Ti Ratra - 2 books and stories free download online pdf in Marathi

ती रात्र - 2

मी पेट्रोल भरत होती, त्यांना बाहेर उभ केलं होत. त्या दोघी बोलत होत्या. मी गेलो आणि अचानक त्यांनी बोलणं बंद केलं. पुन्हा गाडी वर बसलो आणि आम्ही निघालो.
कुत्र्यापासून वाचून आम्ही पुढे चालायला लागलो,
थोडा वेळ गेल्यानंतर ती खूप मोठ्याने हसायला लागली.
ते पाहून मी तिला विचारलं “काय झालं हसायला ?”
ती “तू किती घाबरला होता कुत्र्यांना”
मी “म्हणजे मुलांना भीती नाही वाटू शकत काय”
ती हसतच होती
मधेच ती थांबली आणि मला विचारलं
“तुझं नाव काय ?”
मी “श्रेयस”
ती ” sorry नाही बोलणार मला”
मी “का , खरं तर मी तुला thank you म्हणायला पाहिजे”
ती “ते गावात नवीन …”
मी तिला मधेच थांबवले
“शपथ ते मी नव्हतो बोललो”
ती “हो तुझ्याकडे पाहून वाटत नाही, तुझ्यात इतकी daring असेल”
आणि मोठ्याने हसायला लागली
मग काय मी पण हसायला लागलो. त्या नंतर ती हॉस्टेल ला गेली.
कॉलेज मध्ये आम्ही बोलायला लागलो होतो, contact number save झाले होते. मी फारसा हुशार नाहीच आधीपासून, फार तर class मध्ये माझा नंबर मध्ये कुठे तरी लागत असणार. पण ओळखी होत्या चांगल्या, त्यामुळे आमच्या दोघांची जवळीक पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यांना वाटायला लागलं होत की आमच्यात काही तरी सुरू आहे. त्यात त्यांचं काहीच चुकत नव्हतं, कदाचित त्यांना जे वाटत होत त्याची फक्त सुरुवात झाली होती.
आणि एका रात्री आम्ही फोन वर बोलत असताना रात्री चे २-३ वाजून गेले.
गप्पा सुरूच होत्या,
अचानक ती बोलली
“मला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचं होत”
मी “सांग की मग”
ती “कसं सांगू काहीच समजत नाही, कुठून सुरू करू ते”
मी “कुठून पण सुरू कर, जर काही बाकी राहील तर मग तू पुन्हा ते सांगू शकते, आयुष्याला rewind button नसलं तरी आठवणींना असतं.
ती “नको इतकं जड बोलत जाऊस रे”
मी “तुला काय बोलायचं ते बोल ना”
ती “सरळ सरळ सांगते मला तू आवडतो, प्रेम आहे की फक्त आकर्षण ते माहिती नाही”
मी काय बोलणार यावर, ही तर सरासर चीटिंग आहे. माझे संवाद ही का बोलते आहे.
ती “तुझ्यावर तर खूप राग आला होता, पण जेव्हा तुला त्या रात्री कुत्र्यांना घाबरतांना पाहिले तेव्हा खरंच वाटलं किती तू भोळा आहे, तू असं कधीच करू शकणार नाही. त्या वेळी तू माझ्यामागे लपला होता, तेव्हा तुझ्यापेक्षा माझ्या ह्रदयाचे ठोके जास्त वाढले होते, कुत्र्यामुळे नाही तू खांद्यावर हात ठेवल्यामुळे, कुत्र गेल्यावर मागे वळून पाहिले तर तुझे डोळे बंद होते, एखाद लहान बाळ झोपलेलं असतं ना तसाच तू दिसत होता, अस वाटत होत की असच तुला पाहत राहावं कायम. तू माझा हात पकडला होता, खूप जोरात तो दाबला होता म्हणून मी तो सोडवला होता. तुला जर मी आवडत असणार तर तस सांग, नसणार तरी सांग म्हणजे मी पुढे काय करायचं ते मला ठरवता येईल”
मी “मला पण तू आवडते”
मी दरवाजा वाजवला, ईशांत ने तो उघडला.
तो मूर्ख उघडाच असणार आपले पठार सारखे पोट दाखवत, मला त्याची कल्पना होतीच म्हणून मी त्या दोघींना खालीच पार्किंग ला उभ केलं होत. माझ्या रूम मध्ये येऊन माझे अंतर्वस्त्र लपवले. त्याला कपडे घालायची विनंती वजा धमकी देऊन मी मानसी ला कॉल केला आणि तिची वाट बघत दारात उभा राहिलो आणि त्या दोघांना घेऊन सरळ आत गेलो.
रूम मध्ये आल्यावर
ती “मला वाटलं नव्हतं तुझा रूम इतका स्वच्छ असेल, मी येणार समजल्यावर स्वच्छ केली का”
मी “नाही कालच साफ सफाई केली म्हणून नाहीतर आमच्या रूम मध्ये यायची आमचीच इच्छा नसती झाली”
ती आणि तिची मैत्रीण मोठ्याने हसायला लागली. नंतर त्या दोघी फ्रेश झाल्या, त्या जेवण करूनच निघाल्या होत्या असं ती रस्त्यातच बोलली होती.
आम्ही तिघेही बेड वर बसलो होतो, त्या दोन्ही माझ्या पार्टनर च्या बेड वर आणि मी माझ्या.
आम्ही 2BHK flat ला राहत होतो, एका बेडरूम मध्ये २ जण असायचे. मला अजुन पर्यंत माहिती नव्हतं मानसी बरोबर ची मैत्रीण कोण आहे, म्हणून विचारलं.
मी “ही कोण आहे ?”
ती “ही माझ्याबरोबर काम करते, सृष्टी”
ती हिंदी मालिकेची खलनायिका असते ना, अगदी तशीच दिसत होती. आता मानसी ची मैत्रीण आहे म्हटलं, म्हणून तिच्याकडे पाहून हसलो, हाय करत हातचा इशारा केला. माझ्याकडे का आली याच कुतूहल होत मला, म्हणून मी विचारलं
“इकडे कशी,
तर ती म्हणाली “माझ्या एका मैत्रिणीच लग्न आहे, त्याचीच खरेदी करायला आलो होतो”
मी “मग माझ्याकडे कशी ?”
ती “का तुला नाही आवडलं का , की जाऊ आम्ही ?”
मी “नाही, नाही तस म्हणायचं नव्हतं मला पण तू घरी पण जाऊ शकत होती ना”
ती “अरे हो पण मी घरी सांगितले नाही ना मी येणार आहे, घरी गेले की तेच कामात अडकून जाणार बाहेर फिरणं नाही. म्हणून टाळलं मी सांगणं.”
मला अपेक्षा नव्हती आम्ही कधी असे भेटू पण आता अनपेक्षित ची अपेक्षा जास्त करतो मी.
ती बोलत होती “सृष्टी ची एक मैत्रीण होती, ती हो म्हणाली होती. पण नंतर सांगते की आमच्याकडे जागा नाही, तुम्ही दुसरी जागा शोधा.”
मला वाटलेच होते ही सृष्टी खलनायिका असणार नक्की , साधी मदत करणारी एक मैत्रीण पण नाही ठेऊ शकत.
मी “दुसरीकडे कुठे ?”
ती “दुसरीकडे अजुन एक मैत्रीण होती पण तिच्याकडे जायला तर बारा वाजले असते. तू मागच्या वेळी बोलला होता. जवळच राहतो असे, म्हणून तुला कॉल केला.”
मी “बरं केलं”
सृष्टी “मला खूप झोप येते, दिवसभर थकले खूप”
मी “तुम्ही दोघी झोपा इथे मी बाहेर जातो”
ती “तू कुठे जातो आता”
मी “दुसऱ्या बेडरूम मध्ये, का काय झालं”
ती “ही झोपायच म्हणते मी नाही, मला झोप नाही लागली अजुन”
मी “मग ये तिकडे आपण गप्पा करू”
ती “तिकडे नको इथेच, तिकडे तुझा रूम पार्टनर असणार”
मी “तो लवकर नाही झोपत आणि हॉल मधेच झोपणार तो सिनेमा बघत”
ती “ठीक आहे”
मग सृष्टी झोपली आणि आम्ही दोघे दुसऱ्या बेडरूम मध्ये आलो. तिथे मी एका बेड वर आणि ती दुसऱ्या बेड वर फक्त पडलो होतो. झोप कुणालाच येत नव्हती,
मी “तुम्ही पेट्रोल पंप ला काय बोलत होते, मी आलो आणि अचानक शांत झाले तुम्ही”
ती “काही नाही रे, ती मला विचारत होती. फक्त मित्र आहे की अजुन काही”
मी आणि ती दोघं हसायला लागलो.
ती “नंतर मग मी तिला तुझ्याबद्दल सांगत होते.”
मी “काय काय सांगितले”
ती “सर्व काही जे मला माहिती आहे, नको काळजी करू सर्व चांगलच सांगितलं आहे तुझ्याबद्दल.”
मी “तुझी जवळची मैत्रीण आहे का ही ?”
ती “नाही रे, असच तिला पण इकडे तिच्या boyfriend ला भेटायचं होत म्हणून आली.”
मला वाटलेच होते, ही मानसी ची मैत्रीण नसुच शकते.
मी “मग बाकी घरी कसं सुरू आहे ?”
ती “घरी सर्व ठीक आहेत , नीट सुरू आहे सर्व”
तिच्या आवाजात बदल जाणवत होता, अस वाटत होत की ती काहीतरी लपवते आहे.
ती पुढे बोलली “आणि तू पण काय सृष्टी समोर विचारतो घरी का नाही गेली, हो आहे याच शहरात माझं सासर पण तिकडे गेलं की टीपिकल सूनेसारख वागावं लागतं, सासूबाई म्हणते हे नको करू, ते नको करू आणि लवकर पाळणा हलवा सारखं तेच. मी माझ्या नवऱ्याला आधीच सांगितले आहे, मला अजुन वेळ हवा आहे.”

– क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED