Abhagi - 13 books and stories free download online pdf in Marathi

अभागी ...भाग 13

विराज एक सारखं मधू ला पाहत होता.. न राहवून तो मधू समोर जावून तिच्या सोबत बोलू लागला..

विराज: हाय ..मधुरा..खूप छान दिसत आहेस आज..

पणं मधू च लक्ष च नसत ती साया चा विचार करत हसत ..स्वतः मध्येच हरवलेली असते..विराज ला थोडा राग येतो..मी हिच्या सोबत बोलत आहे ..आणि ही काय attitude दाखवते आहे..तसा तो पुन्हा मधू शी बोलतो.

विराज : मधुरा...

त्याच्या जोरा त ..बोलण्याने मधू आपल्या स्वप्नाच्या दुनिये तून बाहेर येते.. व विराज ला समोर पाहून गोंधळते ..

मधू: हा..काय म्हणालास का ?

विराज : अग मी कधीचा इथे उभा आहे ..बोलत आहे तुझ्या सोबत तर तू कुठे हरवली आहेस? कसला विचार करत आहेस ?

मधू ला त्याच्या या प्रश्ना वर काय बोलावं कळतं नाही..

मधू: ते ..मी ..ते..काही नाही..बोल काय म्हणत होतास.

विराज : छान दिसत आहेस आज तू..

मधू: thanks..

विराज: कॉफी पिणार का ?

मधू : काय ?

विराज : अग मी कॅन्टीन मध्ये जात आहे येतेस का ? कॉफी पियायला ?

मधू: नाही नको...मी नाश्ता करून आली आहे घरून..

मधू बोलतच असते की सायली व अनु पळतच तिच्या कडे येतात व तिला ओढून घेऊन जातात...विराज ला राग येतो खूप..तो परत आपल्या ग्रुप कडे निघून जातो.. व कॅन्टीन मध्ये जातो आपल्या ग्रुप सोबत.

सायली: मधू काय म्हणत होता तो विराज ?

मधू: काही नाही ग ..छान दिसत आहेस म्हणत होता.

अनु : ते तर सर्वांना माहीत आहे ..त्याला सांगायची काय गरज पडली होती?

मधू: जावू दे ना सोड..

सायली : अजून काय बोलला..किती उशीर बोलत होता आम्ही पाहिलं होत..

मधू: कॉफी पिणार का ? कॅन्टीन मध्ये जावू म्हणत होता.

सायली व अनु ही शॉक होतात ऐकुन .. ह ..हा विराज काही सुधरत नाही...बहुतेक आज त्याला जरा जास्तच मधू ला अटेशन्न देयु वाटत आहे वाटत अस दोघी ही बोलतात.सायली ला खूप भूक लागली होती ..ती मधू व अनु ला कॅन्टीन ला चला म्हणून ओढत होती शेवटी तिघी ही जातात...मधुर आधीच कॅन्टीन मध्ये एका बाकड्यावर बसला होता ..आणि तेच बाकड खाली होत म्हणून सायली मधू व अनु त्याच्या जवळ जाऊन बसतात..मधुर ला तर काही सुचतच नाही..मधू ला समोर बसलेले पाहून तो नजर चोरून खाली पाहत असतो..सायली व अनु ते पाहून हसत असतात..सायली तिघिन साठी चहा व वडापाव मागवते..मधुर उठून जावू लागतो ..तशी मधू त्याला बोलते ..

मधू: अरे बस ना .. वी आर फ्रेण्ड्स तू इथे बसला होतास आम्ही च इथे आलो ..मग तू कशाला उठून जातोस ? तू बसू शकतो इथे.

मधू च बोलणं ऐकून मधुर खुश होतो व पुन्हा खाली बसतो..कॅन्टीन मध्ये एका साईड ला विराज चा ग्रुप बसलेला असतो..विराज मधू ला पाहत असतो व त्याला राग ही येतो ..थोड्या वेळा पूर्वी तर चल बोललं मी तर घरून नाश्ता केला आहे म्हणाली आणि आता ? मधुर सोबत बोलताना पाहून विराज ला आणखी राग येतो.

विराज शेजारी बसलेल्या आपल्या फ्रेन्ड संपत ला म्हणतो..

विराज : सगळ्या सुंदर मुली मूर्ख असतात का रे ?

संपत : होय ..मला तर तसचं वाटत पणं तू का विचारत आहेस ?

विराज : अरे बघ ना ..मधू ला कॉफी ला विचारल तर नाही म्हणाली आणि आता त्या मधुर बावळट सोबत बसून चहा पीत आहे ..काय आहे रे त्या मधुर मध्ये ? बघ कसा वेडपटा सारखा दिसतो ..आणि मी ...इतका हॅण्डसम असून ..तिला स्वतः विचारल तर नाही म्हणाली मला?

संपत : ह्म..अस आहे होय ? पणं भारी दिसत आहे या र..आज मधू..

विराज ला पुन्हा राग येतो संपत चा त्याने मधू ला पाहून कमेंट केली म्हणून तो त्याला रागात ओरडतो .

विराज : खाली बघून गप खा..नाही तिथे डोळे वटारून पाहू नकोस.

तसा संपत गप बसतो ..आणि विराज मधू ला एक टक पाहू लागतो..सायली ते पहाते..मधू ला हळूच कानात त्या साईड ला बघ म्हणून बोलते ..मधू बघते तर तिथे विराज तिलाच पाहत असतो ..तिला ते पाहून कसं तरीच वाटत .. व ती पुन्हा नजर वलवते व चला जावू म्हणून अनु व सायली ला सोबत घेऊन कॅन्टीन बाहेर पडते.
घरी गेल्यावर आई तिची नजर उतरत असते आणि मधू आई वर रागवत असते.

मधू: काय ग आई ..काय तू पणं अंधश्रद्धा पळते स ? अशी कोणाची नजर लागते का कोणाला..तुझं आपलं काही तरच..

आई : असू दे अंधश्रद्धा च ..मला वाटतं तर करू दे ..तुला काय कळायचं त्यातलं..आज माझी मधू दिसत च इतकी छान होती तर..कोणा मेल्याची नजर नको लागायला.
अस म्हणत आई मधू वरून दोन वेळा हातात मीठ घेऊन पाया पासून नखा पर्यंत वर खाली करते व बाहेर नेऊन पाण्यात ते मीठ सोडून देते..मधू ते पाहून हसत असते व नंतर आपल्या रूम मध्ये निघून जाते ..कपडे बदलून ..मोबाईल हातात घेऊन .. बेड वर पडते ..साया शी बोलायची तिची इच्छा होते .. तर साया चा च मॅसेज आलेला ती पहाते..

साया: मधू ..खूप छान दिसत होतीस आज.

मधू: तू पाहिलंस ? हे बर आहे तुझं मला तेवढ पाहायचं आणि स्वतः मात्र माझ्या पासून लपून राहायचं..कधी येणार तू समोर.

साया : हो येईन लवकरच..पणं तू खरच छान दिसत होतीस आज..मुली मराठ मोळ्या रुपात खरंच सुंदर दिसतात..वेस्टर्न कपड्यान पेक्षा..

मधू: होय का ? तू एकदा घालून बघ मग कळेल..साडी सावरता सावरता जीव नकोसा होतो..

साया : मग आपली आई आजी तर कायम साडी च वापरतात ना ..त्यांना बर आवडत ?

मधू: त्यांना सवय पडलेली असते बाबा..मला तर ड्रेस मध्ये च कंफर्टेबल वाटत नेहमी ..

साया : पणं तू साडी मध्येच छान दिसतेस..त्या ही पेक्षा तुझं साधे पण च खूप सुंदर आहे ग..मला तर तेच जास्त भावत.. नो मेक् अप.. नो ..हाय फाय पणं एकदम सर्व नैसर्गिक सौंदर्य जस निसर्गाने बहाल केलं आहे तस

मधू ला त्याचं बोलणं ऐकून हसू येत व ती लाजते ही पणं ते पाहायला साया समोर कुठे असतो ?

दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये ट्रिप ची घोषणा करतात ..सर्व जण एकदम खुश होऊन ओरडू लागतात..सायली ,मधू व अनु ही खूप खुश होतात ..आणि कोणी येऊ ना येऊ आपण तिघी तर जायचं अस ठरवून ही टाकतात...महाबळेश्वर म्हंटल्यावर कोण ट्रीप ला जाणार नाही ?

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED