सुवर्णमती - 17 - अंतिम भाग Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

सुवर्णमती - 17 - अंतिम भाग

17

त्या रात्री कुंवर त्यांच्या दालनात न जाता मुख्य कक्षातच बसलेले पाहून तिला जरा आश्चर्य वाटले. आपण इथेच थांबावे की बाहेर जावे, या संभ्रमात ती असतानाच कुंवरने चाहुल लागून वर पाहिले. या वेळेस नेहमीप्रमाणे सुवर्णमतीस पाहून त्याने मान वळवली नाही. उलट तो उठून उभा राहिला. काही क्षण अवघडलेले गेले. हीच योग्य वेळ आहे असे वाटून सुवर्णमती म्हणाली, "कुंवर, आता आपण मला माहेरी परतण्याची अनुमती द्यावी. आपणास हा विवाह इतकाच जर अमान्य होता तर आपण लग्नवेदीवर उभे राहिलातच का? असा प्रश्न मी आपणास विचारणार नाही. आपण राज्यहितास किती महत्व देऊ शकता हे माझ्याइतके इतर कोण समजू शकेल? पण मी आपणाशी केवळ राज्यहितासाठी विवाह केला नव्हता हे मात्र त्रिवार सत्य. असो. ते आता काहीच महत्वाचे उरले नाही. माझा आपण एवढा तिरस्कार करता हे माहित असते तर मी हा विवाह केलाच नसता. पण झाले ते झाले. आपल्या विवाहाने आपल्या राज्यांना जो फायदा झाला त्यात मी समाधानी आहे. परंतु आपल्याकडून मिळणारा सततचा तिरस्कार सहन करण्याची ताकद माझ्यात नाही. तो मी सहन करावा असे मला वाटतही नाही. ठरल्याप्रमाणे मी माझ्या राज्याची धुरा यथोचित सांभाळेन. आपले आमच्या राज्यावरील हक्क तसेच अबाधित राहतील. जिथे मिळून लढण्याची आपल्या राज्यांना गरज पडेल तिथे मिळून लढू. आपल्या तिरस्काराचे कारण मी विचारणार नाही. कदाचित मला ते माहीतही आहे.

एवढे बोलून ती जाण्यास वळली. सूर्यनागाने जवळ येत तिच्या खांद्यास धरून तिला आपल्याकडे वळवले. सुवर्णमतीचे डोळे भरून आले होते. आणि त्याचेही.

तो म्हणाला “ एक एक घटना अशा घडत गेल्या ... वनमंदिरी तुझे चंद्रनागाच्या कवेत असणे, वर तुझ्या पिताजींनी तुझ्या संमतीने माझ्यासाठी प्रस्ताव पाठवणे, त्यानंतर तुझे आणि त्याचे पुन्हा वनमंदिरी भेटणे, मी चंद्रनागास शोधण्यास दूत पाठवले होते त्यांच्याकडून कळले.

माझ्या नजरेतून आम्हा दोघांनाही भुलवत आणि झुलवत ठेवणारी नागीण वाटत होतीस तू. संशयाचं भूत एकदा मानगुटीवर बसलं की सत्य पाहूच शकत नाही माणूस. माझंही तसंच झालं.

पिताजींनी सांगितले मला परवाच्या मेजवानीनंतर, की प्रस्ताव त्यांनीच पाठवला होता. तुझं आणि चंद्रनागाचं बोलणं नकळत ऐकू आलं आणि रीतीविरुद्ध असूनही नंतर चोरून ऐकण्याचा मोह आवरला नाही.

नंतर लॉर्डशी बोलताना, तुझा प्रामाणिकपणा समोर आला. मग एकेक चित्र साफ होत गेलं. माझी मलाच प्रचंड शरम वाटली. तदनंतरचे तुझे एकेक पाऊल तू किती विचाराने टाकले होतेस हे दिसले. तुझ्या सर्व योजना यशस्वी झाल्याच. आणि त्या सर्वच राज्यहिताने प्रेरित होत्या.

मी जे वागलो ते अत्यंत चुकीचं होतं. माफीस ते पात्रंही नाही. तू म्हणशील ती शिक्षा मी त्यासाठी घेईन. पण मला सोडून जाऊ नकोस. ती मरणप्राय शिक्षा असेल माझ्यासाठी. तुझ्यावरील अलोट प्रीतीनेच मला हे असे टोकाचे वागण्यास प्रवृत्त केले. संशयाने मला अंध केले सुवर्णमती. पण त्यालाही तूच कारणीभूत आहेस. कोणत्याही गोष्टीने स्वता:च्या उद्देशापासून दूर न जाणारा हा मुत्सदी वीर, तुझ्या सौंदर्याने आणि गुणांनी एवढा प्रभावित झालो की मला तुझ्याशिवाय दुसरे तिसरे काही सुचेनासे झाले.
मला माफ करून एक संधी देशील? तू आणि मी मिळून या दोन्ही राज्यांची कमान अधिकाधिक उंचावत नेऊ. पण, तुझ्या साथीशिवाय ते शक्य नाही सुवर्णमती! ”

तिच्या चेहऱ्यावर हसू आणि आंसू दोन्हींनी रंगपंचमी साधली. सूर्यनाग त्या रंगात रंगून गेला. त्याने तिचे मुख आपल्या ओंजळीत घेतले. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले तेव्हा तिला तिच्याविषयी प्रेम, आणि आदर दिसला. नकळत तिची नजर खाली झुकली. त्याने तिला आपल्या कवेत घेतले. त्याच्या कुशीत ती आनंदाने शिरली. आत्तापर्यंत केलेला सर्व अट्टाहास आज कामी आला. ज्याला तिने प्रत्यक्ष भेटीपूर्वीच मनोमन वरले होते, तो आज तिचा मनमीत झाला होता. आता तिच्या सर्व योजना सफल झाल्या होत्या.

समाप्त!