June 29, 2061 - Black Night - 8 books and stories free download online pdf in Marathi

२९ जून २०६१ - काळरात्र - 8

“ह्या कागदावर माझ्या भावाच्या नोट्स आहेत. ज्या तो लेक्चरसाठी म्हणून काढून ठेवतो. यात त्याने डिकोहेरन्स आणि श्च्रोडिंगर्स कॅट बद्दल माहिती लिहिली आहे. तुम्हाला श्च्रोडिंगर्स कॅट बद्दल काही माहिती आहे का? जाऊ द्या, मीच सांगतो. बेसिकली तो एक थॉट एक्सपरिमेंट आहे. एका बॉक्स मध्ये एक मंजर ठेवलेली असते आणि तिच्या जगण्याची आणि मारण्याची शक्यता ही पन्नास – पन्नास टक्के असते. कारण त्या बॉक्समध्ये रेडियो अॅक्टिव्ह पदार्थ ठेवलेले असतात. या गोष्टीवर रेग्युयलर फिजिक्स असं म्हणतं की बॉक्समधली मंजर एकतर जगेल किंवा मरेल पण क्वंटम फिजिक्सच्या नियमानुसार असं नसतं. मांजराच्या जगण्याची किंवा मरण्याची शक्यता या दोन्ही गोष्टी एकाचवेळी अस्तीत्वात असतात. पण जेव्हा तुम्ही तो बॉक्स ओपन करतात तेव्हा ह्या दोन्ही शक्यता एकाच एव्हेंटमध्ये बदलतात.” एवढं बोलून अनि थांबला आणि त्याने पान उलटलं व मनातच वाचू लागला. त्याचं वाचून झालं त्याने काही वेळ डोळे बंद करून विचार केला आणि समोर असलेल्या सर्वांकडे नजर स्थिर करून म्हणाला,

“त्याने पुढे लिहिलं आहे की, अशीच अजून एक थेअरी आहे. दोन शक्यता किंवा स्थिती ह्या एकाच वेळी स्वतंत्रपणे अस्तीत्वात असतात, त्या एकमेकांपसून अलिप्त म्हणजेच डि-कोहेरंट आणि वेगळ्या असतात. त्यातली प्रत्येक शक्यता ही अस्तित्वाची एक वेगळी आणि सेप्रेट ब्रांच निर्माण करत असते. म्हणजेच क्वंटम डि-कोहेरंट आपल्याला या वेगवेगळ्या शक्यतांपासून वेगळं ठेवतं. ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. म्हणजेच जर एका बॉक्स मध्ये मंजर जीवंत असेल तर दुसर्‍या बॉक्स मध्ये मंजर मेलेली आढळते. कारण तिच्या जगण्याच्या आणि मारण्याच्या ह्या दोनच शक्यता असतात, त्यामुळे क्वंटम डि-कोहेरंट नुसार त्या मांजरीच्या जगण्याच्या किंवा मारण्याचा त्या ठिकाणच्या रियालीटीवर काहीही फरक पडत नाही. कारण दुसरी रियालिटी अस्तीत्वात आहे हे त्यांना माहितीच नसतं.”

“ओह माय गॉड. तू काय बोलतोयस? मला काहीच समजत नाहीये.” दोन्ही हातांनी डोकं गच्च धरत सारंग म्हणाला.

“म्हणजे आपण एका बॉक्समध्ये अडकलो आहोत आणि आपण मांजर आहोत. आपण आता जिवंत किंवा मेलेलो आहोत. बरोबर ना?” सक्षम म्हणाला.

“आणि हंसीकाच्या म्हणण्यानुसार आज अवकाशात काहीतरी वेगळी स्थिती आहे. त्यामुळे धूमकेतू पास होईपर्यंत डिकोहेरंट जे आपल्याला सर्व रियालिटीज पासून वेगळं ठेवतं ते काम करणार नाही.” सारंग म्हणाला.

“एझॅक्टली, यू आर राइट. दॅट्स व्हाट आय एम ट्राईंग टु टेल यू पीपल्स.” अनि म्हणाला.

“पण मग ते दुसर्‍या रियालिटी मधले लोकं म्हणे आपणंच आपल्याशी कॉन्टॅक्ट का करत आहेत? हा बॉक्स, याच्यातले फोटो, त्यामागचे नंबर्स काय दर्शवतात? हे सर्व काय आहे?” हंसीका म्हणाली.

“त्या घरातल्या लोकांनी आपल्याला मारण्याआधी आपण त्यांना मारायला हवं. निदान काहीतरी अर्धमेला तरी करायला हवं.” सक्षम संतापात म्हणाला.

“मूर्खपणा करू नकोस सारंग. तू असं काहीही करत नाहीयेस.” शौनक म्हणाला.

“सगळ्यात आधी जेव्हा लाइट गेली तेव्हा आपल्याला एका घरात प्रकाश दिसला. तेव्हापासून हे सगळं सुरू झालं आणि तो बॉक्स कदाचित आपल्यासाठी नसेल.” आर्या म्हणाली.

“असं सुद्धा असू शकतं की दुसर्‍या रियालीटी मध्ये आपण आता असाच संवाद आपल्याशी साधत असू. म्हणजे आपण आता एकमेकांच्या रियालीटीत मिक्स होतोय.” अनिने सांगितलं.

“शक्यता आहे.” हंसीका म्हणाली.

“म्हणजे त्या हॉलीवूड मूवी स्लायडिंग डोअर्स सारखं. त्यातल्या नायिकेला सब-वे पकडायला काही सेकंद उशीर होतो आणि ती वेगळ्याच जगात पोहोचून जाते.” रचना म्हणाली.

“येस, एझॅक्टली. सेम. द सेम थिंग वी आर एक्सपिअरींसिंग नाऊ.” अनिने सापष्टीकरण दिलं.

“असं असेल तर आपण फक्त बसून काय करतोय.” सक्षम म्हणाला.

“एक मिनिट....., सक्षम आणि मी जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा सक्षमने हा बॉक्स आणला होता. हे सर्व तिथूनच सुरू झालं. म्हणजे आपण जर हा बॉक्स जिथून आणला तिथं ठेवला तर सर्व पाहिल्यासारखं होईल.” अनिने बॉक्स उचलत म्हटलं.

“शांत बस अनि. आपण असं काहीही करणार नाही. माझा त्या घरातल्या लोकांवर मुळीच विश्वास नाहीये. त्यामुळे बॉक्स इथेच राहील.” सक्षम म्हणाला.

“तू असा विचित्रपणा का करतोयस?” अनि म्हणाला.

“आपल्याला त्या घरातल्या लोकांशी काहीही भांडण किंवा मारामारी करायची नाहीये. ते कदाचित आपल्यासारखेच माणसं असू शकतात. ते जर सनकी किंवा क्रूर असते तर त्यांच्या समोर त्यांच्या हुबेहूब आकृत्या बघून पाळले नसते.” सारंगने अंदाज व्यक्त केला.

“मला ते काहीही माहिती नाही. मी त्यांना मारणार. मला हे माझं आयुष्य जसं आहे तसं आवडतंय.” सक्षम त्याच्याच धुंदीत आणि आवेशात बोलत होता.

“ठीक आहे. तू जर असंच करत असशील तर तिथे जाऊन सगळ्यात आधी कुणाला मारशील?” हंसीकाने सक्षमजवळ जात विचारले.

“तुलाच मारशील. कारण तूला माहितीये की तुझ्याएवढी ताकद फक्त तुझ्यातच आहे. कारण कॉलेजला असतानापासून तुझी जिम आणि बॉडी बिल्डिंग सुरू आहे. त्यामुळे आपल्या सर्वांत तुला तूच तुल्यबळ आहेस. बरोबर. मग यात जिंकेल कोण? तुलाच तू मारल्यावर कोण जिंकेल? सांग ना मला. तू जेव्हा खिडकीतून बघितलं होतंस तेव्हा तिथे तुला तू दिसला होता का?” हंसीका सक्षमल समजावणीच्या सूरात म्हणाली.

“नाही, मी तिथं मला बघितलं नाही.” सक्षम वैतागून म्हणाला.

“चल ठीक आहे, पण मी जर वाईन पित असलो तर, एका सेकंदासाठी विचार करा. सर्वकाही संपलंय. तो सारंग वाईन पिऊन मला, तुला आणि सगळ्यांना मारण्याआधी काहीतरी करावं लागेल. मी जास्त वेळ वाट नाही बघू शकत. कारण मी इथं जो विचार करतोय तिथला मीसुद्धा असाच विचार करत असेल.” सक्षम डोक्याला हात लावत म्हणाला.

“ओह गॉड, तू त्या घरात कुणाकुणाला बघितलं होतंस?” रचना म्हणाली.

“मी त्या घरात शौनक, हंसीका, आर्या, रचना, नीलिमा आणि सारंग आणि मला बघितलं होतं.” सक्षम म्हणाला.

“म्हणजे तिथं तिथं अनि नव्हता?” रचना अनिकडे बोट दाखवत म्हणाली.

“नाही.” सक्षम उच्चारला.

“आता इथे नीलिमा नाहीये. ती झोपलीये. म्हणजे त्या घरात अनि झोपला असेल आणि जर तिथे अनि झोपला असेल तर आता आपलं जे संभाषण सुरू आहे ते तिथं होत नसेल. कारण अनिचा भाऊ तिथं प्रोफेसर असल्यामुळे आपल्याला हे माहिती आहे.” रचना डोळे मोठे करत म्हणाली.

“वेट, वेट, वेट, आपण जर त्या घरातल्या अनिच्या गाडीतून ते पुस्तक काढून घेतलं तर.” सक्षम म्हणाला.

“ग्रेट, जर तशी शक्यता असेल तर आपण गाडीतून पुस्तक काढून घेऊ.” आर्या म्हणाली.

“अनि, गाडीच्या चव्या दे.” सक्षम अतिउत्साहात म्हणाला.

“नो, नेव्हर. आपण तसं काहीच करू नये असं मला वाटतं. आपण या प्रकारची सुद्धा रिस्क नको घेऊयात. काहीही झालं तरी आपण शांतपणे इथंच बसून राहू. म्हणजे जे आयुष्य आधी सुरू होतं तेच आता आणि पुढेसुद्धा सुरू असेल. तू माझ्या गाडीच्या चव्या घेत नाहीयेस.” अनिने दरडवले.

सक्षमने अनिचं बोलणं ऐकून घेतलं आणि तो काही वेळ शांतपणे उभा राहिला. केव्हापासून सुरू असलेल्या या उच्चकोटीच्या संभाषणाला ब्रेक लागला आणि शांतता पसरली. ही शांतता भयाण आणि असह्य होती आणि रात्र तर वैर्‍याचीच होती. शब्दशः वौर्‍याची. सक्षमने घड्याळाकडे बघितलं, रात्रीचा एक वाजला होता. तो मागे वळला आणि बेडरूमकडे जाऊ लागला. आर्या त्याला कुठे चाललास? असं विचारणारच होती. पण तिला आठवलं की सक्षम नीलिमाला उठवायला जात असेल. त्यामुळे ती शांतच बसली.

“असं असू शकतं की ते आपले डार्क व्हर्जन असू शकतात. त्या असुरमध्ये दाखवल्यासारखं... आपण इथे चांगले आहोत काय खात्री आहे की ते चांगलेच असतील?” रचनाने प्रश्न उपस्थित केला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED