lahan pn dega deva - 14 books and stories free download online pdf in Marathi

लहान पण देगा देवा - 14

भाग १४

 

अथर्वच्या आजोबांच्या आईची एक इच्छा होती कि घरातील नात सून म्हणून साक्षीला करून आणायचे, आणि तसा प्रस्ताव त्यांनी साक्षी च्या आजोबांकडे आणि वडिलांकडे केला होता, त्यांची या सर्व गोष्टींसाठी काही एक हरकत नव्हती, कारण त्याने अथर्वला जवळून पाहिलं होत, त्याची आणि साक्षी ची घट्ट मैत्री पाहिली होती, त्यामुळे त्यांनी लगेच होकार दर्शविला, पण प्रश्न होता तो अथर्वच्या आई वडिलांचा ते कधीच तयार होणार नाही हे कायम माहित होत सगळ्यांना, अथर्वच्या आई वडिलांना त्या दोघांची मैत्री देखील मान्य नव्हती, योग्य शिक्षण झाल कि एका मोठ्या उद्योगपती च्या मुली सोबत ते अथर्व च लग्न लावणार होती. आणि हि इच्छा पूर्ण केली तर सगळे काही भिस्कटेल म्हणून अथर्व च्या वडिलांनी त्यांचा सगळा राग हा साक्षीच्या आजोबांवर काढला, एकदाही वयाचा विचार नाही केला त्यांचे शब्द साक्षीच्या आजोबाना इतके मनाला लागले कि त्यांना त्याच ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्याकडे एकदाही न बघता अथर्वचे वडील तिथून निघून गेले. या सर्व गोष्टी अथर्वला कळल्या तर तेच करेल जे त्याचे आजी आजोबा सांगतील म्हणून त्याला लगेच लंडन ला पाठवून दिले, त्याची इच्छा नसताना त्याला तिथे जाव लागल. आज अथर्वला सगळ खर समजल होत पण किती काही केल तरी साक्षी च दुखः तो कमी करू शकत नव्हता. आणि त्यात फारीस फार म्हणजे तो हि तिला खूप काही बोलला होता.

 

तो सर्व विचार बाजूला ठेऊन साक्षी जवळ गेला आणि तिला जवळ घेऊन तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण तिला होणारा त्रास पाहून त्याला स्वतःचा राग येत होता. पण आता तिला समजावता समजावता त्याने मनाशी एक घट्ट गाठ बांधली आणि, साक्षीला विचारायला सुरुवात केली.......

 

अथर्व- साक्षीला स्वतःपासून बाजूला करत, साक्षी मला सांग माझ्यावर विश्वास आहे तुझा ????

(साक्षी हळूच मान हलवून हो म्हणते) मग मी जे करणार त्यात मला साथ देशील ?????

 

आता मात्र साक्षीला प्रश्न पडला कि अथर्व अस काय करणार आहे ???? आणि न राहून तिने त्याला विचारल....... काय करणार आहेस तू अस ?????

 

अथर्व- त्याची काळजी नको करूस, फक्त मला साथ दे, आता पर्यंत जे काही चुकीच झाल ते सगळ नीट करूया. पण मला तुझी साथ असेल तर मी हे सगळ करू शकतो.

आणि सगळ्यात महत्वाच एक विचारायचं होत, म्हणजे वेळ चुकीची आहे पण, आता नाही विचारल तर मग राहून जाईल म्हणून............. विचारू का ????

 

साक्षी अथर्वकडे प्रश्नार्थ नजरेने पाहतच असते कि, तो तिला विचारतो.........

 

अथर्व- साक्षी लग्न करशील माझ्याशी……. "You deserve the world and all the good things it has to offer. If I fail to find that world for you, I promise to give you mine!"

 

मैंने ख्वाबों में तुम्हारा नूर देखा है

दिल ने भी तुमको कहीं तो ज़रूर देखा है

मैं रोज तेरा चेहरा सुनहरा

आँखों में लेके जगा

क्या जानता था, तू भी था मेरा

अब जो मिला तो लगा

 

देर से ही सही मगर तू मिला

मिला तो है ना

धीरे धीरे सही मगर फासला

मिटा तो है ना

 

देर से ही सही मगर तू मिला

मिला तो है ना

धीरे धीरे सही मगर फासला मिटा तो है……….

 

तुझसे किसी भी बहाने

मैं रोज मिलता रहूँ

खुदको भी मैं जान लूँगा

जो मैं तुझे जान लूँ

 

तू जो दिखाये, देखे निगाहें

तू जो सुनाये, सुनूँ

साँसों की है अब किसे जरूरत

तेरे भरोसे जियूं

 

देर से ही सही मगर तू मिला

मिला तो है ना

धीरे धीरे सही मगर फासला मिटा तो है……….

 

त्याच्या या प्रश्नाने साक्षी त्याच्या डोळ्यात हरवून गेली आणि आपसूक तिच्या तोंडून हा असे शब्द निघाले.......................

 

आज दोघांचे मैत्रीचे भाव प्रेमात बदले होते, आता याच प्रेमाने त्यांना सर्व काही नीट करून सर्व परिवार एक करायचा होता...............

 

आणि त्याचे सुरवात खर्या अर्थाने अथर्व साक्षी च्या लग्नाने होणार होती..................................

थोडा हि वेळ न घालवता साक्षीला bye बोलून अथर्व आजी आजोबांशी बोलण्यासाठी निघाला....................

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED