June 29, 2061 - Black Night - 14 books and stories free download online pdf in Marathi

२९ जून २०६१ - काळरात्र - 14

“अजून ऐक, अनि आणि सक्षम हे तिसर्‍या विश्वातले आहेत. त्याने आताच तुझा फोटो काढला. त्याचा फोन खराब नाहीये. तुला आठवत असेल आपण डिनर सुरू करतानाच त्याच्या फोनच्या स्क्रीनला प्रॉब्लेम झाला होता आणि फोन बंद झाला होता.” सारंगने हातातला वाईन ग्लास खाली ठेवला आणि गंभीर मुद्रेने हंसीकाकडे बघू लागला.

“तुला तो काळोख म्हणजे डार्क एरिया आठवतोय का? ज्याच्यातून आपण पास झालो होतो, मला असं जाणवलं की त्या एरियामधून जो कुणीही पास झाला तो वेगळ्याच विश्वात पोहोचला आणि जो त्या काळोखातून पास झाला तो त्याच्या मूळ विश्वात कधीही परत जाऊ शकत नाही आणि मला असं वाटतं की आपण धूमकेतू पास होईपर्यंत आपलं खरं विश्वं शोधण्याचा प्रयत्न करावा कारण धूमकेतू पास झाला तर आपण इथे कायमचे अडकून जाऊ आणि मला इथं आयुष्यभरासाठी अडकायचं नाहीये.” हे बोलताना हंसीकाच्या डोळ्यात पाणी तरारलं होतं.

“जर तुझी थेअरी खरी असेल, जर आपण डार्क एरियामधून पास झालो असू आणि आपल्याला आपल्या मूळ ठिकाणी जाणं अशक्य असेल तर आपण इथंच थांबवं असं मला वाटतं. आपण अडकलोय इथं.” वाईन बॉटलकडे एकटक बघत सारंग म्हणाला.

त्याचं असं बोलणं सुरू असताना बॉक्स ठेवायला गेलेला शौनक परत आला आणि म्हणाला, “मी गेटजवळ बॉक्स ठेऊन आलोय. सर्वजण इथेच थांबा, सर्वकाही ठीक होईल.”

इतक्यात दारावर टक टक झाली. अनि दार उघडायला जाणार तोच शौनक त्याला म्हणाला, “नो, डोन्ट ओपन इट. हू इज दॅट? स्टे अवे फ्रॉम डोर. ते दुसर्‍या विश्वातले अनि आणि सक्षम असू शकतात, फोन मागायला आलेले किंवा फक्त अनि असू शकतो. मेसेज चिकटवयाला आलेला.”

अनि दाराजवळ उभा राहिला. त्याने बघितलं, दरवाज्याच्या खालून एक कागद घरात सरकवण्यात आला होता. त्याने तो कागद हातात घेतला आणि मोठयाने वाचायला सुरुवात केली, “सारंग…”

“ओह, फक मी.” सारंगने स्वतःच्या हाताने कानशिलात लगावत म्हटले आणि डोक्याला हात लावून जमिनीवर बसला.

अनिने पुढे वाचायला सुरुवात केली, “सारंग माझ्या मित्रा. हे काय आहे? नीलिमा प्लस बुक इक्वल्स टू लोणावळा क्लब.”

“हे काय आहे?” अनिने विचारलं

“ही जस्ट एक नोट आहे. ही सारंगची मूर्ख आयडिया होती. तो ही नोट दुसर्‍या घरी ठेऊन येणार होता. म्हणजे त्या घरातील लोकांना अनिच्या गाडीतील पुस्तक घेण्यापासून रोखता आलं असतं.” शौनक म्हणाला.

“पण सारंगने ही नोट कुठेही नेली नाही. किंवा लिहिली नाही, मग हे काय आहे?” अनिने शंका उपस्थित केली.

“दुसर्‍या विश्वातला कोणतातरी मूर्ख आणि वेडा सारंग बहेर पळत असेल आणि त्याने ही नोट आपल्या दाराखालून सरकवली असेल. बाकी काही नाही.” सारंगला वाचविण्याच्या हेतूने शौनक म्हणाला.

“तुला माहितीये हे काय आहे ते. सांग. आपण याबद्दल काही बोललो नव्हतो. बरोबर ना?” अनि सारंगवर जोरात ओरडला.

“जाऊ द्या गाइज, सोडा सगळं आपल्याला फक्त ही रात्र काढायची आहे.” शौनक आवरतं घेत म्हणाला.

“मग आम्हाला सांगितलं का नाही? हं, नीलिमा? सारंग? बोला काहीतरी....” अनि सारंग आणि नीलिमाकडे बघत परत जोरात ओरडला.

“इट्स... इट्स जस्ट नथिंग..” सारंग घबरत म्हणाला.

“जर हे काहीच नाही तर मग माझ्या निलीमच्या नाकातून रक्त का येतंय?” अनिने नीलिमाल सर्वांसमोर खेचत म्हटलं.

“ओह माय गॉड.” नाकावर रुमाल लावत नीलिमा म्हणाली.

“नीलिमा? व्हाट द हेल इज धिस?” अनिने निलीमचे बहू गदागदा हलवत विचारलं.

“मी तुला सांगितलं होतं. ही एक मूर्ख कल्पना आहे.” शौनक हळूच कुजबुजला. पण तरीही अनिला ऐकू गेलंच.

“काय होती ती कल्पना?” अनि आता चांगलाच चिडला होता.

“अकरवीत असताना नीलिमा आणि सारंग लोणावळ्यात.... सारंग स्वतःला ब्लॅकमेल करणार होता. त्यांच्या हाती पुस्तक लागू नये म्हणून.” शौनक घाबरत म्हणाला.

“धिस इज बॅड. व्हेरी बॅड.” रचना म्हणाली.

तिकडे अनि नीलिमावर जोरजोरात ओरडत होता. त्यांचे जोरात भांडण सुरू होते. “याबद्दल अजून कुणाला माहिती आहे? सांगा मला. कुणाला माहिती आहे. उघडा तोंड. सक्षम, हंसीका, आर्या तुम्हाला माहिती आहे का? लूसर साले, सगळ्यांना माहिती होतं. फक यू ऑल. मला सोडून सगळ्यांना माहिती होतं हे.”

“अनि शांत हो. तुला जसं वाटतंय तसं काहीही नाहीये. खरं बघायला गेलं तर तू इथला नाहीयेस.” सारंग आता तापला होता.

“तू आता माझ्या डोक्यात जातोयस सारंग.” अनिने तुच्छतेने म्हणाला.

“ऐक, आपण दोघं या घरातले नाही आहोत. आपण दुसर्‍याच विश्वातले आहोत. माझं आणि तुझं विश्वसुद्धा वेगळं आहे. हे आपलं घर नाहीये.” सारंग जोरात म्हणाला.

“तुला म्हणायचंय तरी काय?” अनिने विचारले.

“हे आर्या आणि नीलिमाचं विश्व आहे.” सारंग दोघांकडे बोट दाखवत म्हणाला.

“तू माझ्या मैत्रिणीसोबत झोपलास आणि हेच तू मला सांगतोयस.” अनि आता चांगलाच पेटला होता.

“तुझा फोन चेक कर. तो फुटला आहे का?” सारंग म्हणाला.

“त्याचा काय संबंध आहे? सांग ना, काय संबंध आहे त्याचा?” अनिचा आवाज अजून जोरात वाढत होता.

“शांत.... शांत रहा. आम्हाला दाखव फक्त.” सक्षम अनिला शांत करत म्हणाला.

“नाही, माझा फोन फुटलेला नाहीये.” अनिने खिशातून फोन काढला आणि हात उंचावत सर्वांना तो चांगला फोन दाखवला आणि जोरात ओरडला, “याचा निलीमच्या सारंगशी केलेल्या गुन्ह्याशी काही संबंध आहे का?”

“आहे, आज डिनरला बसल्यापासून तुझा फोन फुटलेला होता.” सक्षम म्हणाला.

“नाही, हंसीकाचा फोन फुटला होता.” अनि म्हणाला.

“एक... एक मिनिट. तो बॉक्स. सर्वांत आधी मिळालेल्या बॉक्समध्ये काय वस्तू होती?” हंसीकाने विचारलं.

“स्टेप्लर.... त्याच्यात एक स्टेप्लर होते.” अनिने सांगितलं.

“काय? काहीही बरळू नकोस. त्यात ओव्हन ग्लोव्ज होते.” नीलिमा आनिकडे रागात बघत म्हणाली.

“आमच्या बॉक्समध्ये रुबिक्स क्युब होता.” रचना हंसीकाकडे बघत म्हणाली.

“आणि माझ्या बॉक्स मध्ये नॅपकीन होता. पांढरा शुभ्र नॅपकीन.” सारंग शांततेत म्हणाला.

“तुम्ही सर्वजण काय बोलताय याचं तुम्हाला तरी भान आहे का?” अनिने डोक्याला हात लावत विचारलं.

“आता ऐक अनि, ती माझी रचना नाहीये. तू पाहत असलेली नीलिमा तुझी नीलिमा नाहीये आणि मी तुझा मित्र सारंग नाही. आपण वेगवेगळ्या विश्वातले आहोत.” सारंग म्हणाला.

“हा हा हा, आपण वेगळ्या विश्वातले आहोत. पण मी ज्या विश्वातला आहे तिथे माझा सर्वात जवळचा मित्र माझ्या मैत्रिणीसोबत झोपत नाही.” अनिने जोरात प्रत्युत्तर दिले.

“अनि, तुला समजत नाहीये का, मी काय बोलतोय ते? हे सर्व आजा रात्री सुरू झालं आहे आणि जर असंख्य विश्व अस्तीत्वात असतील तर मी प्रत्येक विश्वात तुझ्या मैत्रिणीसोबत झोपलो असेल.” तावातावात असं बोलून सारंगने अनिकडे पाठ केली.

प्रत्येक क्षणाला वाढत जाणार्‍या अनिच्या रागाने सीमा ओलांडली आणि तो सारंगवर धावून गेला. सर्व शक्तिनिशी त्याने सारंगला त्याच्याकडे फिरवाला आणि तोंडावर एक जोरदार गुद्दा लगावला. अचानक झालेल्या हल्ल्याने सारंग जमिनीवर कोसळला. अनि त्याच्या पोटावर बसून अजून जोरात मारू लागला. सारंग जोरात आरोळ्या मारू लागला. शौनक, सक्षम आणि रचनाने मिळून अनिला आवरण्याचा प्रयत्न केला. पण तो कुणाकडूनच आवरला जात नव्हता. शेवटी हंसीका आणि आर्याने सारंगला खेचलं आणि तिकडे शौनक आणि सक्षमने मिळून अनिला ओढलं. ते त्याला कसेबसे किचनमध्ये घेऊन गेले. तरीही तो सारंगवर धावून येण्याचा प्रयत्न करत होताच. शौनक आणि सक्षमने त्याला सर्व शक्तिनिशी आवरलं. अनिने लगावलेल्या जोरदार गुद्द्यांमुळे सारंगच्या नाकातून रक्त वहात होते. आर्याने ते रक्त पुसले आणि त्याला खुर्चीवर बसवले. हंसीकाने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED