Prarambh - 9 books and stories free download online pdf in Marathi

प्रारब्ध भाग ९

प्रारब्ध भाग ९

नंतर चार पाच दिवस असेच गेले .
सुमन रोज दुपारी स्मिताकडे जात असे .
दोघींचे खुप चांगले जमत असे .
शिवाय स्मितामुळे सुमनला मुंबईची माहिती मिळत होती .
जवळपासची सगळी दुकाने देवळे ही पण स्मिताने तिला चांगली परिचित करून दिली .
एके दिवशी स्मितासोबत ती लोकल मधील महिलांच्या डब्यातून तिच्या मैत्रिणीकडे जाऊन आली .
लोकलचा प्रवास तिच्यासाठी एक थ्रील ठरला .
त्या दिवशी शनिवार होता .
स्मिता आज काही कामासाठी बाहेर गेली होती .
त्यामुळे सुमन घरीच होती .
दुपारी जेवण झाल्यावर ती टीव्ही पहात लोळत होती आणि बेल वाजली .
आत्ता कोण आले असेल असा विचार करीत मोकळे केस बांधत सुमन उठली.
दार उघडताच बाहेर परेशला पाहून तिला नवल वाटले .
“तुम्ही आत्ता कसे काय घरी आलाय ?...”तिने विचारले .
ब्याग खाली ठेवून परेशने सुमनला आधी मिठीत घेतले आणि तिचे केस मोकळे करून
तिची चुंबने घ्यायला सुरवात केली .
सुमनचे मोठे मऊ मुलायम केस त्याला अतिशय आवडत असत .
सुमन बावरून गेली आणि त्याच्या मिठीत विरघळून गेली .
मग दुपारीच तिथे रात्र अवतरली ..
थोड्या वेळाने भानावर आल्यावर दोघेही उठले .
“चल आवर लवकर कालचा नवीन फ्रॉक घाल ..आपण बाहेर जातोय आत्ता “
असे परेशने म्हणताच ..
“हो आवरते मी पण कुठे जायचेय आणि ऑफिस नाही का तुम्हाला ..?
सुमनने विचारले .
“आता पुरे प्रश्न.. चल पटकन मी फ्रेश होऊन येतो ..
सुमन कपडे बदलायला आत गेली ..
आणि परेश आत जाऊन फ्रेश होऊन आला आणि तिची वाट पाहत बसला .
आज ऑफिसचे काम याच भागात होते त्यामुळे तो इकडे आला होता .
त्याने काम आटोपून घेतले, आता परत जायचे नव्हते .
त्यात उद्या रविवार असल्याने सुट्टी पण होती,त्याला जोडून त्याने एक दिवस सुट्टी घेतली होती .
सुमनला मुंबई फिरुन दाखवायचा त्याचा प्लान होता .
रविवारी स्मिता संतोष सुद्धा त्यांच्या सोबत यायचे होते
अजुन त्याने सुमनला ही कल्पना नव्हती दिली .
नवीन फ्रॉक घालून सुमन बाहेर आली ,तिने तिचे लांब केस एका पिनमध्ये अडकवले होते .
नवीन घेतलेले उंच टाचाचे चप्पल घातले होते .
थोडा मेकअप आणि लाल गडद लिपस्टिक लावलेल्या सुमनला बघुन परेश थक्क झाला .
हीच का ती खेड्यातली “काकूबाई टाईप” मुलगी असे त्याला वाटले .
खुप चटकन सुमन मुंबईच्या वातावरणाशी “समरस” होत होती .
त्याला या गोष्टीचे कौतुक पण वाटले .
सुमनजवळ जाऊन त्याने तिचा चेहेरा हातात घेतला .
किती सुंदर दिसते आहेस ग ..असे म्हणताच .
सुमनने त्याच्या हातातून स्वतःला सोडवून घेतले आणि कृतककोपाने म्हणाली ,
“चला आता नाहीतर परत इथेच तुम्ही सुरु व्हाल ..
तिचे बोलणे ऐकताच परेश हसायला लागला ...
“बरे बाई आता उरलेले रात्री ..मग तर झाले ?..
दोघे बाहेर पडली आणि रिक्षात बसली .
परेश तिला एका मोठ्या मोबाईलच्या दुकानात घेऊन गेला .
तिच्या पसंतीचा सर्व फीचर्स असलेला एक मोठ्या स्क्रीनचा एक महाग मोबाईल त्याने खरेदी केला .
आता तर सुमन अगदी हरखून गेली .!!
बाहेर पडल्यावर तो सुमनला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला .
तिच्या मनपसंत पदार्थांची ऑर्डर देऊन, तिच्या आवडीचे आईस्क्रीम पण सांगितले त्याने .
खाऊन झाल्यावर दोघे संतोषच्या घरी गेले .
संतोष नुकतच आला होता .
स्मिता आणि संतोष सुमनला आधुनिक वेशात पाहून चकित झाले .
“वा मस्त आहे की फ्रॉक ..एकदम मॉड दिसायला लागली आहेस तु
अजिबात ओळखू येइनास “!!
स्मिता कौतुकाने म्हणाली ..
सुमन परेशकडे पाहून खुशीत हसली .
मग चौघांच्या गप्पा रंगल्या .परेशने तिच्यासाठी घेतलेला मोबाईल तिने दाखवला .
आणि म्हणाली ,”स्मितावहिनी मला शिकवाल न कसा मोबाईल वापरायचा ते..
आणि ते फेसबुक ,वाटसअप पण मला शिकायचे आहे ..”
“अग हो हो ..सगळे शिकशील तु ,काय अवघड आहे त्यात ..
उद्याच तुला एक्सपर्ट करून टाकते मग झाले ..?”
स्मिताच्या बोलण्यावर सुमनने मान डोलावली .
तिच्या नवीन नंबरवर स्मिताने तिला कॉल दिला आणि नंबर सेव्ह कसा करायचा हे शिकवले .
“स्मिता बघितलेस न माझा सुद्धा मोबाईल इतका मोठा आणि महाग नाहीये बर का
आम्ही आपले साधे कामगार लोक ...असे परेशने बोलताच सगळी हसु लागली .
सुमनने हसून उगाचच परेशकडे पाहून डोळे मोठे केले
बरच वेळ गप्पा गोष्टी झाल्या.
सुमन तिथेच टीव्ही वर एक सिनेमा पाहता पाहता गप्पात भाग घेत होती .
सुमनला स्मिताकडे असलेला मोठ्ठा टीव्ही पाहायला मजा येत असे .
एखाद्या थिएटर मध्ये बसल्याची मजा येत असे .
आपण पण आता परेशला सांगुन मोठ्ठा टीव्ही घ्यायचा असे तिने ठरवले .
स्मिताने मग जेवून जायचा आग्रह केला.
खिचडी ,कढी, भजी असा बेत केला .
सोबत परेशने आईस्क्रीम नेलेले होतेच .
असे मस्त सेलिब्रेशन झाले .
दोघे घरी परत आले .नवीन फोन वर सुमनने मामा मामींना फोन केला .
चिंटू पिंटू पण बोलले फोनवर.
तशीच ही बातमी तिने सासरी पण फोन करून सांगितली .
सासू सासऱ्यांनी पण कौतुक केले .
“आता आम्हाला आमचे गिफ्ट द्या न नवीन मोबाईल घेतल्याबद्दल ..
असे म्हणत परेशने तिला मिठीत घेतले आणि चुंबनाचा वर्षाव केला ..
“किती सुंदर दिसते आहेस माहिती आहे का तुला ..
असे म्हणत त्याने तिचे केस आधी मोकळे केले आणि फ्रॉकची मागची चेन ओढली .
आणि तिच्या ब्राचा हुक काढुन तिचे भरदार स्तन गोंजारू लागला .
त्याचा हात हळूहळू खाली गेल्यावर
त्याच्या लक्षात आले आज तिने नवीन लेस असलेले अंतर्वस्त्र घातले होते .
“अहो थांबा मी कपडे तरी बदलते ...असे म्हणताच .
आता बदलायचे नाही काढायची वेळ आहे असे म्हणत त्याने सुमनला बेडवर खेचले .
त्याचा अधीरपणा पाहून सुमन पण “रोमांचित” झाली .
आणि ती पुरेपूर त्याच्या स्वाधीन झाली
तिच्या सहवासात आणि मऊ लांब केसात परेश गुंतून गेला .
उद्या सुट्टी असल्याने परेशने त्या रात्री सुमनला खुप वेळ झोपू दिले नाही .
सुमन पण छान साथ देत होती .
एका खेड्यातील मुलगी इतकी चांगली साथ प्रणयात देते हे समजल्यावर परेश
हळूहळू तिला नवीन सेक्सची आसने पण शिकवायला लागला होता .
त्याच्या लक्षात आले होते की तिला याच्यात खुप “रुची” आहे आणि ती हे सारे चटकन शिकते आहे .
त्या आसनांमध्ये ती अगदी रममाण होत असे .
परेशला आपल्या विषयी वाटणारी आसक्ती पाहून सुमनला आपल्या रूपाचा “गर्व” वाटत होता .
उद्या सर्वांनी मिळुन रेल्वेतून चौपाटीवर जायचे आहे हे तिला परेशने सांगितले होते .
तिने अजुन समुद्र कधी पाहिला नव्हता .
कधीतरी चौपाटीचे वातावरण तालुक्याला पाहिलेल्या सिनेमातून बघितले होते .
ते आता प्रत्यक्ष पाहायला मिळणार होते ..
शिवाय परेश तिला मुंबई दर्शन गाडीतुन संपूर्ण मुंबई दाखवायला पण नेणार होता ..
ती खुष होती ..!

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED