..
मेकअप ,लिपस्टिक अगदी अपटूडेट तयार झाली होती .
सुमनचा ड्रेस आणि मेकअप सेन्स पाहुन स्मिताला पण आश्चर्य वाटत असे .
नुकतीच काही दिवसापूर्वी मुंबईत आलेली ही एका लहान खेड्यातील ही मुलगी आहे हे
कोणाला सांगुन पण पटले नसते .
पोहे मस्त केले होते सुमनने ,संतोष पण खुष झाला पोहे खाऊन .
सगळे बाहेर पडले आणि रेल्वे स्टेशन वर गेले .
त्या गर्दीत सुमनचा हात परेशने घट्ट पकडला .
लोकलची घोषणा झाली आणि चौघे फलाटाच्या जवळ सरकले .
“माझा हात घट्ट धर आणि पर्स जवळ पकड बर का ,चटकन वर चढायला लागेल आपल्याला .
लोकल आल्यावर मोठी गर्दी बाहेर पडली आणि त्याच्या दुप्पट गर्दी आत शिरली .
ते चौघेही आत चढले .
हा पुरुषांचा डबा होता त्यामुळे खचाखच लोक भरले होते .
सुमनला अनेक लोकांचे स्पर्श होत होते ,ती थोडी संकोचली होती .
स्मिता बरोबर तिने दुपारी महिला डब्यातून प्रवास केला होता तेव्हा इतकी गर्दी नव्हती .
सुमनला संकोचलेली पाहताच परेशने तिच्याभोवती हातांचे कडे केले आणि तिला सुरक्षित केले .
परेशच्या जवळ जवळ मिठीतच राहून प्रवास पुरा झाला .
स्मिता,संतोषची तीच अवस्था होती ..पण ते दोघेही सरावलेले होते .
आधी सगळेजण एक सिनेमा पाहायला आयनॉक्स थिएटरला गेले .
मोठ्या पंधरा मजली मॉल मध्ये सर्वात वरच्या मजल्यावर ते होते .
त्या गार गार एसी थिएटरमध्ये सिनेमा पाहताना सुमनला खुप मजा वाटत होती
इंटरव्हल मध्ये चिप्स ,कोक ,पोपकोर्न खाणे झाले .
सिनेमा संपल्यावर वरच्या मजल्यावर टेरेस रेस्तोरा मध्ये जेवायला गेले .
जेवण झाल्यावर सगळे समुद्रावर गेले .
बर्याच उशीरपर्यंत समुद्रावर सगळ्यांनी भरपूर धमाल केली .
संतोषने सोबत खेळायला मोठा बॉल आणला होता .
सर्वांनी समुद्रात जाऊन भरपूर बॉल खेळला .
संध्याकाळ झाली तशी जवळच्या गाड्यांवर सर्वजण भेळपुरी पाणीपुरी खायला गेले
पोटभर खाल्ल्यावर शेवट नारळ पाणी आणि कुल्फिने झाला .
सगळेजण आता खुप दमले होते नंतर मिळाली ती लोकल पकडून सगळे धमाल करीत घरी पोचले .
“उद्या मस्त सगळी मुंबई आरामात बघ बर का ..आम्ही उद्या नाही येऊ शकणार
दोघे मजा करा ..स्मिताने सांगितले .
सुमनने होकार दिला आणि सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला .
घरी आल्यावर कपडेही न बदलता दोघांनी बेड गाठला .
एकमेकांच्या मिठीत कधी झोप लागली दोघांनाही समजले नाही .
दुसरा दिवस तर आणखीन धमाल पार पडला .
मुंबई दर्शन बस मधून संपूर्ण मुंबई पाहताना सुमन थक्क झाली .
अशा डबलडेकर बसमध्ये ती प्रथमच बसली होती .
गर्दीने भरलेले रस्ते ,मोठ्या मोठ्या गगनचुंबी बिल्डींग्ज ,अलिशान हॉटेल्स ,रस्त्यात दिसणारे रेल्वे मार्ग
बसेस,आलिशान गाड्या,रस्त्यात असेलेले स्ट्रीट बाजार ..
सुमनला हे सगळे पहाताना दोन डोळे कमी पडत होते .
आणि तिच्या चेहेर्यावरचा आनंद आणि आश्चर्य पाहताना परेश खुष होऊन गेला.
ह्यांगिंग गार्डन ,राणीचा बाग ,दादर चौपाटी , जुहू चौपाटी ,गेटवे ऑफ इंडिया ,
नेहरू प्लानेटोरीयम ,बांद्रा ..अशा अनेक ठिकाणी बस फिरत होती .
बूट बंगला पहाताना सुमन अगदी लहान होऊन गेली .
ठिकठिकाणी वेगवेगळे पदार्थ खात मुंबई दर्शन पार पडले .
आदल्या दिवशी सारखाच हाही दिवस गडबडीत आणि थकलेला पार पडला .
दुसऱ्या दिवशी मात्र परेशला ऑफिस गाठायला लागणार होते .
सुमनच्या हातचा चविष्ट नाश्ता करून तो अनिच्छेनेच ऑफिसला गेला .
परेश गेल्यावर सुमन स्मिताकडे गेली .
मग स्मिताने तिला आधी सेल्फी कसा काढायचा दाखवले .
मग स्वतःच तिचे वेगवेगळ्या पोजमधले फोटो काढले .
वाटस अप शिकवले,
लगेच तिने फोटो अपलोड करून परेशला मेसेज केला .
परेशचा पण “वाहवा” अभिनंदन असा मेसेज आला ...
मग स्मिताने तिचे फेसबुक खाते काढुन दिले .
फ्रेंड लिस्ट तयार करणे ,पोस्ट टाकणे ,रिप्लाय देणे,सिक्युरीटी मेजर
सांभाळणे वगैरे गोष्टी सांगितल्या .
स्मिताच्या लक्षात आले की ती प्रत्येक गोष्ट ती लगेच आत्मसात करीत आहे .
सुमनला हा मोबाईल खेळ अगदी आकर्षक वाटला .
परेश घरी आला की त्याला सगळे डिटेल सांगायची तिला सवय होती .
आज तर जेवताना नव्या मोबाईल विषयी तिची बडबड चालली होती.
जेवणात मुळी लक्षच नव्हते तिचे ..
रात्री झोपताना नेहेमीप्रमाणे परेशने तिचे केस मोकळे केले .
आज जास्त खुशीत असल्याने ती रात्र अगदीच मादक होती .
या आठवड्यात मात्र परेशला भरपूर काम होते त्यामुळे त्याला यायला खुप उशीर होऊ लागला होता .
रात्री सुमनच्या मिठीत मात्र त्याचा शीण दूर होत असे .
सुमन आणि स्मिता दिवसभर एकमेकीच्या सहवासात असत .
त्यांचे जेवण पण आजकाल एकमेकींकडे होत असे .
या अवधीत मोबाईल मध्ये सुमन चांगलीच पारंगत झाली .
रविवारी स्मिता संतोषला घरी जेवायला बोलावून सुमनने फर्मास मटण आणि भाकरी बेत केला होता .
ते खेड्यातल्या पद्धतीचे मटण खाऊन स्मिता संतोष अगदी खुष होऊन गेले .
जेवण झाल्यावर गप्पा करताना स्मिताने बातमी सांगितली .
तिने ब्युटी पार्लर कोर्सला प्रवेश घेतला होता .
कोर्स तीन आठवड्याचा होता .
यानंतर तिला पार्लरमध्ये पार्ट टाईम जॉब करता येणार होता .
तिच्या दोन तीन मैत्रीणींची स्वतःची पार्लर होती .
तिला तिथेही बोलवणे आले होते .
इतके दिवस स्मिताची सुमनला खुप सवय झाली होती .
आता ती नसणार हे समजल्यावर सुमन थोडी नाराज झाली .
मग स्मिता तिला म्हणाली ,सुमन असे करूया का ..तु पण येतेस का हा कोर्स करायला .
तुला प्रवेश मिळेल तिथे ,म्हणजे दोघी एकत्र राहू “
सुमनने एकदम पटकन सांगितले ,नको ग नको मला असली आवड नाहीय
आणि असला कोर्स मला नाही करायचा .तुझी तूच जा ..
तिचे एकदम तोडल्या सारखे बोलणे ऐकुन स्मिताला जरा वाईट वाटले .
पण तिने विचार केला ..
नसते एखाद्याला आवड पार्लरची ..जाऊ दे ..
“सुमन अग मी दुपारी तीन पर्यंत येते आहे परत मग आहेच आपली गट्टी ..
तेव्हा भेटत जाऊ आपण ..स्मिता म्हणाली .
हो हो असे म्हणून सुमनने जुजबी होकार दिला.
परेशला हे सुमनचे वागणे थोडे अजब वाटले .
संध्याकाळी सुमन आणि परेश जवळच्या एका बागेत गेले फिरायला .
दुपारी जेवण भरपूर झाले होते .
मग फक्त सुमनच्या आवडीचे आईक्रीम खाऊन दोघे घरी आले .

क्रमशः