Mitranche Anathashram books and stories free download online pdf in Marathi

मित्रांचे अनाथाश्रम - भाग १४

रजनी, "मी ठरवलं आहे, आता जगायचं तर तुमच्याबरोबर, नाहीतर नाही जगायचं
सांगा, करणार ना माझ्याशी लग्न ?"

आत्तापर्यंत आनंदात असणारा मी रजनी जे बोलली ते ऐकल्यावर घाबरलो होतो. मी जे ऐकलं त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. ती बोलली त्यानंतर मला चक्कर यायला लागले. मी तसा विचार सुध्दा केला नव्हता आणि तिच्या भावाने तिच्यासाठी स्थळ पाहिलं आहे. तिचं लग्न तिच्या भावाच्या पसंतीने होणार आहे. मी त्याबद्दल तिला सांगू पण शकत नाही. कारण ती आत्ताच मरण्याच्या धमक्या देते आहे. ती शांत व्हायला तयार नव्हती.
रजनी, "बोला तुमचं काय मत आहे. हो असेल तर मी माझ्या दादाबरोबर बोलते आणि हरी देशमुख यांच्या मुलाला कुणी नकार देणार नाही हे नक्की आहे. तुमचं उत्तर नाही असेल तर मी जीव द्यायला मोकळी."
माझ्याकडे तिच्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, कारण तिच्यावर माझं प्रेम नव्हतं हे जर तिला बोललो तर जीव देण्यासाठी मागे पुढे ती बघणार नाही. मी अडकलो होतो, हो म्हणू शकत नाही आणि नाही सुध्दा नाही. तितक्यात कुठेतरी गोंधळ सुरू झाला. मी आणि रजनी दोघेही गर्दीच्या दिशेने गेलो, पाहिले तर तिथे काही तृतीयपंथी आले होते. त्यांना बघण्यासाठी ती गर्दी जमली होती. आमच्या मागे संजय आणि आम्या पण धावत आले.
आम्या त्यांच्यातल्या एकाकडे बोट दाखवून म्हणाला, "ती बघ रज्जो"
रज्जो ने सुध्दा आम्याला ओळखले आणि पुढे येऊन बोलली, "कैसा है अब ?"
आम्या, "म्हणजे ?"
रज्जो, "उस दिन तेरा ॲक्सिडेंट हो गया था, अब कैसा हैं तु ?"
आम्या, "तुम्हाला कसं माहिती ?"
रज्जो, "मदत की जरुरत नहीं पडेगी, देख तेरे काम आयी ना मैं"
आम्या, "म्हणजे तुम्हीच त्या दिवशी मला हॉस्पिटल ला घेऊन गेले होते ?"
रज्जो, "नही तो क्या मेरा भूत आया था"
सुरेश काकांनी त्या सर्वांचे आभार मानले आणि जेवायला बसवले. मी तिथेच उभा राहून स्त्री, पुरुष पलीकडे जाऊन माणसातील माणुसकी पाहत होतो. तितक्यात माझ्या समोर रजनी पुन्हा एकदा उभी राहिली.
रजनी, "काय ठरवलं"
मी, "मी अजून त्याबद्दल काहीच विचार केला नाही"
माझ्या खांद्यावर एक हात आला. मागे वळुन पाहिले तर माझ्या मागे संजय उभा होता.
संजय, "तुला सांगितले होते, सरप्राइज देईल"
मी, "हो ना कुठे आहे सरप्राइज"
संजयने माझा हात पकडला आणि त्याच्या बरोबर मंडपात घेऊन गेला.
एका खुर्चीकडे हात दाखवुन म्हणाला, "ते बघ तुझं सरप्राइज"
मी, "कोण आहे ?"
संजय, "तुच जाऊन विचार, मला खुप काम आहेत."
माझ्याकडे पाठ करून बसला होता म्हणुन मला ओळखायला आला नाही. मी खुर्चीच्या समोर जाऊन पाहिले.
तेव्हा तु उभा राहिला आणि मला बोलला, "नमस्कार मी दुर्गेश बोरसे"
मला आम्या आणि संजय पहिल्यांदा भेटले तेव्हा तुच तर होता माझ्याबरोबर, तुच विवेकचा कॉलेजचा मित्र त्याच्या घरी बसला होता. मला विवेक आणि स्वातीबद्दल तुच सांगितले. तुच आहेस माझा दुसरा मित्र.

