लहान पण देगा देवा - 15 Adv Pooja Kondhalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लहान पण देगा देवा - 15

भाग १५

अथर्वला कधी एकदा घरी येऊन आजी आजोबांशी बोलून सगळ ठरवल्या प्रमाने करतो अस झाल होत.

तो दारातून ओरडतच आत आला इकडे त्याला अश्या प्रकारे ओरडत येताना पाहून दोघांना हि टेन्शन आले, आता काय नवीन उद्योग करून ठेवला काय माहित असा प्रश्न त्यांना पडला. आणि दोघेही प्रश्नार्थ त्याच्या कडे बघायला लागले.

त्याने न थांबतच पटकन बोलून टाकले, मी साक्षी शी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही तयारीला लागा.

तसा दोघांना आनंद झाला होता पण, त्यांना आधी या विषयावरून काय झाल हे माहित होत म्हणून त्यांनी परत प्रश्न केला, साक्षी तयार झाली ???

अथर्व: हो आजोबा ती हो म्हणाली म्हणून तर लगेच तुम्हाला सांगायला आलो इकडे.

आजी : अहो, ती हा कशी काय म्हणाली असेल, हा खोट तर नाही ना बोलत आपण याच ऐकाव म्हणून......

आजोबा: अग रमा ऐकून मला हि समजत नाही ये पण काय बोलायचं हेच समजत नाही ये.

अथर्व: तुम्हाला दोघांना जे प्रश्न पडले आहेत ते तुम्ही साक्षी ला विचारा मला काहीच प्रोब्लम नाही ये.

आणि आता लग्न आहे तुमच्या नातवाच तयारी ला लागा.

अस सांगून अथर्व तिथून निघून जातो, पण आता मात्र या दोघांची बैचेनी वाढली होती, म्हणून त्यांनी लगेच साक्षी ला फोन केला.

साक्षी बाळ आजोबा बोलतो आहे,

समोरून साक्षी: हा आजोबा बोलणा ???

आजोबा: मला जे आता अथर्व सांगून गेला ते खर आहे का ????

साक्षी: हो आजोबा, तुम्ही तयारीला लागा सगळे, आणि तुमची दोघांची पण हीच इच्छा होतीना मग कसली हि काळजी नका करू अथर्व सगळ सांभाळेल. मी फोन ठेवते इथे पेशेनट आहेत.

साक्षी तर फोन ठेवते पण आता आजी आजोबा दोघे हि घाबरले होते तितक्यात हे सगळ ऐकून शंभू काका तिथे येतात, आणि त्यांना सांगतात कि, मालक अथर्वला सगळ माहित झाल आहे त्याने सगळ शोधून काढल आहे, आता तुम्ही त्याला अडवल तर उगाच तो काहीतरी वेगळ करून बसेल त्या पेक्षा तो जे करतो आहे ते आपण करून देऊ हेच योग्य आहे.

तरीच मी विचार करत होतो सगळ ठीक आहे पण साक्षी कशी तयार झाली, तर हे कारण आहे. चल मग रमा आपली नात सून घरी आणायची आहे तयारीला लागू या सगळे, शंभू तुला माहित आहे सगळ सुरु कर अगदी पारंपारिक असू दे सगळ समजल !!!!!!!!

हो मालक सुरूच करतो बघा सगळ. (अस म्हणून शंभू काका तयारीला लागतात)

रमा आजी : अहो सगळ ठीक आहे पण तुमचा लेक, परत काही तमाशा केला तर ?????

आजोबा : आता मी नाही घाबरत कोणाला माझा नातू सोबत असल्यावर, आणि हा निर्णय त्याचा आहे, तो काही लहान नाही आता ठीक आहे ना ?????

आणि हो तयार व्हा लवकर नात सुने ला भेटून येऊ तिला शेवटी आपणच आहोत, तिला काय हव नको पाहायला पाहिजे.

रमा आजी : आताच तयार होते, आणि तिच्या साठी ती घेऊन ठेवलेली साडी आणि लक्ष्मी हार घेते तिला आज देऊ या आपण.

आजोबा : अग तो हार काय तर अथर्व अ घेतलेलं कड पण काढ त्याच्या पण हाथात चढवतो ते आज.

आणि आजोबा अथर्व ला फोन लाऊन घरी बोलून घेतात. अथर्व घरात येतोच तर मस्त घमंग खिरीचा सुगंध घरभर पसरला होता, आजी तर अशी तयार झाली होती कि जणू काही कोणता सन आहे, आजोबा तर विचारायलाच नको, हे सगळ पाहून अथर्व न राहवत विचारतो, काही आहे का आज ???

आजोबा : आहे तर आमची नात सून या घरात येणार आहे आम्ही तिला भेटायला जातो आहे, त्या साठी तयार झालो आहे, बघ तुला यायचं तर तू चल, पण आम्ही जास्त वाट नाही पाहणार हा ...................

पटकन हो म्हणत अथर्व पळत आत जातो आणि तयार होऊन येतो पण, त्याची हि अवस्था पाहून आजी आजोबा दोघी हि खूप हसतात. आणि आजोबा त्याला जवळ बोलवतात, प्रेमाने त्याच्या चेहर्या वरून हात फिरून त्याच्या हाथात एक कड चढवतात. आणि ते पाहून तो खूप खुश होतो.

अथर्व: आजोबा हे तेच कड आहे ना जे मला आवडला होत आणि तुम्ही म्हणाला होतात कि, मी मोठा झालो कि मला ते तुम्ही देणार????

आजोबा: हो रे बाळ हे तेच आहे आवडल तुला ???

अथर्व: खूप आवडल

त्या नंतर तिघे हि साक्षी कडे येतात साक्षी ला ती सुंदर साडी आणि तो हार देऊन आजी तिची दृष्ट काढते. आणि दोघांना हि भरभरून आशीर्वाद देते.

आता खरी परीक्षा असते ते म्हणजे लग्न ते देखील अथर्व च्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन........................