June 29, 2061 - Black Night - 6 books and stories free download online pdf in Marathi

२९ जून २०६१ - काळरात्र - 6

अनिच्या ग्लास मधली वाईन संपली. त्याची अजून वाईन घेणायची इच्छा होती. पण काहीतरी आठवल्यासारखा तो हॉलमध्ये आला आणि हंसीकाच्या समोरील खुर्चीवर बसला. हंसीकाच्या समोर असलेल्या नोटबूक मधून त्याने शेवटचं पान फाडलं आणि काळ्या मर्करने काहीतरी लिहू लागला. तो इतक्या घाईत हॉलमध्ये का आला हे बघण्यासाठी सर्वजण त्याच्या मागोमाग आले. तो काहीतरी लिहितोय असं बघून आर्या म्हणाली, “अनि, तू काय करतोयस हे?”

आपली नजर कागदावरच स्थिर करत अनि म्हणाला, “मला तिथं जायला हवं. ज्या अर्थी तिथं लाइट आहे, त्याअर्थी तिथे फोनला नेटवर्क असेल किंवा इंटरनेट कनेक्शन तरी असेल. मी त्यांच्या साठी एक नोट लिहितोय आणि ही नोट मी त्या घराच्या दारावर चिकटवून येणार आहे. मी त्यांना त्यांचा फोन वापरु देण्याची विनंती करतोय. जेणेकरून कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या भावशी कॉन्टॅक्ट करू शकेल. त्यांनी जर तशी असमर्थता दर्शवली तर मी ही नोट चिकटवून परत येईल. दॅट्स इट.”

“यू शुड नोट गो देअर. जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू तिथे आपल्यालाच पहिलं आहे, तर आपल्यासोबत १९८६ च्या घटनेची पुंनरावृत्ती होऊ शकते. तू या कोड्यात फसू नकोस. प्लीज. तुझं तिथं परत जाणं हे आपल्याला संकटात टाकू शकतं.” हंसीका अनिच्या हातातला मार्कर ओढत म्हणाली.

“देअर वी गो. मी तेच म्हणतोय. आपल्याला या सर्कलमध्ये फसायचं नाहीये. आताच काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकू.” असं म्हणत अनिने हंसीकाच्या हातातला मार्कर खेचला आणि नोट लिहायला सुरुवात केली.

रचनाचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि तो जोरात ओरडली, “ओह शिट !!! देअर इज समवन आऊट देअर...”

सर्वांचं लक्ष खिडकीकडे गेलं. त्यांनी पहिलं तेव्हा एक माणूस दरवाज्याजवळ आला आणि लगेच परत फिरून निघून गेला. सगळे विचारात पडले. तो मनुष्य नक्की कोण होता त्याचा विचार करू लागले. तेवढ्यात शौनक हतात हॉकी स्टिक घेऊन दाराजवळ गेला. हंसीका आणि सक्षमने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तो गेलाच. त्याने हळूच दार उघडले. बाहेर डोकावून बघितलं. समोर कुणीच नव्हतं. तो दरवाजा बंद करणार तेवढ्यात त्याला दरवाज्यावर एक कागद चिकटवलेला आढळला.

“काय आहे ते?” सारंगने विचारलं.

शौनक त्या कागदावरचा मजकूर मोठयाने वाचू लागला. तो मजकूर काही असा होता, -

“हॅलो, आम्हाला पाच मिनिटांसाठी तुमचा फोन हवा आहे. एक अर्जंट कॉल करायचा होता. धन्यवाद...”

“काय म्हणतोस?” अनि जोरात किंचाळला. “हॅलो, आम्हाला पाच मिनिटांसाठी तुमचा फोन हवा आहे. एक अर्जंट कॉल करायचा होता. धन्यवाद... सेम अगदी सेम लिहिलंय मी दाखव तो कागद.” असं म्हणत अनिने शौनकच्या हातातून कागद हिसकवून घेतला. तो त्याच्या जागेवर जाऊन बसला आणि तो लिहीत असलेल्या नोटच्या बाजूला दारावर सापडलेला कागद ठेवला आणि ते बघून त्यालाच काय सर्वांना फक्त भोवळ येणं बाकी राहिलं होतं. कारण त्या कागदावरचा आणि अनिने लिहीलेल्या कागदावरचा मजकूर सारखाच होता. एका अक्षराचा देखील फरक नव्हता. इतकंच काय तर कागद, काळ्या रंगाचा मार्कर, त्यावरील अक्षर हे सर्व अगदी शंभर टक्के सारखं होतं. सर्वांची बोलती बंद झाली होती. अनि त्या दोघं कागदांकडे डोक्याला हात लावून बघत बसला होता.

आर्याने दोघं नोट्स बघितल्या. अनिने आता पाच मिंनिटांपूर्वी तिच्यासमोर नोट लिहिली होती. त्यामुळे ती जुनी असण्याची शक्यता नव्हती. तिने दुसरी नोट बघितली. तिच्यावरील शाईचा वास घेतला आणि असं सांगितलं की या कागदावरचा मजकूर फक्त पाच मिंनिटांपूर्वी लिहिला गेलाय.

“कसं शक्य आहे आर्या? आपण सर्वांनी बघितलं बाहेरून कुणीतरी हा कागद आपल्या घराच्या दाराला लावून गेलं आणि तू म्हणतेस की पाच मिंनिटांपूर्वी लिहिलं म्हणे.” सक्षम म्हणाला.

“तोच प्रश्न आहे सक्षम, सगळं काही सारखं आहे.” रचना म्हणाली.

“ते घर आपल्या घरापेक्षा काही वेळ पुढे आहे. तिथला अनि आला होता आणि त्याने दारावर नोट चिकटवली, जशी आपला अनि त्यांच्या दारावर जाऊन चिकटवणार होता.” हंसीका शांतपणे म्हणाली.

“म्हणजे, तुला म्हणायचंय तरी काय हंसीका? मघाशी अनिने जे बघितलं ते खरं आहे? तिथं आपले डुप्लीकेट्स आहेत हे मान्य आहे तुला?” सारंग थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला.

“होय, मला मान्य आहे. हिंदू शस्त्रांनुसार असं मानलं जातं की आपण ज्या पृथ्वीवर राहतो तशा अनंत पृथ्वी अस्तीत्वात आहेत आणि अशा जर अनंत पृथ्वी अस्तीत्वात असतील तर शक्य आहे ती तिथे आपण असू. तिथला आणि इथला वेळ मागे किंवा पुढे असू शकतो फक्त.” हंसीका खुर्चीवर बसत म्हणाली.

“तुझ्याजवळ काही पुरावा आहे का?” रचना हंसीकाला चिडवण्याच्या उद्देशाने बोलली.

“माझ्याजवळ पुरावा आहे. पण आता तो माझ्या घरी आहे. ते काही जुने आणि अतिशय दुर्मिळ ग्रंथ आहेत. त्यात या बाबींचा सविस्तर उल्लेख केलेला आहे आणि शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या त्या ग्रंथांवर माझा विश्वास आहे.” हंसीका ठामपणे म्हणाली.

रचना हंसीकाला चिडवण्याच्या उद्देशाने बोलली हे अनिच्या लक्षात आलं. तो म्हणाला, “ही वेळ भांडण्याची नाहीये. आपल्याला शांततेत या समस्येवर उपाय शोधायचा आहे. त्यामुळे प्लीज....”

त्याचं बोलणं पूर्ण होतं न होतं तोच शौनक म्हणाला, “असं तर नाही ना की कुणी मुद्दामहून आपली मजा घेतंय? कुणीतरी आपल्या सर्वांच्या ओळखीचं?”

“का नाही, असू शकतं.” सक्षम म्हणाला.

“नाही तसं काहीही नाही. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. त्या बॉक्समध्ये आपले फोटो आहेत. तिथपर्यंत ठीक आहे. पण सारंगचा फोटो, त्याच्यावर तर आजची दिनांक आहे आणि या सर्वांत कळस म्हणजे ती दारावर चिकटवलेली नोट..... ती नोट आणि मी लिहिलेली नोट या अक्षरशः एकच आहेत. त्यामुळे प्लीज तुम्हाला माहिती नसेल तर हंसीका जे काही सांगतेय ते निदान ऐका तरी.” अनिने त्याचं मत स्पष्टपणे व्यक्त केलं.

सर्वजण हंसीका समोर बसले आणि हंसीका बोलायला लागली, “श्री योग वाशिष्ठ ऋषींचे या विषयावरील बोल काहीसे असे आहेत. – या असीम चेतनेच्या अनिवार्य स्वरूपामुळे अनंत ब्रह्मांड पुन्हा पुन्हा उद्भवत असतात आणि लय पावत असतात. हे सर्व अनंत काळापासून अविरतपणे सुरू आहे. नाभीकमलामधून असंख्य ब्रम्हदेव उत्पन्न झालेले आहेत. त्यामुळे असंख्य ब्रह्मांड, असंख्य सूर्यमाला अस्तीत्वात आहेत. एकवेळी सूर्याच्या किरणांना मोजणं सोपं जाईल परंतू आता या क्षणी अस्तीत्वात असलेल्या ब्राहमंडची संख्या सांगणं केवळ अशक्य आहे. मी या गोष्टीचा अभ्यास करण्याचे ठरवले आणि समाधी अवस्थेत गेलो, तिथे मी असंख्य ब्रह्मांड बघितली. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता. तरीही सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. थोड्याफार वेळेच्या फरकाने काही गोष्टी तशाच किंवा निराळ्या पद्धतीने होत होत्या.”

एवढं बोलून हंसीका थांबली. सर्वजण उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते. जणू काही तिचं म्हणणं त्यांना पटलं होतं. तिने परत बोलायला सुरुवात केली, “याशिवाय अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत, भागवत महापुरणात श्री विष्णुंचे तीन प्रकार संगितले आहेत – माही, गर्भोदकाय आणि क्षिरोदकाय....”

“यापैकी गर्भोदकाय विष्णु म्हणजे माही विष्णूचा विस्तार. आणि क्षिरोदकाय विष्णु म्हणजे गर्भोदकाय विष्णूचा विस्तार... पहिले म्हणजे माही विष्णु भौतिक विश्वाचा विस्तार करतात. गर्भोदकाय विष्णु सर्व विश्वांमध्ये विविधता निर्माण करतात आणी क्षिरोदकाय विष्णु त्या प्रत्येक विश्वामध्ये सर्वव्यापी म्हणून ओळखले जातात. चराचरात त्यांचे अस्तित्व असते. माही विष्णु अनंत गर्भोदकाय विष्णू निर्माण करतात आणि गर्भोदकाय विष्णू अनंत क्षिरोदकाय विष्णू. हे प्रत्येक विष्णू नाभीकमलातून अनंत ब्रह्मा निर्माण करतात आणि हेच अनंत ब्रह्मा अनंत ब्रह्मांड निर्माण करतात. एका ब्रह्मांडात आपल्यासारख्या किती दीर्घिका आणि त्या दीर्घिकांमध्ये किती आकाशगंगा आहेत हे कुणीच सांगू शकत नाही. म्हणूनच अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा जयजयकार करताना म्हणतात - अनंतकोटी ब्रह्मांडनायक .....!!!”


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED