संत एकनाथ १४ श्रीकृष्ण उध्दव संवाद Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संत एकनाथ १४ श्रीकृष्ण उध्दव संवाद

एकनाथी भागवत -१४ श्रीकृष्ण उद्धव सवांद श्रीगणेशाय नमः ॥

॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण । गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥१॥ सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण । नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥२॥ अगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी । पंचभूतांपासूनी । सोडविता जनीं जनार्दनू ॥३॥ ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन । जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥४॥ जनार्दनाचें कृपाळूपण । सर्वथा नेणती जन । नेणावया हेंचि कारण । जे देहाभिमान न सांडिती ॥५॥ जननीजठरीं जन्म जाण । त्या जन्मास्तव म्हणती जन । त्या जनजन्मा करी मर्दन । यालागीं जनार्दन नाम त्यासी ॥६॥ मरण मारुनि वाढवी जिणें । जीव मारुनि जीववणें । देहीं नांदवी विदेहपणें । ऐशी जनार्दनें कृपा कीजे ॥७॥ निजभावार्थें परिपूर्ण । एकाकी देखूनियां दीन । कृपा करी जनार्दन । कृपाळु पूर्ण दीनांचा ॥८॥ जे जे भावना भावी जन । ते ते पुरवी जनार्दन । जो मागे परम समाधान । त्याचा देहाभिमान निर्दळी ॥९॥ हो कां जनार्दनासमोर । कैं आला होता अहंकार । मा तेणें घेऊनियां शस्त्र । करी शतचूर निजांगें ॥१०॥ जेवीं सूर्याचेनि उजियेडें । अंधारेंसीं रात्री उडे । तेवीं जनार्दननामापुढें । अहंकार बापुडें उरे केवीं ॥११॥ ऐकतां गुरुनामाचा गजरु । समूळ विरे अहंकारु । येथ दुःखदायक संसारु । कैसेनि धीरु धरील ॥१२॥ ज्याचें नाम स्मरतां आवडीं । संसारबांदवडी फोडी । जीवाचे जीवबंध सोडी । नामाची गोडी लाजवी मोक्षा ॥१३॥ निजमोक्षाहीवरतें । ज्याचें नाम करी सरतें । त्याच्या कृपाळूपणातें । केवीं म्यां येथें सांगावें ॥१४॥ नामप्रतापा न करवे सीमा । त्या सद्गुरुचा निजमहिमा । कैशापरी आकळे आम्हां । काय निरुपमा उपमावें ॥१५॥ अगाध कीर्ति गुरुची गहन ।

गुण गुणितां अनंतगुण । काय घ्यावें त्याचें आपण । नित्य निर्गुण निजांगें ॥१६॥ धांव घेऊनि त्यापें जावों । तंव त्या नाहीं गांवठावो । त्याचे प्राप्तीसी न चले उपावो । एक सद्भावोवांचूनी ॥१७॥ सद्भावें स्मरतां नामासी । गुरु प्रकटे स्मरणापाशीं । जेवीं सागरु सैंधवासी । ये भेटीसी निजांगें ॥१८॥ सागरा देतां आलिंगन । जेवीं सैंधव होय जीवन । तेवीं वंदितां सद्गुरुचरण । मीतूंपण हारपे ॥१९॥ सद्गरुकृपा झालिया पूर्ण । जनचि होय जनार्दन । तेव्हां जन वन विजन । भिन्नाभिन्न भासेना ॥२०॥ जन तेंचि जनार्दन । जनार्दनचि सकळ जन । हेंचि उपनिषत्सार पूर्ण । हे निजखूण जनार्दनीं ॥२१॥ येणेंचि अभिन्नार्थें येथ । सांख्य बोलिला भगवंत । उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । वस्तु सदोदित संपूर्ण

॥२२॥ सांख्य ऐकोनियां उद्धवो । विचारी आपुला अभिप्रावो । संसार वाढवी जो अहंभावो । तो अवश्य पहा हो सांडावा ॥२३॥ अहंकार जडला चित्ता । तो सांडितां न वचे सर्वथा । हें पुसों जरी श्रीकृष्णनाथा । तेणें सांख्य या अर्था निरुपिलें ॥२४॥ सकळ प्राप्तीचा अभिप्रावो । सांख्य अनुवादला देवो । अवश्य सांडावा अहंभावो । हेंचि पहा हो दृढ केलें ॥२५॥ माझेनि पराक्रमें तत्त्वतां । माझें मीपण न वचे सर्वथा । लाजिरवाणें कृष्णनाथा । किती आतां पुसावें ॥२६॥ ऐशी उद्धवाची चिंता । कळूं सरली श्रीकृष्णनाथा । बाप कृपाळु निजभक्तां । जेणें निवारे अहंता तें निजवर्म सांगे ॥२७॥ आजि उद्धवाचें भाग्य पूर्ण । जगीं उद्धवचि धन्य धन्य । ज्यासी संतुष्टला श्रीकृष्ण । न करितां प्रश्न निजगुह्य सांगे ॥२८॥ बाळक काय भूक सांगे । मग माता स्तन देऊं लागे । ते कळवळ्याचे पांगें । धांवोनि निजांगें स्तनपाना लावी ॥२९॥ त्याहूनि अतिआगळा । कृष्णीं उद्धवकळवळा । तो स्वभक्तांची भजनकळा । जाणोनि जिव्हाळा पोखित ॥३०॥ बाळक नेणे आपुली चिंता । परी माता प्रवर्ते त्याच्या हिता । तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥३१॥ त्या उद्धवाचें जें जें न्यून । तें तें करावया परिपूर्ण । प्रवर्तलासे श्रीकृष्ण । तो निजनिर्गुण उपदेशी ॥३२॥ पंचविसावे अध्यायीं जाण । सांगोनि गुणजयोलक्षण । लक्षवील निजनिर्गुण । हेंचि निरुपण निजनिष्ठा ॥३३॥ प्रकृतिपुरुषविवेक । झालियाही बुद्धिपूर्वक । जंव गुणजयो नाहीं निष्टंक । तंव वाढे सुखदुःख अहंभावो ॥३४॥ तिहीं गुणांस्तव देह झाला । देही गुणजयो न वचे केला । मूलउच्छेदू आपुला । न करवे वहिला कोणासी ॥३५॥ दांडा जन्मला वृक्षजातीसीं । तो मिळोनियां कुर्हावडीसीं । समूळ छेदवी वृक्षासी । तेवीं विवेकासीं सत्वगुण ॥३६॥ विवेका मीनल्या सत्वगुण । समूळ उच्छेदी तिनी गुण । सहजें प्रकटे निजनिर्गुण । तेव्हां गुणच्छेदन तें मिथ्या ॥३७॥ समूळ मिथ्या तिनी गुण । नित्य सत्य निजनिर्गुण । येचि अर्थीचें निरुपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत