Ti ratra - 7 books and stories free download online pdf in Marathi

ती रात्र - 7

मी शुद्धीवर आलो तेव्हा माया माझ्या समोर बसली होती. मायाने हळूच मला उठवले आणि एका डेस्क वर बसवले. बॅग मधून पाणी काढले, मला पाजले. मी एका हाताने खांद्याला लागलेली जखम दाबली होती. माया च लक्ष त्याकडे गेलं, तिने तिच्या रुमालाने ती जखम बांधली. माझ्या बाजूला बसली आणि हळुवार पणे तिने माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलं, डोक्यावर हात फिरवत मला बोलली. “श्रेयस तू ठीक आहे ना आता ?”
मी, “हो, पण तू का अशी वागते आहे. मी तुला खूप चांगली मैत्रीण समजत होतो. पण तू का अशी वागली माझ्याबरोबर, मी कधीच तुला प्रेम करतो असं काही बोललो नाही.”
ती, “शांत हो, तुझी काही चूक नाही ये त्यात आणि माझी पण नाही ये. जे काही झालं, कसं झालं त्याच उत्तर मला पण माहिती नाही. तू नसणार माझ्यावर प्रेम करत तर मी समजू शकते पण आपल्यात जे काही झालं ते खोटं नाही ये. मी नाही म्हणत की तू माझा उपयोग करून घेतला आणि मला विसरून चालला. तुला वाटत असेल की तू चूक केली माझ्याबरोबर नात्यात येऊन तर तसे पण मी समजून घेईन. तुला माझ्याबरोबर नाही राहायचं नको राहू. फक्त मी खोटं बोलते किंवा आपण घालवलेले बरोबरचे क्षण खोटे आहेत, असे नको बोलू. तु मला खूप जास्त आधार दिला आहे. आज मी ज्या जागेवर आहे त्याच पूर्ण श्रेय तुला देईन मी. आता नंतर तुझ्याबरोबर कधी भेट नाही होणार पुन्हा, तुला मी असं त्रासात नाही पाहू शकत.”
असं म्हणून तिने माझ्या गालावर हळुवार तिचे ओठ टेकवले आणि बोलली “Thank You for everything”.
मला उठवले, माझ्या हातात पाण्याची बॉटल दिली. ती आता बाहेर जात होती. वर्गाच्या दरवाज्यावर जाऊन ती एकदा मागे वळली आणि आम्ही पहिल्यांदा भेटलो लायब्ररी मध्ये तेव्हा जशी हसून हाय म्हणाली होती अगदी तशीच हसून आता हात फिरवत बाय म्हणाली. त्या दिवसानंतर ती मला पेपर सुरू असताना, एक दोन वेळेस दिसली होती. पण तिने पाहून न पहिल्यासारखे केले. मानसी सुध्दा बोलत नव्हती.
अश्या प्रकारे माझं कॉलेज संपलं होत.
चार – पाच महिने झाले असणार तेव्हा एके दिवशी मी स्वतःहून मानसी ला फोन केला. मला बाहेरून माहिती पडलं होत की ती आयुष्यात खूप पुढे गेली आहे. पण एक चांगली मैत्रीण मी गमावली होती. ती मिळवण्यासाठी म्हणून तिला फोन केला. तिने फोन उचलला, “हॅलो”
मी, “हॅलो, मानसी”
ती, “हो, आपण कोण ?”
मी, “श्रेयस”
ती, “अय्या श्रेया, कसा आहेस, कुठे आहे सध्या.? ”
मी, “मी मस्त , जॉब करतो सध्या मुंबई मध्ये. तू कशी आहे”
ती , “मी मस्त, बरं झालं कॉल केला. अरे माझं लग्न ठरलं, मी विचार करत होते, तुझ्याबरोबर काही संपर्क नाही, कसं काय तुला पत्रिका द्यायची. पण हा तुझाच नंबर आहे ना ? मी तुला WhatsApp करते. तू नक्की ये”
आम्ही अजुन थोडा वेळ बोललो. पण लग्नाची गडबड सुरू होती. म्हणून तिने लवकर फोन ठेवला. WhatsApp वर तिने पत्रिका पाठवली होती. एक महिन्यात तीच लग्न होत, माझ्याकडून तीच लग्न पाहिलं जाणार नाही म्हणून मी तिला सांगितले की ऑफिस च्या कामासाठी बाहेर जातो आहे आणि तेव्हाच शुभेच्छा देऊन टाकल्या.
लग्न झाल्यावर एकदा ती काही कामासाठी मुंबईला आली होती. पण खूप घाईत असल्यामुळे आम्ही थोडा वेळ भेटलो. तेव्हाच तिला मी इथेच बसस्टँड पासून २-३ किलोमीटर वर राहतो असे बोललो होतो.
मग २-३ महिन्यांनंतर त्या दिवशी मला रात्री ९ च्या सुमारास तिचा फोन आला.
“हॅलो, तू कुठे आहे ?”
ती माझ्या जवळ येत होती, पण मी काहीही करून तिला थांब असं म्हणू शकत नव्हतो. माझ्या आतून कुणीतरी ते थांबू नये म्हणून विरोध करत होत. पण मी खूप जास्त प्रयत्न केले, स्वतःला मागे खेचले. मानसी ने लावलेले डोळे उघडले आणि ती भानावर आली. काही तरी चुकीचं घडत होत असं मला वाटायला लागलं होत. रूममध्ये पुन्हा एकदा शांतता झाली होती.
मी ,”सॉरी, चुकून तुझ्या जवळ आलो. मला काहीच समजले नाही काय झालं ते”
ती, “मी पण विसरून गेेले होते, स्वतःला.”
असे म्हणत ती बाजूच्या बेड वर जाऊन झोपली.
मी, “तू गैरसमज करून घेऊ नको, पण मी बाहेर जातो झोपायला आता. नाहीतर काही भयंकर परिणाम होतील”
ती, “नको रे झोप इथेच, मला आहे तुझ्यावर विश्वास. तू नाही करणार तसे काही आणि मी पण सावरेल स्वतःला”
मी, “तुला असेल माझ्यावर, पण मला नाही.”
असे म्हणून मी रूमच्या बाहेर जायला निघालो,
ती बोलली, “मला एकटं एकटं वाटेल, झोप की इथेच, माझी ही शेवटची एकच इच्छा समजून पूर्ण कर, नंतर आपण दोघं एकत्र असं भेटू शकणार नाही.” मी खूप विचार करून पुन्हा मागे फिरलो आणि बेड वर जाऊन झोपलो.
मी मानसी ला “Good Night”.
माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटल मध्ये होतो. माझ्या एका हाताला सलाईन होती आणि समोर ईशांत होता, पण मला समजायला काही मार्ग नव्हता मी इथे कसा काय आलो. रात्री काय झालं काहीच आठवत नव्हतं. मी या अश्या विचित्र अवस्थेत होतो, तरी सुध्दा माझे डोळे मानसी ला शोधत होते.
मी विचारलं ईशांत ला “मानसी कुठे आहे”
ईशांत, “ती कालच सकाळी गेली”
मला धक्काच बसला, मी मोठ्याने विचारलं त्याला
“मी इथे कधीपासून आहे ?”
ईशांत, “काल दुपार पासून”
मी, “मानसी कशी गेली, तुला काही बोलली का ?”
ईशांत, “ती सकाळी तयारी करून बाहेर जात होती, मला सांगितले की श्रेय खूप गाढ झोपेत आहे, खूप दमला असणार. तो उठला की सांग, माझा दादा आला आहे, मी त्याच्या बरोबर गेली.”
मी, “दादा बरोबर गेली तर ठीक आहे जाऊ दे मग”
ईशांत, “मी दुपार पर्यंत वाट पाहिली पण तू स्वतः उठताच नव्हता, नंतर मी खूप प्रयत्न केले. खूप जास्त घाबरलो मी, त्यामुळे तुला हॉस्पिटल ला घेऊन आलो.”
मी, “ठीक आहे, पण मला झालं काय आहे.?”
ईशांत, “तू झोपेच्या गोळ्या घेतो, मला बोलला नाही, खूप वाईट सवय आहे ही, त्या तू जास्त घेतल्या म्हणून तसे झाले. बंद कर आता ती सवय”
मी , “ये वेडा आहेस का, मी नाही घेत झोपेच्या गोळ्या.”
तितक्यात डॉक्टर आले, माझ्याकडे पाहून चौकशी करू लागले, “कसं वाटत आहे ? झोपेच्या गोळ्या का घेतात तुम्ही, कोणत्या डॉक्टर च्या सल्ल्याने घेतात.”
मी, “मी नाही घेत गोळ्या, मला काहीच माहिती नाही.”
डॉक्टर, “ठीक आहे जास्त त्रास करून घेऊ नका, यानंतर अशी चूक करू नका, काळजी घ्या.”
नर्स कडे पाहून डॉक्टर, “यांना उद्या घरी जाऊ द्या.”
असं बोलून डॉक्टर निघून गेले. मला दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा चेकप करून सोडण्यात आले. पण काही दिवस मला खूप वेगळ्या प्रकारची भीती वाटत होती. आतल्या आत काही तरी सुरू आहे असं वाटत होत. मी पूर्ण बरा होऊन ऑफिस ला जात होतो, पण मानसिक दृष्ट्या खूप डीप्रेस झालो होतो. कामात मन लागत नव्हतं, बरोबर झोप येत नव्हती. म्हणून डॉक्टर कडे गेलो, तर त्यांनी सांगितले की मला मानसरोग तज्ज्ञाची गरज आहे आणि तुमचं नाव सुचवलं.

मागचे एक दीड तास झाले. श्रेयस डॉक्टर सबनीस समोर बसून त्याची गोष्ट सांगत होता.
डॉक्टर, “तुला कधीपासून असं वाटतं ?”
श्रेयस, “मानसी गेल्यानंतर पासून”
डॉक्टर, “तसे नाही, म्हणजे तुला कुणीतरी मागे ओढत आहे. किंवा तुला वाटत की तू नाही करत पण चुकून होऊन जात असे”
श्रेयस, “मला लहान पणापासून होत तस.”
बाजूला असलेल्या बेड समोर बोट करत,
डॉक्टर, “तू यावर झोप”
श्रेयस त्यावर झोपला, डॉक्टरांनी त्याला संमोहित केले. हळु हळु श्रेयस झोपेत गेला.
तो उठल्यावर डॉक्टर त्याला बोलले, “तुझ्याबरोबर लहान असताना काही झालं होत का?”
मी, “नाही, का ?”
आपल्या कॉम्प्युटर च्या स्क्रीन ला श्रेयस कडे फिरवत डॉक्टर बोलले, “हे बघा”
श्रेयस ते बघून थक्कच झाला, त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तो त्या स्क्रीन मध्ये स्वतःला पाहत होता, पण त्यात जे काही सुरू होत त्याची श्रेयस ला जराही कल्पना नव्हती की हे सर्व त्याच्याबरोबर केव्हा आणि कधी घडलं.
श्रेयस, “हे काय आहे”
डॉक्टर, “तू आहेस”
श्रेयस, “मला नाही आठवत हे मी काही बोललो असेल असं, मला काय झालं डॉक्टर”
डॉक्टर, “Multiple Personality Disorder किंवा split personality, एका नाण्याच्या दोन बाजू असतात, जेव्हा आपण पहिली बाजू पालटतो तेव्हा आपल्याला दुसरी बाजू दिसते”
डॉक्टर कॉम्प्युटर स्क्रीन कडे बोट करून म्हणाले,
“मी तुझी पहिली बाजू पलटवली, आता दुसरी बघ”

– क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED