श्वास असेपर्यंत - भाग १५ Suraj Kamble द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्वास असेपर्यंत - भाग १५









अरे अमर , " तू कसल्या विचारात मग्न आहेस ???? कमी बोलतो , कॉलेज मध्ये ही लक्ष नसतं !!! "
असा खोचक प्रश्न आनंद ने मला विचारला...

अरे काही नाही आनंद , " आईचीआठवण येत आहे. ती कशी जगत असणार !!! कशी राहत असणार!!! हा प्रश्न सतत मनाला भेडसावत असतो . त्यावर एक उपाय म्हणून मी कॉलेजच्या वेळे व्यतिरिक्त काही काम करण्याचा विचार करतोय."
मी सावकाशपणे उत्तर दिले.

" काही पैसे कमावले तर, तेच आईला पाठवता येईल. आई एकटी तरी काय काय करणार!!!"

" बरोबर आहे तुझ अमर . पण आपलं आयुष्य अगोदर पूर्वपदावर आण . आता दिसतोय तो जबाबदारीने वाढणारा तरुण . आम्हांला अजूनही जुनाचं अमर हवा!!"
आनंद मला म्हणत होता.

अरे मित्रा, " मी पुर्वी जसा होतो तसाचं आताही आहे. फक्त आईच्या आठवणीने व ती आता एकटीचं असल्याने, तिची काळजी वाटते रे !!"

" तू फक्त मला आता कॉलेज विषयी जास्त माहिती सांगत चल. कारण मी काम शोधतो आहे . काय सांगावं कामातून सुट्टी मिळाली तर ठीक नाहीतर कामातच गुंतवून राहावे लागेल. कॉलेजला बरोबर येता येणार नाही . तू सायंकाळी वसतिगृहात आल्यावर सर्व मला सांगत चल."
असे मी विनवणी करत होतो .

अरे अमर, " काळजी करू नकोस. मला माहितीये सध्याची परिस्थिती . मीही शोधू लागतो काम तुझ्यासाठी." आनंद मला नेहमी धीराचे शब्द देत असायचा.

शेवटी शोधाशोध केल्यानंतर एका हॉटेलमध्ये मी कामावर रुजू लागलो . ज्या दिवशी कामावर गेले त्याच दिवशी पैसे द्यायचे . ज्यादिवशी नाही गेलो, त्या दिवशी पैसे मिळणार नाही, असं हॉटेल मालकाने सांगितले होतं . नियमित आता मी हॉटेलमध्ये कामाला जायचं ठरवलं आणि रात्री असलेलाअभ्यास पूर्ण करायचं असं ठरलं होतं . फक्त एवढ्या स्थितीत साथ होती ती आनंदाची. तोच कॉलेजमधला सर्व अभ्यास मला व्यवस्थित सांगत होता . अधून मधून मी कॉलेजला जायचो पण कुणाशी भेट न घेता वापस यायचो. आनंद मी काम करतो , याविषयी कुणाला सांगू नये असे मी बजावून ठेवलं होतं . सांगितलं असतं तरी फारसे काही बिघडणार नव्हतं. परिस्थिती मनुष्याला जबाबदारी स्वीकारायला लावते. इतर कुणालाही हेच मान्य झालं असतं. त्यात मी काही अपवाद नव्हतो. काही पैसे जवळ जमा झाले की, कुणाच्या हातून आईला पैसे पाठवत असायचो. कधी मी स्वतःहून घरी नेऊन देत असायचो.

एके दिवशी हॉटेलात कामावर असतांना अचानक माझ्यासमोर देशपांडे सर हॉटेलात आले. त्यांनी मला इथे पाहून सरळ प्रश्न केला . देशपांडे सर म्हणजे मला कॉलेजला शिकवणारे प्राध्यापक. त्यांनी सरळ मला प्रश्न केला, " अरे अमर इथे कामाला आहेस का ???? तरी मी म्हणायचो, एवढा हुशार मुलगा अचानक कॉलेजमध्ये अनुपस्थितीत कसा राहू शकतो ??? त्या मागचे कारण हे आहे, आता समजलं . "

सरांना पाहून माझा चेहरा पडला होता.
होय सर, " मी इथे कामाला आहे . बाबा गेल्यानंतर आई एकटीचं असते . वरून तिथे काम मिळत नाही म्हणून मला हे काम करून आईला पैसे पाठवायचे असतात म्हणून हे काम करत असतो."

" व्हेरी गुड अमर !!! तुझे बाबा गेल्यानंतर तुझ्या आईची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली खूप अभिमानास्पद गोष्ट आहे . पण तुला जर चांगलं काम मिळालं तर हे काम सोडणार का ???"
बाळा तू मला भेटला असता, तर मी दिले असते तुला चांगलं काम शोधून !!! सर बोलत होते .
ठीक आहे तू आता हे काम करायचं नाही . तुला कॉलेज करता येईल आणि कामही करता येईल. असंच काम तुझ्यासाठी शोधून ठेवतो .

" तू मी सांगेल ते काम करणार आहेस की नाही????"
सर आता हसून म्हणाले.

होय सर , " नक्की करेल !!!" आता माझ्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत झाला होता. कॉलेजला जायला मिळेल. कामावरून पण पैसे मिळवून ते आईला पाठवता येईल. ठरल्याप्रमाणे सरांनी मला त्यांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये कामाला लावून दिलं. तिथे फक्त रेकॉर्ड मेंण्टेन करायची, लिहिण्याचे काम होतं . इथले ऑफिसचे सर ही स्वभावाने चांगले असल्याने आणि सरांचे मित्र असल्याने ते मला समजून घेत होते आणि महिना झाला की पैसे द्यायचे . मग कधी आई घरी गेल्यावर विचारपूस करत असायची आणि म्हणायची,

" तुला पैसे कुठून मिळतात ??? तू नेहमी पैसे पाठवत असतो , काही वाम मार्गाला तर नाही ना लागला तू ???कॉलेज व्यवस्थित करतो की नाही ??? अशी भीती व्यक्त करून आई बोलत असायची.

अगं आई , " तसं काही नाही आहे!! आमच्या कॉलेजमध्ये देशपांडे सर आहे , मनमिळाऊ आणि मदत करणारे. त्यांनीच मला त्यांच्या मित्राच्या ऑफिसमध्ये कामाला लावलं. तिथे फक्त लिहिण्याचं काम असतं शिवाय कॉलेजही होतं म्हणून मी ते काम करत असतो . मग त्यात वाईट थोडी आहे !!!

" तूच आहे माझं जग सध्या !! तुझ्याशिवाय आता कुणी उरलेलं नाही . तुझ्यासाठीचं करतो ग आई हे सर्व अशी समजूत मी काढत बसायचो.

तेंव्हा , " ठीक आहे !!" तुला समजल तसंच कर . फक्त वाम मार्गाला नको लागू म्हणजे झालं .
आई आपली भावनिक होऊन बोलत असायची.


अमर, " फार वाईट झालं रे तुझ्या सोबत!!! म्हणून तुला कॉलेज सोडून तुझ्या आईची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर उचलावी लागली ."
लक्ष्मी बोलत होती पण यावेळेस चेहऱ्यांवर हास्य नव्हते, तर ती दुःखी आणि गंभीरपणे बोलत होती.

लक्ष्मी, " नियतीपुढे आणि परिस्थिती आल्यावर मनुष्य हतबल होऊन जातो . काहीही म्हण लक्ष्मी , पण परिस्थिती आणि वेळ मनुष्याला जबाबदारीची जाणीव करुन देत असते. मी जे बोलायचं ते बोलून गेलो.

" अगदी बरोबर आहे तुझं अमर !!!" पण तुला देशपांडे सरांचे आभार मानावयास हवे . त्यांनी तुला हे काम दिलं नसतं तर तू आमच्यासाठी, या कॉलेज साठी दुर्मिळ प्राणी झाला असता, बरं का!!!"
आता मात्र लक्ष्मी चेष्टा करत होती .

हो बरोबर आहे तुझं, मला देशपांडे सरांचे हे उपकार मी कधीही विसरता येणार नाही । पण तू मात्र दुर्मिळ प्राणी म्हणून माझी चेष्टा नको करू म्हणजे झालं.

बरं बाबा , " ठीक आहे! नाही करत तुझी चेष्टा वगैरे.!!"" सहजचं म्हणाली . लक्ष्मी लडीवाळपणे बोलत होती.

" बरे एक म्हणू का तुला ???? म्हणण्यापेक्षा एक सजेशन देऊ का तुला ??? जर ते तू ऐकणार असेल तर!!! "

' अरे का बरं नाही ???' बोलून तर बघ तू मी ही उतावीळ होऊन म्हणालो.

" अरे तसं काही खास नाही रे!!! पण तु ना या चेहऱ्यावर असणाऱ्या दाढीमुळे खूप मोठा माणूस दिसतो. तू नीटनेटका म्हणजे क्लीन शेव्ह नाही राहू शकत का ???? मला ती दाढी काही आवडत नाही बुवा !!!"
लक्ष्मीने वेगळा भाव चेहऱ्यावर आणत बोलली. ..

पण , तुझ्या तुला आवडत नाही म्हणून मी दाढी काढावी हे कसं शक्य आहे ??? तुझी आवड वेगळी, माझी आवड वेगळी, नाही का लक्ष्मी पाटील????"
मी हसत तिला म्हणालो .

" जा तुला चांगलं सांगावं तर !! तुला ऐकावं वाटत असेल तर ऐक नाही तर राहू दे !!" लक्ष्मी नाराजीचा सूर काढत म्हणाली .

बरं बघू , " जमलं तर करेल तुझी आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न.."

"चल बाय , येतो मी!!" म्हणत निघून गेलो.

झालेल्या चर्चेबद्दल मी आनंदला सांगितलं तर आनंद ही माझी संधी मिळताच चेष्टा करताला लागला. " आज लक्ष्मीने दाढी काढून क्लीन शेव करायला सांगितले. उद्या तुला प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही . तुला प्रेमाचा प्रस्ताव नक्कीच ठेवणार . एवढं मात्र खरं!!
आनंद अजुनचं माझी मस्करी करत होता....

क्रमशः .....