स्पर्श पावसाचा ?️ - 11 Akash द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

स्पर्श पावसाचा ?️ - 11

किती अवघड असते आपल्या आवडत्या व्यक्तीला ती आपल्याला किती आवडते सांगणे.मनाची,शरीराची सर्व ताकत एकवटली तर शब्द कुठे फुटतात तेजीला बोलताना माजी पण हालत तशीच झाली होती कसे बोलावे मला काळात नव्हते काय बोलावे समजत न्हवते सुरुवात कुठून कशी करावी कळत न्हवते
मी तसाच वर ताऱ्यांना बघत विचार करत होतो.तेवढ्या मध्ये तेजी बोली "काय रे akya तू कुणाला तरी like करतो असे मला समजले आहे. खरं आहे का ते ? " मी आश्चर्याने तिच्याकडे बघितले मला वाटले आमच्या ग्रुप मधले कोणी तरी सागितले असेल तिला की आकाश तुला like करतो मानून. आणि त्या मुळेच ती मला असे विचारत आहे असे मला वाटले मी ही होकार अर्थी मान हलवली आणि तसेच तार्‍या कडे बघत राहिलो माजा मना मधे तो उठलेला विचारांचा वादळ माझे डोके आणि मन या दोघांनाही सुंद करून टाकलं होतं त्या मुळे तिला काय बोलावे मला काही कळत न्हवते असे कोणी अचानक असे काही विचारले की आनंद. भीती की अजून काय दुसरे ती काय फिलिंग आहे हे आपल्याला नाही कळत एक वेगळ्या प्रकारची मिश्रित अशी ही फिलिंग असते ज्याच्या मध्ये सर्वच असते
"का akya मला नाही सांगणार का ? आपल्या गावा कडची आहे का ? कोण आहे ? तिचे नाव काय आहे ? आणि मला का नाही सागितले ?" अशा अनेक प्रश्नांच्या बाणाचा मारा तिने सुरू केला.आता तिला कसे सांगू की या सर्व प्रश्नाचे उत्तर एकच आहे तू मी हे बोलणार होतो तेवढ्या मध्ये ती बोली "तिला सागितले की नाही अजून" मी नकारार्थी मान हलवली " का ? " माजा कडे बघत ती बोली " भीती वाटते आहे " मी वरची मान खाली घेत बोलो. "भीती वाटते आहे ? काय रे तुम्ही मुले किती भिता. माजा boyfriend पण मला बोलायला खूप घाबरत होता.त्याच्या friend नी मला सागितले आणि मग त्याने" माजा मणा मध्ये उठलेले वादळ पूर्ण शांत झाले होते आणि एकच प्रश्न त्या मधून बाहेर पडला " तुझा boyfriend??" " हो उद्या तो लग्नाला येणार आहे तेव्हाच आपल्या ग्रुप ल सरप्राईज देऊन ओळख करून द्यावे म्हंटले होते.पण खाली तुझा विषय निघाला आणि बंटी ने सागितले की तू कुणाला तरी like करतो तू खाली दिसत ही न्हवता त्या मुळे तुला शोधत शोधत इथे आले. सांग ना कोण आहे ती ? नाव काय आहे तिचे ? " ती तसेच प्रश्न विचारत होती पण मला कायच समजत न्हवते ती काय बोलतेय? तिला काय उत्तर देऊ ? माजा डोक्यामध्ये एकच आवाज घंटेच्या आवाजासारखा वाजत होता तिचा boyfriend
"Hello.. काय झाले आकाश कुठे हरवला? " तिने माजा खांद्यावर हात ठेवून विचारले. काय सांगणार होतो मी तिला? तिच्या तोंडूून ते शब्द ऐकून आकाश कुठे हरवलाय? काय सांगायला आलो होतो मला माझे अश्रूू अनाव होत होते पण तिच्या समोर रडणार तरी कसा ? मी रडलो असतो तिच्यासमोर तर तिला माझ्या भावनाा कळल्या असत्य ? की त्या प्रश्नांच्या वादाने एक नवीन दिशा घेतली असती. त्यााच्यातून निर्माण होणारे नवीन प्रश्नन ज्या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती. असे प्रश्न तिने जर मला विचारलेे असते तर ? हे सर्व गोष्टी टाळण्यासाठी मी माझ्या खांद्यावरून खाली घेतला पाणावलेले डोळे तिला न दिसावे अशाा पद्धतीने मी मान खाली घालून तिथून निघालो
ती मला मागून आवाज देत होती पण मी न थांबता तसाच खाली निघून गेलो. माझे डोळे भरून आले होते आणि तेच मला तिला दाखवायचे नव्हते मला रडू तर खूप येत होतं पण रडायचं कुठे ? लग्न घर असल्यामुळे सगळीकडे कोणी ना कोणी होतं. आणि कोणी मला रडताना बघितलं तर त्यांनी मला रडण्याचं कारण विचारलं असता आणि ते मला कोणाला सांगता आल नसत
ज्याच्यासाठी रडतो त्याला सांगता नाही आल दुसऱ्यांना काय सांगणार होतो का रडतोय मानून वी

....... To be continue 😊

रेट करा आणि टिप्पणी द्या

Dnyanu

Dnyanu 1 वर्ष पूर्वी

kharch khup mast twist aala story madhe Rao

Mahendra Patil

Mahendra Patil 1 वर्ष पूर्वी