Prarambh - 7 books and stories free download online pdf in Marathi

प्रारब्ध भाग ७

प्रारब्ध भाग ७

रात्री खुप उशिरा झोपून सुद्धा ...
सकाळी नेहेमीप्रमाणे साडेपाच वाजता परेशला जाग आली .
रोजच्या रुटीनमध्ये त्याला रोज सकाळी आठ वाजता बाहेर पडायला लागत असे .
घरापासून दोन तास लोकल प्रवास करून नोकरीच्या ठिकाणी पोचायचे असे .
पुर्वी तो घराजवळच असलेल्या कंपनीत होता .
पण जेव्हा प्रमोशन मिळाले तेव्हा त्याची कंपनीच्या दुसऱ्या युनिटला बदली झाली होती .
जाग आल्यावर त्याने शेजारी पाहिले तर सुमन गाढ झोपेत होती .
तिचे लांब मुलायम केस तिच्या अंगावर आणि उशीभर पसरले होते .
तिच्या लांब लांब पापण्या झोपेत तिच्या गालावर विसावल्या होत्या .
तिचा गोरापान बांधेसूद देह ,गुलाबी रसदार ओठ ..
तिच्याकडे पाहताना काल रात्रीची आठवण येऊन ..परेश सुखावला .
खरेच काल रात्री जगातले “सर्वोच्च” सुख त्याला मिळाले होते .
सुमनने पण अतिशय उत्कट साथ दिली होती त्याला !!!
स्वतःच्या प्रारब्धाचा त्याला अतिशय हेवा वाटला !!
त्याचा विश्वास होता प्रारब्धावर ,माणसाने कितीही कष्ट केले आणि धडपड केली तरी
यशस्वी होण्यासाठी प्रारब्धाची साठ हवीच ..अशी त्याची पक्की खात्री होती .
त्याने स्वतः जरी खुप कष्ट केले तरीही त्याच्या प्रारब्धानेच ही मुंबई त्याला दाखवली होती .
इथेच त्याची प्रगती झाली .
आणि आता त्याच्या प्रारब्धाने त्याला अशी ही देखणी बायको भेटवली होती .
गेल्या आठ दिवसात त्याचे आयुष्य कुठल्याकुठे पोचले होते ..!!
मामाच्या मुलाच्या लग्नाला जातो काय आणि स्वतःचे लग्न होते काय ..सगळेच अनपेक्षित !!
शेजारी झोपलेल्या सुमनला परत त्याने आपल्या जवळ ओढले .
होय ,आज रविवारची सुट्टी होती त्याला आणि उद्यापासून मात्र कामावर जायला लागणार होते .
सुमनला जाग आली आणि हसुन परत ती त्याच्या कुशीत शिरली .
मग परत दोन तीन तास दोघे एकमेकात रममाण झाले .
नंतर मात्र सुमन उठून चहापाण्याच्या तयारीला लागली .
चहा घेता घेता परेशने सुमनला सांगितले आज आपण आवरून बाहेर पडणार आहोत.
नाश्ता जेवण सगळेच बाहेर आणि तुझ्यासाठी कपडे खरेदी पण करणार आहोत.
“अहो पण कपडे आहेत की माझ्याकडे ,साड्या आहेत गाऊन आहेत ,सलवार कमीज पण आहेत .
असे सुमनने म्हणताच ..
“ते जुने आणि ओल्ड फ्याशन कपडे आता इथे नाही वापरायचे
मी तुला सगळे मुंबई स्टाईलचे कपडे घेणार आहे ..”
सुमन खुष होऊन आंघोळीला गेली .
त्यांचे दोघांचे आवरेपर्यंत कामवाली बाई येऊन भांडी घासून केरवारे करून गेली .
मग दोघेही बाहेर पडले .
आधी समोरच्या सोसायटीमध्ये असलेल्या संतोषच्या घरी दोघे गेले .
त्यांचे घर पाचव्या मजल्यावर होते आणि त्या बिल्डींगला लिफ्ट होती .
सुमन प्रथमच लिफ्टमध्ये बसल्याने तिला अगदी गंमत वाटली .
स्मिता आणि संतोषने त्यांचे चांगले स्वागत केले.
दोघेही नुकतेच नाश्ता करीत होते मग त्यांनी या दोघांना पण आग्रह केला .
सगळी निवांत गप्पा करीत बसली ,दरम्यान स्मिताने सुमनला त्यांचा ब्लॉक दाखवला .
तीन खोल्यांचा त्यांचा प्रशस्त ब्लॉक चांगल्या फर्निचरने सजलेला होता .
सुमनला खुप आवडला तो ब्लॉक .
जाताना प्रथमच सुमन घरी आल्याने स्मिताने तिची ओटी भरली .
तिला एक चांगले ड्रेस मटेरीयल भेट म्हणून दिले आणि म्हणाली ,
“ आवडले ना तुला हे ..
सुमनने होकारार्थी मान हलवली ..उद्या तुला माझ्या टेलरकडे घेऊन जाते हा ड्रेस देऊ शिवायला .
आता मुंबई स्टाईल राहायला शिकवणार आहे मी तुला.”
“स्मिता मी पण तिला हेच सांगितले आहे ,शिकेल ती आता लवकरच .
आजच आम्ही तिला नवीन कपडे घ्यायला निघालोय .
जरा जवळची थोडीफार मुंबई दाखवतो तिला .”
उद्यापासून आम्ही दोघे जाणार ऑफिसला मग ती तुझ्याच ताब्यात आहे बर का ..”
परेश म्हणाला…
स्मिताने हसुन मान डोलावली ..
तिकडून बाहेर पडल्यावर सुमनच्या म्हणण्यानुसार दोघे आधी जवळच असलेल्या एका
गणपतीच्या देवळात गेले .
गणपतीचे देऊळ खुप प्रशस्त होते .
आजूबाजूला बाग सुद्धा होती.
रविवार असल्याने देवळात गर्दी होती .
वेगवेगळ्या वेशातले ,वयाचे आणि कपड्यातले अनेक स्त्री पुरुष देवळात होते .
सुमन ती सारी गर्दी अचंब्याने पहात होती .
बाजूच्या दुकानातून पेढे हार घेऊन दोघे देवळात शिरली .
हार ,फुले गणपतीला अर्पण करून ,पेढ्याचा नेवेद्य दाखवून सुमनने मनोभावे
देवाला नमस्कार केला .
या तिच्या नव्या आयुष्यात सुख समाधान लाभावे अशी प्रार्थना केली.
परेश हे सारे लांबूनच कौतुकाने पहात होता .
सुमनने परेशला प्रसाद दिला आणि देवाला नमस्कार करायला सांगितला.
देवावर फारसा विश्वास नसलेल्या परेशने सुमनच्या आग्रहाखातर नमस्कार केला .
दोघेही बाहेर पडले आणि परेश तिला घेऊन जवळच्या मॉल मध्ये गेला .
हा मॉल चांगला सहा सात मजली होता .
प्रत्येक मजल्यावर वेगवेगळी डिपार्टमेंट होती .
पुरुष ,बायका मुले यांचे कपडे खेळणी ,पुस्तके ,भांडी ,इलेक्ट्रिक समान इलेक्ट्रोनिक्स आयटेम .
प्रत्येक मजला लिफ्ट मधून फिरुन पाहिल्यावर सुमन चकित झाली .
सुमनला फ्रॉक ,स्कर्ट असे लेटेस्ट कपडे तसेच दोन तीन प्रकारचे पंजाबी ड्रेस ,
छान आधुनिक नाईटीज ,एक मोठी आधुनिक पर्स ,चप्पल अशी बरीच खरेदी केली .
स्लीवलेस कपडे आणि असे आधुनिक ड्रेस सुमनने कधीच वापरले नव्हते .
तिला या साऱ्याची हौस मात्र होतीच .
हे सारे झाल्यावर तिथल्याच एका मोठ्या हॉटेलमध्ये परेशने सुमनला जेवायला नेले .
इतके मोठे हॉटेल व त्यात मेनुकार्ड वरचे असंख्य पदार्थ!
परेशने सुमनला हवे ते मागव असे सांगितले पण सुमनला काय मागवावे समजेना.
मग परेशनेच तिची आवड विचारून ऑर्डर सांगितली .
ते चविष्ट जेवण सुमन पोटभर जेवली .
तिचा आनंद बघुन परेश पण आनंदित झाला .
यानंतर परेशने तिला रिक्षातुन बरेच फिरवले.
आजूबाजूच्या काही गोष्टी दाखवल्या .
जवळचे रेल्वे स्टेशन दाखवले .
भरधाव धावणाऱ्या असंख्य लोकल ,माणसांची भरगच्च गर्दी बघुन सुमन चक्रावली.
“तु काळजी करू नकोस काही दिवसात तुही लोकलने आरामात न घाबरता फिरायला लागशील “
परेश म्हणाला .
संध्याकाळ होता होता दोघे घरी पोचले .
दोघे खुप थकले होते .
सुमनने मस्त चहा केला आणि दोघे आरामात चहा पीत टीव्ही पहात बसले .
संध्याकाळी बाहेरून जेवण मागवूया का असे विचारल्यावर सुमन नको म्हणाली .
“मी करेन वरण भात ,मामीने साहित्य दिलेय थोडे .
शिवाय पापड लोणची पण सासुबाईनी दिलेली आहेत .
उद्यापासून सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाक सुरु करेन भाजी आणि इतर साहित्य आणुन ..’
परेश खुष झाला .आता घरगुती जेवण मिळायला लागणार ..
बाहेरचे खाऊन कंटाळला होता तो इतकी वर्षे .
तरी बरे कंपनीत मिळणारे जेवण मात्र चांगले असायचे .
रात्री जेवण झाल्यावर सर्व कपड्यांची ट्रायल घ्यायला सांगितली परेशने .
त्याच्या समोर कपडे बदलताना सुमन संकोचून गेली .
पण परेश ऐकतच नव्हता ..तिला आधुनिक कपड्यात पाहताना परेशचे डोळे चमकत होते .
खुप देखणी दिसत होती सुमन ..
आत कपडे बदलायला निघालेल्या सुमनला त्याने अडवून तिच्या अंगावरचे सर्व कपडे
स्वतः उतरवले तिच्या केसांची वेणी सोडुन केस मोकळे केले आणि तिला उचलुन बेडवर ठेवले.
मऊ मुलायम केसात लपेटलेले तिचे नग्न शरीर पाहून तो बेधुंद झाला .
आणि स्वतः आवेगाने तिच्या जवळ गेला ..
सुमनने लाजेने तोंड झाकून घेतले ..
तिचे हात बाजूला करून त्याने तिचे ओठ ओठात घेतले ..
आणि रात्र परत रंगात आली ..

क्रमशः




इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED