घरी गेल्यावर मधू साया ला मॅसेज करून कुठे भेटायचं विचारते तो सरस्वती गार्डन मध्ये भेटू म्हणून सांगतो सायंकाळी चार वाजता वेळ ठरतो..साया मधू ला एक मॅसेज करतो.
साया : मधू उद्या आपण भेटणार आहे ..तू कशी वागशील माहित नाही..तुला मी आवडेल की नाही ..तुला माझा राग येईल का हे ही माहित नाही मला .. पणं तुझा जो ही निर्णय असेल तो मला मान्य असेल..मी तुझ्या वर खरंच खूप प्रेम करतो आणि शेवटचा श्वास असे पर्यंत करत राहीन..तू मला नाही एक्सेप्ट केलंस तरी .. माझं तुझ्या वरच प्रेम कधीच कमी होणार नाही.
मधू मॅसेज वाचून खुश होते आणि हा वेडा च आहे इतकं प्रेम करणाऱ्याला कोणी का नाही हो बोलणार अस स्वतः ला च म्हणते आणि तस ही तू कुणी ही असलास तरी माझ्या मनाने तुला न पाहताच स्वीकारलं आहे आता मी नकार देण्याचा प्रश्न च येत नाही अस तिला सांगू वाटत पणं उद्याच सांगू अस म्हणून ती त्याला काही रिप्लाय देत नाही..मधू सायली ला अनु ला फोन करून सरस्वती गार्डन ला चार वाजता भेटायचं आहे हे सांगते व त्या दोघींना ३ ला च आपल्या घरी यायला सांगते.
दुसऱ्या दिवशी मधू खूप खुश असते...आज साया भेटणार याची खुशी तिच्या चेहऱ्यावर झळकत होती..आणि आज ती तिच्या प्रेमाची कबुली ही देणार होती..पणं का कोणास ठावूक तिच्या मनाला खूप हुर हूर लागली होती.. आई ला तिने मी सायली व अनु बाहेर फिरायला जाणार आहे अस आधीच सांगून ठेवलं होत आई ने ही परवानगी दिली होती.मधू २ वाजताच आवरून बसली होती..निळा अनारकली ड्रेस त्याचं कलर च्या बांगड्या .. कानातल ..एक छोटासा हार..थोडेसे केस मोकळे सोडले होते क्लिप लावून खूप छान दिसत होती मधू आणि ती स्वतः ला आरशात निहाळत उभी होती ..तेवढयात सायली व अनु आल्या त्या मधू ला पाहून चीडवू लागल्या..मधू त्यांना शांत बसा ना म्हणून रिक्वेस्ट करत होती ..सरबत वगेरे पिऊन तिघी ही तीन वाजताच घरा बाहेर पडल्या ..मधू ने एक गुलाबाचे फुल विकत घेतलं.. व तिघी ही सरस्वती गार्डन मध्ये आल्या मधू एका झाडा खाली उभी राहिली व सायली व अनु थोड्या दूर अंतरा वर मधू दिसेल अशा बसल्या होत्या ...चार वाजून गेल्या होत्या पणं साया काही आला नव्हता..साया ही खूप टेन्शन मध्ये होता ..काय होईल ..मधू ला आपण आवड लो नाही तर तिने कायम च आपल्याशी बोलणं सोडलं तर ..त्याला ही काय करावं कळत नव्हत तो केव्हाच गार्डन मध्ये येऊन थांबला होता पणं त्याचे ही पाय मधू कडे जायला नकार देत होते..सर्व संपेल की काय असं त्याला वाटू लागलं होत..पणं कधी ना कधी समोर जावं लागेलच त्यामुळे आताच गेलं पाहिजे अस त्याला वाटलं.
मधू उभी राहून कंटाळली होती..तेवढ्यात तिला मधुर येताना दिसला ती थोडी गोंधळली..मधुर तिच्या जवळ येऊन उभा राहिला.. व तिच्या सोबत बोलू लागला.
मधुर: हाय ,मधू तू इकडे ?
मधू : हो असच सहज फिरायला आले होते..पणं तू इथे कसा काय ?
मधुर : मी ही असच आलो होतो एक्सा म संपले ना आता म्हणून ..
मधू : हो झाले एकाचे एक्सां म टेन्शन संपल..
मधुर थोडा वेळ गप्प च उभा राहिला व मधू ला बोलला..
मधुर: मधू मला तुला काही तरी सांगायचं आहे..
मधू: हो बोल ना..
मधुर काय बोलतोय याची मधू वाट पाहत होती..मधुर थोड घाबरतच बोलला..
मधुर : मधू ,माझं तुझ्या वर खूप प्रेम आहे ..
मधू ला पुन्हा ध कका बसल्या सारखे झाले ..काल विराज आज मधुर .. सगळे माझ्या मुळे दु खावत आहेत.. मधुर चांगला आहे पणं आता त्याला ही दुःख होणार त्याचं ही मन तुटणार मी नाही बोलले तर हे सगळं माझ्या सोबतच का होत आहे....ती मधुर च काहीच ऐकुन न घेता बोलली..
मधू: सॉरी मधुर तू खूप चांगला आहेस पणं माझं प्रेम नाही तुझ्या वर..मी इथे दुसरच कोणाची तरी वाट पाहत होते..सॉरी माझ्या मुळे तुला दुःख होईल पणं मला नव्हत तुला दुखवायचं रे ..
अस बोलून मधू पळत च गार्डन बाहेर निघून गेली ..सायली आणि अनु ही लांबून पाहत होत्या आणि तिला काय झालं म्हणून विचार करत त्या मधुर कडे आल्या मधुर ने आपली बॅग सायली जवळ दिली व प्लीज सायली ही बॅग पकड मी मधू ला बोलवतो म्हणून तो ही गार्डन बाहेर पाळला..सायली ने ही बॅग घेतली व अनु व सायली ही मधुर गेला त्या दिशेने गार्डन बाहेर आल्या..
क्रमशः