ती रात्र - 8 Durgesh Borse द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

ती रात्र - 8

"गावात नवीन पाखरू आलंय"
माझ्या तोंडातून असे शब्द बाहेर पडले, खूप दिवसापासून दाबून ठेवलेल्या आवाजाला आज या मुलीमुळे ऊर्जा मिळाली, काय दिसते आहे ती मुलगी, अशी मुलगी पाहिजे आयुष्यात एकदा एका रात्रीसाठी, मग मेलो तरी चालेल. या श्रेयस मुळ कधी नीट जगता पण येत नाही. याच्या सोबत असण्याचा एक फायदा होतो, याच्या छान बोलण्याने आणि दिसण्याने मला कायम सुदंर सुदंर मुलींचा सहवास लाभला. त्यांच्या स्पर्शाने रात्र रात्र भर माझ्या डोळ्यातली झोप पळवली होती. खूप तोटे होते श्रेयस बरोबर राहण्याचे पण फायदा एकच मुली, मी मुलींसाठी किती पण तोटे सहन करायला तयार आहे. तिने तिचे नाव सांगितले होते, मानसी.
त्या रात्री ती एकटीच दिसली रस्त्यावरून जाताना. मला त्याच्या फायदा करून घ्यायचा होता. तिच्याबरोबर ओळख वाढवायची होती आणि नंतर तिला कस जवळ करायचं त्याची तयारी कायम असते माझ्या डोक्यात, म्हणून मी तिला भीती वाटावी आणि ती माझ्या जवळ यावी म्हणून एक शक्कल लढवली होती. रस्त्यावर दोन कुत्रे बसले होते, तिने त्या कुत्र्यांना मागे टाकले. पण श्रेयस ला काही जमणार नाही म्हणून मीच पुढाकार घेतला आणि एका कुत्र्याच्या शेपटीवर पाय दिला. ते मागे लागले मी तिच्याकडे जाऊन तिच्या मागे लपणार होतो, जेणेकरून ती घाबरणार पण ती तर खूप डेरींगबाज निघाली. जागेवरून जराही हलली नाही, हा भित्रा श्रेयस घाबरला. पण मी कुठे सोडतो हातात आलेला घास, मला स्पर्श हवा होता तीचा मी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या कमरेवर हात ठेवणार होतो पण तितक्यात तिचा हात मध्ये आला, मी तो हात माझ्या हातात घेतला. तिचा तो मऊ हात, तिच्या केसांचा विलक्षण सुवास, मला तिच्या जवळ ओढत होते. मला तिचा हात सोडायची अजिबात इच्छा होत नव्हती. मी डोळे लावून तिच्या बरोबर घालवत असलेल्या क्षणांची स्वप्ने पाहत होतो. पण तितक्यात तिने कुत्र्यांना घालवले, पण श्रेयस ला मधेच जाग आली. नाईलाजाने मला त्या क्षणी तिथून जावे लागले.
नंतरच्या काळात तर विचारायची गोष्ट नाही, मी भित्रा समजणाऱ्या श्रेयस ने तर त्याच्या निरागस चेहऱ्यामुळे तिला चांगलीच मैत्रीण करून घेतली होती. पण असा काही योग आला नाही की मला तिचा तो सहवास पुन्हा लाभेल. श्रेयस च्या चांगुलपणामूळे मी दाबला जात होतो. पण किती दिवस मला ते बांधून ठेवणार होते. पण आनंदाची एक गोष्ट होत होती, मानसी श्रेयस च्या जवळ जवळ येत होती. मला तेच तर हवं होत, तिच्या बरोबर अजुन जास्त वेळ भेटला तर मला जे अपेक्षित आहे ते मी नक्कीच मिळवेल. त्या रात्री श्रेयस आणि मानसी फोन वर उशिरा पर्यंत बोलत होते. तिने या पट्ठयाला प्रपोज केलं, याला काय सांगावं काही समजत नव्हतं, मग मीच स्वतः कसतरी करून श्रेयस ला डावलून , त्याच्या भाषेत तिला, मी पण तिच्यावर प्रेम करतो असं सांगितले. मला तिचा सहवास पाहिजे होता, ती पाहिजे होती. श्रेयस च्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हतं पण मला ती पाहिजे होती. त्याला वाटत असणार तिच्या बद्दल च आकर्षण माझं होत, त्याला तिच्याबद्दल काही भावना नव्हत्याच मुळात, फक्त मला जे वाटत तेच त्याला वाटायचं. पण मला त्याच्यावर , त्याच्या मनावर विजय मिळवता येत नव्हता, त्याच पूर्ण शरीर माझ्या ताब्यात आले की मला वाटणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करून घेईल.
पण मोठा घात झाला, श्रेयस ला आता वाटायला लागलं होत की तो हे सर्व करत नाही, त्याच्याकडून कुणी तरी करून घेत आहे. रात्रभर न झोपलेल्या श्रेयस ने सकाळीच तिला प्रेम करत नाही, आकर्षण आहे वैगरे सांगून. माझ्या प्लॅन वर पाणी फिरवले, मला माहिती नव्हतं की श्रेयस असा काही टोकाचा निर्णय घेईल. पण मानसी ने ही त्याच्या होकरात हो केला. त्या दिवशी मला पहिल्यांदा वाटलं की श्रेयस ला वेडा समजणे आपली मोठी चूक होती, त्याच्या मनात आले तर तो आपल्याला कधीच कोणत्या मुलीकडे जाऊ देणार नाही. त्याचमुळे मी आता खूप विचार करून आणि श्रेयस ल समजणार नाही असं करणार होतो. बरं तर त्या दोघांनी वेळ देण्याचा निर्णय घेतला होता, काहीतरी भाग अजुन बाकी होता माझ्या मनात असलेल्या गोष्टी पूर्ण करणाऱ्या प्लॅन च्या, मानसी आणि श्रेयस अजूनही मित्र होते.जसं जसं श्रेयस आणि मानसी जवळ येत होते, मला जास्त वेळ मिळायला लागला. मी मानसी जवळ असलो की श्रेयस नाही मीच असतो तिच्या जवळ असं मला वाटतं.
एक दिवशी लायब्ररी मध्ये एक परफ्यूम चा सुगंध पसरला होता, त्या सुगंधाच्या मागे मी खूप जास्त आकर्षित होत होतो. मला बघायच होत तो परफ्यूम कुणी वापरला आहे, त्या सुगंधा वरून एखाद्या मुलीचा असेल याची पूर्वकल्पना मला आलीच होती. श्रेयस च्या माध्यमातून मी तिच्या पर्यंत पोहचलो, पण श्रेयस पुढेच चालला होता. थांबायला तयार होत नव्हता, कसं तरी करून बघितले तर एक मुलगी होती. चार पाऊले तिच्या पुढे जाऊन थांबलो, बाजूला पुस्तक बघत उभा होतो. पण मला तिला पहायचं होत म्हणून एकाकी मागे फिरलो, तर माझं काय झालं मलाच समजल नाही. किती सुंदर होती ती मुलगी, मला पहिल्यांदा वेगळाच अनुभव आला. मी बघत असतानाच श्रेयस ला तिने हात वर करून हाय केलं. मला माहिती नाही अशी कोणती परी या वेड्याच्या ओळखीची असणार मी याच विचारात होतो. तो पर्यंत पुढे मानसी होती, तिच्या बरोबर आधी पाहिलेली ती मुलगी, बोलणं झाल्यावर समजले ती मानसी ची मैत्रीण माया होती. सर्व मुली मैत्री करतांना आपल्या सारख्याच सुंदर सुंदर मैत्रिणी बघत असणार म्हणजे एखादा मुलगा बघत असेल तर भांडण नको जास्त, कुणाकडे तरी बघत असणार. पण मी मात्र माया कडेच बघत होतो.
मला मानसी तर पाहिजेच होती, पण आता माया बद्दल पण मला आकर्षण होत. मी आणि माया आता पर्यंत संपर्कात येऊन जवळ आलो होतो. याची कल्पना आता माझ्याबरोबर श्रेयस ला पण येत होती, की माया जवळ येते पण मानसी लांब जाते आहे.
असच एका रात्री माया चा कॉल आला होता, तीच आणि श्रेयस च बोलणं झालं, पण तिच्या बोलण्यावरून वाटत होत की माया ला श्रेयस अर्थात मी आवडायला लागलो होतो. तिच्या रडण्यातून तिच्या बोलण्यातून जाणवत होत की तिला बोलायचं आहे मानसी ने तिला सांगितले असणार की श्रेयस मला आवडतो. म्हणून ती रडत असणार आणि स्वतःला समजावत असणार की श्रेयस नाही प्रेम करू शकला तरी मित्र म्हणून असावा तिच्याबरोबर, पण श्रेयस ला ती गम्मत वाटत होती, मी या गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवलं. आता अशी वेळ आली होती की मी श्रेयस वर जास्त हावी होऊ शकत होतो. रात्री श्रेयस झोपल्यावर मी पुन्हा माया ला फोन केला.
तिने उचलला, “हॅलो , हा बोल श्रेयस”
तिच्या आवाजात अजूनही दुःख दिसत होते.
मी, “मला सांग तुला का इतक्या रात्री माझी आठवण आली, कुणी काही बोललं का तुला ?”
ती, “नाही रे, असच एक स्वप्न पडलं होत म्हणून”
मी, “तुला नाही लपवता येत काही, माझ्या बरोबर खोटं बोलू नको, तुला माझी शपथ”
ती शांत होती, अचानक हुंदके ऐकू येऊ लागले आणि बोलायला लागली “सॉरी”
मी, “का, काय केलं तू”
ती, “मी तुझ्यात आणि मानसी मध्ये येते आहे ना ?”
मी, “नाही, असं का वाटतं आहे तुला ?”
ती, “मला तू खूप आवडतो पण मला लक्षात नाही आले की मी माझ्या मैत्रिणीला धोका देते आहे. तुझ्याबरोबर किती छान बोलत होता, आणि तुझ्यात आणि मानसी मध्ये काही नाही, मानसी ला तू आवडतो पण तुला मानसी नाही, असे ती मागे मला बोलली होती पण तुझ्याबरोबर होत असलेली जवळीक पाहून मानसी ला त्रास झाला, त्यामुळे तिने मला काही वेळापूर्वी कॉल करून सांगितले की तुझ्यापासून दूर राहा, नाहीतर ती तुला माझ्याबद्दल सांगणार होती, माझा भूतकाळ खूप वाईट आहे ”
मला जसं पाहिजे होत अगदी तसच घडलं होत. माया माझ्या प्लॅन मध्ये अडकली होती. पण आता श्रेयस ला काही समजू ना देता तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट ठेवायचा होता. म्हणून मी तिला सांगितले, “मला पण तू खूप आवडते, पण मानसी खूप चांगली मैत्रीण आहे , तिला मी दूर नाही करू शकत म्हणून असा वागतो आहे. तुला मी खरंच आवडत असणार तर मला तुझ्याबरोबर रिलेशन मध्ये राहायला आवडेल.”
तिचे हुंदके एव्हाना बंद झाले होते, ती हसत म्हणली “खरंच, आय लव यू श्रेयु, तुला श्रेयु बोललं तर चालेल ना”
मी, “आय लव्ह यू टू, पण मला तू गुड्डू म्हणत जा , बाकीच्यांसाठी मी श्रेयस तुझ्यासाठी गुड्डू ”
मला माया श्रेयस म्हणून हाक मारत होती, तेव्हा तो श्रेयस आठवतो, ज्याला काहीच येत नाही. हरलेला श्रेयस, त्याला जे आवडत नाही ये मी पण नाही करायचे , का म्हणून . माझं वेगळं अस्तित्व होत आणि ते मी आता सिद्ध करणार, म्हणून माया ला गुड्डू म्हणून ओळख करून दिली.
त्या दिवसानंतर श्रेयस ला समजू नये म्हणून तो झोपल्यानंतर मी माया बरोबर बोलायचो, कालांतराने भेटायचो. तिला एके दिवशी असच माझ्या मनात आले म्हणून बोलून दिले की तुला जॉब लागला तर तुला मी गिफ्ट देईल, पण मला नव्हतं माहिती ती असं काही करेल. खरंच तिला जॉब लागला होता. तिने माझ्याकडे गिफ्ट मागितले, मी तिला सिनेमा बघायला घेऊन गेलो, आणि तिकडे तिला पहिल्यांदा किस केलं. बस या दिवसानंतर माझ्यातील संभोग करण्याची इच्छा वाढत होती, मला तिच्या जवळ जायचं होत.
पण एके दिवशी श्रेयस चुकून तिच्या बरोबरच बोलला आणि माया ने त्याला विचारले सिनेमा साठी तिकीट काढले का, पण बर झालं त्या मुर्खाला काही समजले नाही.
श्रेयस ला समजू न देता मी माया ला हॉटेल ला घेऊन गेलो होतो, माया ला माझ्यावर पूर्ण विश्वास होता, पण तरी ती माझ्याबरोबर झोपायला तयार नव्हती. तू माझ्यावर खर प्रेम नाही करत , माझ्यावर तुझा विश्वास नाही असे फासे फेकले की मुली फसतात आणि माया पण फसकीच. तिने त्या रात्री मला अजिबात थाबवल नाही. मला जे हवं होत ते मला मिळालं होत. आता या रात्रीचे खूप उपयोग होतील, हे मला माहिती होते. म्हणून मी आणि माया ने बरोबर फोटो काढले. तिला वाटत होत की मी तिला फसवेल वैगरे, पण मला काय फरक पडणार होता, फसणार तर श्रेयस होता. मी श्रेयस ला हरवले होते.

– क्रमशः