थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी ... - 8 Dhanashree yashwant pisal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

थोडासा प्यार हुवा है, थोडा है बाकी ... - 8

डोळ्यात स्वप्न घेऊन अरोही मुंबईत उतरली . पहाटे चे तीन वाजले होते . सगळी कडे अंधार फक्त गाड्या चा उजेड आणि सोबतीला आवाज .अरोही ला आपण मुंबईत आलोय ह्याचा अंदाज आला होता . अरोही, आदी आणि त्याची आई ...गाडीतून उतरले ...नवीन संसार म्हणून भरपूर सामान सोबत होते . सगळ सामान घेऊन ते घरी आले . आणि अरोही ला थोडा आश्चर्य चा धक्काच बसला . मुंबईत ले ते घर ...... पहिल ....आणि पहिल्यादा तिला फार मोठा धक्का बसला . खूप अस्वच्छ होते ते घर .... घरात एक ही वस्तू नव्हती .फक्त एक जुना टी वी होता .तो पण खालीच फरशी वर ठेवलेला होता . किचन मधे चार भांडयाशिवाय काहीच नव्हते .आणि बेडरूम तर खाली रूम शिवाय काहीच नव्हते . अरोही ला ते सगळ बघून खूप म्हणजे खूप दुःख जाहले होते . पण ...तिने सावरले स्वतःला ......आपण जो विचार करतोय ,तो चुकीचा तर नाही ...आदी च रिकामे घर बघून आपल्याला वाईट का वाटले . आपण पण पैशाच्या मागे लागलोय .आज काही नाही ....पण, उद्या येईल की सगळ ...आपल्या घरात ....आदी च्या आणि अरोही च्या घरात ..... अरोहीच डोक विचार करून करून दुखू लागले होते . तिला काहीच सुचत नव्हते . आदी ने तिच्याकडे बघ्त्ले ......तिच्या मनात काय चलाए ह्याचा अंदाज त्यला आला होता . त्याने प्रेमाने तिला जवळ घेतले ...आणि म्हणला ...आज काही नाही ..पण, उद्या तूझ्या आवडीने आणि तूझ्य मर्जीने ....अरोही ला समजले की, आदी ला काय म्हणायचय ते ....ती ही अलगद आदी च्या मिठीत गेली . दोघे ही शांत झोपी गेले . दुसरा दिवस उजाडला .......सकाळ जाहली .रात्री झौपय्ला खूप उशीर झल्यामूले अरोही ची झौप तशी पूर्ण जाहली नव्हती .पण तरीही सकाळ झल्यमूले तिने उठ्न्याचा निर्णय घेतला .अरोही सकाळी उठली .आणि हॉल च्या गलेरी मधे आली .सुंदर वातावरण तिला दिसत होते . ह्या नवीन दिवसासारखीच नवीन सुरवात करायची ...अस, अरोही ने ठरवले .अरोही उठली, तिने केसांचा अंबाडा बांधला .साडी चा पदर खोचला . हॉल मधून ती किचन मधे आली .तिने ई कडे तिकडे बघून आंघोळी चे पाणी तप्व्ण्या साठी ...तिने पातेले शोधले ....ते तरी नीट मिळेल अशी तिची आशा होती ...पण तिथे ही ...असो ...तिने आहे तेच पातेले घेतले .आणि त्यात पाणी घेऊन ग्यास पेटवला . तिला थोड्या वेळाने कसला तरी वास आला ...तो वास ग्यास चा च होता ...कोठे तरी लीकेज होत असणार .तिने कशीबशी आंघोळ उरकली ....तिच्या पाठोपाठ आदी आणि त्याच्या आई ने ही आंघोळ उरकली . अरोही ने लगेच आदी ला ग्यास च काम करयला संगितले . आदी ने ही तिचे ऐकले आणि ग्यास नीट करयला घेतला . पण काही प्रॉब्लेम मुळे तो काही नीट होऊ शकत नव्हता . तो पर्यंत अरोही ने तिच्या लग्नात मिळालेली भांडी कपाटावर मांडली होती .सगळ कस सुंदर दिसत होती . ग्यासचा प्रॉब्लेम झलय हे कळल्यावर अरोही ने तिच्या लग्नात मिळणारी एक शेगडी काढली .आणि आदींच्या मदत्तीने ती जोडून घेतली . तिला छान हळद कुंकू लावले .आणि तिने शेगडी ला नमस्कार केला . मझ्या हातून उत्तम स्वयंपाक होऊ दे .....खाणारे प्रसन्न होऊ दे ...अस मागणे ही मागितले ....आणि मग शेगडी पेटवली .अरोही ला फारसा असा काही स्वयंपाक येत नव्हता .पण जेवढ काही येत होते .ते तिने बनवून आदीला आणि त्याच्या आई ला वाढले .त्या दोघनेही फार काही न बोलता ताटात जे वाढले ....ते गोड मानून खाल्ले.
अरोही ने आता घराकडे लक्ष द्याचे ठरवले होते . नवनवीन पधर्थ कसे बनवायचे ....घर सुंदर आणि शोभिवंत दिसण्यासाठी काय करायचे .असे एक न अनेक गोष्टी ...ती मोबाइल वर पाहत होती .आणि ह्याला आदी ही तिला साथ देत होता . दोघांचा संसार छान चालला होता .अरोही त्याच्या अयुषत आली म्हणून मनोमन तो देवाचे आभार सूध्हा मानत होता .आता आदी आणि अरोही च्या लग्नाला महिना होत आला होता . अरोही ने घरी बसून कंटाळा येतो ....म्हणून नोकरी करण्याचा निर्णय घेतला .आदी ने ही त्यला होकार दिला . तिने अनेक ठिकणि नोकरी साठी अप्लाय केले .पण तिला पहिजे अशी नोकरी काही केल्या ...लागेना . त्यामुळे तिने घरून्च कहितरि काम करायचे ठरवले . तिला एका मैत्रिणीच्या मदतीने टायपिंग च काम ही मिळाले .सगळ व्यव्स्तित चालले होते . आदी दिवसभर कामावर असे ...मग अरोही सकाळी उठून घरातील सर्व कामे करत ...आणि मग दुपारी ..ऑनलाइन वर्क ......आणि परत संध्याकाळी घरातील कामे ....सगळ व्यव्स्तीत चालले होते .एक दिवशी अरोही घर स्वच्छ करत असताना तिला आदींची काही कागदपत्रे सापडली .... त्यात तिला आदी चा आणि एका मुलीचा फोटो सापडला .ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून ,ही तीच मुलगी होती ..जिचा फोटो तिने त्याच्या हनिमून ला आदी च्या पॉकेट मधे पहिला होता .
आता तो फोटो पाहून अरोहीच्या डोळ्यातून घळघळ धारा येय्ला लागला .... ती आता चिढ्लि होती ... कारण ती ने एक दोनदा ह्या आधी ही आदी च्या मोबाईल मधे तिचा फोटो पहिला होता .....त्यामुळे तिचा आता पारा चांगला चढला होता काय चांगल? काय वाईट? काय खरं? काय खोटं? हे जाणून घेण तिला आता योग्य वाटत नव्हते ....आता फक्त हेच खर होत ..की, ह्या मुलीशी आदी च कहितरि कनेक्शन होत आणि आता ही आहे .अरोही खूप संतापली होती .... एवढी की तिला आता काहीच सुचत नव्हते ..तिला असे वाटत होते की, जाऊन आदी ला ह्या सगळ्या बदल जाब विचारावा ....हे काय आहे? आणि असे का? पण ...तिने तस नाही केल ...तिने मनाला समजावले .... की, हे जे काही आहे .... त्याबदल आदी स्वतः आपल्याला ह्या सगळ्या बदल सांगेल . आपण स्वतहा त्याला ह्याबद्दल काहीही विचारायच नाही ......अरोही ने तिला आलेला राग गिळला असला ...तरीही त्याच्या नात्यात, प्रेमात ...आणि तिला आदी बदल वाटणारा विश्वास ह्यात कुठेतरी दरार आली होती . प्रेम असच असत ...नाजूक ...काचेच्या भांडया सारखे......खूप जपून सांभाळावें लगते . कधी कधी हा तातून पडले तरी, त्यला काही होत नाही ....आणि कधी कधी साधा धक्का लागला तरी ते पडून फुटून जाते ......
अरोही रडत रडत किचन मधे आली ....तीच हे दुःख तिला कोणाला सांगावे ....ते ही तिला कळेना . डोळ्यातले अश्रू पुसत पुसत च तिने कामाला सुरवात केली .तिने ढोकळा बनवायला घेतला .नाश्तासाठी ती आज ढोकळा बनवणार होती .ई कडे आदी उठला .... त्याने ई कडे तिकडे पहिले . नेहमी स्वच्छ असणारी त्याची बेडरूम आज अस्ताव्यस्त होती . कागद ई कडे तिकडे पडले होते . आज अरोही ही नेहमी सारखी त्याला प्रेमाने उठवायला आली नव्हती .का ...? ते आदी ला कळेना ...मग त्याने अरोही ला च विचारायचे ठरवले ....त्याने अरोही ला आवाज दिला . पण त्याच्या एका आवाजावर ,.....आले अहो ....असा आवाज देणारी ...अरोही ...आज ऐत्का आवाज देऊन आली सुढ्ह नाही .