समीर माझ्या समोर बसुन सर्व काही सांगत होता. माझी आणि समीरची ओळख विवेकच्या घरी झाली होती. त्यानंतर आम्ही दोघं फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो. विवेकने संजयला माझी माहिती दिली आणि नंतर संजयने मला बोलावले. सुरुवातीपासून म्हणजे मी समीर .... ते तुच आहेस माझा दुसरा मित्र पर्यंत सर्व समीर माझ्यासमोर बसुन मला सांगत होता.
समीर, "तुला माझ्याबद्दल सर्व काही माहिती आहे ते कुणाला सांगू नको."
समीर कुठेतरी जात होता. मी त्याला विचारले, "आता कुठे चालला तु ?"
समीर, "मी एक निर्णय घेतला आहे, तु बस मी आलो पंधरा वीस मिनिटात"
त्यानंतर समीर निघुन गेला. मागच्या अर्ध्या एक तासापासुन तो मला त्याच्याबरोबर घडलेल्या सर्व घटना सांगत होता. सर्व घडलेल्या घटना काहीतरी गोष्ट सांगत होत्या, सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळाली होती तरी सुध्दा काहीतरी बाकी आहे, असा भास मला होत होता. समीर पुढे काय करणार याकडे माझं लक्ष होत. संजय आणि विवेक मला भेटायला आले.
संजय, "ओळखलं का याला ?"
विवेक, "नाही कोण आहे हा ?"
मी, "काय रे तुला मारवेसे नाही वाटत का ?"
विवेक ने मला मिठी मारत, "तुला कसं विसरेल बर, फक्त तुला काय आठवत हे पहात होतो. बोलला तर ते पण मला लक्षात ठेवायचं नाही तेच"
संजय, "तुझ्या आणि स्वातीबद्दल हाच तर बोलला."
त्यानंतर आम्ही तिघांनी खुप गप्पा केल्या. कार्यक्रम संपला आणि जेवण झालं माझं, तरी समीर कुठे दिसला नाही. मी सर्वांचा निरोप घेतला आणि जायला निघालो तेव्हा समीर आला. घाईत आला, जास्त काही बोलला नाही, माझ्या हातात एक चिठ्ठी ठेवली आणि निघुन गेला. मी माझ्या मार्गाला लागलो.
घरी गेल्यावर मी ती चिठ्ठी वाचली. आत्तापर्यंत कथेत खुप पात्र आले होते. आनंदात या कथेचा शेवट करायचा असं मी ठरवलं होत. पण या चिठ्ठी ने सर्व विचाराचा शेवट केला.
एखाद्या कथेचा शेवट करण्यासाठी सर्वात आधी त्याच्या मध्यात जाण्याची गरज असते. एखादा लेखक जर कथेला चांगला शेवट देऊ शकला नाही तर वाचक त्या लेखकाच्या लेखनकौशल्यावर प्रश्न उभे करतात. पण माझ्याबाबतीत वाचकांनी तसा विचार करावा हे मला मान्य नव्हतं आणि म्हणुन मी या कथेचा शेवट चिठ्ठीने करायचा निर्णय घेतला.
मी जेव्हा कथेच्या शेवटाची सुरुवात लिहायला बसलो तेव्हा माझा फोन वाजला आणि संपणाऱ्या कथेत पुन्हा प्राण फुंकला गेला. तो विवेकचा फोन होता. त्याने मला भेटायला बोलवलं. फोन विवेकचा होता तरी असं वाटतं होत को समीर माझ्याशी बोलतो आहे, मला त्याच्याशी खुप काही बोलायचं आहे. मी त्या सर्वांना पुन्हा भेटायचं म्हणुन खुप आनंदात होतो.
कुणीतरी म्हटलेच आहे की कथेची सुरुवात जिथे होते तिथेच त्याचा शेवटसुध्दा होतो म्हणुन मी सरपोतदार अनाथाश्रमला गेलो. मी जेव्हा आश्रमासमोर पोहचलो तेव्हा तिथे कुणीच नव्हते. तिथे फक्त राखेचा ढिग होता. असं वाटतं होत की खुप वर्षापासून दाबलेला ज्वालामुखी फुटला आणि त्याने पूर्ण अनाथाश्रम गिळले असणार. जे आश्रम मी दोन दिवसापूर्वी झगमगीत सोडले होते त्याची फक्त राख उरली होती. मी विवेकला फोन करून आश्रमासमोर उभा असल्याचं कळवलं. तो मला घेण्यासाठी तिथे येणार होता.
मी त्या राखेकडे पाहत होतो. त्यातून कुणीतरी मला आवाज देत आहे, असा भास होत होता. त्या दिवशी लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज मला येत होता. कार्यक्रमाची सुरुवात दिसत होती. मला समीरने सांगितलेली गोष्ट दिसत होती. मी माझ्याच विचारत असतांना एक हवेची झुळूक आली आणि काही राख उडवली. राखेबरोबर एक गुलाबी कापड उडत माझ्याकडे आला. तो कापड हातात घेतल्यावर एखाद्या ओढणीचा कापड असावा याची खात्री झाली आणि मला आठवले कार्यक्रमाच्या दिवशी रजनी ने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता.
गाडीचा आवाज आला मी मागे वळून पाहिले तर विवेक आला होता, तो बोलला "चल बस"
त्याने गाडी सुरू केली, माझ्या मनात प्रश्न होता. मला रहावले नाही,
मी त्याला विचारले, "मी गेलो तेव्हा सर्व ठीक होत, अचानक असं काय घडलं ?"
विवेकने मला त्या दिवशी काय घडलं ते सांगायला सुरुवात केली.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED