अभागी...भाग 22( अंतिम भाग) vidya,s world द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अभागी...भाग 22( अंतिम भाग)

मधू मधुरची डायरी वाचून खूपच दुखी झाली होती..तिचे डोळे सतत वाहत होते..मधुर सोबत घालवलेल्या प्रत्येक क्षण तिला आठवत होता..त्याचं तिच्या कडे वेड्या गत पाहणं..त्याच्या सोबत बसून पिलेला चहा...त्याचं तिच्या घरी तिला सोडायला येन..बुक शॉप मध्ये केलेली मदत...ट्रिप मध्ये त्याने तोडून दिलेलं ते चाफ्या च फुल....इतके दिवस समोर होता तो तिच्या पणं कधीच तिचं लक्ष त्याच्या कडे गेलं नव्हत...सतत तिच्या आजू बाजूला च असायचा मधुर..पणं आपण त्याला ओळखू शकलो नाही..समजू शकलो नाही याचं खूप वाईट वाटत होत तिला.. बेड वर बसल्या बसल्या ती खूपच रडू लागली..तितक्यात सायली आली..मधू ला जाग आली व तिला रडताना पाहून ती थोडी घाबरली..

सायली: ये मधू काय झालं ग ? काय रडत आहेस इतकी ?

मधू सायली ला पाहून जास्तच रडू लागली ..सायली ने मधू ला जवळ घेतलं व ती तिचे अश्रू पुसून तिला शांत करत होती..

सायली : काय झालं ग मधू बोल ना?

मधू : सायली..बघ ना मधुर नेहमी माझ्या आजू बाजूला असायचा ग पणं पणं कधीच मी त्याला समजून घेतलं नाही..कधी त्याचं प्रेम कळलं च नाही ग मला..पणं पणं आता कळलं तर बघ ना हे सर्व काय झालं ?

सायली : मधू तुझी काही चुकी नाही ग..त्याने काही उघड उघड सांगितलं नाही ग म्हणून तुला समजलं नाही ग..

मधू: पणं तरीही मी खूप वाईट वागले त्याच्या सोबत..त्याला मला मधू बोलू नको म्हटलं...तिरस्कार केला त्याचा.. खरंच खूप चूक झाली माझी ..पणं आता मला माझी चुकी सुधारायची आहे ..त्याला सांगायचं आहे ग माझं ही प्रेम आहे तुझ्यावर..तो ..ऐकेल ना माझा?ये पणं तो कसा आहे ग..मी बघ त्याला पाहायला ही गेले नाही ..चल ना आपण जावू त्याला पाहायला हॉस्पिटल मध्ये..
अस म्हणत म्हणत मधू बेड वरून उतरून जावू लागली .. पणं खूप अशक्त झाली होती ती अंगात जीव च नाही अस वाटल तिला ..सायली ने तिला तिला थांबवून पुन्हा बेड वर बसवलं..

सायली: मधू अग तो ठीक आहे ..आणि लवकर डिस्चार्ज मिळणार आहे त्याला...आणि सर्व ठीक होईल..तुला माहित आहे ना ..त्याचं तुझ्या वर किती प्रेम आहे .. मग तुझी अशी हालत पाहून किती दुःख होईल त्याला...तू लवकर ठीक हो मग आपण जावू भेटू त्याला..आणि सांगू ही त्याला की मधुर ची मधू ही त्याच्या वर खूप प्रेम करते त्याच्या वर .. ओके ना..

सायली च बोलणं ऐकून मधू ला बर वाटल..मधुर ची मधू म्हंटल्यावर तर तिच्या चेहऱ्यावर हसू आल..ती थोडीशी लाजली...तो ठीक आहे आणि डिस्चार्ज मिळणार आहे हे ऐकुन तर तिला खूप बर वाटल ..आता लवकर जावून त्याला भे टाव अस तिने ठरवल..

पणं सायली ला मात्र भीती वाटू लागली.. आपण मधू सोबत खोट बोललो याची ..खर समजलं तर तिला खूप राग येईल तिला आपला ..पणं आता आपण तरी काय करणार मधुर ची हालत बिघडत आहे..आणि मधू ही ठीक नाही कसं सांगायचं तिला..सायली मनाशीच विचार करत होती.

हॉस्पिटल मध्ये कॉलेज चे फ्रेण्ड्स ..मधुर चे नाते वाईक सर्व जण मधुर ला येऊन पाहून जात होते ..अनु ही येत होती ..सायली ही अनु ला मधू जवळ थांबवून ती ही मधुर ला पाहून गेली होती...पणं मधू च अजून त्याला पाहायला आली नव्हती..
पाच दिवस झाले होते मधुर कोमात जावून ..सायली ने अनु ला फोन करून बोलावलं.. व स्वतः थोडा वेळ घरी जावून येते अस मधू ला सांगून घरा बाहेर पडली..मधू ला थोड बर वाटत होत पण तरीही तिच्या जवळ कोणी तरी थांबून राहायला हवं अस सायली ला वाटत होत..मधू ची आई किचन मध्ये काम करत होती..बाबा बाहेर गेले होते...मधू ला झोप लागली होती ..अचानक तिचा फोन वाजला व ती जागी झाली..फोन पाहिलं तर तो तिच्या क्लास मेंट निता चा होता..मधू ने फोन उचलला..

मधू : हॅलो..निता बोल..

निता: हॅलो मधू..अग तू कुठे दिसली नाहीस म्हणून फोन केला..

मधू: म्हणजे ?

निता: अग मधुर वरला ना...आम्ही सगळे चाललो आहे त्याच्या घरी ..आपल्या क्लास मधले बरेच जन आहेत..पणं तू नाही दिसली ..म्हणून म्हटलं तू ही येतेस का विचारावं..

निता बोलत होती पणं मधू ऐकायला होतीच कुठे ? मधुर वारला..इतकंच तिने ऐकलं होत आणि फोन केव्हाच हातातून खाली पडला होता..हात पाय कापत होते तिचे ...तोंडातून शब्द च बाहेर येत नव्हते ..ती काही तरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पणं आवाज च येत नव्हता कंठा तून बाहेर..खूप बळ एकवटून तिच्या तोंडातून फक्त एकच शब्द बाहेर पडला .. म...धू... र....आणि मधू खाली कोसळली..आता ती ही कायम ची शांत झाली होती.

मधुर ने आपले शब्द खरे केले होते ..अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या वर प्रेम केलं होत..पणं...पणं मधू अभागी ठरली.. तिला तर तिच्या मनातील भावना व्यक्त ही करत्या आल्या नाहीत....मनातल प्रेम ओठा पर्यंत येण्या आधीच ..सर्व संपून गेलं.. खरंच किती अभागी असतात..ती लोक ज्यांना वेळ गेल्या नंतर आपल प्रेम कळत...आणि ते प्रेम त्यांना व्यक्त ही करता येत नाही.

समाप्त