“संत एकनाथ महाराज” ६ नाम जपाचे महत्व.
एवं युगानुरूपाभ्यां भगवान् युगवर्तिभिः ।
मनुजैरिज्यते राजन् श्रेयसामीश्वरो हरिः ॥३५॥
एवं
कृतादि-कलियुगवरी । इहीं नामीं रूपीं अवतारीं ।
सद्भावें तैंच्या
नरीं । भजिजे श्रीहरी श्रेयार्थ ॥१॥
त्यांमाजीं
कलियुगाची थोरी । वानिजे सद्भावें ऋषीश्र्वरीं ।
येथें
हरिकीर्तनावरी । मुक्ती चारी वोळगण्या ॥२॥
श्लोक ३६ वा
कलिं सभाजयन्त्यार्या गुणज्ञाः सारभागिनः ।
यत्र संकीर्तनेनैव, सर्वः स्वार्थोऽभिलभ्यते ॥३६॥
अवधारीं राया
सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा ।
जेथ सर्व स्वार्थ
हरिकीर्तना । नामस्मरणासाठीं होती ॥३॥
कलियुगीं दोष
बहुत । केवीं कीर्तनें होय स्वार्थ ।
तेथें दोषत्यागें
जे गुण घेत । ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥४॥
हरिकीर्तनें
शुद्ध चित्त । दोषत्यागें गुण संग्रहीत ।
ऐसे सारभागी
कलियुगांत । परममुक्त हरिकीर्तने ॥५॥
कलीच्या गुणांतें
जाणते । नामें मोक्ष जोडणें येथें ।
जाणोनि करिती
कीर्तनातें । ते जाण निश्र्चितें नित्यमुक्त ॥६॥
कलियुगीं हेंचि
सार । नाम स्मरावें निरंतर ।
करिती नामाचा
निजगजर । ते मुक्त नर नृपनाथा ॥७॥
(संमत श्र्लोक) ध्यायन्कृते यजन्यज्ञैस्त्रेतायां
द्वापरेऽर्चयन् ।
यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम् ॥
कृतयुगीं
शमदमादिसाधन । त्रेतायुगीं वेदोक्त यज्ञ ।
द्वापरीं आगमोक्त
पूजन । तंत्रविधान विधियुक्त ॥८॥
यापरी त्रियुगीं
जना । परम संकट साधना ।
करितांही परी मना
। अणुमात्र जाणा उपरमु नव्हे ॥९॥
तीं अवघींच
साधनें । कलीनें लाजविलीं कीर्तनें ।
जेथ गातां नाचतां
आपणें । वश्य करणें परमात्मा ॥४१०॥
आखरीं हुंबळी
गुणें । ऐकतां गोवळांचें गाणें ।
देव भुलला
जीवेंप्राणें । त्यांसवें नाचणें स्वानंदें ॥११॥
कृष्णा कान्हो
गोपाळा । या आरुष नामांचा चाळा ।
घेऊन गर्जती
वेळोवेळां । तेणें घनसांवळा सुखावे ॥१२॥
तेणें सुखाचेनि
संतोषें । देवो परमानंदें उल्हासे ।
एवं कलियुगीं
कीर्तनवशें । भक्त अनायासें उद्धरती ॥१३॥
कीर्तनआवर्तनमेळीं
। जळती पापांच्या वडवाळी ।
भक्त उद्धरती
तत्काळीं । हरिनामें कलि दाटुगा ॥१४॥
कलियुगीं हेचि
थोरी । नामसंकीर्तनावारी ।
चहूं वर्णां
मुक्त करी । तेथ न विचारी स्त्री शूद्र ॥१५॥
वेदु अत्यंत
कृपणु जाला । त्रिवर्णांचे कानीं लागला ।
स्त्रीशूद्रादिकांसी
अबोला । धरूनि ठेला अद्यापि ॥१६॥
तें वेदाचें
अतिन्यून । उद्धरीं हरिनामकीर्तन ।
स्त्री शूद्र
अंत्यज जन । उद्धरण हरिनामें ॥१७॥
कीर्तनें
स्वधर्मु वाढे । कीर्तनें स्वधर्मु जोडे ।
कीर्तनें
परब्रह्म आतुडे । मुक्ति कीर्तनापुढें लाजोनि जाय ॥१८॥
कीर्तनानंदें
चारी मुक्ति । हरिभक्तांतें वरूं येती ।
भक्त त्यांतें
उपेक्षिती । तरी पायां लागती दास्यत्वें ॥१९॥
एवढी कलियुगीं
