Tujhach me an majhich tu..24 books and stories free download online pdf in Marathi

तुझाच मी अन माझीच तू...भाग २४

तुझाच मी अन माझीच तू...भाग २४

आभा ने जरा विचार केला आणि ती बोलायला लागली, "ओह.. आय नो.. तो तुझ्याविषयी बोलतांना भडकलेला असतो.. "

"हो ना.. वाटलाच मला.. उगाच मला बदमान करत फिरत असतो.. ठीके मी मान्य करतो मी एकदा चूक केली होती.. पण नंतर मी बदललो.. पण राजस ची माझ्यावरची खुन्नस काही केल्या कमी झाली नाही.." रायन बोलला..

रायन तसा लकी होता.. त्याला राजस ने तयार केलेली वातावरणाचा फायदा कसा करून घ्यायचा हे चांगलेच माहिती होते.. रायन ने मिळालेल्या संधीचा फायदा करून घ्यायचा निर्णय घेतला होता. आणि रायन थोडा सुधारला सुद्धा होता. त्याच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या होत्या याचा थोडा परिणाम रायन वर झाला होता. पण त्याने आपले वागणे खरच सुधारले होते का नाही ह्या बद्दल कोणालाही खात्री मात्र नव्हती. रायन उत्तम वागत होता आणि आभा च्या मनावर उगाचच हे बिंबवले जाते होते की रायन खरच चांगला आहे.. आता महत्वाचा प्रश्न असा होता की रायन खरच सुधारला आहे की तो फक्त नाटक करत होता.. ह्याची खात्री आता आभा ला करायची होती..

रायन सुद्धा आपल्या चांगल्या वागण्याचा आणि आपण केलेल्या वातावरण निर्मितीचा आभा वर काय आणि कसा परिणाम होतो ते पाहायला रायन उत्सुक होता पण आभा लगेच काही बोलली नाही. आभा ला कळत नव्हते कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवावा.. तिला राजस रायन बद्दल काहीतरी बोलला होता पण काय झाल होत ते रायन ने स्वतःहून सांगितले होते म्हणजे रायन वर विश्वास ठेवता येईल असंही आभा ला वाटून गेल.. आभा ला नवीन ऑफिस मध्ये येऊन २ दिवस सुद्धा झाले नव्हते त्यामुळे एकदम कोणत्याही निष्कर्शावर आभा येणार नव्हती.. त्यात पूर्वी तिच्या आयुष्यात आलेल्या वादळामुळे तर आभा अधिकच जागरूक झाली होती. पण आज रायन च्या स्पष्ट बोलण्यामुळे आभा जरा नरमली सुद्धा होती.

आभा ने जरा वेळ विचार केला.. आणि ती बोलायला लागली..

"हो हो.. राजस सुद्धा बोलला होता तुमच्या खुन्नस बद्दल.. नक्की काय झालं होत ते मला माहिती नाही सो...मी याविषयी जास्ती काही बोलू शकणार नाही.. आणि तसही मी लगेच कोणावरही विश्वास ठेवत नाही.. आणि कोणाच्या भूतकाळात अडकत देखील नाही..." आभा थोडे केअरलेसपणे बोलली... आणि इतक बोलून थांबली..

"आभा, नकोच ठेऊस माझ्यावर लगेच विश्वास...मी त्याबद्दल काही बोललोच नाहीये.. आपण जनरल बोलत आहोत.."

"नाहीच ठेवत मी लगेच कोणावर विश्वास...सॉरी! पण मी अशीच वागते आता.. प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो आणि भूतकाळ कधी कधी खूप काही शिकवून जातो.. माझ्याही बाबतीत तसच काहीस झालं आहे.. ज्या चुका मी भूतकाळात केल्या त्या परत करायची माझी इच्छा नाहीये... त्याच चुका परत नको सो.. आय होप यु अंडरस्टँड मी...आणि प्लीझ डोंट माइंड!!" आभा खप खंबीर पणे हे बोलली होती आणि तिला आपण भूतकाळातून शिकलो हे सांगतांना कोणत्याही प्रकारच दुःख नव्हत. म्हणजे ती आपल्या भावना कधीच लपवून ठेवायची नाही.. तिला ती कशी आहे हे लोकांना सांगयची गरज नेहमीच वाटायची. तिला काही गोष्टी जगाला सांगायला आवडायच्या त्यातून ती कशी खंबीर आहे हे सुद्धा तिला लोकांना सांगायला आवडायचं...आभा ला कोणीही ग्रँटेड घेऊ नये हा मेसेजच जणू आभा तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सांगायची..त्यातुनच तिच ठाम स्वभाव समोरच्या व्यक्तील समजायचा.. आभा चे इतके स्पष्ट बोलणे ऐकून रायन जरा उडला होता.. इतक्या स्पष्टपणे त्याच्याशी कोणीच बोलल्याच त्याला आठवत नव्हत.. त्याचे काही मुलींशी ह्या आधी वाद झाले होते पण त्याच्या समोर इतक्या स्पष्ट पणे कोणीच स्वतःची मते मंडली नव्हती. रायन कडे कश्याचीच कमी नव्हती.. लुक्स १०० मार्क, पैसे १०० मार्क, माज १०० मार्क्स, पोझिशन १०० मार्क्स, लक्झरी १०० मार्क्स.. रायन एक फूल पॅकेज होता तरी आभा ने त्याच्या तोंडावर त्याला लगेच नाही ही गोष्ट अगदी सोप्प्या शब्दात सांगितली होती.. आणि आभा गप्पा राहून ऐकून घेणारी नाही ह्याचा अंदाज सुद्धा रायन खालीली येऊन आभा शी बोलायचं रायन ने ठरवलं.. आपला माज आभा समोर काही कामाचा नाही ही गोष्ट रायन हुशार असल्यामुळे त्याला लगेच समजली होती.. रायानाधीपासूनच आभा शी सावधपणे बोलत होता आणि आता तर तो अधिकच अलर्ट होऊन आभा बरोबर संवाद साधणार होता.

