अभागी...भाग 16 vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अभागी...भाग 16

मधू नंतर सायली वर नंबर येतो..तशी ती खूपच एक्साईटेड होऊन साँग म्हणायला चालू करते ..आणि मधू ला पाहत तिचे खांदे धरून .. बेवड्याची अक्टिंग करत असते ..सर्वजण खूप हसत असतात..

ये जो मोहब्बत हैं...
ये ऊनका हैं काम..
मेहबूब का जो लेते हुये नाम..
मर जाये ..मिट जाये..हो जाये बदनाम..
जाणे दो छोडो.. अब रेहने दो यार..
हम ना करेंगे प्यार..प्यार प्यार..

मधू तिला बस बाई बस म्हणून हात जोडते आणि ओढून तिला खाली बसवते..एक एक करत सर्वांचे नंबर होतात ..सर्वजण त्यांच्या आवडीची छान छान साँग म्हणतात..सर्वजण घरी परत निघतात.. पहाटे सहा ला सर्वजण कॉलेज मध्ये पोहचतात..थोडा वेळ तिथेच थांबून मग सर्वजण घरी निघून जातात.
मधू प्रवासाने कंटाळलेली होती त्यामुळे ती घरी जाऊन झोपी गेली..ट्रिप नंतर एक दिवस कॉलेज ला सुट्टी होती त्यामुळे सर्वांना आराम मिळाला.
आज मधू चा वाढदिवस होता..सर्व जण तिला शुभेच्या देत होते..मधू ने ग्रीन कलर चा मधुबाला ड्रेस घातला होता..त्यात ती खूप सुंदर दिसत होती..सर्व जण तिला गिफ्ट देत होते कौतुक करत होते ..साया ने तर तिला रात्रीच मॅसेज करून शुभेच्या दिल्या होत्या..मधू ची नजर साया ला शोधत होती ..तो गर्दीत असला तरी आपल्याला माहीत पडत नाही याच तिला वाईट वाटत होत...सर्वांच्या शुभेच्या झाल्यावर मधू ,सायली अनु त्याचं मधू च्या आवडत्या गुलमोहर च्या झाडा कडे गेल्या ...तिथे गेल्यावर तर तिघी ही शॉक लागल्या सारख्या उभ्या राहिल्या..झाडा खाली ..गुलाबाच्या पाकळ्या नी हार्ट बनवलं होत त्यात happy birthday Madhu लिहल होत ..बाजूला सर्व प्रकारची फूल एकत्र गुंफलेला एक बुके होता..मधू ने तो उचलला त्यात..एक चिट होती..

प्रिय मधू ला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
तुला फुल आवड तात कळाल पणं कोणत फुल तुला जास्त आवडतं हे माहीत नव्हत म्हणून सर्वच फुल एकत्र करून दिली..
तुझाच- साया

मधू चिट वाचून खुश झाली ..सायली ने तिच्या हातून घेऊन वाचली व अनु ला ही दाखवली..

अनु आणि सायली मधू ला चीडवू लागल्या.. ओ हो.. तुझाच साया ..प्रिय मधू ह ह..

मधू त्यांच्या वर चिडत नव्हती उलट लाजून लालेलाल झाली होती..सायली व अनु ला ही आश्चर्य वाटलं ..आज मधू चिडली नाही?

सायली : काय मधू मॅडम आज तुम्ही चिडला नाहीत ?

मधू काहीच बोलली नाही ..फक्त हळूच हसत होती..

अनु : ये मधू ..तू त्या सायाच्या प्रेमात तर पडली नाहीस ना ?

सायली : अग बोल ना ? काय शांत बसली आहेस ..

मधू : सायली ,अनु मला साया खूप आवडतो ग..आज काल सारखं त्याच्या सोबत बोलावंसं वाटत..सतत त्याचेच विचार असतात डोक्यात ..मी त्याच्या मॅसेज ची एक एक क्षण वाट पाहत असते ..त्याच्या सोबत बोलले की खूप आनंद होतो मला..आणि आज काल स्वप्न ही फक्त त्याची च पडतात ग..कसा असेल तो ?सारखं वाटत त्याला पहावं ..त्याला सांगावं ..खूप आवडतोस तू मला..मी तुला पाहिलं नाही .. पणं माझ्या मनाने तुला कधीच आपल मानलं आहे..

मधू बोलत असते आणि सायली आणि अनु थक्क होऊन ऐकत असतात..

सायली : आणि समज जर तो दिसायला अजिबात चांगला नसला तर?

मधू : सायली मला पहिलं वाटत होत ..आपल्या स्वप्नातला राजकुमार ..खूप सुंदर असावा..त्याला फक्त पाहिल्यावरच आपण त्याच्या प्रेमात पडावं..पणं जेव्हा पासून साया भेटला माझे विचार बदल ले आहेत ग..साया कसा ही असला..अगदी काळा कुट्ट असला तरी चालेल..कारण त्याच मन ..त्याचे विचार..आणि त्याच माझ्या वरील प्रेम पाहून मी त्याच्या प्रेमात पडली आहे ..त्याचं रूप माझ्या साठी तितकं महत्वाचं नाही वाटत मला...आणि रुपाच काय ग.. वय वाढेल तस ते ही आपली साथ सोडत पणं ..प्रेम मात्र नेहमी आपल्या सोबत राहत..

अनु : ओ गॉड मधू ..काय बोलतेस तू यार ? किती छान ..

सायली : बापरे आमची मधू प्रेमात पडली आहे ..

दोघी ही तिथेच मधू भोवती नाचू लागतात..मधू ही खुश होते..

सायली : ये मधू पणं बास कर म्हणावं आता त्या साया ला हा लपंडाव ..आणि आता समोर ये म्हणावं ..

मधू : हो मी ही बोलणार आहे त्याच्या सोबत..मला ही आता त्याला पाहायचं आहे त्याला सांगायच्या आहेत माझ्या भावना..

अनु : ये पणं तो तुला भेटला की पहिलं आम्हाला सांगायचं..आणि आमची ही ओळख करून द्यायची.

मधू : अग हो ग माझ्या आया नों तुम्हाला नाही तर कोणाला सांगेन .. बर चला कॉलेज मध्ये जावू..
कॉलेज मध्ये लेक्चर ला बसल्या बसल्या मधू साया चा विचार करत होती...आज साया भेटला ना ..त्याला समोर यायला सांगायचं..

क्रमशः