श्वास असेपर्यंत - भाग १२ Suraj Kamble द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

श्वास असेपर्यंत - भाग १२




आई मला पाहताच तिला गहिवरून आलं. पण तिने आपले अश्रू लपवत,
अरे अमर , " अचानक कसं काय तू येण केलं ????" बाबा भिंतीला टेकून चिंतातुर विचारात मग्न होते.

" सहज आलो आई. तुमची आठवण जास्त येऊ लागली, म्हणून मी आलो !"
असं मी उत्तर दिलं.

शेवटी जन्मदात्री असल्याने तिने सर्व ओळखुन घेतलं . पण सध्या बोलणे योग्य नाही , म्हणून ती म्हणाली " ठीक आहे " . बाबांच्या पायाची, जखमेची थोडी विचारपूस करुन आईने गुळाचा चहा केला होता तो पिऊ लागलो . मग आई लगेचं स्वयंपाक करायला बसली.आम्ही म्हणजे बाबा व मी बसलो इकडच्या तिकडच्या गोष्टी करत. आईने आज वाटलेल्या डाळीचे बेसन केलं होतं , सोबत लाल मिरचीचा ठेचा आणि भाकरी केल्या होत्या. जेवण करून आम्ही सर्वजण झोपी गेलो.

सकाळी उठल्याबरोबर ज्या गोष्टीची भीती मनात होती आणि ज्यासाठी मी गावी आलो, त्या कारणासाठी माझं मन तिथे नाही , म्हणून तोच विषय बाबांनी काढला . मी तेव्हा नुकताच झोपेतून उठलो होतो .

सावित्री , " सर्व संपलं गं !!!
" आपल्या जवळचं होतं नव्हतं समदं न येणाऱ्या पावसाबरोबर वाहून गेलं. व्याजाने पैसे काढून यंदाच्या साली शेती करायचं ठरवलं सोबतचं सावकारांकडून कडून पैश्यांच्या बदल्यात एकुलत्या एका जमिनीचा तुकडा गहाण ठेवला !!!!"

" आता मी काय करू!!!!"
एवढे बोलून बाबांच्या डोळ्यांत अश्रू येऊ लागले...

" तो निसर्ग आहे हो आणि त्याच्या मोर कुणाचं काही चालत का????? "
तुम्ही काळजी नका करू. आपण दोघेही घेतलेल्या कर्जाची परतफेड करू . आई सुद्धा डोळ्यांत आणून बाबांसोबत बोलत होती .

" बरोबर म्हणत आहेस तू ...आपण आपल्या रक्ताचं पाणी करुन कर्ज फेडू...पण आपला देवही आपला साथ देत नाही !!!!"
बाबा बोलत होते.

" तुम्ही हार नगा मानू . करू आपण काम . देवानेच या संकटात पाडलं. तोच काही मार्ग काढेल नक्कीच.. देऊ आपण सावकाराचे कर्ज ."
आई मात्र पोटतिडकीनं बोलत होती.

तेवढ्यात मी म्हणालो, बाबा - आई
" मी काम करतो . तुमच्यावरचं सर्व भार पडतो. वसतिगृहात मला फुकटचं खायला मिळते. पण तुंम्ही एवढे कष्ट करून सुद्धा दोन वेळेचं अन्न मिळत नाही."

" मी कॉलेजच्या व्यतिरिक्त मिळेल ते काम करून तुम्हांला पैसे पाठवत जाईल. जेणेकरून घेतलेल्या कर्जाचा भार थोडा हलका होईल !!!"

" यांसाठी पाठवले का तुला शिकायला????? लोकांची धुणी भांडी करायला??? तेच करायचं असतं तर एवढं शिकवलं नसतं ??? "
बाबा चिडून बोलून गेले..

" तू काळजी नको करू. तू आपलं शिक्षण घे. बाकी राहिलं कर्ज , तर ते आम्ही काम करून चुकवून देऊ...... आणि परत आपली जमीन वापस घेऊन पुन्हा कष्ट करू."

" आमचं आयुष्य तर निघून गेले इतरांची गुलामी करण्यातचं. तुझ्या पुढे सर्व आयुष्य पडलंय. चांगलं साहेब बनून तूच नाही का आम्हाला सुख देणार!!!"
आई धीराचे आणि हिंमतींचे शब्द बोलत होती. माझा नाईलाज शेवटी आई-बाबांनी कष्टाची तयारी दाखवून मला तंबी दिली की , तू काही काम करायचं नाही .फक्त शिकायचं. शेवटी मी रजा घेऊन परत वसतिगृहात दाखल झालो.

" बरं तुला एक विचारू का ??? जर तुला राग येणार नसेल तर विचारतो!!!! नाही तर तुला राग यायचा, आणि आपल्या दोस्तीमध्ये दरात पडायची????"
असा आनंदने मला प्रश्न केला.

" तर एवढी कमजोर मैत्री म्हणायची का आपली ????? आणि सांग बरं, कधी मला तुझ्या कोणत्याही गोष्टीचा राग आला ????आणि तुझ्याशी मी कधी अबोला केला ???मी तुला एकूण एक गोष्ट माझी सांगत असतो," असं मी म्हणालो ...

" तसं नाही रे, पण मी जे विचारणार आहे त्याने तुला जर राग आला तर !!!!!!!! म्हणून मी विचारण्यास घाबरत आहे , बाकी दुसरे काही नाही! !" आनंद बोलून गेला.

" नाही येणार तुझ्या कसल्या गोष्टीचा राग , तू बिंनदास्तपणे विचार " मी अधिक भर देत म्हणालो.

बरं , ती आपली मैत्रीण आहे ना लक्ष्मी , " ती तुला आवडते का रे ???? नाही म्हणजे मी बऱ्याचदा तिला तुझ्याशी बोलतांना पाहिलं आणि ती बोलत असतांना सारखी तुझ्याकडे पाहत असते, तुझ्या बोलण्याकडे नेहमी तिचं लक्ष असते , तिला तू आवडतं , हे नक्की!!!! ती पण तुला आवडते की नाही , हे कन्फर्म करायचं होतं . "
मनात काही नसतांना आनंदने हा प्रश्न विचारला, त्यामुळे मी बुचकळ्यात पडलो . क्षणभर थांबून मीच म्हणालो,

" तू म्हणतो ते ही काही अंशी तरी खरं आहे . पण लक्ष्मीचं नाही सांगत !! तिच्या मनात माझ्याविषयी काही असेल म्हणून, पण ती मला आवडते . आता या आवडीलाच प्रेम म्हण किंवा काही वेगळं नाव देऊ शकतो!!!"
" म्हणजे स्पष्ट शब्दात सांगायचं झाल्यास, तू आणि मी जेंव्हा दहावीत होतो आणि आपण निकाल लागण्याची वाट पाहत बसलो होतो , तेंव्हा मी कधी - कधी लक्ष्मीच्या घरी वर्तमानपत्र वाचायला जात असायचो. तेंव्हा तिची आणि माझी नजर भेट होत असायची. तेव्हांच ती मनात भरली होती , पण त्या वेळच्या पाहण्याच्या प्रेमाला , आपण प्रेम म्हणू शकत नाही. तेंव्हाही वाटायचे की लक्ष्मीने , आपल्या नजरेसमोर दूर जाऊ नये आणि गेली तरी तिच्या कितीतरी वेळ लक्ष्मीच्या पाठमोर्या शरीराकडे पाहत असायचो . आता योगायोग म्हणावा ,की काही और पण ती आपल्या कॉलेजमध्ये आहे . आपली चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे मी त्या प्रेमाच्या भावना मनातच ठेवल्या. तुला कधीतरी सांगणारचं होतो , पण ती वेळ आल्यावर. आता विषय काढला आणि मग खरं तुझ्यापासून लपवता येणार नाही , त्यामुळे मी आता सर्व सांगून टाकलं.."
बोलता बोलता मी मात्र लक्ष्मीच्या आठवणीत रममाण झालो..

" बरं , ठीक आहे मग . प्रेम कदाचित असंच असावं त्या व्यक्तीला गमावून बसण्याच्या भीतीने सांगायचं राहून जातं. पण सध्या आपण अभ्यासाकडे लक्ष दिलं तर जास्त महत्त्वाचं . शेवटी लक्ष्मी सोबत आहेच ना. "
आनंद मला आपल्या परिस्थिती आठवण करून देऊ लागला .

" हो बरोबर आनंद तुझं आणि तसं ही ती पाटलाची लेक. घरदार जमीन- जुमला , गोरीपान आणि तिने जरी मला स्वीकारले तरी शेवटी जातीचा प्रश्न येणारचं. गरीब - श्रीमंत प्रश्न येणारचं. ती पाटील मी माझ्या घरचा गरीब पाटील, आपल्याला राहायला कुठे घर नाही, खायला दोन वेळचं अन्न नाही आणि राजकुमारीला आपले बनविण्याचे स्वप्न कसे पाहू शकतो. " मी आपला गंभीरपणे बोलत होतो...

तेवढ्यात लक्ष्मी येते.
" काय चाललं तुमचं दोघांचं??? फार गंभीर विषयावर चर्चा चालू दिसते तुमची ??? " लक्ष्मी आपले स्मित हास्य करत म्हणाली.

" काही नाही लक्ष्मी , आम्ही जातं या विषयांवर बोलत होतो म्हणजे बघ ना , मनुष्य जन्माला येतो तो जातीत आणि मरतोही तो जातीत म्हणजे सरणावर सुद्धा आपल्या जात पद्धतीने जाळल्या जातो किंवा जात घेऊनचं मातीत मिळतो!!" ' जी जाता जात नाही ती जात...'
आनंद पोटतिडकीने बोलत होता. मी मात्र मनातून घाबरलो होतो , कारण आनंद ने लक्ष्मीला माझ्या प्रेमाचा विषय काढला असता , तर आपली फजिती झाली होती.....

आनंद बोलता बोलता मला जातींवर आधारित या ओळी आठवल्या,

जी जाता जात नाही ती जात,
अशीचं टाकली आहे या जातीने नवीन कात,
पण खरंच का हो???
एवढी कशी चिपकुन बसली ही जात!!!
याच जातीने देशाचे, तुकडे केले हजार,
हिंदू ,मुस्लिम, सिख , ईसाई ,
असाच जातीने केला बाजार .....


खूप छान !!! लक्ष्मी आपला प्रतिसाद देते. चला हा विषय खूप सखोल आहे, कधी तरी यावर भाष्य करता येईल.. शेवटी आम्हीं तासिकेला निघून जातो...

क्रमशः......