"नो नो.. इट्स ऑल गुड!! तुझा स्वभाव वेगळा आहे.. आणि हे खूप छान गोष्ट आहे.. तू स्वतःची मते इतक्या स्पष्टपणे मांडतेस. नाईस.."

"थँक्यू.." आभा बोलली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू आले.. ह्यातले बरेच शब्द तिने आधी सुद्धा ऐकले होते.. आधी हे बोलणारा राजस होता आणि आता रायन सुद्धा राजस चेच शब्द बोलत होता.. त्याक्षणी आभा च्या मनात एक विचार आला, 'मेन विल बी मेन..' मग मात्र तिला आपले हसू कंट्रोल करता आले नाही. ती दिलखुलास हसली.. पण आभा का हसती आहे हे रायन ला उमगेना..

"काय झाल आभा? इतक हसू का आलं? कर कर शेअर कर..मग मी सुद्धा हसेन मग.."

"काही नाही.. असच काहीतरी आठवलं!! तुला सांगण्यासारखं नाही..."

"ओह ओके.. मागशी मी बोलत होतो, माझ्या भूतकाळा मधून मी पण काही गोष्टी शिकलोय...नी आत्ता तुझ्याकडून पण शिकतोय... तू एक चांगली टीचर आहेस ह आभा..."

"ओह थँक्यू अगेन!! आणि भूतकाळ आपल्या आयुष्यात महत्वाच असतो.. म्हणजे काही गोष्टी खूप काही शिकवून जातात..गुड टू नो.. वी आर सेलिंग द सेम बोट.."

"येस.. मी तुला सांगितलं की मी चुकीचा वागलो होतो.. थोडा जोश होता आणि त्यामुळे झाल्या काही चुका.. पण मी आता त्या चुका सुधारून वागतोय.. तू सुद्धा तुझ्या चुका सुधारती आहेस आणि मी पण.. वी आर सेलिंग द सेम बोट.. वेल सेड!!" रायन छोटी स्माईल आणत बोलला आणि त्या स्माईल ने थोडी का होईना पण आभा वर जादू केली... आभा सुद्धा रायन कडे पाहून हसली. आभा ला रायन चा हा प्रामाणिकपणा आवडला.. रायन ने तिला स्वतःहून खर काय ते सांगितले होते नी आपली चूक मान्य सुद्धा केली होती...

आभा च्या मनात विचारचक्र चालू झाले... "प्रामाणिक लोकं मला फार आवडतात. उगाच खोट बोलला नाही रायन..किंवा खोटा दिखावा सुद्धा नाही केला... चूक मान्य करायला पण करेज लागत.." आभा ला रायन चे हे वागणे आवडले होते.. एकदम स्पष्ट आणि त्याने सत्य आभा पासून लपवून ठेवले नव्हते. काही कळायच्या आतंच आभा च्या मनावर रायन चे विचार चालू झाले होते.. ह्या सगळ्या विचारात मध्ये मध्ये राजस पॉप प होत होता पण आभ चे मेन लक्ष रायन ने स्वतःकडे ओढले होते.

आता तिच्या आयुष्यात आता २ मुलं आली होती. आभा ला दोघातलं कोण जास्त चांगल आहे हे कळतच नव्हत. आभा दोघांनाही पारखून घेणारी होती. भूतकाळा मुळे आभा चे वागणे एकदम क्लिअर झाले होये. झालेल्या चुका आभा परत करणार नव्हती.. आणि मैत्री तर ती नीट पारखून करायची.. आणि अश्याच वेळी राजस आणि रायन दोघांनी तिच्या आयुष्यात नकळत प्रवेश केला होता.. आता आभा च्या आयुष्यात बरेच बदल होणार होते. राजस आणि रायन मध्ये निवड करतांना आभा ची खरी परीक्षा होणार होती.. तिच्यासाठी दोघे तसे अनोळखीच होते आणि योग्य निवड कदाचित तिच संपूर्ण आयुष्य बदलवून टाकणार होती.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED