By संत
एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या
ग्रंथाचे पाच अध्यायाची
नक्कल करून पैठणाचा एक
भाविक ब्राम्हण नित्य नेमाने पाच
अध्याय वाचत असे त्या
शिवाय तो जेवण करीत
नसे.एकदा तो ब्राह्मण
काशीस गेला असता गंगेवर स्नानकरून,तेअध्याय वाचीत असतांना तेथील
काही पंडितांनी पाहिले व तेथील
मठाधिपतीला सांगितले.मठाधिपतीने त्याला बोलावून घेतले,तो वाचीत असलेले
पाच अध्याय पाहिले.भागवतावर
प्राकृत टिका करणारा पैठणाचा
ब्राम्हण आहे
त्यास बोलवा. एका सांडणी
स्वरा बरोबर,सही शिक्क्याचे
पत्र देऊन त्यास,पैठण
येथे पाठविले. तो सांडणी स्वार
पैठण येथे
गेला व ते पत्र
नाथास दिलें. नाथानी त्या
पत्रास नमस्कार केला व
काशीस जाण्याच्या तयारीस लागले.त्यांच्या
बरोबर काशीस जाण्यास बरेच
लोक निघाले.तसेच गावो,गावचे लोक सुदधा
ला झाले.टाळ,मृदुंग यांच्या गजरा सह,जयघोष करीत काशीस पोहचले.ही बातमी मठाधी पर्यंत
पोहचली.
“नाम नीजधीर,गर्जती वैष्णववीर
कळी काळ यामाचे भार पळाले तेथे.”आशा कळीकाळाला थरारून सोडणार महाराष्ट्रीय
संत समुदायाकडून नाचत उडत होणारा, भुताकाश व चिदाकाश निनादून सोडणारा भागवन्नामाचा घोष काशिकरांच्या कानात पडणारा
हा पहिलाच दिवस होता.पंच गंगेच्या काठावर हा समुदाय उतरला.किराणा,धूपपापा, सरस्वती , गंगा व यमुना या Fपाचही गंगा या नाथांचे पाय आपल्या उदकात
केव्हा बुडतील
या कडे डोळे लावून वर पाहू लागल्या.स्नान संकल्प सांगणारे
भडजी तीरावर होते.संकल्प विकल्प लयाला गेलेल्या नाथरायांनी
संकल्प सांगून घेऊन गंगेत” जय गंगे जय गंगे” म्हणत गंगेत बुडी मारली.गंगोदकाच्या शीतळ स्पर्शाने,प्रवासश्रमाने श्रांत झालेले शरीर विश्रांती झाले.
व गंगा माताही या भानुदास कुलोत्पन्न
सुंदर बालकाला मांडीवर घेऊन त्याचे सर्वांग प्रेमश्रून्नी भिजवून कृतकृत्य झाली.
“स्नान करी गंगाजळे। परी गंगोदकाते नातळे।मन चित्स्वरूपे केले सोवळे।तो चिन्मात्रचि
देखे जीवन।अखंड चिद्रूपीं अवगाहन।इतर म्हणती केले स्नान।त्यासी निमज्जन
निजरूपी।
‘तीर्थीकुर्वन्ति तीर्थानी’हे संतस्नानाचें
महत्व गंगदि V जाणावे.’
सगळ्यांचे स्नान झाल्यावर एकनाथ महाराज
हातात वीणा व चिपळ्या घेऊन किर्तनास उभे राहिले शे दीडशे टाळकरी मागे उभे राहून व चार
पाच मृदुंग एकाच तालावर विण्याच्या तालावर वाजत होते.नाथांनी निरूपण केले त्यांचे निरूपण
एकूण काशिकर मंत्रमुग्ध झाले.तिथे काशीविद्यापीठादी यांचे शिष्य होते,त्यांच्या लक्षात आले की एकनाथ महाराज सामान्य .गुरुजींनी त्यांना वादात हरवून बहिष्कार
घालण्याचा केला आहे,ते केवळ
साधू नसून चांगले विद्वान ही आहेत.त्यांना वादात जिंकणे
कठिण जाईल.
शिष्य मंडळींनी गुरुजीस सांगितले की,नाथांची बोलण्याची पद्धत हसतमुख व प्रेमळपणाची
आहे,नाथांच्या तोंडाकडे
पाहून तुम्ही बोलू लागलात तर तुम्हाला बोलताच येणार हे ऐकून गुरुजी चिंतातुर झाले व त्यांनी ठरविले की
भागवता सारख्या पवित्र ग्रंथावर प्राकृत टीका लिहिणारा महापापी आहे.तो मुखवलोकणासही योग्य नाही. महाद्वारात एक पडदा लावून त्याला पडद्या
बाहेर बसवावे.सभेत विद्वान लोकांच्या मताने ठराव पसंत करून ग्रंथ गंगेत बुडवून टाकावा.पुढे टीका करण्याची त्याला मनाई करावी.सभा भरविण्याचा दिवस ठरविन्यात आला.व द्वारातील पडद्या बाहेर बसून नाथांनी
बोलावे असे ठरले.काही लोकांना हे चमत्कारिक वाटले.परंतु नाथांना त्या बद्दल किंचीतही वाईट वाटले नाही. ठरलेल्या सकाळच्या प्रहरी लोकांची गर्दी
जमली.प्रात:स्नान आटोपून नाथराय सभामंडपाच्या द्वारात
लावलेल्या पडद्या बाहेर येऊन स्वस्थ हरीचंतन करीत बसले.नाथांचा हा अपमान पाहून लोकांचे मन
क्षुब्ध झाले होते. पण नाथांचे मन निर्विकार होते.
“जे या ग्रंथाचा आदर करिती।अथवा जे का उपेक्षिती।केवळ जे कोणी निंदीतील तर्हा आम्हा
ब्रह्ममूर्ती
सद्गुरुरूपे। हेचि शिकविले जनार्दने
। सर्वांभूती मजसी पाहणे।प्रकृती गुणांची लक्षणे।
सर्वथा आपणे न मानावि।।
अशी नाथांची मनोधारणा होती.लोक बसल्यानंतर स्वामी पायऱ्या चढू
लागले नाथांना पाहावे असे त्यांना त्यांनी सहज वाकड्या नजरेने त्यांच्या कडे पाहिले
तो काय चमत्कार? नाथांच्या ठिकाणी त्यांना किरीटकुंडलमंडीत, शंख, चक्र गदा पद्मधारी व श्रीवत्स-कौस्तुभ-वैजयंतीमलाविराजित अशी शामसुंदर वासुदेवमूर्ती दिसली!स्वामींच्या
मनाला आश्चर्याचा धक्का बसला.ज्याचे जया ध्यान। तेची होय त्याचे स्वामी
तपस्वी होते त्यांना नाथांच्या ठिकाणी वासुदेवरूपाचे
दर्शन झाले.परंतु अहंकार असल्यामूळे नाथांच्या
चरणी लिन न होता,सिंहासनाकडे व सिंहासनावर कसे बसे.प्रश्न न विचारता नाथांचा ग्रंथ गंगेत
फेकून देण्याचा हुकूम दिला.हुकूम ऐकताच एका शिष्याने ग्रंथ हातात घेऊन गंगेचा रस्ता धरला.सभा बरखास्त झाली.आरोपीचे म्हणने ऐकून घेऊन,आरोप शाबीत झाल्यावर त्याला शिक्षा
फर्मावायची अशी सभेची रीत आहे,ती रीत स्वामींनी सोडली.
म्हणून लोक समुदाय क्षुब्ध झाला,पण त्यांचे काही चालण्या सारखे नव्हते.मनकर्णिका घाटावर उभे राहून,त्या शिष्याने तो ग्रंथ भिरकावून दिला.तो ग्रंथ गंगादेवीने आपले वज्रचुडेमंडीत
दिव्य सुंदर हस्त उदकाबाहेर काढून वरचेवर झेलला.हे पाहून लोकांनी”एकनाथ महाराज की जय,गंगामाताकी जय” अशी ठोकली व गंगेत भराभर
उड्या मारल्या.गंगा माताकी हाय,गंगा माताकी जय म्हणत ते गंगा देवीने हातात धरलेल्या ग्रंथाकडे
पोहत जाऊ लागले,जवळ आलेल्या एका माणसाच्या हातात ग्रंथ
देऊन,गंगामाता गुप्त झाली.त्या ग्रंथाची लोकांनी हत्तीवरून मिरवणूक काढलीपंडितांची तोंडे काळी ठिक्कर पडली.,भाविक सज्जनांची तोंडे विजयश्रीने प्रफुल्लित
झाली.नाथांनी त्यानंतर काशीतच राहून उरलेल्या अध्यायावरची टीका
संपुर्ण केली.ह्या प्रमाणे नाथांची
भागवतटीका काशीक्षेत्रामध्ये गाजली.