प्रचीती । कीर्तनाची परम ख्याती ।
राया जाण गा
निश्र्चितीं । विकल्प चित्तीं झणें धरिसी ॥४२०॥
कृतत्रेताद्वापारासी
। निषेधु नाहीं नामासी ।
कलियुगीं
नामापाशीं । चारी मुक्ती दासी स्वयें होती ॥२१॥
श्लोक ३६ वा
कलिं सभाजयन्त्यार्या गुणज्ञाः सारभागिनः ।
यत्र संकीर्तनेनैव, सर्वः स्वार्थोऽभिलभ्यते ॥३६॥
अवधारीं राया
सर्वज्ञा । धन्य धन्य कलियुग जाणा ।
जेथ सर्व स्वार्थ
हरिकीर्तना । नामस्मरणासाठीं होती ॥३॥
कलियुगीं दोष
बहुत । केवीं कीर्तनें होय स्वार्थ ।
तेथें दोषत्यागें
जे गुण घेत । ते नित्यमुक्त हरिकीर्तनीं ॥४॥
हरिकीर्तनें
शुद्ध चित्त । दोषत्यागें गुण संग्रहीत ।
ऐसे सारभागी
कलियुगांत । परममुक्त हरिकीर्तने ॥५॥
कलीच्या गुणांतें
जाणते । नामें मोक्ष जोडणें येथें ।
जाणोनि करिती
कीर्तनातें । ते जाण निश्र्चितें नित्यमुक्त ॥६॥
कलियुगीं हेंचि
सार । नाम स्मरावें निरंतर ।
करिती नामाचा
निजगजर । ते मुक्त नर नृपनाथा ॥७॥
(संमत श्र्लोक) ध्यायन्कृते यजन्यज्ञैस्त्रेतायां
द्वापरेऽर्चयन् ।
यदाप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम् ॥
कृतयुगीं
शमदमादिसाधन । त्रेतायुगीं वेदोक्त यज्ञ ।
द्वापरीं आगमोक्त
पूजन । तंत्रविधान विधियुक्त ॥८॥
यापरी त्रियुगीं
जना । परम संकट साधना ।
करितांही परी मना
। अणुमात्र जाणा उपरमु नव्हे ॥९॥
तीं अवघींच
साधनें । कलीनें लाजविलीं कीर्तनें ।
जेथ गातां नाचतां
आपणें । वश्य करणें परमात्मा ॥४१०॥
आखरीं हुंबळी
गुणें । ऐकतां गोवळांचें गाणें ।
देव भुलला
जीवेंप्राणें । त्यांसवें नाचणें स्वानंदें ॥११॥
कृष्णा कान्हो
गोपाळा । या आरुष नामांचा चाळा ।
घेऊन गर्जती
वेळोवेळां । तेणें घनसांवळा सुखावे ॥१२॥
तेणें सुखाचेनि
संतोषें । देवो परमानंदें उल्हासे ।
एवं कलियुगीं
कीर्तनवशें । भक्त अनायासें उद्धरती ॥१३॥
कीर्तनआवर्तनमेळीं
। जळती पापांच्या वडवाळी ।
भक्त उद्धरती
तत्काळीं । हरिनामें कलि दाटुगा ॥१४॥
कलियुगीं हेचि
थोरी । नामसंकीर्तनावारी ।
चहूं वर्णां
मुक्त करी । तेथ न विचारी स्त्री शूद्र ॥१५॥
वेदु अत्यंत
कृपणु जाला । त्रिवर्णांचे कानीं लागला ।
स्त्रीशूद्रादिकांसी
अबोला । धरूनि ठेला अद्यापि ॥१६॥
तें वेदाचें
अतिन्यून । उद्धरीं हरिनामकीर्तन ।
स्त्री शूद्र
अंत्यज जन । उद्धरण हरिनामें ॥१७॥
कीर्तनें
स्वधर्मु वाढे । कीर्तनें स्वधर्मु जोडे ।
कीर्तनें
परब्रह्म आतुडे । मुक्ति कीर्तनापुढें लाजोनि जाय ॥१८॥
कीर्तनानंदें
चारी मुक्ति । हरिभक्तांतें वरूं येती ।
भक्त त्यांतें
उपेक्षिती । तरी पायां लागती दास्यत्वें ॥१९॥
एवढी कलियुगीं
प्रचीती । कीर्तनाची परम ख्याती ।
राया जाण गा
निश्र्चितीं । विकल्प चित्तीं झणें धरिसी ॥४२०॥
कृतत्रेताद्वापारासी
। निषेधु नाहीं नामासी ।
कलियुगीं
नामापाशीं । चारी मुक्ती दासी स्वयें होती ॥२१।।
सुधाकर काटेकर