Azab lagnachi gazab kahaani - 5 books and stories free download online pdf in Marathi

अजब लग्नाची गजब कहाणी - (भाग ५)

 

 

जानकी बैठकीत आली..रघुवीरला तिच्याकडे बघून अस वाटत की बहुतेक ही नाराज आहे तिलाही लग्न करायची इच्छा नसावी . वडीलधाऱ्या व्यक्तींना तिने वाकून नमस्कार केला..तिने हळूच नजर रघुवीर वर टाकली तो तिच्या कडेच बघत होता. दोघांची नजरानजर झाली .जिजींनी तिला त्यांच्या जवळ बसवलं.औपचारिकता म्हणून प्रश्न विचारले,जानकी ची आवड निवड विचारली..रघुवीर आणि जानकी ला निवांत बोलता यावं म्हणून दोघांना वरच्या मजल्यावर बोलायला पाठवलं.खुर्चीवर दोघे बसले खरतर काय बोलाव त्यांना कळतं नव्हतं.

" काय उकडतं हो तुमच्या अकोल्यात .जेमतेम फेब्रुवारी महिना सुरू आणि इतकी गर्मी" रघुवीर शांतता भंग करत म्हणाला..जानकी आश्चर्या ने त्याच्याकडे बघत होती तो अस काही बोलेल हे तिला अपेक्षित नव्हते..

" तुमच्या अमरावती मध्ये नाही उकडतं का??की बर्फ पडतो तिकडे" जानकीने ही लगेच टोला लगावला ..

" होत न गरम पण इतकं नाही होत..इकडे तसाही पाण्याचा दुष्काळ असतोच बाराही महिने त्यामुळे वातावरण सदा तापलेल असत, कसे राहता तुम्ही लोकं काय माहीत" रघुवीर पुन्हा प्रतिउत्तर दिले.

" हे पाहा तुम्ही उगाच आमच्या शहराला काही बोलू नका बरं, चांगलं आहे आमचं अकोला,आणि घरच्यांनी आपल्या ला आपल्या बद्दल बोलायला पाठवलं आहे . अकोला अमरावती बद्दल बोलायला नाही" जानकी चिडून म्हणाली..

" अरे हो सॉरी विसरलोच मी.. बरं तुला एक स्पष्ट सांगू" ??रघुवीर म्हणाला.

" हो सांगा न" जानकी म्हणाली..

" तुला बघून अस वाटतं की लग्न करायची इच्छा नाही" रघुवीर म्हणाला..
जानकीला काय बोलाव कळतं नव्हतं ..

" हो म्हणजे इतक्यात खरतर नाही लग्न करायची इच्छा माझी पण घरचे तर अजिबात काही ऐकून घेत नाही" जानकी ने खर सांगितलं..

" अग सेम माझही तसच आहे ,मला ही काही घाई नाही लग्नाची..पण कोणी ऐकेल तर शपथ.. तशी माझी काही कारणंही आहेत म्हणा..नाही म्हणजे तुला न करण्याच काही विशेष कारण" ?? रघुवीर असा जानकी सोबत असा काही बोलत होता की जशी जुनी ओळख आहे..

" मला न लव्ह मॅरेज करायची फार इच्छा होती पण..." जानकी बोलता बोलता एकदम चूप बसली एका अनोळखी मुलाला पहिल्याच भेटीत चुकून आपण मनातलं सांगून बसलो म्हणून ती थोडी घाबरली..

" पण काय?हे बघ घाबरू नको ..मी कुणाला जाऊन सांगणार वगैरे नाही आहे . विश्वास ठेव माझ्यावर .कुणी आहे का तुझ्या आयुष्यात अस??आणि हो मला अहो काहो वगैरे नको म्हणून तू म्हण " रघुवीर म्हणाला.

"नाही तस कुणी आहे वगैरे नाही..पण मनात एक सुप्त इच्छा होती..आता तु मला स्वप्नाळू म्हण,मूर्ख म्हण नाही तर आणखी काही परिकथेत नाही का एखाद्या राजकुमार असा घोड्यावर बसून येतो आणि राजकन्येला घेऊ जातो तस माझ्याबाबतीत घडावं अस वाटायच मला.कुणाच्या तरी प्रेमात पडावं ..ती हुरहूर अनुभवावी आणि अगदी फिल्मी स्टाईल ने अस गुडघ्यावर बसून त्याने मला प्रपोज करावं असं वाटायचं मला.. आजवर पण काय न अशी संधी कधी मिळालीच नाही ,कुणावर वेड्यासारखं प्रेम कराव अस भेटलच नाही, मला न माझं आयुष्य अस स्वतःच्या मनासारखं जगायच .माझ्यावर नितांत प्रेम करणारं कुणीतरी भेटेल अस मला कायम वाटतं.घरात सगळ्यांची अत्यंत लाडकी अण्णांचा तर जीव की प्राण त्यामुळे न सगळे मला अस कायम प्रोटेक्ट करत आले. कधी कुठे एकटीला जाऊ दिलं नाही.कॉलेजला असतांना सुध्दा बाबा,काका ,दादा नाहितर ओंकार यांच्यातल कुणी ना कुणी मला सोडायला आणि घ्यायला यायचे.कुण्या मुलाला माझ्या अवती भवती भटकू दिल नाही.स्वच्छंदपणे जगातच आलं नाही..तस कॉलेजमध्ये असतांना एक मुलगा आवडला ही होता नचिकेत नावं होत त्याच पण मला त्याला काही कधी सांगता आलं नाही.कॉलेज संपलं आणि नचिकेत चॅपटर क्लोज झाला. घरचे सगळे खूप प्रेम करतात माझ्यावर आणि काळजी असते सतत त्यांना माझी म्हणून आजपर्यंत माझ्याबाबतीत सगळे निर्णय घरच्यांनीच घेतले आणि ते मी मान्यही केले. पण आयुष्याचा इतका मोठा मला घेऊ द्यावा अस वाटत .तस मी बोलण्याचा प्रयत्न सुध्दा केलाय पण अण्णा प्रचंड विरोधात आहेत या सगळ्याच्या.. बावीस वर्षापूर्वी माझ्या आत्याने अण्णांचा विरोध झुगारून प्रेमविवाह केला पण काही कारणाने त्यांच लग्न टिकलं नाही आणि आतू परत घरी आली..अण्णांनी तिला घरात तर घेतलं पण त्यानंतर आजपर्यंत तिच्याशी एक अक्षर सुध्दा बोलले नाहीत ..त्यांना मी पुन्हा अस दुःखी करू शकत नाही म्हणून त्यांच्या मनाने ऐकते..या आधी तीन मुलं येऊन गेली मला पाहायला त्यातला एकाची पत्रिका जुळली नाही म्हणून अण्णांनीच नकार कळवला.. राहिलेलं दोन फार लांब शहरातली होती म्हणून मग मीच सगळ्यांना गळ घातली की इतक्या लांब मला नाही जायच ..इमोशनली ब्लॅकमेल केलं त्यामुळे दोन्ही ठिकाणी नकार कळवला आणि तुझं काय तुला का नकोय लग्न इतक्यात??" जानकी मनातलं सगळं सांगून मोकळी झाली...

" बापरे फारच अजब कहाणी आहे तुझं..म्हणजे कुणावर प्रेम नाही आहे तरी प्रेमविवाह करायचा आहे ..वाह !! मानलं तुझ्या आत्मविश्वासला..माझं म्हणशील तर थोडी फार तुझ्याच सारखी कहाणी ..मला न खरंतर बँगलोर ला जायच आहे म्हणजे तिथे मल्टीनॅशनल कंपनी मध्ये ट्राय करतोय मी पण घरच्यांचा विरोध या सगळ्याला कारण त्यांच म्हणणं आहे की चांगली नोकरी आहे न सुरू आपल्याच गावी मग कशाला घरापासून दूर जायच ..या बाबतीत माझी आई मला फार इमोशनल करते..बँगलोर च नाव जरी काढलं न तरी तिच्या डोळ्यांत गंगा ,जमुना येतात..तिथे कंपनी जॉईन केल्यानंतर वर्षभरातच फॉरेन ला जायचा चान्स आहे..आणि माझी तिकडे जायची प्रचंड इच्छा आहे.घरच्यांमुळे मी काहीच करू शकत नाही आहे मला ही माझं आयुष्य माझ्या मनासारखं जगायचं आहे काही काळ घरच्यांपासून दूर रहायच मला,आणि बघ माझं लग्न करत आहेत पण मुलगी त्यांच्या आवडीची हवी त्यांना माझ्या मनाचा विचार कुणीही करत नाहीय..म्हणून मीही आजपर्यंत पाच मुली नाकारल्या आहेत .तुला पाहिलं तेंव्हा मनाला जाणवलं की तुही खूष नाही आहे म्हणून तुला सरळच विचारलं काय आहे न तू पहिली अशी मुलगी आहे जीच्यासोबत इतकं सहजपणे मनातलं बोलू शकलो ..आधीच्या ज्या मुली होत्या न त्याअजून एक दोन कारणं आहेत माझी सध्या लग्न न करण्याची" रागिणी विषयी काही न बोलता बाकी सगळं रघुवीर त्याच्या मनातलं बोलला..

" तुझं म्हणणं पटतंय मला पण एक गोष्ट खटकली तुला घरच्यांपासून दूर जायच आहे हे नाही आवडलं मला.मला बोलायचा अधिकार नाही पण तरीही बोलतेय..मान्य की घरचे त्यांचे निर्णय आपल्यावर थोपवत आहेत म्हणून त्यांच्या पासून दूर जाण हा पर्याय नाही . आपल्याबद्दल त्यांनाही प्रेम आणि काळजी आहेच न..मला तर नाही जायच माझ्या घरच्यांपासून दूर कधीच.." जानकी म्हणाली.

" लग्न झाल्यावर तर जावंच लागणार आहे न तुला दूर मग काय करशील" ? रघुवीर म्हणाला.

" हो पण तुझ्यासारख पार परदेशात वगैरे तर जाणारच नाही, मग आता नकार कसा द्यायचा आपण एकमेकांना काही कारण ही नाही सुचत आहे..खर जर सांगितलं तर घरचे लोक जबरदस्ती आपलं कुठेही लग्न लावून देतील आता काय करायच आपण??" जानकी म्हणाली..

" एक मिनिट एक मिनिट ..मला एक आयडिया सुचली ..हे बघ आपण एकमेकांना नकार द्यायला काहीच कारणं नाही आहेत .जेंव्हा पासून तुझं स्थळं आलंय तेंव्हा पासून माझ्या घरच्यांनी तर ठरवूनच टाकलं आहे की काहीही झालं तरी लग्न जमायला हवंच आणि आता तर तुला पाहिल्यावर घरचे आताच्या आता तुझं लग्न लावायला कमी करणार नाही.. त्यात आपल्या दोघांची नावं एकमेकांना अनुरूप अशी आहेत.. माईंची आणि जिजींची मैत्री आणि आमच्या सारखच तुमच एकत्र सुखी कुटुंब मग नाही म्हणायचा काहीच चान्स नाही.आपण अस केलं तर लग्नाला होकार देऊ या" रघुवीर काहीतरी विचार करुन म्हणाला.

" काय??? म्हणजे आपण लग्न करायचं?? जानकी आश्चर्याने म्हणाली

" हो तसच..घरच्यांच्या आनंदासाठी आपण हे लग्न करू ..एकदा का लग्न झालं की आपल्या मागचा लग्नाचा तगादा संपेल..मी माझ्या कंपनीच्या इंटरव्ह्यू साठी आवश्यक लागणारी तयारी शांतपणे करू शकेल.. वर्षभरात मी नक्की यशस्वी होईल आणि बँगलोर निघून जाईल.." रघुवीर दिपस्वप्न रंगवत म्हणाला

"आणि माझं काय?? मी करायचं?" जानकीने प्रश्न केला..

" मी बँगलोर ला जायच सांगेल तेंव्हा त्यावेळी घरून मला विरोध होईल हे नक्की तर सुद्धा मला बँगलोर ला जाण्यापासून अडवायचा प्रयत्न करशील पण कुणाचंही न ऐकता सरळ निघून जाईल..या वर्षभरात आपल्याला अशी परिस्थिती निर्माण करावी लागेल दोन्ही कुटूंबाला अस दाखवायचं की आपलं दोघांच अजिबात पटत नाही ..भांडण करायचे, एकमेकांसोबत नीट वागायचं नाही..तू माझ्या घरच्यांसोबत आणि मी तुझ्या घरच्यांसोबत तुटक वागायचं जेणे करून आपलं लग्न लावून द्यायचा त्यांचा निर्णय किती अयोग्य होता हे त्यांना कळेल..मग बँगलोर गेल्यानंतर तू इकडे परत येऊन जाशील आणि अस दाखवशील की तू माझ्यासोबत राहून खूप त्रास सहन केला तुझी परिस्थिती बघून अण्णांच तुला माझ्याकडे परत पाठवणार नाहीत..तुझ्या वागणुकी मुळे माझ्या घरचे सुध्दा नाराज होतील आणि मग आपण घटस्फोट घेऊ .आपल्या ला आपल्या मनानी वागता येईल ,आवडत्या व्यक्तीसोबत लग्नही करता येईल. त्यावेळी घरचे त्यात हस्तक्षेप करू शकणारच नाही.. कारण त्यांनी आपलं लग्न करून देण्याचा पश्चाताप त्यांना राहील .स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकू...काय कशी वाटते आयडिया" रघुवीर म्हणाला..

" एकदम बोगस आयडिया आहे तुझी..हे कुठलं नाटक किंवा सिनेमा नाही आहे असं घडायला..खोटं वागणं नाही होणार माझ्याने, घरच्यांना मी नाही फसवू शकत..आणि मला सांग सहज सोप्प वाटतंय का तुला..आपल्यामुळे माई आणि जिजींची मैत्री तुटेल , आपला संसार मोडेल तर सगळ्यांना किती त्रास होईल याचा विचार कर.." जानकीला रघुवीरच्या बोलण्याचा राग आला होता..

" जानकी तू इमोशनल होऊन विचार करत आहेस. जरा प्रॅक्टिकली विचार करून बघ.मला सांग आपण एकमेकांना नकार दिला तर घरचे ऐकणार आहेत का ? आपलं जरी लग्न नाही झालं तरी उद्या चालून अजून दुसरं स्थळं ते आपल्यासाठी शोधणारच आहेत मग किती मुलांना नकार देशील शेवटी कंटाळून कुणा एकाशी लग्न करशील .सुखी राहू शकशील का पण तू??मी सांगतो न तुला , तू आनंदी नाही राहू शकणार..तू दुःखी आहे हे कळल्यावर तुझ्या घरचे तरी कसे बरं आनंदी राहितील ..त्यांना आनंदी ठेवण्यासाठी आपण आनंदी असणं गरजेच आहे आणि आपल सुख हे कश्यात आहे हे आपणच ठरवणार ..सध्या आपल्या घरच्यांना ते कळतं नाही आहे म्हणून सगळे आपल्यावर जबरदस्ती त्यांची मर्जी थोपवत आहेत..फार तर फार वर्षभर आपलं लग्न टिकेल आणि हो काळजी नको करू आपलं जरी लग्न झालं तरी मी तुझ्याशी कधीही मर्यादा सोडून वागणार नाही. आपल्यात मैत्रीच नातं राहील.मला घाबरण्याचं काहीच कारण नाही तुला तसा मी खूप सभ्य मुलगा आहे..एका दुसऱ्या मुलाशी लग्न करून आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा मी दिलेल्या ऑफर चा विचार कर ," रघुवीर म्हणाला..

जानकी विचारात पडली तिची द्विधा मनस्थिती झाली ..काय करावं कळतं नव्हतं .पहिल्याच भेटीत एका अनोळखी मुलावर विश्वास ठेवू की नको असं तिला झालं होतं पण रघुवीर च बोलणं तिच्या अंतर्मनाला पटलं होत म्हणून त्याच्या बोलण्याचा एकदा शांतपणे विचार करावा अस तिने ठरवलं

" तू जे बोलतोय त्याचा एकदा मला विचार करायचा आहे मी लगेच तुला काही सांगू शकत नाही.. खूप जोखमीची तर गोष्ट आहेच पुन्हा आपल्या सोबत संपूर्ण कुटूंबाच्याही आयुष्याचा प्रश्न आहे..सहजासहजी मी नाही काही सांगू शकत.." जानकी म्हणाली.

" ठीक आहे विचार करून सांग मला पण लवकरात लवकर कारण घरचे आतुर झाले असतील आपला निर्णय ऐकायला" रघुवीर म्हणाला..

तितक्यात जानकी आणि रघुवीरला बोलवायला मनु आली .दोघेही तिच्या सोबत खाली गेले..देव कुटूंबियांना जानकी प्रचंड आवडली होती पण रघुवीर काय निर्णय घेतो हे ऐकण्यासाठी सगळे उत्सुक होते..अग्निहोत्री कुटूंबियांच सुध्दा तसच होत जानकी काय म्हणते यावर पुढील बोलणी होती..खाली गेल्या गेल्या जिजींनी रघुवीर ला निर्णय विचारला परंतु जानकी आणि रघुवीर या दोघांनी दोन दिवसांची मुदत मागून घेतली.दोन दिवसांनंतर काय तो निर्णय सांगतो म्हणाले..दोन्ही कुटुंब थोडेसे नाराज झाले पण आशा होती की दोघेही होकार कळवतील..
जेवणे आटपून, काही वेळ थांबल्यानंतर देव कुटूंबानी अग्निहोत्री कुटूंबाचा निरोप घेतला.जातांना रघुवीर ने ओंकार जवळ त्याचा मोबाईल नंबर जानकीला देण्यासाठी ठेवला.
आता रघुवीरला ही उत्सुकता होती जानकीच्या निर्णयाची.

क्रमशः

 
 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED