विजयची घराची परिस्थिती फारच बेताची. घरात आई वडील आणि दोन बहिणीसोबत तो राहायचा. घरात तोच मोठा असल्यामुळे आई बाबांच्या कामात त्यालाच मदत करावी लागत असे. गावात सातवी पर्यंत शाळा होती म्हणून सातव्या वर्गापर्यंत तो शिक्षण पूर्ण केला. त्यापुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाणे त्याला शक्य नव्हते. म्हणून तो आपले शिक्षण सोडून देऊन गावात मिळेल ते काम करू लागला. गावात जास्तीत जास्त बांधकाम करण्याचे काम केल्या जात असत त्यामुळे तेच काम विजय करू लागला. हळूहळू तो त्या कामात मजुरदार वरून मिस्त्रीचे काम करू लागला. त्याच्या हातात बऱ्यापैकी पैसा खेळू लागला होता. पण घरात दोन बहिणी असल्यामुळे त्यांच्या लग्नाची चिंता आई बाबांना खात होती. हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत होते. म्हणून विजय ने मोठ्या शहरात जाऊन काम करण्याचा निर्णय घरात सांगितला. त्याच्या आई बाबाने त्यास खूप विरोध दर्शविला पण विजय ऐकण्याच्या तयारीत मुळीच नव्हता.
एके दिवशी तो जवळच्या मोठ्या शहरात आपल्या सायकलवर गेला. दिवसभर खूप फिरला पण त्याला कोठे ही काम मिळाले नाही. त्याला खूप दुःख वाटले. कोणी ओळखीचे नाही तर काम कुठून मिळणार. काही दिवस असे तसेच निघून गेले. शहरातील एक मोठा बांधकाम कारागीर मजूर लोकांच्या शोधात त्या गावात आला. भरपूर पैश्याची आमिष दाखविली. विजयने देखील त्याच्या बोलण्यात आला. वर्षाची काही आगाऊ रक्कम घेऊन विजय त्या कारागिरांच्या बांधकामावर जाण्यास निघाला. तो कारागीर राहण्याची आणि खाण्याची देखील व्यवस्था केली होती. त्यामुळे आई बाबांना देखील त्याची काळजी वाटत नव्हती. मोठ्या बहिणीच्या लग्नासाठी लागणारी अर्धी रक्कम मिळाली होती. एका वर्षात अजून तेवढी रक्कम कमावून आणून तिचा लग्न करण्याचा निश्चय केला होता. आपल्या बॅगमध्ये रोज लागणारी कपडे, अंथरूण आणि पांघरूण घेऊन। विजय कामासाठी निघाला. गावापासून शे दोनशे किमी दूर असलेल्या शहरात त्याचे मन हळूहळू विसावले. रोज सकाळी सात वाजता कामावर जायचे आणि सायंकाळी सहा वाजता काम संपवायचे. जिथे काम चालू होते तेथेच त्याची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे त्याला कुठे जाण्याची गरज नव्हती. रविवारी त्याला सुट्टी राहत असे म्हणून त्यादिवशी तो कधी फिक्चर पाहायला जात असे, कधी बाहेरच एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करायचा. त्याला त्या कामावर रमेश नावाचा एक मित्र भेटला. जो की विजय सोबतच त्या बांधकामवर काम करायचा. हळूहळू काही दिवसानंतर त्यांच्या दोघांची मैत्री झाली. रमेश स्वभावाने चांगला होता मात्र त्याला दारू पिण्याची सवय होती. एका रविवारी तो आणि विजय एक फिक्चर पाहिले. सायंकाळी एका धाब्यावर जाऊन जेवण करण्याचा बेत होता. तसे दोघे ही एका हॉटेलवर गेले. रमेशने आपल्या खिशातून एक बाटली काढली आणि ग्लासमध्ये भरलं. तो विजय साठी पण एक ग्लास भरू लागला होता पण विजय ने नकार दिला. रमेशने खूप विनंती केली पण तो दारू घेतला नाही. त्या रात्री ते जेवण करून घरी येऊन झोपी गेले. असे दोन तीन रविवार गेले. एका रविवारी मात्र विजय स्वतः ला आवरू शकला नाही आणि थोडी दारू आपल्या घशाखाली घातली. त्याला त्याची चव काही कळली नाही मात्र थोडा वेळ ह्या संसारातून दुसऱ्या जगात गेल्याचा भास झाला. दारू पिण्याची त्याची गोडी हळूहळू वाढत गेली. आता दर रविवारी विजय दारू पिऊ लागला. तो ज्या धाब्यावर दारू प्यायला जात असे त्याच्या धाब्यावर वेश्या व्यवसाय देखील चालत होता. हे विजय ला माहीत नव्हते. तो फक्त दारू पिऊन निघून जायचा. तो या दुष्टचक्रात कधीही अडकला नसता जर त्याच्या सोबत ही घटना घडली नसती तर. तो त्या रविवारी एक एक पॅग पीतपीत खूप दारू पिला. त्याला काही भान राहिले नव्हते. तो जागेवरून उठता ही आले नाही. तो तेथेच लुडकला. धाब्याचे मालकाने त्याला उचलले आणि घरात नेऊन टाकले. तिथे घरात एक बाई होती. ती दररोज विजयला दारू पिताना पहायची आणि एक ना एक दिवस विजयसोबत वेळ घालविण्याची स्वप्न पहायची कारणही तसेच होते. विजय पंचविशीतला तरुण पिळदार शरीर यष्टी देखणा रूप नसले तरी मुलींना आकर्षण करेल असा तो दिसत होता. याच संधीचा फायदा घेऊन तिने मदहोश विजयला निर्वस्त्र करून त्याच्या सोबत रात्र रंगून टाकली. सकाळी उठल्यावर विजय धाब्यावरच्या घरात पाहून चक्रावून गेला. त्यालाकाही तरी विचित्र वाटत होते. तो कामावर जायचे म्हणून निघून गेला. त्या रात्रीची त्याला राहून राहून आठवण यायची आणि तो अस्वस्थ व्हायचा. रविवारची तो आतुरतेने वाट पाहायचा. त्या रविवारी तो धाब्यावर गेला. दारूचे दोन तीन पॅग घातले आणि त्या घरात शिरला. ती घरात त्याची वाट पाहतच होती. त्याला त्या रात्री अजून जास्त वेगळा अनुभव आला. तो आता पूर्णपणे दारू आणि बाईच्या आहारी गेला होता. इकडे गावाकडे बहिणीची सोयरीक झाली होती आणि लग्नाचे दिवस जवळ आले होते. पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन आणि काही पैसे व्हेउन त्या लग्नासाठी विजय गावी परत आला. दोन दिवस गावात सगळ्यांच्या गाठी भेटी मध्ये गेले. तिसऱ्या दिवशी त्याला दारूची आणि बाईची आठवण आली. पण गावात तर काही व्यवस्था नाही. तो अस्वस्थ होऊ लागला. बहिणीचे लग्न झाले की तो पुन्हा शहरात कामावर गेला. यावेळी त्याला कामाची नाही दुसऱ्याच गोष्टीची आस लागली होती. तो पूर्णपणे आहारी गेला होता. आता काम देखील कमी करू लागला आणि धाब्यावर जास्त वेळ घालवू लागला. एके दिवशी त्याच्या अंगात खूप ताप चढली. त्याच्या मित्राने त्याला दवाखान्यात नेला. दोन तीन। दिवसानंतर ही त्याचा तापकाही केल्या उतरत नव्हता. तापीचे कारण समजून घ्यावे म्हणून डॉक्टरांनीत्याला रक्त आणि लघवी तपासण्याचा सल्ला दिला. तसे त्याने रक्त आणि लघवी तपासणीसाठी दिले. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट मिळाला. रिपोर्ट पाहून डॉक्टरने विजयला बाजूला बसवून त्याच्या मित्राला सांगितले की विजय HIV ve आहे. त्याच्या मित्राला धक्काच बसला. त्याने काहीही न बोलता विजयला घेऊन घरी गेला. दिवसामागून दिवस जात होते. विजयच्या अंगातील शक्ती हळूहळू कमी होत होती. त्याला थोडे काम केले की थकवा येऊ लागला. मित्राने त्याला परत आपल्या गावी जाण्याचा सल्ला दिला. तसा तो आपल्या गावी परतला. पिळदार शरीर यष्टीचा विजय अगदी बारीक दिसू लागला. त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही तेज नव्हते. तिशीतला विजय पन्नास वर्षाचा वृद्ध दिसू लागला होता. गावी आल्यावर तो घरच्या बाहेर देखील निघत नव्हता. नेहमी झोपून राहत असे. गावात त्याच्या या वागण्याच्या बाबत लोकंकाही बाही बोलू लागली होती. शेवटी एके दिवशी सायंकाळी जेवण करून तो झोपला तो कायमचा झोपला. रात्रीच्या झोपेतच त्याची प्राणज्योत मावळली. त्याच्या एका चुकीमुळे घरातला कर्ता सवरता तरुण मुलगा गेल्याचे त्या आई बाबांना खूप खूप दुःख होते. अशी चूक अनेक युवकांच्या जीवनात येते पण वेळीच युवकांनी स्वतःला सावरणे आवश्यक आहे.
- नागोराव सा. येवतीकर, स्तंभलेखक
- मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
- 9423625769