ती रात्र - 9 Durgesh Borse द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

ती रात्र - 9

त्या दिवशी सर्व इतकं घाईत झालं, मला काही समजलेच नाही. श्रेयस ला खांद्याला लागलेलं होत. तो बेशुद्ध होऊन पडला होता. मी जागा होणार होतो, पण तितक्यात माया आली आणि श्रेयस ला जागं केलं. त्याच्याबरोबर थोड काहीतरी बोलून ती तेथून त्याला अलविदा बोलून निघून गेली. तो दिवस शेवटचा होता माया बरोबर बोलण्याचा, त्यानंतर ती कुठेच दिसली नाही. हो, मध्ये कधी कधी दिसायची पण ती बोलली नाही.
बघता बघता कॉलेज चे दिवस संपले होते, श्रेयस जॉब ला लागला होता, मुलींबरोबर संपर्क नसल्यामुळे, त्याच्यात असणार माझं अस्तित्व कमी होत गेलं. चार पाच महिने झाले त्यानंतर पुन्हा मानसी बरोबर बोलणं सुरू झालं, पण तीच लग्न ठरलं होत. पण आपल्याला काय त्याच, की कुठे तिच्या प्रेमात आहे.
एके दिवशी अचानक मानसीचा कॉल आला.
“Hello, तु कुठे आहे ?”
खूप दिवसांनी तिचा आवाज ऐकुन पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखं वाटलं. ती इथे राहायला येणार असं समजल्यावर अजुन जास्त आनंद झाला.
त्या रात्री ती राहायला आली. मी माझं भान हरवून बसलो. ती आधीपेक्षा कित्तेक पटीने जास्त सुदंर दिसत होती. असं म्हणतात लग्नाआधी हळद लावली जाते ते सौदर्य वाढवण्यासाठी, कदाचित तिच्या हळदीचा गुण आजतागायत तसाच असावा.
मला काही बोलायला जमत नव्हतं, श्रेयस जागा असल्यामुळे मला वेळच मिळत नव्हता. मी खूप जास्त प्रयत्न केला. एक संधी मिळाली आणि मी श्रेयस वर आरूढ झालो. ती तिच्या लग्नाच्या व्यथा सांगत होती, श्रेयस ऐकुन खूप भावूक झाला होता. मी तीच संधी साधली आणि तिचे गाल ओढण्याची परवानगी मागितली. ती वर बघून हसायला लागली होती. यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असेल.
मला ती बोलली की “मला स्पर्श करण्याचा अधिकार आहे अजुन तुला.”
यावर समाधानी राहणारा मी नाहीच, मी पुढाकार घेणार तोच श्रेयस ला जाग आली. कदाचित मानसी च्या स्पर्शाचा परिणाम असेल.
त्या रात्री ती झोपल्यावर मला झोपच येत नव्हती, मी तर प्रयत्न करत होतो, पण श्रेयस स्वतःवर नाही माझ्यावर ताबा ठेऊन होता. समोर एक मुलगी झोपली होती, तिला माझ्या स्पर्शाचा काहीच त्रास नाही तर मी का म्हणून मागे राहावं. पण हा श्रेयस स्वतः खात नाही आणि दुसऱ्याला पण खाऊ देत नाही. किती दिवस अजुन मला थाबवणार श्रेयस संयम सुटणार कधी ना कधी तरी, तो दिवस माझा असणार.
सकाळी उठून सर्व तयारी करून मानसी निघाली होती. खूप छान दिसत होती ती, मी असा शांत बसणार नव्हतो. मी अचानक मागे फिरून तिला किस करणार होतो. पण त्यातही श्रेयस आडवा आला, त्यामुळे तिला मिठी मारून सोडावं लागलं. पण आनंद या गोष्टीचा होता की तिने त्यालाही नकार दिला नाही.
त्याउलट तिने मला घट्ट मिठीत पकडले, माझी सोडण्याची अजिबात इच्छा नव्हती. पुन्हा एकदा श्रेयस मुळे सोडावं लागलं. तिला बस स्टँड ला सोडून श्रेयस पुन्हा रूमवर येऊन झोपला.
माझ्यातली वासना आता खूप वरच्या स्तराला जाऊन पोहचली होती, ती गेल्यानंतर मला शांत राहाव शक्य होत नव्हतं. तिच्याबद्दल माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. ती नव्हती माझ्या सोबत तरी सुध्दा ती माझ्यासोबत आहे याचा मला भास होत होता. जे काही मी मयाबरोबर केलं तसाच काही मी मानसी बरोबर करत होतो पण फक्त मनात, ते मनातल सत्यात उतरवण्यासाठी मी तरफडत होतो. शेवटी मी पुढचे १-२ तास शॉवर खाली जाऊन उभा होतो. मला माहिती नाही त्याने काय होत, पण आग लागल्यावर त्यावर पाणीच ओतलं जातं. मी सुध्दा तेच केलं, पाणी संपले तेव्हा मी बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मी जरा शांत झालो होतो आणि मन हलक झालं. श्रेयस नव्हताच तो केव्हाचा झोपला होता आता मलाही झोप येत होती.
श्रेयस उठल्यानंतर त्याला मानसी चा फोन आला आणि ती पुन्हा आज रात्री रूमवर राहायला येणार होती, यावेळेस ती एकटीच होती.
हे सर्व जेव्हा श्रेयस ने डॉक्टर समोर बसून मॉनिटर वर पाहिले तेव्हा त्याला त्यावर विश्वास बसत नव्हता, सर्व काही त्याच्यासाठी नवीन होत.
श्रेयस, “डॉक्टर, हे सर्व मी कधीच केलं नाही. मला याबद्दल जराही कल्पना नाही, कधीतरी कुणी मला ओढत आहे. माझ्याकडून करून घेत आहे असे मला वाटायचे. पण यात मी बोललेल्या काही गोष्टी मला हलक्या हलक्या आठवतात. पण मी झोपेतून उठल्यावर ते मला स्वप्न आहे असच वाटायचं आणि म्हणून मी त्याचा जास्त विचार कधीच केला नाही.”
डॉक्टर,”तू जेव्हा जागा असायचा तेव्हा तुझं sub conscious mind म्हणजे छोटा मेंदू सर्व गोष्टी लक्षात ठेवायचा आणि तोच सर्व माहिती गुड्डू पर्यंत पोहचवायचा, जेव्हा तू झोपायचा तेव्हा तोच छोटा मेंदू तुझ्यासाठी काम करायचा. त्यामुळे तुला सर्व काही आठवणार पण काहीतरी स्वप्न असल्यासारखं वाटेल.”
श्रेयस, “तुम्हाला कसं कळलं मला असा आहे आजार आहे ?”
डॉक्टर, “जेव्हा तू मला मानसी तुझ्या रूमवर भेटायला आली ते सांगत होता तेव्हा तू भूतकाळाबद्दल पण बोलत होता. एखादी गोष्ट जी आत्ता तुझ्याबरोबर घडली तीच गोष्ट आधी पण घडली असावी किंवा त्यात काही ठिकाणं काही वस्तू आत्ता समोर आल्या त्याच मागे सुध्दा कधी आल्या असाव्यात म्हणून तू कॉलेज मध्ये घडलेलं आयुष्य आणि तुझ्या रूमवर मानसी बरोबर घालवला वेळ दोघं गोष्टी एकत्र करून सांगत होता. काही गोष्टी मला वेगळ्या वाटल्या, तू अश्या काही गोष्टी सांगितल्या ज्या तू केल्या नाही तरी तुझ्यावर त्याचे आरोप होत होते, एक दोन वेळेस ठीक आहे पण तू खूप वेळा तुझ्या गोष्टीत सांगितले की मी नाही केले ते किंवा मला कुणीतरी पुढे करायला भाग पाडत होत. यावरून मी तुझ्यावर काही चाचण्या केल्या त्यावरून हे सर्व समोर आले.”
श्रेयस, “डॉक्टर हे सर्व माझ्याबरोबरच का घडलं ? हा आजार कशामुळे होतो."
डॉक्टर, " एखादी गोष्ट खूप दिवस मनातच राहिली म्हणजे एखाद दुःख, झालेला त्रास, राग इत्यादी जेव्हा खूप दिवस दाबून धरल्या तर तितक्याच वेगाने बाहेर पडतात पण बाहेर पडताना त्या सामान्य नसतात आणि आपल्या मर्यादेला ओलांडणाऱ्या असतात. त्याच भावना एक आपल्यातला दुसरा मी पूर्ण करतो आणि तो सर्व यासाठी जबाबदार असतो. जेव्हा आपण आपल्या भावना दडपून ठेवतो तेव्हा असे काही परिणाम होतात. तुझ्या बाबतीत दोन भावना मला प्रकर्षाने दिसून येतात एक राग आणि दुसरी वासना. तुझ्या बरोबर काहीतरी घडलेलं आहे ज्यामुळे तुझ्यातल्या मी ला बाहेर पडावं लागलं आणि तो अजुनही वासना घालवण्यासाठी पर्याय शोधतो आहे.”
श्रेयस, “हा आजार कसा बरा होणार, यावर काही औषध, काही उपाय ?”
डॉक्टर, “नाही, अश्या आजारावर काहीच उपाय नाही.”
श्रेयस, “पण त्याला बाहेर येण्यापासून कसं काय रोखणार मी, यामुळे माझ्या जवचे सर्व दुरावतील, करणार हा भोगणार मी. त्या रात्री मी नाही झोपेच्या गोळ्या घेतल्या मग त्यानेच घेतल्या असाव्या, तुम्हाला त्याला विचारता येईल का त्या रात्री काय झाले. मानसी का मला काहीच न बोलता निघून गेली, का मी झोपेच्या गोळ्या घेतल्या त्या रात्री काय घडलं, माझ्याबरोबर काय घडल ज्यामुळे मला हा त्रास सहन करावा लागतो ?”
डॉक्टर, “त्याने सर्व काही सांगितले आहे. पण त्याने जे सांगितले ते तुला सहन होणार नाही. म्हणून जे तुला माहिती असणं आवश्यक होत तेच मी तुला सांगितले. पण तू मनाने ठाम असणार आणि तुला ऐकायचं आहे की त्या रात्री काय झालं. तुझी अशी अवस्था कशी झाली तर तुला मी सिडी देतो तुला जेव्हा वाटेल की वेळ आली आहे तेव्हाच बघ”
श्रेयस ला डॉक्टर कडून परत यायला खूप उशीर झाला होता, त्याने ईशांत ला रस्त्यात गाठून बाहेर जेवण करून यायचा निर्णय घेतला. दिवसभर जे काही घडलं त्यामुळे त्याच डोकं खूप दुःखात होत. डोकेदुखी ची गोळी घेतली आणि झोपला. उठल्यावर त्याने डॉक्टर कडून मिळालेल्या पुस्तकातील काही मानसिक खेळ खेळले. त्याला आता बर वाटत होत. त्यामुळे मागच्या सात दिवसापासून ऑफिस ला न गेलेला श्रेयस आज ऑफिस साठी तयार झाला. त्याने बॅग उचलली त्यात रात्रभर चार्जिंग ला असलेला लॅपटॉप टाकण्यासाठी बॅग उघडताच त्याला सीडी दिसली. त्याने खूप विचार केला आणि त्यानंतर निर्णय घेतला की जे काही घडल तो भूतकाळ होता. आता पुढे जायला पाहिजे. त्यासाठी त्याने ती सीडी न पाहताच जाळून टाकली.

– क्रमशः