स्पर्श पावसाचा ?️ - 1 Akash द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

स्पर्श पावसाचा ?️ - 1

सूर्वात कुठून करावी मला नाही माहिती पण मला आठवते तसे सागेल
पावसाळा हा माजा आवडता ऋतू तसा हा बऱ्याच लोकाचा आवडता ऋतू आहे असणारच ना या ऋतु मधे किती प्रसन्नता असते हिर्वळ असते
पावसा मध्ये आपण जीवनात पहिला कधी भिजलो हे कोणालाच माहिती नसते पण शाळे मधून घरी येताना भिजलेली माजा हे सर्वांना लक्षात असते त्या दिवशी पण तसेच काही तरी झाले
शाळेचा घंटा वाजला शाळा सुटली आमी आमचे दप्तर पाठीवर घेऊन शाळेचा बाहेर पडलो जसा बाहेर पडलो तसा पाऊस सुरू झाला आमी आमचे पाठीवर चे दप्तर डोक्यावर घेतले पावसाळ्याचे दिवस होते माहिती होता पाऊस कधी ही पडेल मनून पहिलाच वही आणि पुस्तक हे प्लॅस्टिक पिशवीत सुखरूपणे ठेवले होते
आता डोक्यावर दप्तर आहे डोके तर भिजणार नाही माहिती होते पण बाकी अंगाचे काय असे विचार करून एका झाडा खाली थांबलो तसे सर्वच जण थांबले होते पण जांचा कडे रेनकोट किवा छत्री होती ते आपले निघाले छत्री आणि रेनकोट दाखवत
थोड्या वेळाने पाऊस कमी झाला पण सर्व पाणी पाणी आणि चिखल करून गेला मग काय जास्त भरभर चालता पण येईना त्यात आमची स्लीपर आणि शाळेचा गणवेश पांढरा जरा भरभर चाले तर माघटून चड्डी पासून केसा पर्यंत चिखल तसे बघायला गेले तर गणवेश येवढं काय स्वच्छ नव्हता पण घरी ओरडतात मानून हळू हळू जायचे एकदाचे घरी पोहोचलो दप्तर घरात ठाऊक कपडे बदलून लगेच खेळायला बाहेर
घराचा बाहेर पडलोच तेवढ्यात ती दिसली पावसाळा ऋतू आवडायचे अजून एक कारण मंजे ती आता ती मंजे कोण हे मला सांगायची गरज नाही वाटत तरी पण तुम्हाला माहिती असावे मानून सांगतो मी आकाश आणि ती या आकाशातून पडणारा प्रेमाचा पाऊस खूपच फिल्मी झाले ना तुम्ही सोप्या भाषेत तिला माजी crush कीवा पाहिले प्रेम बोलू शकता
तेव्हा ती आमचा गावी आली आहे समजले तसे ते दुसऱ्या शहरात राहत होते तीची अज्जी आमचा गावी राहायची तशी ती उन्हाळी सुट्टी ला याची लहान असताना उन्हाळी सुट्टी सर्वच मुलांना आवडते पण ती याची नेहमी सुट्टीला मनून मला जास्तच आवडायची पण ही आता कशी आली हे मला नाही समजले मग नंतर मला कळले की तिची आज्जी आजारी आहे ती त्या साठी घरचा सोबत आली आहे मला काय त्याचे मी तर हे विचार करून खुश होतो की ती आली आहे मानून चांगले १० दिवस राहणार होते ते त्या मुळे मी अजून जास्त खुश
त्याचे घर आमचा घराचा बरोबर समोर होते त्या मुळे तिला घरातून च बघत बसणार पण खरं सांगू का खूपच भाव खायची हे मला आवडायचे नाही पण काय करणार चालायचे लगोरी. क्रिकेट कोणता ही आमी खेळ खेळत असेल तर नेहमी ती माजा विरुद्ध टीम मध्ये मग काय मुद्दाम मी हरणार आणि माजा मित्रांना वाटणार याला काय येतच नाही पण त्यांना कुठे माहिती मी का हरतो आमी हरलो की तिचा चेहऱ्यावर एक खूप भारी अशी स्माईल याची ते खूप आवडायची मला अजुन सुधा लक्षात आहे माजा
तेव्हा ते पावसाळ्या मध्ये आले होते त्या मुळे काय अमाला खेळायला तर काही भेटत न्हवते आणि त्यात आमची शाळा चालू त्या मुळे आता रविवार ची सुट्टी ची वाट बघत बसणार शनिवारी आमची शाळा सकाळी असायची पण मी माजा पोटात दुखत आहे मानून शाळेला जाणार नाही मानून घरी सागितले आणि सुट्टी मारली सकाळी पाऊस पडून थांबला होता

रेट करा आणि टिप्पणी द्या

Aniket more

Aniket more 1 वर्ष पूर्वी

Dada sparsh pavsacha hi khup chaan story ahe. Khupch aavdali mla. ♥️ yacha next part kdi upload krnar aahat 😍

Basavraj Madivale

Basavraj Madivale 1 वर्ष पूर्वी

Dnyanu

Dnyanu 1 वर्ष पूर्वी

kharch khup chan suruvat keli ahe tuhmi mast asech pudhche part pn upload kara