June 29, 2061 - Black Night - 3 books and stories free download online pdf in Marathi

२९ जून २०६१ - काळरात्र - 3

“ओह, अरे मी तुला सांगायला विसरले. चल.” असं म्हणत हंसीका शौनकला हॉलमध्ये घेऊन आली आणि तिचा फोन शौनकच्या हातात दिला.

“ओह शिट, कसं झालं?” सक्षम म्हणाला.

हंसीका बोलण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात परत एकदा दारावरील बेल वाजली. नीलिमाने दार उघडलं. सारंग आणि रचना आले होते. ते दोघं घरात आले आणि सर्वांच्या चेहर्‍यावर एक समाधानाची झलक पसरली. निलीमाने भिंतीवरील घड्याळाकडे बघितले आणि म्हणाली, “साडेदहा, ओह माय गॉड साडेदहा..... सहा वाजता भेटणारे आठ लोकं साडेदहा वाजता भेटताहेत. चला आता लवकर करा.”

“येस, चला आता. सर्वजण आले. जेवताना बोलूयात.” असं म्हणत आर्याने नीलिमाला दुजोरा दिला आणि ती किचनकडे वळली.

हॉलमध्ये असलेल्या डायनिंग टेबलच्या अवतीभोवती सर्वजण बसले. त्या आयतकृती डायनिंग टेबलच्या एका हेडला हंसीका बसली होती. आर्याने सर्वांकडे बघत एक लाघवी हास्य केले आणि रेड वाईनची बॉटल ओपन केली. आठ वाईन ग्लास एका ओळीत ठेवले होते. त्यात ती लाल रंगाची वाईन ती सावकाशपाणे आणि सांभाळून ओतू लागली. हंसीकाच्या डाव्या बाजूला सक्षम बसला होता आणि उजव्या बाजूला शौनक. सक्षमच्या बाजूला आर्या आणि तिच्या समोर सारंग होता. दुसर्‍या हेडला नीलिमा बसली होती, तिच्या डाव्या बाजूला अनि आणि उजव्या बाजूला रचना बसली होती. वाईन ओतून झाली. एकेक ग्लास पास होत होत सर्वांसमोर ठेवला गेला. आता स्टार्टरची वेळ होती. स्टार्टरमध्ये ऑलिव्ह मॅगझीन आणि ब्राउनी होतं. भरपूर वेळ झाला असल्याने सर्वांना खूप भुका लागल्या होत्या. त्यामुळे आधीची पाच मिनिटं सर्वांनी स्टार्टरवर कॉन्सनट्रेट केलं. मग पोटात पडल्यावर त्यांना बोल फुटू लागले.

“नाईस मॅगझीन आर्या,” अनि आर्याकडे बघत म्हणाला.

थॅंक्स, पण मॅगझीन नीलिमाने बनवलं आहे.” आर्या निलीमकडे बोट दाखवत म्हणाली. मग बाकीच्यांनी मॅगझीनची स्तुती केली आणि इतर विषयांवर गप्पा वळल्या. हंसीका आळीपाळीने शौनक आणि रचनाकडे कटाक्ष टाकत होती. पण शौनकला प्रचंड प्रमाणात भूक लागली असल्याने तो खाण्यात गर्क होता. सक्षमचीसुद्धा काही वेगळी स्थिती नव्हती.

“सक्षम तू दाखवलं नाहीस तुला कुठं लागलं होतं ते?” रचना सक्षमकडे बघत म्हणाली.

“मला? मला कुठे काय लागलं होतं.” सक्षम काहीसा डोळे मोठे करत म्हणाला.

“अरे तूच सांगितलं होतं ना, आठवडाभरपूर्वी तू जिमला गेलेलास तेव्हा काहीतरी लागलं होतं न तुला?” सारंगने रचनाला पाठिंबा दिला.

“नाही रे, असं काहीच झालं नाही.” सक्षम स्पष्टीकरण देत म्हणाला.

सारंग आणि रचना एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले. दोघं गोंधल्यागत वाटत होते. इतक्यात सक्षमने रचनाला विचारलं, “अगं तूच संगत होतीस ना तू टेनिस कोर्टवर पडलीस ते. तू तर मला फोटोसुद्धा पाठवलेलेस.”

रचना आणि सारंग सक्षमकडे अतिशय आश्चर्यचकित होऊन बघू लागले.

रचना म्हणाली, “नाही रे. मी तर कधी टेनिस कोर्टवर गेलीच नाही. मग पडणार कुठून?”

नेमकं खोटं कोण बोलतंय हे कुणालाच कळत नव्हतं. उरलेले सर्वजण एकमेकांकडे बघत होते. पण तसं पाहायला गेलं तर सक्षमने रचना पडल्याचं आर्याला सांगितलं होतं. आर्या यांच्यात पडण्याच्या विचारात होती. तिने अनिकडे बघितलं. अनिने वाईनकडे बोट दाखवलं. आर्या समजायचं ते समजली. रचना आणि सारंगला वाईन चढली असावी असं सर्वांना वाटत होतं. पण वास्तविक स्थिती वेगळी होती. नीलिमाने काहीतरी वेगळा विषय काढून त्यांचं सुरू होणारं भांडण थांबवलं आणि गप्पांचा रूळ बदलला. परत एकदा गप्पा आणि डिनर सुरू झालं. थोड्या वेळातच अनिचा फोन व्हायब्रेट झाला. त्याने खिशातून फोन काढेपर्यंत व्हायब्रेशन बंद झालं होतं. त्याने फोनकडे बघितलं आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. हातातला फोन हंसीकाला दाखवत तो जवळपास ओरडलाच, “हंसीका, बघ...”

अनिच्या आवाजाने सगळे जण दचकले आणि त्याच्या फोनकडे पाहू लागले. त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. अनिच्या फोनची स्क्रीन फुटली होती. अगदी हंसीकाच्या फोनची होती तशीच अनिच्या फोनची स्थिती झाली होती. हंसीकाने तिच्या पर्समधून तिचा फोन काढला आणि टेबलवर ठेवला. अनिच्या हातात त्याचा फोन होता. सर्वजण आश्चर्यचकित होऊन दोघं फोनकडे बघत होते. शेवटी हंसीकाने पुढाकार घेत कोंडी फोडली. ती म्हणाली, “नाऊ आय कन्फर्म. हे सर्व हॅलेच्या धूमकेतूमुळे होतंय.”

“व्हॉट? व्हाट यू मीन बाय हॅलेच्या धूमकेतूमुळे होतंय.” शौनक हंसीकाकडे बघत म्हणाला.

"ब्रम्हंडात जी काही गोष्ट घडते तिला काही ना काही कारण असतंच असतं. काहीही न करता आमचा दोघांचा फोन खराब होण्यामागेसुद्धा काहीतरी कारण आहे." असं बोलताना हंसीकाचा चेहरा गूढ वाटत होता.

“हंसीका, तुला माहिती असेल तर सांग ना यार लवकर. का असं काहीतरी अगम्य बोलून आमची उत्सुकता शिगेला पोहोचवतेयस?” सक्षम हंसीकला विनवणीच्या सूरात म्हणाला.

“आज सिंहस्थ कुंभमेळा आहे. म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार ही घटना शुभ आहे. कारण सूर्याच्या भोवती फिरणारे सर्व ग्रह आज एका सरळ रेषेत आलेले आहेत. त्याचप्रमाणे आज पृथ्वीच्या जवळून हॅलेचा धूमकेतू जाणार आहे. धूमकेतूचं पृथ्वीजवळून जाणं आमच्या शास्त्रात थोडं निगेटिव्ह मानलं गेलं आहे. हॅलेचा धूमकेतू पृथ्वीजवळून पास होताना काही अदृश्य रेडिएशन्स म्हणजे किरणं प्रसारित करतो. ही रेडिएशन्स बर्‍याच गोष्टींवर परिणाम करत असतात. फिजिकली आणि मेंटलीसुद्धा. त्यातल्या त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हॅलेचा धूमकेतू हा दर ७५ वर्षानी पृथ्वीवरून जात असतो.” एवढं बोलून हंसीका थांबली. सर्वजण तिच्याकडे काहीशा आश्चर्याच्या नजरेने बघत होते.

रचनाला तिचं म्हणणं पटलं नव्हतं बहुतेक. तिने हंसीकाला विचारलं, “म्हणजे धूमकेतूमुळे तुझा आणि अनिचा मोबाईल खराब झाला असं म्हणायचं आहे का? पण काहीतरी बिघाड होऊन मोबाईलला प्रॉब्लेम आला असेल असं होऊ शकतं ना. हा केवळ योगायोग की आज एकाच दिवशी असं झालं.”

“नाही, मी खात्रीशीर सांगू शकते की हा धूमकेतूचाच परिणाम आहे. आर्या किंवा सक्षम तुमच्यापैकी एकाने प्लीज तुमच्या बेडरूममध्ये असलेल्या लॅपटॉपवर इंटरनेट कनेक्शन आहे का बघा.” हंसीकाच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. तिच्या सांगण्यानुसार आर्या उठली आणि बेडरूममध्ये ठेवलेले लॅपटॉप चेक केला, त्यात इंटरनेट कनेक्शन नव्हतं. तिने कनेक्शन नसल्याचं सांगितलं तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. परत रचनाने शंका उपस्थित केली, “कदाचित काही प्रॉब्लेम असेल.” तिला शौनक आणि सारंगने दुजोरा दिला.

हंसीकाने परत सांगायला सुरुवात केली, “मागील वेळी म्हणजे १९८६ ला हॅलेचा धूमकेतू पृथ्वीवरून जात होता, तेव्हा लोकांना विचित्र अनुभव आले होते. काहींनी आपली मानसिक स्थिती गमावली होती तर काहींचे अनुभव हे खरंच विश्वास न बसण्यासारखे होते. मागील वेळी जेव्हा हॅलेचा धूमकेतू पृथ्वीवरून जात होता, तेव्हा त्याचा केंद्रबिंदू हा ‘डेन्मार्क’ इथं होता. धूमकेतू पास झाल्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी तिथे राहणार्‍या एका महिलेने पोलिसांत तक्रार केली की तिच्या घरात असणारा मनुष्य हा तिचा पती नाहीये. पोलिस या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते कारण त्या मनुष्यकडे त्या महिलेशी लग्न केल्याचा पुरावा म्हणून फोटो होते. ती महिला पोलिसांच अजिबात ऐकून घ्यायला तयार नव्हती. कारण तिच्या म्हणण्याप्रमाणे तिने काल रात्रीच तिच्या पतीचा खून केला होता. तरीही पोलिसांनी त्या महिलेला अटक केली नाही, कारण त्या मनुष्यजवळ लग्न केल्याचा पुरावा होता आणि तिने कुणाचा खून केल्याचे निष्पन्न होत नव्हते. विचित्र आहे नाही का?”

हंसीकाची ही गोष्ट सर्वजण अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. त्यांनी जेवण थांबवून अगदी एकटक होऊन तिचं म्हणणं ऐकलं होतं. एकवेळ दुसर्‍या कुणी असं म्हटलं असतं तर त्यावर विश्वास ठेवला नसता पण हंसीका न्यूमरोलॉजिस्ट आणि अॅस्ट्रोलॉजिस्ट असल्यामुळे तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. तिचं बोलणं झालं तरीही सर्वजण तिच्याकडे रोमांचित नजरेने बघत होते. कुणीच काहीच बोलत नव्हते. तेवढ्यात अनिने बोलायला सुरुवात केली तेव्हा सर्वांच्या नजारा तिकडे वळल्या, “हंसीकाचं म्हणणं खरं आहे. मागील वेळी म्हणजे १९८६ च्या आधी १९११ ला जेव्हा धूमकेतू पास झाला होता तेव्हा त्याचा केंद्रबिंदू इजिप्तमध्ये होता. तेव्हा तेथील काही लोकांना असेच विचित्र अनुभव आले होते. एकाच घरातल्या तीन व्यक्तींनी एकमेकांना ओळखणे बंद केले होते आणि जोरात भांडण करत होते. पुढे काय झालं काय माहिती पण ते विचित्र वागत होते हे मात्र खरं होतं.”


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED